(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) सदर प्रकरण आज प्राथमिक सुनावणीसाठी ठेवण्यात आले, परंतु सतत पुकारा करुनही अर्जदार व त्याचे वकील कुणीही हजर झाले नाही. तक्रारीचे व दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता, तक्रारीतील गैरअर्जदार हा मंचाचे कार्यक्षेञाचे बाहेरील असून, वादास कारण हे मंचाचे अधिकारक्षेञात घडल्याचा पुरावा नाही, त्याबाबत कोणताही दस्ताऐवज तक्रारी सोबत दाखल नाही. आक्षेप घेवूनही अर्जदाराने त्याची पुर्तता केलेली नाही. अर्जदारास पुरेपूर संधी देवून सुनावणी केलेली नाही. यावरुन, अर्जदारास तक्रार चालवायची नाही, हेच स्पष्ट होतो. तक्रारीतील गैरअर्जदार मंचाचे कार्यक्षेञातील असून, वादास कारण मंचाचे अधिकार क्षेञात घडले असेही दिसून येत नाही, त्यामुळे तक्रार ही स्विकारुन गैरअर्जदारास नोटीस काढण्या योग्य नाही, असे या न्यायमंचाचे मत असल्यामुळे, तक्रार प्राथमिक सुनावणीत अंतिम आदेश खालील प्रमाणे पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची तक्रार निकाली. (2) अर्जदारास सदस्य संच व मुळ दस्ताऐवज असल्यास त्याच्या झेरॉक्स प्रती रेकॉर्डवर ठेवून मुळ दस्ताऐवज परत करण्यात यावे. (3) अर्जदारास आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक :08/02/2011.
| | [HONABLE MR. Sadik M. Zaveri] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER | |