तक्रारकर्तीतर्फे वकील ः- श्री. पी.पी.थेर
विरूध्द पक्ष क्र. 1 तर्फे वकील ः- श्री. आय.के. होतचंदानी
विरूध्द पक्ष क्र 2 ः- एकतर्फा.
विरूध्द पक्ष क्र 3 ः- गैरहजर.
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 15/06/2019 रोजी घोषीत )
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्दपक्ष क्रं-1) यांनी दावा मंजूर किंवा नामंजूर केल्यामूळे सदरची तक्रार दाखल केली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तिचा मृतक पती श्री. सुरेश भय्यालाल ब्राम्हणकर हे राज्य शासनाने राबविलेली ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी विमा योजना अंतर्गत विरूध्द पक्ष क्र 2 व 3 मार्फत उतरविला आहे. मयत श्री. सुरेश भय्यालाल ब्राम्हणकर हे माहे मार्च- 2017 रोजी मुंबईला आपल्या परिवाराच्या उदरर्निवाहकरीता मजुरीचा काम करीत होते. दि. 05/03/2017 रोजी बांधकामाचे काम करीत असतांना, तिस-या माळयावरून खाली पडल्यामूळे त्यांचे मृत्यु त्याचदिवशी झाले. त्यांचा शवविच्छेदन जवळच्या कुपर हॉस्पीटल खार (पश्चिम) मुंबई येथे करण्यात आला आणि कुपर हॉस्पीटलचा कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेटनूसार मृत्युचे कारण “Septicemia following craniofacial trauma (unnatural) ” असे नमूद केले आहे.
तक्रारकर्ती हि नॉमिनी असून त्यांनी ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी विमा योजनेचा दावा विरूध्द पक्ष क्र 2 व विरूध्द पक्ष क्र 3 कडे सादर केला. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी, विरूध्द पक्ष क्र 1 कडे विमा दावा तसेच त्यासोबत जोडलेले दस्ताऐवज पाठवून दिले. परंतू, विरूध्द पक्ष क्र 1 कडून दावा मंजूर किंवा नामंजूर केल्याबाबतचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तक्रारकर्तीने आपल्या वकीलामार्फत विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना दि. 31/05/2018 रोजी नोटीस पाठविली आहे. दोन्ही पक्षाने त्या नोटीसला सुध्दा कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून तिने सदरची तक्रार या मंचात दाखल करून विम्याची रक्कम रू. 2,00,000/-/-, द.सा.द.शे 12 प्रतिशत व्याजाने रक्कम मिळेपर्यंत दयावा तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रू. 5,000/-.व शारिरिक व मानसिक त्रासापोटी रू. 50,000/-,अशी मागणी केली आहे.
3. विरूध्द पक्ष क्र 1 यांना या मंचाची नोटीस मिळाल्यानंतर आपला लेखीजबाब मंचात दाखल केला. त्यांनी मय्यत श्री. सुरेश भैय्यालाल ब्राम्हणकर हे शेतकरी होते व सदरच्या विमा योजनेमध्ये ‘लाभार्थी’ आहे हे त्यांना मान्य नाही. तसेच तक्रारकर्ती सुध्दा ग्राहक/लाभार्थी हेही त्यांना मान्य नाही. त्यांना तक्रारीत नमूद मजकुर सुध्दा मान्य नाही. त्यांनी आपल्या विशेष् कथनामध्ये सदरची तक्रार या मंचात चालु शकत नाही ती कालबाहय आहे, त्यांनी सेवेमध्ये कोणतीही कमतरता केली नाही तसेच तक्रारकर्तीचा कोणताही विमा दावा त्यांना मिळाला नाही. म्हणून सदरची तक्रार, तक्रार दाखल करण्याचा कारण घडल्यानंतर अगोदर दाखल केल्याने सदर तक्रार खारीज करणयास पात्र आहे असे नमूद केले.
विरूध्द पक्ष क्र 2 यांना मंचातर्फे पाठविलेली नोटीस दि. 06/12/2018 रोजी प्राप्त झाली आहे तसा पोस्टाचा ट्रॅक रिपोर्ट अभिलेखावर दाखल आहे ते गैरहजर असल्यामूळे त्यांचेविरूध्द एकतर्फा आदेश या मंचानी पारीत केला आहे.
विरूध्द पक्ष क्र 3 यांनी आपला लेखीजबाब काही कागदपत्र या मंचात दाखल केले आहे. तसेच लेखीजबाब हाच त्यांचा लेखीयुक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली. तक्रारकर्तीने विमा दावा त्यांच्याकडे दाखल केला आहे हे त्यांना मान्य आहे तसेच विमा प्रस्ताव मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठ कार्यालयास पत्र क्र. 1519 दि. 16/06/2017 रोजी सादर केलेला आहे. विरूध्द पक्ष क्र 3 हे ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी विमा योजने अंतर्गत दावा स्विकारतात व वरिष्ठ कार्यालयास सादर करतात व सेवेमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रृटया देत नाही. संपूर्ण कागदपत्र वारसदारांनी रितसर सादर केल्यानंतर, विरूध्द पक्ष क्र 1 व 2 हे प्रकरणाची तपासणी करून दाव्याची रक्कम भूगतान करतात. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी प्रकरणची तपासणी करून कागदपत्राची पूर्तता करणेबाबत वरीष्ठ कार्यालयामार्फत या कार्यालयास पत्र क्र 20 दि. 20/06/2017 ला कळविलिे होते. त्याप्रमाणे तक्रारकर्तीला त्यांच्या कार्यालयाने उलट टपाली त्रृटयांच्या कागदपत्राबाबत कळविले आहे. त्यांनी विनती केली आहे की, तक्रारीमधून तालुका कृषी अधिकारी गोंदिया या कार्यालयाची मुक्तता करण्यात यावी. अर्जदाराकडून प्रस्ताव स्विकारणे व ते पुढील कार्यवाहीस वरीष्ठ कार्यालयास सादर करणे ऐवढचे या कार्यालयाचे काम आहे.
4. तक्रारकर्तीची तक्रार, तसेच त्यासोबत जोडलेले कागदपत्र, त्यांचे शपथपत्र व पुरावा तसेच लेखीयुक्तीवाद दाखल केलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) यांनी सुध्दा लेखी उत्तर व शपथपत्र तसेच लेखीयुक्तीवाद व 3) यांनी लेखीजबाब या मंचात दाखल केलेले आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ती तर्फे विद्वान वकील श्री. पी.पी.थेर आणि विरुध्दपक्ष क्र 1 तर्फे विद्वान वकील श्री. आय.के. होतचंदानी त्यांचे वतीने त्यांचे सहाय्यक वकील श्री. दिपम बी. पोपट यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
05. सदर तक्रारीचा दस्त क्र 1 पृष्ठ क्र 14 कुपर हॉस्पीटल मुंबई यांचा शवविच्छेदन अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, मृतक श्री. सुरेश भैय्यालाल ब्राम्हणकर वय- 42 वर्ष याचे मृत्यु दि. 05/03/2017 जवळपास सायकांळी 5.45 मिनीटांनी डोक्याला जबर मार लागल्यामूळे झालेला आहे आणि अहवालामध्ये मृत्युचे कारण “Septicemia following craniofacial trauma (unnatural)” नोंदविलेला आहे. तसेच दस्त क्र. 2 ईन्कवेस्ट पंचनामा, दस्त. क्र 3 घटनास्थळ पंचनामा तसेच विरूध्द पक्ष क्र 3 यांनी दाखल केलेला मृत्यु अहवाल मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, मृतक हा कलर देण्यचे काम करीत असतांना त्याचे पायाखालील बांबु तुटून तो खाली पडल्याने मृत्यु झाला आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, मयत श्री. सुरेश भैय्यालाल ब्राम्हणकर याचे मृत्यु नैसर्गिक नसून तो अपघात आहे. म्हणून ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी विमा पॉलीसी अंतर्गत मृत्यु झालेला व्यक्ती शेतकरी असायला पाहिजे त्याकरीता तक्रारकर्तीने दस्त क्र 7 पृष्ठ क्र 20 गाव नमुना 7/12 उता-याची मूळ प्रत मंचात दाखल केली असून त्यामध्ये सन 2009 मृतक श्री. सुरेश भय्यालाल ब्राम्हणकर यांचे नाव नोंदविले आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, मृतक हा शेतकरी होता. तक्रारकर्ती मृतक श्री. सुरेश भय्यालाल ब्राम्हणकर यांची पत्नी असून विमा योजनाचे ‘लाभार्थी’ आहे त्या अर्थाने ती ग्रा.सं.कायदा अंतर्गत ‘ग्राहक’ आहे.
6. विरूध्द पक्ष यांनी आपल्या लेखीजबाबामध्ये तक्रारीचे मजकुर अमान्य केले परंतू कोणताही ठोस पुरावा या मंचात दाखल केले नाही. फक्त उडवाउडवीचे कथन केले आहे असे दिसून येते. विशेष कथन क्र (B) सदरची तक्रार कालबाहय आहे, म्हणून खारीज करण्यात यावी असे कथन केले आहे. परंतू याउलट कथन क्र (D) सदरची तक्रार कारण घडण्याचे अगोदर दाखल केली असल्याकारणाने या मंचापुढे चालु शकत नाही असे कथन कले आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, विरूध्द पक्ष क्र 1 यांच्याकडे तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळण्याचा कोणताही ठोस कारण नसतांना सुध्दा आजपर्यत त्यांनी विमा दाव्याबद्दल तक्रारकर्तीला कळविले नाही. विरूध्द पक्ष क्र 3 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रानूसार तक्रारकर्तीचा दावा त्यांच्याकडे सादर केला आहे हे स्पष्ट दिसून येते. येथे INSURANCE REGULATORY AND DEVELOPMENT AUTHORITY (PROTECITION OF POLICYHOLDERS’) REGULATIONS, 2002. नूसार विरूध्द पक्ष यांनी प्रसताव दाखल झाल्यानंतर 30 दिवसात आपले मत होय किंवा नाही तक्रारकर्त्याला कळविणे बंधनकारक आहे. तसे स्पष्ट विनीयमन ‘8’ मध्ये नमूद आहे. ते खालीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहे.
8. Claims procedure in respect of a life insurance policy
(1) A life insurance policy shall state the primary documents which are normally required to be submitted by a claimant in support of a claim.
(2) A life insurance company, upon receiving a claim, shall process the claim without delay. Any queries or requirement of additional documents, to the extent possible, shall be raised all at once and not in a piece-meal manner, within a period of 15 days of the receipt of the claim.
(3) A claim under a life policy shall be paid or be disputed giving all the relevant reasons, within 30 days from the date of receipt of all relevant papers and clarifications required. However, where the circumstances of a claim warrant an investigation in the opinion of the insurance company, it shall initiate and complete such investigation at the earliest. Where in the opinion of the insurance company the circumstances of a claim warrant an investigation, it shall initiate and complete such investigation at the earliest, in any case not later than 6 months from the time of lodging the claim.
(4) Subject to the provisions of section 47 of the Act, where a claim is ready for payment but the payment cannot be made due to any reasons of a proper identification of the payee, the life insurer shall hold the amount for the benefit of the payee and such an amount shall earn interest at the rate applicable to a savings bank account with a scheduled bank (effective from 30 days following the submission of all papers and information).
(5) Where there is a delay on the part of the insurer in processing a claim for a reason other than the one covered by sub-regulation (4), the life insurance company shall pay interest on the claim amount at a rate which is 2% above the bank rate prevalent at the beginning of the financial year in which the claim is reviewed by it.
(Emphasis supplied)
विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी आपल्या लेखीजबाबामध्ये त्यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल केलेला आहे हे अमान्य केला आहे. विमा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर विरूध्द पक्षावर ते कायदेशीर बंधन आहे की, त्यांनी दाव्याबाबत आपले मत तक्रारकर्तीला/अर्जदाराला पोहचविले पाहिजे. जरी ते नामंजूर केले असेल तरी देखील तसेच मान्य केले असतील तर त्यांना 30 दिवसाच्या/ जास्तीत जास्त 6 माहिनेच्या आत रक्कम दयायला पाहिजे होते. तशी सूचना न देऊन विरूध्द पक्षाने कायदयाचा उल्लंघन केल्यामूळे तक्रारकर्तीची तक्रार मान्य करण्यात यावी असे या मंचाचे मत आहे. तक्रारकर्तीने त्यांच्या वकीलामार्फत् पाठविलेली नोटीस दि. 31/05/2018 रोजी विरूध्द पक्ष क्र 1 व 2 च जो पत्ता तकारीमध्ये नमूद केलेला अहे तोच पत्ता नोटीसमध्ये नमूद आहे. त्याची पोचपावती दस्त क्र 6 वर दाखल केलेली आहे. त्याचा उत्तर देखील विरूध्दपक्ष क्र 1 व 2 यांनी दिलेला नाही. यावरून हे स्पष्ट आहे की, विरूध्द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्तीला ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात विमा दाव्याबाबत कोणतेही कारण न सांगता रक्कम न देऊन, त्यांनी तक्रारकर्तीला सेवा पुरविण्यात कसुर केला आहे असे स्पष्ट सिध्द होत आहे.
7. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/-,तक्रार दाखल दिनांक-19/06/2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/-(अक्षरी रुपये वीस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) ती विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
8. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्र 1 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीच्या पतीचा अपघाती मृत्यू संबधाने ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) तक्रार दाखल केल्याच्या दिनांक-19/06/2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावे.
(03) विरुध्दपक्ष क्र 1 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/-(अक्षरी रुपये वीस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र 2 व 3 चे 30 दिवसांत पालन न केल्यास, द.सा.द.शे 12 टक्के व्याज देय राहिल.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात