
View 3038 Cases Against Maruti
SHRI RAMCHANDRA MARUTI ROMAN ETC. 6 filed a consumer case on 13 May 2015 against PRIYADARSHINI NAGARI SAHAKARI PATSANSTHA MARYADIT THROUGH BRANCH MANAGER ETC. 12 in the Sangli Consumer Court. The case no is CC/14/46 and the judgment uploaded on 18 Jun 2015.
नि.32
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य – सौ मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 46/2014
तक्रार नोंद तारीख : 21/02/2014
तक्रार दाखल तारीख : 07/03/2014
निकाल तारीख : 13/05/2015
1. श्री रामचंद्र मारुती रोमन
2. सौ सुमन रामचंद्र रोमन
3. कु.सुनिता रामचंद्र रोमन
4. कु.विद्या रामचंद्र रोमन
5. कु. गौरव रामचंद्र रोमन
6. कु.माया रामचंद्र रोमन
सर्व रा. बलवडी ता.खानापुर जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
तर्फे शाखाधिकारी
मु.पो.विटा, ता.खानापूर जि. सांगली
2. श्री जगदीश शहाजीराव पाटील, चेअरमन
रा.प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्था
मु.पो.विटा, ता.खानापूर जि. सांगली
3. श्री भिमराव जगन्नाथ चव्हाण, व्हा.चेअरमन
रा. लॉयन्स फायनान्स, यशवंतनगर,
भिमा प्लाझा, मायणी रोड, विटा
ता.खानापूर जि. सांगली
4. श्री सुखदेव लक्ष्मणराव शितोळे
रा.शितोळे गल्ली, विटा, ता.खानापूर जि. सांगली
5. श्री सुभाषराव निवृत्ती पवार
रा.संगम मेडिकल्सजवळ,
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
मु.पो.विटा, ता.खानापूर जि. सांगली
6. श्री उत्तमराव हंबीरराव जाधव
रा. पंचमुखी मंदीराशेजारी
विटा, ता.खानापूर जि. सांगली
7. श्री संपतराव रामचंद्र कदम
रा. उभी पेठ, जैन मंदिराशेजारी,
विटा, ता.खानापूर जि. सांगली
8. रघुनाथ बाजी पवार
रा. रेवानगर (सुळेवाडी) विटा
ता.खानापूर जि. सांगली
9. श्री परशराम दत्तात्रय जाधव
रा. पंचमुखी मंदीराशेजारी,
विटा, ता.खानापूर जि. सांगली
10. श्री रविंद्र लक्ष्मणराव भिंगारदेवे
रा. तलाठी कार्यालयाशेजारी, विटा
ता.खानापूर जि. सांगली
11. सौ शालिनी विलासराव साळुंखे
रा. तलाठी कार्यालयाशेजारी, विटा
ता.खानापूर जि. सांगली
12. सौ शारदा पोपटराव शिंदे
रा. कुर्ली, ता.खानापूर, जि. सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एम.डी.भोसले
जाबदार क्र.1 ते 12 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा : मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार, ऊपरनिर्दिष्ट तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 खाली जाबदार क्र.1 ते 12 यांनी त्यास दिलेल्या दूषित सेवेबद्दल दाखल केली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार क्र.1 यांची तक्रारदार क्र.2 ही पत्नी असून तक्रारदार क्र.3 ते 6 ही अपत्ये आहेत. जाबदार संस्था ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार स्थापन करण्यात आलेली संस्था असून तिचा मुख्य व्यवसाय बँकींग आहे. जाबदार क्र.2 हे सदर संस्थेचे चेअरमन, जाबदार क्र.3 व्हाईस चेअरमन तर जाबदार क्र.3 ते 12 हे संचालक आहेत. तक्रारदारांनी जाबदार क्र.1 या सहकारी पतसंस्थेमध्ये, खालील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे मुदत ठेव पावतीमध्ये रकमा ठेवलेल्या होत्या.
परिशिष्ट
अ.क्र. | ठेवीदाराचे नांव | पावती नंबर | ठेव तारीख | ठेव परतीची तारीख | ठेव रक्कम | व्याजदर |
1 | रामचंद्र मारुती रोमन | 543 | 6/7/2004 | 6/7/2012 | 10000 | 9% |
2 | रामचंद्र मारुती रोमन | 0560 | 21/7/2009 | 21/10/2015 | 10000 | 11.5% |
3 | रामचंद्र मारुती रोमन | 5163 | 29/7/2010 | 31/7/2012 | 16000 | 12% |
4 | रामचंद्र मारुती रोमन | 5164 | 29/7/2010 | 31/7/2012 | 16000 | 12% |
5 | रामचंद्र मारुती रोमन | 7464 | 30/7/2010 | 31/7/2012 | 20000 | 12% |
6 | सुमन रामचंद्र रोमन | 0561 | 21/7/2009 | 21/10/2015 | 10000 | 11.5% |
7 | सुमन रामचंद्र रोमन | 1359 | 06/7/2004 | 6/7/2012 | 10000 | 9% |
8 | सुमन रामचंद्र रोमन | सेव्हिंग्ज खाते क्र.291 | 15/4/2010 | 23/9/2011 | 3152 | 6% |
9 | सुनिता रामचंद्र रोमन | 0562 | 21/7/2009 | 21/10/2015 | 10000 | 11.5% |
10 | विद्या रामचंद्र रोमन | 0564 | 21/7/2009 | 21/10/2015 | 10000 | 11.5% |
11 | विद्या रामचंद्र रोमन | 5165 | 29/7/2010 | 31/7/2012 | 16000 | 12% |
12 | विद्या रामचंद्र रोमन | 5166 | 29/7/2010 | 31/7/2012 | 16000 | 12% |
13 | विद्या रामचंद्र रोमन | 1357 | 06/7/2004 | 6/7/2012 | 15000 | 9% |
14 | विद्या रामचंद्र रोमन | 7466 | 30/7/2010 | 31/7/2012 | 20000 | 12% |
15 | गौरव रामचंद्र रोमन | 0565 | 21/7/2009 | 21/10/2015 | 10000 | 11.5% |
16 | गौरव रामचंद्र रोमन | 7467 | 30/7/2010 | 31/7/2012 | 20000 | 12% |
17 | गौरव रामचंद्र रोमन | 1360 | 06/7/2004 | 6/7/2012 | 10000 | 9% |
18 | माया रामचंद्र रोमन | 0563 | 21/7/2009 | 21/10/2015 | 10000 | 11.5% |
19 | माया रामचंद्र रोमन | 5167 | 29/7/2010 | 31/7/2012 | 16000 | 12% |
20 | माया रामचंद्र रोमन | 7465 | 30/7/2010 | 31/7/2012 | 20000 | 12% |
21 | माया रामचंद्र रोमन | 1358 | 06/7/2004 | 6/7/2012 | 15000 | 9% |
|
|
|
| मूळ ठेव रक्कम | 2,83,152 |
|
तक्रारदाराची तक्रार अशी की, सदर ठेवपावत्यांच्या परिशिष्टात नमूद केलेल्या मुदतीनंतर, त्यांनी गुंतविलेल्या रकमा व्याजासह जाबदारकडून मागितल्या असता, जाबदारांनी त्या रकमा देण्यास टाळाटाळ केली. सध्या सदरची संस्था जाबदारांचे ताब्यात असून चेअरमन व इतर जाबदार संचालकांनी कर्जे उचललेली आहेत हे दि.31/12/2013 रोजीचे उपनिबंधक, सहकारी संस्था खानापूर यांचेकडून दिलेल्या यादीमधून दिसून येते. अशा प्रकारे जाबदारांनी स्वतःच कर्जे उचलून तक्रारदार यांचे रकमेचा गैरवापर करुन तक्रारदारांना रक्कम न देवून दूषित सेवा दिली आहे. अशा कथनांवरुन तक्रारदारांनी परिशिष्टात नमूद केलेली मूळ रक्कम रु.283,152/-, तक्रारदार यांनी दामदुप्पट व मुदत ठेवीची एकूण रक्कम रु.2,83,152/- ही रक्कम दि.6/7/2004 पासून पावतीवरील नमूद व्याजाप्रमाणे, ज्या ठेवपावत्यांची मूळ रक्कम दामदुप्पट झाली आहे ती दामदुप्पट रक्कम पावतीवरील नमूद व्याजाप्रमाणे देणेची व तक्रारदारांना मानसिक व आर्थिक त्रास दिल्याबदृल नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.20,000/- व दाव्याचा खर्च व प्रवाखर्चापोटी रक्कम रु.20,000/- ची मागणी केली आहे.
3. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीचे पुष्ठयर्थ नि.2 ला तक्रारदार क्र.2 यांचे शपथपत्र दाखल केले असून नि.4 या फेरिस्त सोबत परिशिष्टात नमूद केलेल्या सर्व ठेव पावत्यांच्या सत्यप्रती, जाबदार संस्थेच्या संचालक मंडळाची यादी व अधिकार पत्र इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. जाबदार क्र.1 ते 12 यांना रितसर जाहीर नोटीस बजावूनही ते नेमलेल्या तारखांना गैरहजर राहिले. सबब, त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत करणेत आला. सदरचा आदेश पारीत झालेनंतर जाबदार क्र.1 व 10 हे या प्रकरणी हजर झाले व त्यांनी सदरचा एकतर्फा आदेश रद्द करणेबाबत अर्ज सादर केला. सदर अर्जावर तक्रारदारांचे म्हणणे घेण्यात येवून तो अर्ज नामंजूर करणेत आला.
5. तक्रारदारांनी नि.27 चे फेरिस्त सोबत माहिती अधिकार कायद्यान्वये सहायक निबंधक, विटा यांचेकडून माहिती मागविणेबाबत केलेल्या अर्जाची प्रत, सदर अर्जास आलेले उत्तर, व उपनिबंधक, सहकारी संस्था, विटा यांचेकडील ऑडीट रिपोर्टची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदारांनी नि.29 ला त्यांनी तक्रारअर्जासोबत दाखल केलेले शपथपत्र हेच त्यांचे सरतपासाचे शपथपत्र समजणेत यावे अशी पुरसीस दाखल करुन नि.30 च्या पुरसीसने आपला पुरावा संपविलेला आहे.
6. तक्रारदारतर्फे नि.31 ला लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला आहे.
7. ज्याअर्थी जाबदार क्र. 1 ते 12 यांनी प्रस्तुत प्रकरणी हजर होवून तक्रारदाराची तक्रारअर्जातील कथने अमान्य केलेली नाहीत व ज्याअर्थी सदरचे प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फा चालवण्यात आले आहे, त्याअर्थी तक्रारदारांची सर्व कथने ही जाबदारांना मान्य आहेत असे गृहित धरावे लागेल. वास्तविक प्रकरण एकतर्फा चालविण्यात आल्यानंतर तक्रारअर्जातील कथनांवरुन प्रस्तुत तक्रारीचा निर्णय करणे कायद्याने या मंचाला शक्य होते, तथापि तक्रारदारास त्याच्या केसची शाबीतीकरणाची संधी या मंचाने दिलेली असून त्याने तक्रारअर्जाचे पुष्ठयर्थ सादर केलेल्या आपल्या शपथपत्रावर व नि.27 सोबत दाखल केलेल्या उपनिबंधक, सहकारी संस्था, विटा यांचे ऑडीट रिपोर्टवर भिस्त ठेवलेली आहे. नि.2 वरील शपथपत्रात तक्रारदाराने आपल्या तक्रारअर्जातील सर्व कथन शपथेवर उध्दृत केले आहे. त्या शपथपत्रातील मजकुराला जाबदारांनी कसलाही विरोध दर्शविलेला नाही. त्यामुळे ही बाब आपोआपच सिध्द होते की, तक्रारदारांनी वर नमूद केलेल्या परिशिष्टात नमूद केलेल्या मुदत ठेवी क्रमांकाच्या मुदत ठेवीमध्ये, त्या त्या ठेवपावतीत नमूद केलेल्या रकमा, त्या त्या कालावधीकरिता, जाबदार क्र.1 या पतसंस्थेमध्ये गुंतविलेल्या होत्या. तक्रारदाराचे पुराव्यावरुन, (नि.2) वरुन हे देखील सिध्द होते की, प्रत्येक मुदत ठेव पावतीच्या मुदतीनंतर तक्रारदारांनी त्या मुदत ठेव पावत्यातील रकमा व्याजासह जाबदारकडून मागितल्या असता जाबदारांनी त्या देण्यास नकार दिला व टाळाटाळ केली. यावरुन हे स्पष्टपणे शाबीत होते की, तक्रारदारांनी जाबदार क्र.1 ते 12 यांनी दूषित सेवा दिली आहे. तक्रारदार आणि जाबदार यांचेमध्ये ग्राहक आणि सेवा देणारे हे नाते असल्याचे स्पष्टपणे शाबीत होते. सबब तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. जाबदारांनी हजर होवून तक्रारदारांच्या रकमा परत न करणेबद्दलचे कुठलेही स्पष्टीकरण मंचासमोर दिलेले नाही. मुदतीनंतर मुदत ठेव पावत्यांच्या रकमा व्याजासह परत न करण्याचे कोणतेही कायदेशीर कारण जाबदार क्र. 1 ते 12 यांना दिसत नाही. त्यामुळे जाबदार क्र. 1 ते 12 यांनी तक्रारदारास दूषीत सेवा दिलेली आहे हे शाबीत होते अशा निष्कर्षास हे मंच आले आहे.
8. सबब प्रस्तुत तक्रार ही मंजूर करुन जाबदार क्र. 1 व 3 ते 12 यांनी ऊपरनिर्दिष्ट परिशिष्टात नमूद सर्व मुदत ठेव पावत्यांची रक्कम व्याजासह तक्रारदारास परत करण्याचा आदेश करणे क्रमप्राप्त आहे. सबब, जाबदार क्र. 1 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारांना त्यांचे वर परिशिष्टात नमूद ठेवपावत्यांपैकी दामदुप्पट ठेव पावत्यांवरील मुदतीनंतर देय झालेल्या दामदुप्पट रकमा अदा कराव्यात व सदर ठेवींच्या मूळ रकमेवर मुदत संपलेनंतरचे तारखेपासून ते तक्रार दाखल तारखेपर्यंत ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने व तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे असा या मंचाचा निष्कर्ष आहे. तसेच जाबदार क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या परिशिष्टातील नमूद उर्वरीत मुदत ठेवपावत्यांच्या मूळ रकमा अदा कराव्यात व सदर मुळ रकमांवर ठेव ठेवले तारखेपासून ते तक्रार दाखल तारखेपर्यंत ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने व तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे तसेच सेव्हिंग्ज खाते क्र.291 मधील शिल्लक रक्कम द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह अदा करावी असाही या मंचाचा निष्कर्ष आहे.
9. तक्रारदारास जी दूषित सेवा दिली व त्याच्या रकमा जाबदारांनी विनाकारण अडकवून ठेवल्या, त्यामुळे तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागणे हे स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे तक्रारदाराचे मागणीप्रमाणे मानसिक त्रासापोटी त्यांनी मागितलेली नुकसान भरपाईची रक्कम रु.20,000/- तक्रारदारास मिळण्यास ते पात्र आहेत. तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून तक्रारदाराने मागितलेली रक्कम रु.5,000/- ही अवास्तव व अवाजवी वाटते, सबब तक्रारदार तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षास हे मंच आले आहे.
10. प्रस्तुत प्रकरणामध्ये जाबदार क्र.2 ते 12 यांचेविरुध्द corporate veil दूर करुन त्यांना देखील जाबदार क्र.1 पतसंस्थेसोबत वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार धरण्यासारखी परिस्थिती आहे असा या मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रारअर्जामध्ये जाबदार क्र.2 ते 12 विरुध्द स्पष्टपणे आरोप केलेले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चेअरमन सह इतर जाबदार संचालकांनी जाबदार संस्थेकडून कर्जे उचलली आहेत आणि स्वतःच कर्जे काढून रकमांचा गैरवापर करुन तक्रारदारांना त्यांच्या रकमा न देवून दूषित सेवा दिली आहे असे स्पष्ट कथन केले आहे. चेअरमनसह इतर संचालकांनी जाबदार क्र.1 पतसंस्थेकडून कर्जे उचलली आहेत ही बाब दि.31/12/13 च्या उपनिबंधक, सहकारी संस्था खानापूर यांनी दिलेल्या चौकशी अहवालातून स्पष्ट होत असल्याचे कथन तक्रारदारांनी केले आहे. तसेच न.27 या फेरिस्त सोबत तक्रारदारांनी माहितीचा अधिकार कायदा 2005 अन्वये जनमाहिती अधिकारी तथा सहकारी अधिकारी, श्रेणी–1, सहायक निबंधक, सहकारी संस्था खानापूर यांचेकडून जाबदार क्र.1 पतसंस्थेच्या दि.1/4/11 ते 31/3/12 या कालावधीकरिता झालेल्या वैधानिक परिक्षणाच्या अहवालाची प्रत याकामी सादर केली आहे. त्या अहवालाचे अवलोकन करता लेखाधिका-याने स्पष्टपणे सदर संस्थेचे चेअरमन व संचालक तसेच मॅनेजर यांनी सदर संस्थेकडून स्वतःचे व आपले नातेवाईकांचे नावे कर्जे काढून परतफेड केलेली नाही व इतर अपहार केलेला आहे असे स्पष्टपणे नमूद केले आहे. या मंचाचे मते, हा अहवाल आणि जाबदारांनी केलेला अपहार गैरव्यवहार जाबदार क्र.1 ते 12 यांना याकामी संस्थेसोबत वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार धरण्यास पुरेसा आहे. सबब, हे मंच जाबदार क्र.1 ते 12 यांना जाबदार क्र.1 पतसंस्थेसोबत वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार धरीत आहे. सबब, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
- आ दे श -
1. तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या तक्रारदारांना वर नमूद परिशिष्टातील दामदुप्पट ठेव पावतींच्या मुदतीअंती देय झालेल्या दामदुप्पट रकमा द्याव्यात व सदर रकमांवर ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून ते तक्रार दाखल तारखेपर्यंत ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने व तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3. जाबदार क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या तक्रारदारांना वर नमूद परिशिष्टातील नमूद उर्वरीत मुदत ठेवपावत्यांच्या मूळ रकमा अदा कराव्यात व सदर मुळ रकमांवर ठेव ठेवले तारखेपासून ते तक्रार दाखल तारखेपर्यंत ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने व तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे तसेच सेव्हिंग्ज खाते क्र.291 मधील शिल्लक रक्कम द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह अदा करावी.
4. जाबदार क्र. 1 ते 12 यांनी संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी म्हणून रु.20,000/- द्यावेत.
5. जाबदार क्र. 1 ते 12 संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.1,000/- द्यावेत.
6. जाबदार क्र. 1 ते 12 यांनी सदर संपूर्ण रकमा या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत तक्रारदारास द्याव्यात अन्यथा तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 किंवा 27 खाली प्रकरण दाखल करता येईल.
7. प्रस्तुत निकालपत्रांच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क द्याव्यात.
सांगली
दि. 13/05/2015
( सौ मनिषा कुलकर्णी ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.