ग्राहक तक्रार क्र. : 123/2015
दाखल तारीख : 10/03/2015
निकाल तारीख : 14/03/2016
कालावधी: 01 वर्षे महिने 04 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. प्रविण मारुती घंदुरे,
वय – 22 वर्षे, धंदा – शिक्षण व शेती,
रा.अमृतवाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. प्रोप्रायटर,
श्री समर्थ कृषि केंद्र,
गौडगाव, ता.बार्शी जि. सोलापूर,
2. व्यवस्थापक,
कृषिधन सीडस प्रा.लि.
कृषिधन भवन, प्लॉट क्र.डी-3 ते डी-6,
अतिरिक्त एम.आय.डी.सी. औरंगाबाद रोड,
जालना -431213, ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.डी.पी.वडगावकर.
विरुध्द पक्षकारा क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.वाय.जी.सोन्नेपाटील.
विरुध्द पक्षकारा क्र.2 तर्फे विधीज्ञ : श्री.एन.व्हि.मनियार.
आदेश
मा. सदस्य श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा :
1) सदर ग्राहक त.क्र.123/2015, मंचात दि.10/03/2015 रोजी दाखल केलेली असून सदर प्रकरणात दि.27/01/2016 रोजी उभयतांनी पुरसिस दाखल केली आहे. सदर पुरसिस नुसार सदर प्रकरणी तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांच्यात न्यायालयाबाहेर आपसात तडजोड झाली असून विप यांनी नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले असल्याने सदर प्रकरण तक्रारदार चालवू इच्छीत नाही अशी विनंती करण्यात आलेली आहे. म्हणून सदर प्रकरण तडजोडीने मंजूर करुन निकाली काढण्यात येते.
आदेश
1) तक यांची तक्रार तडजोडीने मंजूर करण्यात येते.
2) तडजोड हा आदेशाचा भाग समजण्यात यावा.
2) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराने परत न्यावेत
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (श्रीमती विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.