| Complaint Case No. CC/414/2022 | | ( Date of Filing : 07 Jun 2022 ) |
| | | | 1. SMT. JYOTI PRAKASH JUMDE | | R/O. C/O. SUBHASH RAHATE, NEAR GANESH VYAS MANDIR, SAI NAGAR, WARDHA-4420001 | | WARDHA | | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. PITRUCHAYA CO-OP. HOUSING SOCIETY, THROUGH ITS SECRETARY RAMDAS PUJARAMJI PANDE | | R/O. MATRUCHAYA LAYOUT, NEAR NAKA (KADU NAGAR) HUDKESHWAR ROAD, NAGPUR-440024 | | NAGPUR | | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | आदेश मा. अध्यक्ष, श्री. अतुल डी. अळशी यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, तिने विरुध्द पक्षाच्या पितृछाया को-ऑप. हाऊसिंग सोसायटीचे सदस्य अशोक विनायकराव वाघमारे यांच्याकडून मौजा- चिंचभुवन, प.ह.नं. 43, खसरा नं. 33/1, सिटी सर्व्हे नं. 84, शिट नं. 743 ता.जि.नागपूर येथील प्लॉट क्रं. 25, एकूण क्षेत्रफळ 1500 चौ.फु. हा एकूण रक्कम रुपये 7,50,000/- एवढया किंमतीत विकत घेण्याकरिता अग्रिम राशी म्हणून रुपये 75000/- देऊन दि. 02.09.2010 रोजी बयाणापत्र केले असून उर्वरित रक्कम रुपये 6,75,000/- नोंदणीकृत विक्रीपत्राच्या वेळी देण्याचे ठरले होते. त्यानंतर तक्रारकर्तीने दि. 16.10.2010 रोजी रुपये 55,000/- धनादेशाद्वारे अदा केले होते. अशोक विनायकराव वाघमारे यांच्या मृत्युनंतर विरुध्द पक्ष सोसायटीचे सचिव रामदास पुजारामजी पांडे यांनी प्लॉटचा स्थावर संपत्तीचा कब्जापत्र दि. 24.02.2011 रोजी दिलेला आहे. त्याचप्रमाणे विरुध्द पक्षाच्या मागणीप्रमाणे तक्रारकर्तीने प्लॉटच्या एन.ए.टी.पी.करिता संस्थेचे अध्यक्ष फत्तुजी व्ही. गजभिये यांना एफ.ई.एफ.टी द्वारे रुपये 30,000/- दि. 09.06.2016 ला अदा केले आहे.
- तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, तिने विरुध्द पक्षाकडे अनेक वेळा प्लॉटचे विक्रीपत्र करुन देण्याची मागणी केली असता तिच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला 11.04.2022 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्षाने त्याची दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करून मागणी केली की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला उपरोक्त नमूद प्लॉट क्रं. 25 चे कायदेशीर विक्रीपत्र करुन द्यावे. अथवा तक्रारकर्तीला आजच्या बाजारभावाप्रमाणे सदरहू प्लॉटची रक्कम अदा करण्याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च ही देण्याचा आदेश द्यावा.
- विरुध्द पक्षाला आयोगा मार्फत पाठविण्यात आलेली नोटीस प्राप्त होऊन देखील विरुध्द पक्ष आयोगा समक्ष हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 18.08.2022 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तऐवज व तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर निकाला करिता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले
- तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय
2 विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय ? होय 3 काय आदेश ? अंतिम आदेशानुसार कारणमीमांसा - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाच्या पितृछाया को-ऑप. हाऊसिंग सोसायटीत असलेले सदस्य अशोक विनायकराव वाघमारे यांच्याकडून मौजा- चिंचभुवन, प.ह.नं. 43, खसरा नं. 33/1, सिटी सर्व्हे नं. 84, शिट नं. 743 ता.जि.नागपूर येथील प्लॉट क्रं. 25, एकूण क्षेत्रफळ 1500 चौ.फु. हा एकूण रक्कम रुपये 7,50,000/- एवढया किंमतीत विकत घेण्याकरिता अग्रिम राशी म्हणून रुपये 75,000/- देऊन दि. 02.09.2010 रोजी बयाणापत्र केले असून उर्वरित रक्कम रुपये 6,75,000/- नोंदणीकृत विक्रीपत्राच्या वेळी देण्याचे ठरले होते हे नि.क्रं. 2 (1) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. तसेच विरुध्द पक्ष सोसायटीचे सचिव रामदास पुजारामजी पांडे यांनी प्लॉटचा स्थावर संपत्तीचा कब्जापत्र दि. 24.02.2011 रोजी दिलेला आहे हे नि.क्रं. 2(4) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. त्याचप्रमाणे तक्रारकर्तीने प्लॉटच्या एन.ए.टी.पी.करिता विरुध्द पक्ष संस्थेचे अध्यक्ष फत्तुजी व्ही. गजभिये यांना एफ.ई.एफ.टी द्वारे रुपये 30,000/- दि. 09.06.2016 ला अदा केले असल्याचे नि.क्रं. 2(3) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. करारानुसार तक्रारकर्तीने प्लॉट खरेदीपोटी असलेली संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतरच विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या नांवे सदरच्या प्लॉटचे कब्जापत्र करुन दिलेले आहे. विरुध्द पक्ष पितृछाया को-ऑप.हाऊ.सोसा. ही रजि. नोंदणीकृत सोसायटी आहे आणि सोसायटीतील असलेले सदस्य - अशोक व्यकंटेराव वाघमारे यांचे निधन झाल्यामुळे तक्रारकर्तीच्या प्लॉटची कायदेशीर विक्रीपत्र झाले नसल्यामुळे तक्रारकर्तीने याबाबत विरुध्द पक्षाकडे प्लॉट क्रं. 25 ची कायदेशीर विक्रीपत्र करुन देण्याची विनंती करुन ही विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या नांवे कायदेशीर विक्रीपत्र नोंदवून दिलेले नाही ही विरुध्द पक्षाची दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती केली आहे असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या नांवे मौजा- चिंचभुवन, प.ह.नं. 43, खसरा नं. 33/1, सिटी सर्व्हे नं. 84, शिट नं. 743 ता.जि.नागपूर येथील पितृछाया को-ऑप. हाऊसिंग सोसायटी मधील प्लॉट क्रं. 25, एकूण क्षेत्रफळ 1500 चौ.फु. चे कायदेशीर विक्रीपत्र करुन द्यावे. तक्रारकर्तीने विक्रीपत्राचा खर्च सोसावा.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई करिता रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावे.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
| |