Dated the 29 Nov 2016
व्दारा मा अध्यक्ष श्रीमती म्हात्रे हजर
तक्रारदार त्यांचे वकील अॅड सहस्त्रबुध्दे यांचे प्रतिनिधी अॅड सादीका सह हजर
तक्रारदारांनी तक्रार मागे घेत असल्याबबात अर्ज दाखल केला
तक्रारदारांनी सावाले यांचेकडे बुक केलेल्या सदनिकेच्या मोबदल्याची एकुण रक्कम रुपये 22,50000/- असुन तक्रारदारांनी त्यापैकी रक्कम रुपये 6,81000/- हजार सावाले यांना दिल्याचे नमुद आहे
तक्रारीच्या प्रार्थना कलमामध्ये सावाले यांनी तक्रारदारांना फ्लॅट चा ताबा द्यावा अथवा रक्कम रुपये 11 लाख देण्याबाबतचे आदेश व्हावेत असे नमुद केले आहे त्या व्यतिरिक्त मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 3 लाख व न्यायिक खर्चापोटी 5 हजार मागणी केली आहे
कागदपत्राचे अवलोकन केले असता सदर तक्रार मंचाच्या आर्थिक कार्यक्षेत्राााबाहेरीत असल्यामुळे ती चालविण्यास मंचास अधिकार नाही
परंतु तक्रारदारांनी सावाले यांचेकडुन सदनिकेचा ताबा मागितला असल्याने तक्रारीचे कारण कायम आहे
तक्रारदारांच्या वकीलांनी आज रोजी सदर तक्रार ठाणे मंचातुन मागे घेण्यास परवानगी द्यावी व योग्य त्या न्यायालयात दाखल करण्याची मुभाा द्यावी असा अर्ज दिला वर नमुद कारणामुळे सदर तक्रार मागे घेण्याचा अर्ज मंजुर करण्यात येतेा
सबब खालील आदेश
1. तक्रार मागे घेण्याचा अर्ज तकारदारांनी योग्य त्या न्यायालयात नविन तक्रार दाखल करण्याची मुभा देउुन मंजुर करण्यात येतेा.
2.खर्चाबाबत आदेश नाही
3 आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टोने पाठविण्यात याव्यात
4 तक्रारीचे अति रिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
5. तक्रार वादसुचीतुन काढुन टाकण्यात यावी.