Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/453/2016

DIMPLE RAMESHBHAI PATEL - Complainant(s)

Versus

RELIANCE NIPPON LIFE INSURANCE CO.LTD. - Opp.Party(s)

13 Feb 2017

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG, NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN , BANDRA (E), MUMBAI-400051
 
Complaint Case No. CC/453/2016
 
1. DIMPLE RAMESHBHAI PATEL
105, 6 th, FLOOR BLDG, NO. 10, B,SRA REH AB ADJ DHANJIWADI MALAD EAST, MUMBAI 400 097
...........Complainant(s)
Versus
1. RELIANCE NIPPON LIFE INSURANCE CO.LTD.
THROUGH MANAGER H.BLOCK, 1 st, FLOOR DHIRUBHAI AMBANI KNOWLEDGE CITY, NAVI MUMBAI 4007010
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.Y.MANKAR PRESIDENT
 HON'ABLE MR. S.R.SANAP MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 13 Feb 2017
Final Order / Judgement

                    तक्रारदार-  स्‍वतः

 

आदेश - मा. एम.वाय.मानकर, अध्‍यक्ष,          ठिकाणः बांद्रा (पू.   

               

                तक्रार दाखलकामी आदेश

                

1.   तक्रारदारांना दाखलकामी ऐकण्‍यात आले. तक्रार व त्‍यासोबत दाखल करण्‍यात आलेली कागदपत्रे पाहण्‍यात आली.

2.   तक्रारदार यांचेनूसार सामनेवाले यांनी त्‍यांना रू. 40,00,000/-,कर्ज हवे असल्‍यास त्‍यांनी सामनेवाले यांची रिलायंस इनक्रिजींग इन्‍कम पॉलीसी घ्‍यावी असे सांगीतले. तक्रारदार यांनी रू. 2,00,000/-, भरून ती पॉलीसी घेतली. भासविल्‍याप्रमाणे 25 दिवसामध्‍ये कर्ज न मिळाल्‍यामूळे तक्रारदार यांनी पाठपुरावा केला. त्‍यांना अजून पुढे दोन पॉलीसी घेण्‍याबाबत सांगण्‍यात आले व तसा दबाव टाकण्‍यात आला. तक्रारदार यांनी त्‍यास पूर्णतः नकार दिला. तक्रारदार यांनी त्‍यांना भासविण्‍यात आल्‍याप्रमाणे पॉलीसी नसल्‍यामूळे ही तक्रार दाखल करून विविध मागण्‍या केल्‍या आहेत.

3.   तक्रारदार यांची तक्रार ही विमा पॉलीसीवर आधारीत आहे. परंतू त्‍यांनी ती पॉलीसी दाखल केलेली नाही. तक्रारदार यांनी तक्रारीमध्‍ये फ्री लुक पिरिअड बाबत नमूद केले आहे. त्‍यामुळे असे गृहित धरले की, सामनेवाले यांनी काही बाबी स्‍पष्‍ट केल्‍या नव्‍हत्‍या किंवा काही बाबी चुकीच्‍या सांगीतल्‍या. तरी तक्रारदार यांना फ्री लुक पिरिअडमध्‍ये ती पॉलीसी रद्द करण्‍याचा अधिकार होता. तो त्‍यांनी वापरला नाही.

4.   तक्रारदार यांचेनूसार सामनेवाले यांनी लबाडी करून त्‍यांच्‍याकडून रक्‍कम प्राप्‍त केली. तक्रारदार यांनी झालेले संभाषण ध्‍वनीमुद्रीत केले आहे. अशा बाबी सिध्‍द करण्‍याकरीता भरपुर पुरावा आवश्‍यक असते व तसेच साक्षदार यांची तपासणी व उलट तपासणी महत्‍वाची ठरते. ती प्रक्रिया या मंचास समरीपध्‍दतीमध्‍ये शक्‍य नसते. तक्रारदार त्यांच्‍या हक्‍काकरीता मा. दिवाणी न्‍यायालयात दाद मागु शकतात.

   सबब खालील आदेश.      

                          आदेश 

  1. तक्रार क्र. 453/2016 ग्रा.सं.कायदा 12 (3) प्रमाणे फेटाळण्‍यात येते.
  2. तक्रारदार हे लिमीटेशनच्‍या तरतुदींच्‍या अधीन राहून योग्‍य त्‍या मा. दिवाणी न्‍यायालयात/प्राधीकरणाकडे किंवा अधिका-याकडे याबाबत दाद मागु शकतात.
  3. खर्चाबाबत आदेश नाही.
  4. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना निःशुल्‍क पाठविण्‍यात याव्‍या.
  5. अतिरीक्‍त संच तक्रारदारांना परत करण्‍यात यावे.               

npk/-

 
 
[HON'BLE MR. M.Y.MANKAR]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.R.SANAP]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.