जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 340/2010.
तक्रार दाखल दिनांक : 11/05/2010.
तक्रार आदेश दिनांक : 29/07/2013. निकाल कालावधी :03 वर्षे 02 महिने 18 दिवस
1. ईश्वर दौलत कसाब, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. मु.पो. काकडे गल्ली, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर.
2. सोलापूर जिल्हा सह. दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्या.,
सोलापूर, तर्फे व्यवस्थापकीय संचालक,
24/1-अ, मुरारजी पेठ, सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. विभागीय व्यवस्थापक, दी ओरिएन्टल इन्श्योरन्स कंपनी
लिमिटेड, विभागीय कार्यालय क्र.1-15, एडी कॉम्प्लेक्स,
पहिला मजला, माऊंट रोड, सदर नागपूर - 10.
2. जयका इन्शुरन्स ब्रोकरेज, जयका बिल्डींग,
सिव्हील लाईन्स्, नागपूर – 10. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. एस.एस. कालेकर
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 एकतर्फा
आदेश
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य यांचे द्वारा :-
1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार क्र.1 हे तक्रारदार क्र.2 यांचे संलग्न दुध उत्पादक संस्थेचे सभासद आहेत. पशुधन विमा योजनेनुसार तक्रारदार क्र.2 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 (संक्षीप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे तक्रारदार यांच्या खात्यातून रक्कम वर्ग करुन हप्ता भरणा केला आहे आणि तक्रारदार यांच्या गाईचा विमा कंपनीकडे रु.30,000/- रकमेचा विमा उतरविण्यात आलेला आहे. गाईकरिता विमा पॉलिसी क्र.एस.ओ.एल.पी. 114617 आहे. तक्रारदार यांची गाय आजारी पडून दि.12/7/2008 रोजी मृत्यू पावली. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना विमा दावा खोटे उत्तर देऊन नामंजूर केला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारींद्वारे विरुध्द पक्ष यांच्याकडून विमा रकमेसह दैनंदीन नुकसान भरपाई रु.63,125/- व्याजासह मिळावी आणि तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर उचित संधी देऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
3. तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी अभिलेखावर विमा पॉलिसी, विमा दावा प्रपत्र, पोस्टमार्टेम रिपोर्ट, कॅटल व्हॅल्युऐशन रिपोर्ट, कॅटल डेथ सर्टिफिकेट, पंचनामा, ट्रिटमेंट सर्टिफिकेट, सरपंच व दुध संस्थेचा दाखला इ. कागदपत्रे दाखल केलेली आहे. सदर कागदपत्रांचे सुक्ष्मपणे अवलोकन करता, विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते.
6. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविलेली आहे. नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर उपस्थित होऊन त्यांचे लेखी म्हणणे दाखल करण्याचा व तक्रारीचे खंडन करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. विरुध्द पक्ष हे मंचासमोर येऊन वस्तुस्थिती स्पष्ट करीत नसल्यामुळे व तक्रारदार यांच्या तक्रारीचे खंडन करीत नसल्यामुळे तक्रारदार यांची तक्रार त्यांना मान्य आहे, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
7. वास्तविक पाहता, तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तक्रारदार हे विमा रक्कम मिळविण्यास पात्र व हक्कदार असल्याचे सिध्द होते. असे असताना विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. सबब, तक्रारदार हे विमा रक्कम रु.30,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
9. शेवटी खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.30,000/- (रुपये तीस हजार फक्त) व त्यावर दि.5/8/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
3. उभय पक्षकारांना आदेशाची सही-शिक्क्याची प्रत नि:शुल्क द्यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. दिनेश रा. महाजन÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/29713)