Maharashtra

Gondia

CC/15/147

SHASHIKUMAR SHOBHELAL PATEH - Complainant(s)

Versus

POOJA AGENCIES - Opp.Party(s)

MR.K.R.DIVEWAR

31 Oct 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/15/147
( Date of Filing : 14 Dec 2015 )
 
1. SHASHIKUMAR SHOBHELAL PATEH
R/O.T.B.TOLY, CHARCH ROAD, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. POOJA AGENCIES
R/O.GANESH NAGAR TURNING, CURCAS GROUND ROAD, GOUSHALA WARD, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
2. CEAT LIMITED
R/O.NITA ENTERPRISES, PLOT NO.1/8, KHADAN AREA, NEAR JAWAHARLAL NEHARU COLLEGE, WADI, NAGPUR-440023, REG. OFFICE 463, ANI BEZANT ROAD, MUMBAI-400030
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. B. B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. S. B. RAIPURE MEMBER
 HON'BLE MR. S.R AJANE MEMBER
 
For the Complainant:
तक्रारकर्त्‍याचे वकील श्रीमती. एच.एस.पतेह हजर.
 
For the Opp. Party:
विरूध्‍द पक्षातर्फे वकील श्री. एम.के.गुप्‍ता हजर.
 
Dated : 31 Oct 2018
Final Order / Judgement

         तक्रारकर्ता तर्फे त्‍यांचे वकील :  श्रीमती. एच.एस पतेह हजर.

         विरूध्‍द पक्षातर्फे वकील      : श्री. एम.के.गुप्‍ता हजर.

                      (युक्‍तीवादाच्‍या वेळी)

निकालपत्रः- श्री.सु.रा.आजने सदस्‍य ,  -ठिकाणः गोंदिया

                                                                                     न्‍यायनिर्णय

                                                                        (दिनांक 31/10/2018 रोजी घोषीत)

 

1.  तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-

 

2.  मंचाचे मा. अध्‍यक्ष हे यापूर्वी सदर प्रकरणातील विरूध्‍द पक्ष क्र 2 च्‍या पॅनेलवर होते. मा. अध्‍यक्षांच्या आदेशानूसार सदरहू प्रकरण मंचाचे दोन्‍ही सदस्‍यांचे विशेष पीठासमोर युक्‍तीवादाकरीता ठेवण्‍यात आले.   

 

3.  सदर प्रकरणात तक्रारदार श्री. शशीकुमार शोभेलाल पतेह वय- 40 वर्ष, हा गोंदिया येथील रहिवाशी असून, तक्रारकर्त्‍यांनी गोंदिया स्थित पुजा एंजन्‍सी गणेश नगर, गोंदिया जि. गोंदिया यांचेकडून आपल्‍या दोन चाकी वाहनाकरीता विरूध्‍द पक्ष क्र 2 सीऐट.लि. कंपनीने बनविलेला टायर दि. 01/10/2012 रोजी रू. 1,450/-,या किंमतीत विकत घेतला. त्‍याचा इनवॉईस नं. St-Oct12/A-0004 आहे.

 

4.  तक्रारकर्त्‍याच्‍या कथनानूसार विरूध्‍द पक्ष क्र 1 यांनी तसेच विरूध्‍द पक्ष क्र 2 यांनी टायरची लाईफ टाईम रिप्‍लेसमेंट गॅरंटी सांगीतली व तसेच विरूध्‍द पक्ष क्र 1 यांनी आपल्‍या दुकानात सीऐट. टायर कंपनीचे रिप्‍लेसमेंट गँरटीचे बोर्ड सुध्‍दा लावलेले आहेत. विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 हे ग्राहकांना लुभाऊ प्रलोभन देऊन त्‍यांची फसवणुक करतात. तक्रारकर्त्‍याने वरील नमूद विकत घेतलेला टायर याने ग्रीप जाईंन्‍ट – क्‍वाईट सोडल्‍यामूळे तक्रारकर्ता दि. 18/05/2015 ला दुषित डिफेक्‍टीव्‍ह टायर घेऊन विरूध्‍द पक्ष क्र 1 कडे गेला व त्‍यास टायर दाखविला व नविन टायरची मागणी केली असता, विरूध्‍द पक्ष क्र 1 याने तक्रारकर्त्‍याला बिल नं- 61 ची पावती दिली व टायर दि. 18/05/2015 ला जमा करून घेतला व कंपनीला पाठवू म्‍हणून सांगीतले. विरूध्‍द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्त्‍यांकडून मोबाईल नंबर मागीतला व पावतीवर नंबर लिहीला. तसेच, तुम्‍हाला एक महिन्‍यानंतर कंपनीकडून मॅसेज येईल असे सांगीतले परंतू कंपनीकडून काहीच मॅसेज आले नाही. तक्रारकर्ता एक महिन्‍यानंतर दि. 21/06/2015 ला पुन्‍हा विरूध्‍द पक्ष क्र 1 कडे गेला व टायरची विचारणा केली असता,  विरूध्‍द पक्षकार क्र 1 यांनी सांगीतले की, एसएमएस आपणांस लवकरच येईल. तक्रारकर्ता यांनी वारंवार विरूध्‍द पक्ष क्र 1 व विरूध्‍द पक्ष क्र 2 यांना दुरध्‍वनीवरून विचारणा केली परंतू काहीच प्रतिउत्‍तर मिळाले नाही. शेवटी तक्रारकर्ता विरूध्‍द पक्ष क्र 1 यांच्‍याकडे गेल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष क्र 2 यांनी प्रकरणातील विरूध्‍द पक्ष क्र 1 में. मोना टायर शॉपी यांचे नावे दि. 05/09/2015 चे पत्रान्‍वये कळविण्‍यात आले की, “The Tyre/Tube/Flap sent by you under claim, as  per following details has been carefully examined & we found that the Product has failed due to TIME BARRED / OLD PRODUCT  the failure is not due to any manufacturing  defect of the product & not covered under our warranty policy”.

    

      विरूध्‍द पक्ष क्र 1 यांनी वरील नमूद  कारणामूळे तुम्‍हचा क्‍लेम मिळाला नाही. जर तुम्‍ही नविन टायर घेतला तर तुम्‍हाला रू.300/-,‍चे डिस्‍काऊंट मिळेल असे सांगून विरूध्‍द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्त्‍याला परत पाठविले व तक्रारकर्त्‍याचे काहीच म्हणणे एैकून घेतले नाही.  तक्रारकर्ता जेव्‍हा दुषीत टायर घेऊन विरूध्‍द पक्ष क्र 1 कडे गेला तेव्‍हा विरूध्‍द पक्ष क्र 1 यांनी सांगीतले की, तुम्‍हाला दुषीत टायरच्‍या मोबदल्‍यात नविन टायर मिळेल पण आता तुम्‍ही नविन टायर सध्‍या काम चालविण्‍याकरीता विकत घेऊन जा व नंतर तुम्‍हच्‍या दुषीत टायरच्‍या मोबदल्‍यात नविन टायर मिळेल तेव्‍हा तुम्‍हाला विकत घेतलेल्‍या टायरचे पैसे परत मिळतील. विरूध्‍द पक्ष क्र 1 च्‍या म्‍हणण्‍यानूसार अर्जदाराने आपला दुषीत टायर विरूध्‍द पक्ष क्र 1 यांच्याकडे जमा केला व त्‍याचदिवशी विरूध्‍द पक्ष क्र 1 यांच्‍याकडून दुसरा टायर नगदी रू. 1,700/-,देऊन विकत घेतला.

5.  तक्रारकर्ता याने दुषीत टायर स्‍वतःच्‍या उपयोगाकरीता विकत घेतला असल्‍याने तक्रारकर्ता उपभोक्‍ताच्‍या क्षणीक मोडत आहे. त्‍यामुळे दुषीत टायर परत घेऊन नविन टायर देण्‍याची संपूर्ण जबाबदार विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 यांची आहे. तक्रारकर्त्‍याचा प्‍लॉट खरेदी विक्रीचे व्यवसाय आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला वारंवार प्‍लॉट दाखविण्‍यासाठी जावे लागले. परंतू तक्रारकर्त्‍याला आपले जरूरीचे काम सोडून वारंवार विरूध्‍द पक्ष क्र 1 यांच्याकडे जावे लागले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे जवळपास रू. 75,000/-,चे नुकसान झालेले आहे. तक्रारकर्त्‍याला विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 कडून मानसिक त्रास सहन करावा लागला. करीता नुकसान भरपाई व नविन सी.एट. चा टायर मिळण्‍याकरीता तक्रारकर्त्‍यांनी या मंचात तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्‍यानी आपल्‍या तक्रारीत खालील प्रमाणे मागणी केली आहेः-

अ) तक्रारकर्त्‍यांनी दुषित टायर जमा करून नविन टायर बद्दल

        रू. 1,700/-,ची मागणी केली आहे.

ब) तक्रारकर्त्‍यानी विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 यांच्‍याकडून मानसिक, शारीरीक तसेच आर्थिक नुकसान भरपाईबाबत रू.75,000/-, तसेच तक्रारीचा खर्च रू. 20,000/-,देण्‍यात यावा अशी मागणी केली आहे.  

6.   विरूध्‍द पक्षांनी आपल्‍या लेखीजबाबात कथन केले आहे की, विरूध्‍द पक्षांनी ग्राहकास कधीही प्रलोभन दिले नाही. तक्रारकर्त्‍याने वास्‍तविक तथ्‍य मंचापासून लपविले व दाबवून ठेवले आहे व अर्ध सत्‍य उघड केले आहे. जाहिरातीमध्‍ये (*)  चिन्‍ह छापले आहे. ते हे दर्शवितो की, लेखी अटी लागु. तक्रारकर्त्‍याने जाहीरात त्‍या संदर्भाने वाचली नाही आणि स्‍वतःचे चुकीचे, दुषीत दृष्‍य व विचार बनविले आहे. प्रत्‍येक वस्‍तुला स्‍वतःचा आयुष्‍य असतो. तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेला टॉयर नॉन ट्रक टायर या प्रकारामध्‍ये येतो. ज्‍याला उत्‍पादित तारखेपासून 36 महिने (Life) आयुष्‍य असतो. विरूध्‍द पक्ष क्र 1 ने कबुल केले आहे की, तक्रारकर्त्‍यानी दि. 18/05/2015 ला डॅमेज टायर त्‍यांच्‍याकडे जमा केला. तक्रारकर्त्‍याने मंचात सादर केलेले दि. 05/09/2015 चे पत्र हे विरूध्‍द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्त्‍याची तक्रार विचारात घेतल्‍याबाबतचा तात्‍काळपणा व वक्‍तशिरपणा दर्शवित आहे. विरूध्‍द पक्ष क्र 2 चे दि. 05/09/2015 चे पत्र तक्रारकर्त्‍याच्‍या प्रकरणाचे उत्‍तर आहे. तक्रारकर्त्‍याने दि. 01/10/2012 ला टायर विकत घेऊन, दि. 18/05/2015 पर्यंत वापर केला. म्‍हणजेच तीन वर्षापेक्षा जास्‍त. त्‍यामुळे तो मुदतबाहय आणि जुनी वस्‍तु (Old Product ) आहे. विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे क्‍लेमबद्दल बरोबर उत्‍तर दिले आहे. कंपनी व विक्रेते यांचा उद्देश आणि फोकस हा नेहमी ग्राहकाला त्रास दयायचा नसून, बाजार स्‍पर्धेत ग्राहकाचा इंटरेस्‍ट सुरक्षित ठेवणे आहे. विरूध्‍द पक्षांनी असे कथन केले आहे की, तक्रारकर्त्‍याने असा कोणताही आरेाप केला नाही की, टायरमध्‍ये निर्मिती दोष आहे. टायरचे आयुष्‍य (Life) कमी होण्‍यास अनेक गोष्‍टी कारणीभूत ठरतात. ज्‍याप्रकारे- रफ ड्रॉयव्हिंग (Rough Driving)  रस्‍त्‍यावरील गिट्टी, रस्‍त्‍यावरील गड्डे, रस्‍त्‍याचा उथळ व खडतर भाग, गाडीचे Alignment,  Balancing टॉयरमधील हवा व ओव्‍हर लोडींग, शॉकअप इत्‍यादी. तक्रारकर्त्‍याचा कामधंदा हा प्‍लॉटची विक्री व खरेदी करणे आहे. त्‍याकरीता तक्रारकर्त्‍याला ग्रामीण भागामध्‍ये नेहमी जावे लागते. की, ज्‍याठिकाणी रस्‍त्‍याची स्थिती खराब असते. विरूध्‍द पक्ष क्र 1 हा सिएट टायर कंपनीचा विक्रेता आहे आणि टायरची वारंटी कंपनीने दिली आहे. कंपनीने विक्रेत्‍याला वारंटी कालावधीमध्‍ये टायर बदलवून देण्‍याबाबत प्राधीकृत केले आहे. की, जोपर्यंत टायर टेक्‍नालॉजीचे एक्‍सपर्ट किंवा इंजिनीअर, टायरमधील दोष प्रयोग शाळेतील तपासणी केल्‍याशिवाय प्रमाणित करीत नाही. विरूध्‍द पक्षाने लेखीजबाबासोबत मॅनेजर एमआरएफ लि. विरूध्‍द के. सुदेवान अपील क्र. 936/2004, निकाल तारीख. 29/03/2010 या प्रकरणात मा. राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, थिरूअनंतपुरम यांनी दिलेल्‍या निकालाची प्रत सादर केली आहे.

7. मा. दोन सदस्‍यांच्‍या पिठाचे समोर युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याचे वकील श्रीमती.एच.एस.पतेह व विरूध्‍द पक्षकाराचे वकील श्री. एम.के.गुप्‍ता यांचा तोंडीयुक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

8.   विरूध्‍द पक्ष क्र 2 ला नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नाही. करीता दि. 20/07/2016 रोजी मंचाने विरूध्‍द पक्ष  क्र 2 विरूध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारीत केला. प्रस्‍तुत मंचाने तक्रारकर्त्‍यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखीयुक्‍तीवाद तसेच विरूध्‍द पक्ष क्र 1 यांनी त्‍यांची लेखीकैफियत, पुराव्‍याचे शपथपत्र, लेखीयुक्‍तीवाद, यांचे वाचन केले आहे. त्‍यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्‍यात येतात.

क्र..

             मुद्दे

     उत्‍तर

1

 तक्रारदार ग्रा.सं.कायदा कलम 2(1),डी प्रमाणे ग्राहक होतात काय?

     होय.

2.

विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात  कसुर केली  ही बाब तक्रारदार सिध्‍द करतात काय?

     नाही.

3

अंतीम आदेश

तक्रारकर्त्‍याची तक्रार  खारीज करण्‍यात येते.

 

                          कारण मिमांसा

मुद्दा क्र. 1 व 2 ः-  

9.   तक्रारकर्ता हा विरूध्‍द पक्षाचा ‘ग्राहक’ असून, विरूध्‍द पक्ष क्र 1 हे विक्रेते आहेत व विरूध्‍द पक्ष क्र 2 हा निर्माता आहे. विरूध्‍द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्त्‍याला विरूध्‍द पक्ष क्र 2 यांनी निर्मीत केलेला दोन चाकी वाहनाचा टायर दि. 01/10/2012 ला रू. 1,450/-,किंमतीत विकला. तक्रारकर्त्‍याने टायरमध्‍ये दोष आढळल्‍यानंतर, विरूध्‍द पक्ष क्र 1 यांच्याकडे दि. 18/05/2015 ला टायर बदलवून मिळण्‍याकरीता टायर जमा केला. विरूध्‍द पक्ष क्र 1 यांनी वरील नमूद टायर, विरूध्‍द पक्ष क्र 2 यांच्याकडे पाठविला. विरूध्‍द पक्ष क्र 2 यांनी त्‍यांच्‍याकडे विरूध्‍द पक्ष क्र 1 यांनी जमा केलेला टायरचा क्‍लेम नाकारला. (सदरची टायर मुदतबाहय व जुनी आहे म्‍हणून तुम्‍हचा क्‍लेम मिळणार नाही.) विरूध्‍द पक्ष क्र 1 यांचे कथनानूसार तक्रारकर्त्‍याला टायर खरेदी करतेवेळी 36 महिन्‍याची वारंटी विरूध्‍द पक्ष क्र 1 यांनी दिली होती व ती तक्रारकर्त्‍याला मान्‍य आहे. तक्रारकर्त्‍याने खरेदी तारखेपासून म्‍हणजेच दि. 01/10/2012 पासून, दि. 18/05/2015 पर्यंत जवळपास 2 वर्ष 7 महिने टायर वापरला. तक्रारकर्त्‍याचा व्यवसाय हा प्‍लॉट खरेदी व विक्री करण्‍याचा आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला नेहमी ग्रामीण भागात व्‍यवसायाकरीता जावे लागते. विरूध्‍द पक्षकारांनी त्‍यांच्‍या लेखीकैफियतीमध्‍ये नमूद केले आहे की, तक्रारकर्त्‍याचा गाडीचा जास्‍त वापर हा ग्रामीण भागात असल्‍यामूळे टायरमध्‍ये झीज ही रस्‍त्‍याची स्थिती, ज्‍याप्रकारे- रफ ड्रॉयव्हिंग (Rough Driving)  रस्‍त्‍यावरील गिट्टी, रस्‍त्‍यावरील गड्डे, रस्‍त्‍याचा उथळ व खडतर भाग, गाडीचे Alignment,  Balancing टॉयरमधील हवा व ओव्‍हर लोडींग, शॉकअप इत्‍यादी कारणामुळे झाली व टायर हा खराब झाला. विरूध्‍द पक्षाने त्‍यांच्‍या लेखीकैफियत व त्‍यांच्‍या तोंडीयुक्‍तीवादाद्वारे तक्रारकर्त्‍याने टायरमध्‍ये निर्मीत दोष असल्‍याबाबत तज्ञ अहवाल दाखल केले नाही किंवा त्‍याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. विरूध्‍द पक्षाने लेखीजवाबासोबत मॅनेजर एमआरएफ लि. विरूध्‍द के. सुदेवान अपील क्र. 936/2004, निकाल तारीख. 29/03/2010 या प्रकरणात मा. राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, थिरूअनंतपुरम यांनी दिलेल्‍या निकालाची प्रत सादर केली आहे. ज्‍याचा परिच्‍छेद क्र. 8 मध्‍ये असे नमूद आहे की, :-  It is pertinent to note that the first opposite party requested the Forum below to forward the tyre to get an expert as provided under section 13 (1)  (c) of the Consumer Protection Act, 1986. It is a well settled position that it is for the person who alleges manufacturing defect to prove that fact regarding manufacturing defect. It is also the settled position that the alleged manufacturing defect in the goods is to be tested in a laboratory as provided under Section 13 (1) (c) of the Consumer Protection Act, 1986.  But in this case no such procedure was adopted by the Forum below to detect the alleged defect in the goods (tyre) purchased by the complainant from the opposite parties. Thus, in effect the complaint failed to substantiate his case regarding manufacturing defect in the disputed tyre bearing No. 57103622729. If that be so, the forum below has gone wrong in coming to the conclusion that the disputed tyre was having manufacturing defect. (emphasis supplied)

    

      मा. राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, थिरूअनंतपुरम यांनी एमआरएफ लि. विरूध्‍द के. सुदेवान अपील क्र. 936/2004, निकाल तारीख. 29/03/2010 व मा. राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांनी त्‍यांची अपील क्र. 118/2013 व 334/2013 निकाल तारीख. 08/06/2015 च्‍या न्‍यायनिर्णयावर भिस्‍त ठेवून या मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ता विरूध्‍द पक्ष क्र 2 यांनी निर्मीत केलेल्‍या टायरमध्‍ये, निर्मिती दोष असल्‍याबाबतचा तज्ञ अहवाल सादर करण्‍यात अपयशी ठरला आहे. सबब, प्रकरणातील वस्‍तुस्थिती व पुराव्‍याचा विचार करता, हा मंच मुद्दा क्र 1 चा निःष्‍कर्ष होकारार्थी व 2 चा निःष्‍कर्ष नकारार्थी नोंदवित आहोत.

   वरील चर्चेवरून व नि:ष्‍कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.    

              आदेश

1.  तक्रारकर्त्‍याची तक्रार  खारीज करण्‍यात  येते.

2.  खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.

3. न्‍यायनिर्णयाच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

4.  अतिरीक्‍त संच तक्रारकर्त्‍याला परत करण्‍यात यावे.  

 

 
 
[HON'BLE MR. B. B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. S. B. RAIPURE]
MEMBER
 
[HON'BLE MR. S.R AJANE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.