| Complaint Case No. CC/21/26 | | ( Date of Filing : 10 Feb 2021 ) |
| | | | 1. Dr.Sau.Seema Ram Sharma | | 7,SBI Colony,SBI shastrinagar Branch jawal,mount convent road,Chandrapur | | Chandrapur | | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. Prince Calibration Proprietor Shri.Ravi Kalda | | Gayatri Mandir samor,Datala Road,Chandrapur | | Chandrapur | | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्या) (पारीत दिनांक २८/०४/२०२२ ) - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५(१) अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्ता हे शासकीय रुग्णालयात मेडीकल ऑफिसर म्हणून काम करीत असून त्यांची मुलगी पायल हलदर यांचेशी लग्न जुळल्याने दिनांक १४/२/२०२० ही लग्नाची तारीख ठरल्यामुळे दिनांक १५/१०/२०१९ रोजी प्रिन्स सेलीब्रेशन लग्न समारंभासाठी बुकिंग चार्जेस रुपये १०,०००/- देवून बुक केले. लग्न हॉलसाठी ठरलेली रक्कम प्लेटच्या हिशोबाने अंदाजे ३ ते ४ हजार लाखापर्यंत जाणार होती. त्यामुळे कधी ना कधी रक्कम दणे सल्यामुळे विरुध्दपक्षाला रुपये ९०,०००/- पुन्हा दिले. अशाप्रकारे रुपये १,००,०००/- ची रशीद विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला पतीच्या नावाने दिली परंतु काही कारणास्तव तक्रारकर्त्याने मुलीचे लग्न रद्द झाल्यामुळे दिनांक ४/२/२०२० व दिनांक ५/२/२०२० रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना कळविले त्याचप्रमाणे व्हॉट्स अॅप व्दारे सुध्दा विरुध्द पक्ष यांना लग्न रद्द झाल्याचे कळविले. बुकींग फॉर्म मधील अटी व शर्तीनुसार रुपये १०,०००/- बुकींग रद्द झाल्यास परत मिळणार नव्हते.त्यामुळे तक्रारकर्त्याने बुकींग रक्कम रुपये १०,०००/- कापून रुपये ९०,०००/- विरुध्द पक्ष यांना परत मागितले परंतु विरुध्द पक्ष यांनी सदर रक्कम परत देण्यास नकार दिला. वारंवार विनंती करुनही रक्कम देण्यास विरुध्द पक्ष यांनी नकार दिल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार विरुध्दपक्ष यांचे कडून बुकींग रक्कम व्यतिरिक्त रक्कम रुपये ९०,०००/-, शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्कम रुपये १,००,०००/- तसेच तक्ररीच्या खर्चाची मागणी व्याजासकट विरुध्द पक्ष यांचेकडून मिळावे म्हणून सदर तक्रार दाखल केली आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष हे तक्रारीत उपस्थित राहून तक्रारीतील कथन खोडून काढीत त्याच्या विशेष कथनात नमूद केले की, विरुध्दपक्ष यांचे सभागृह तक्रारकर्त्याच्या पतीने बुक केले होते तसेच व्हॉट्स अॅप वरील मॅसेज तसेच दस्तक्रमांक ३ वरील पावती देखील तक्रारकर्त्याने पतीच्या नावाने असल्यामुळे सदर तक्रार दाखल करण्याचा अधिकार तक्रारकर्त्याला नाही. सबब सदर तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. तक्रारकर्ता व तिच्या पतीने विरुध्दपक्ष यांचेकडून कुठलीही सेवा घेतली नाही. जर त्याच्या मुलीचे लग्न ठरल्या तारखेवर झाले असते तर ते विरुध्द पक्षाचे ग्राहक झालेअसते त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही सेवेत न्युनता दिली नाही. सबब विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्याचे ग्राहक ठरत नाही. दिनांक १४/२/२०२० रोजी तक्रारकर्त्याने मुलीच्या लग्नासाठी प्रिन्स सेलीब्रेशन बुक केले होते तसेच अटीप्रमाणे ठरलेल्या तारखेला १५ दिवसाअगोदर एकूण येणा-या खर्चापैकी ८० टक्के रक्कम विरुध्द पक्षाकडे भरणा करणे अनिवार्य होते. परंतु सदर ८० टक्के रक्कम तक्रारकर्त्याने भरणा केली नाही. दिनांक ५/२/२०२० रोजी डॉ. राय शर्मा यांनी व्हॉट्स अॅपवर मॅसेज करुन कळविले की, दिनांक १४/०२/२०२० चे ठरलेले लग्नकार्य २ दिवस अगोदर रद्द झाल्याचे कळविले तेव्हापासून दिनांक १४/२/२०२० रोजी खुप कमी दिवसाचा अवधी असल्यामुळे विरुध्दपक्ष सदर तारखेला कुणालाही सभागृह किरायाने देऊ शकले नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांचे ४ ते ५ लाखाचे नुकसान झाले. लग्न कार्य रद्द झाल्याची बाब विरुध्द पक्षाला कळविल्यानंतर रक्कम परत मागण्यात आली परंतु त्यावेळेस विरुध्द पक्ष यांनी सूचविले की, तुमची जमा रकमेपैकी ५० टक्के रक्कम ही विरुध्द पक्षाकडे अॅडव्हान्स म्हणून जमा राहील व जेव्हा लग्नकार्य राहील तेव्हा सदर रक्कम वळती करण्यात येईल परंतु हे आरोप खोटे असून तक्रारकर्त्याने अधिकार नसतांना विद्यमान आयोगात तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केली सबब यात ग्राहक सेवा संबंध नसल्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, शपथपञ, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर तसेच परस्पर विरोधी कथनाचा सखोल विचार करुन न्यायनिर्णयासाठी आयोगाने खालिल कारणमीमांसा व निष्कर्षे विचारार्थ घेण्यात आले.
कारणमीमांसा - तक्रारकर्ता यांनी त्यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यासाठी विरुध्द पक्ष यांचे सभागृह बुक केले होते व सदर बुकींगसाठी तक्रारकर्त्याने दिनांक १५/१०/२०१९ रोजी बुकींग चार्जेस रुपये १०,०००/- तसेच समोरील खर्च पाहता ३ ते ४ लाखापर्यंत जाणार हे लक्षात घेवून बुकींगच्या रकमे व्यतिरीक्त रुपये ९०,०००/- असे एकूण रुपये १,००,०००/- दिले. त्याबद्दलची पावती दस्त क्रमांक १ वर आहे. सबब तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष हे ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याच्या मुलाचा विवाह काही कारणामुळे रद्द झाल्यामुळे दिनांक ४/२/२०२० व दिनांक ५/२/२०२० रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना कळविले तसेच व्हॉट्स अॅप व्दारे मॅसेज करुन विरुध्द पक्ष यांना लग्न रद्द झाल्याचे कळविले. त्याबद्दल दस्त तक्रारकर्त्याने तक्रारीत २ दाखल केलेला आहे. बुकींग फॉर्म मधील अटी व शर्ती यातून बुकींग रक्कम रुपये १०,०००/- कमी करुन बाकीची रक्कम रुपये ९०,०००/- परत करावी म्हणून विरुध्द पक्ष यांना दुरध्वनीव्दारे तसेच नोटीस पाठवूनही कळविले परंतु विरुध्द पक्ष यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली, ही कृती विरुध्द पक्षाची सेवेतील ञुटी आहे तसेच विरुध्द पक्ष यांना दुस-या बुकींगसाठी जाहिरात देवून बुकींग मिळविण्याकरिता संधी उपलब्ध असतांना कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसून येते नाही तसेच विरुध्द पक्ष यांचे म्हणणे की तक्रारकर्त्याचे बुकींग रद्द झाल्यामुळे त्यांचे ४ ते ५ लाखाचे नुकसान झालेले आहे परंतु विरुध्द पक्ष यांनी नमूद तारखेत इतर कोणत्याही ग्राहकाचे सदरचे सभागृह बुक केलेले नाही किंवा ते त्या तारखेस बुकींग विना रिकामे राहिले हे सिध्द करण्यासाठी कोणताही पुरावा आयोगासमोर दाखल केलेला नाही. याउलट तक्रारकर्त्याने त्यांची तक्रार सिध्द करण्यासाठी वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केलेले आहे. याशिवाय मा. राज्य आयोग, परिक्रमा खंडपीठ, कोल्हापूर यांनी पारित केलेल्या तक्रार क्रमांक A/16/3013 (Arisen out of order dated 29/9/2016 in CC No. 121/2016 of District Consumer Forum, Kolhapur), राम मंगल सांस्कृतीक भवन वि. आनंद दत्ताञय कोळी, दिनांक २१ ऑगस्ट २०१८ या न्यायनिवाड्याचा आधार घेतला तसेच या प्रकरणतील तक्रारकर्त्याने दाखल कागदपञाचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना बुकींग रक्कम वजा करुन बाकीची रक्कम रुपये ९०,०००/-परत करावी म्हणून वेळोवेळी विनंती व कायदेशीर नोटीस पाठवूनही विरुध्द पक्ष यांनी ती रक्कम परत न केल्यामुळे तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता केली आहे ही बाब सिध्द होत असल्यामुळे आयोगाच्या मते विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला बुकींग रक्कम रुपये १०,०००/- वजा करुन बाकीची रक्कम रुपये ९०,०००/- तक्रारकर्त्याला परत करावी तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक ञासापोटी आणि तक्रारीचा खर्च देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष यांचेवर राहील.
उपरोक्त विवेचनावरुन आयोग खालिल आदेश पारित करीत आहे. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. २६/२०२१ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष यांचेकडे विवाह सोहळ्यासाठी दिलेली रक्कम रुपये ९०,०००/- परत करावे.
- तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्कम रुपये १०,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |