Dated the 29 Nov 2016
व्दारा मा सदस्य श्रीमती माधुरी विश्वरुपे
तक्रारदार त्यांचे वकील अॅड सहस्त्रबुध्दे यांचे प्रतिनि धी अॅड सादीका सह हजर
तक्रारदारांनी तक्रार मागे घेत असल्याबबात अर्ज दाखल केला
संचिकेची पाहणी केली असता प्रस्तुत प्रकरणात तक्रारदारांच्या सदनिकेची किंमत रुपये 177600/- असून तक्रारदारांनी सदनिकेच्या ताब्याची मागणी रुपये 5 लाख रुपये मानसिक त्रासाची रक्कम व रुपये 5000 तक्रारीच्या खर्चाच्या रकमेसह सावाले यांचेकडुन मागणी केली आहे. अशा परिस्थितीत तक्रारीचे मुल्य 20 लाखापेक्षा जास्त होत आहे.
कागदपत्राचे अवलोकन केले असता सदर तक्रार मंचाच्या आर्थिक कार्यक्षेत्राााबाहेरीत असल्यामुळे ती चालविण्यास मंचास अधिकार नाही
परंतु तक्रारदारांनी सावाले यांचेकडुन सदनिकेचा ताबा मागितला असल्याने तक्रारीचे कारण कायम आहे
तक्रारदारांच्या वकीलांनी आज रोजी सदर तक्रार ठाणे मंचातुन मागे घेण्यास परवानगी द्यावी व योग्य त्या न्यायालयात दाखल करण्याची मुभाा द्यावी असा अर्ज दिला वर नमुद कारणामुळे सदर तक्रार मागे घेण्याचा अर्ज मंजुर करण्यात येतेा
सबब खालील आदेश
1. तक्रार मागे घेण्याचा अर्ज तकारदारांनी योग्य त्या न्यायालयात नविन तक्रार दाखल करण्याची मुभा देउुन मंजुर करण्यात येतेा.
2.खर्चाबाबत आदेश नाही
3 आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टोने पाठविण्यात याव्यात
4 तक्रारीचे अति रिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
5. तक्रार वादसुचीतुन काढुन टाकण्यात यावी.