Maharashtra

Additional DCF, Pune

CC/12/98

Shri. Gavrav Shirish Pandhare - Complainant(s)

Versus

NIIT INSTITUTE - Opp.Party(s)

10 Apr 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/98
 
1. Shri. Gavrav Shirish Pandhare
Near Vithal Mandhir,Kurdwadi,Tal. Mada
Solapur-413 208
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. NIIT INSTITUTE
4th Floor,Kant Helix Behind Tata Motors,Chinchwad,Pune
Pune-411 033
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Smt. Sujata Patankar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदार           -    स्‍वत:         


 


जाबदेणार                -    एकतर्फा       

 


 

// निकाल //


 

 


 

पारीत दिनांकः-10/04/2013    


 

(द्वारा- श्रीमती.सुजाता पाटणकर, सदस्‍य )


 

 


 

 


 

            तक्रारदाराची तक्रार संक्षिप्‍त स्‍वरुपात खालीलप्रमाणे :-


 

 


 

            तक्रारदारांनी दि.26/8/2010 रोजी जाबदेणार यांचे इन्‍स्‍टीटयूटमध्‍ये Database Administrator in Oracle 9i या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. सदर कोर्सची फी रक्‍कम रु.25,920/- त्‍याचदिवशी तक्रारदारांनी जाबदेणार इन्‍स्‍टीटयूटमध्‍ये भरलेली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जात कथन केल्‍यानुसार तक्रारदारांना प्रवेश घेतेवेळी हा कोर्स 6 महिने कालावधीचा आहे असे जाबदेणारांनी सांगितले. परंतु हा कोर्स 6 महिन्‍यात पूर्ण न करता 1 वर्ष 2 महिन्‍यात पूर्ण करण्‍यात आला. तक्रारदार कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर येथील रहिवासी असून या कोर्ससाठी पुणे येथे आले होते. सहा महिन्‍याऐवजी एक वर्ष 2 महिने पुणे येथे राहावे लागल्‍यामुळे तक्रारदारांना 8 महिने अधिक खर्च करावा लागला. त्‍यामुळे तक्रारदारांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले. कोर्स पूर्ण न झाल्‍यामुळे आठ महिन्‍यात आय.टी. कंपनीजमध्‍ये ज्‍या openings (requirement) होत्‍या त्‍यांना अॅप्‍लाय करता आले नाही. सदरहू कोर्स दि.15/10/2011 रोजी पूर्ण करण्‍यात आला. या कोर्समध्‍ये 1. Introduction to Oracle 9i:SQL, 2. Database Administration Fundamental-I, 3. Database Administration Fundamental-II, 4. Oracle Performance Tunning असे  एकूण 4 modules होते. यापैकी तक्रारदारांना फक्‍त Database Administration Fundamental-II (module-3) हे एकच सर्टीफिकेट जाबदेणार संस्‍थेमधून देण्‍यात आले. उर्वरित तीन सर्टीफिकेटबाबत जाबदेणार संस्‍थेकडे तक्रारदारांनी ब-याचवेळा चौकशी केली, दि.22/3/2012 रोजी त्‍यांच्‍याशी पत्रव्‍यवहार केला. परंतु त्‍याबाबत जाबदेणारांनी कुठलीही दखल घेतली नाही तसेच समाधानकारक उत्‍तर दिले नाही.


 

 


 

            वरील सर्व मजकूर व तक्रार अर्जात सविस्‍तर तपशिलात नमुद केल्‍याप्रमाणे तक्रारदार जाबदेणारांकडून राहिलेले 3 सर्टीफिकेट लवकरात लवकर मिळावेत, तक्रारदारांकडे सर्टीफिकेट नसल्‍यामुळे आय.टी. कंपनीजमध्‍ये ज्‍या openings (requirement) होत्‍या त्‍यांना अॅप्‍लाय करता आले नाही त्‍यामुळे आर्थिक व मा‍नसिक नुकसान झालेले आहे.  मानसिक त्रासापोटी तसेच आर्थिक व मानसिक नुकसान झाल्‍यामुळे रक्‍कम रु.60,000/- जाबदेणारांकडून मिळावेत अशी मागणी केली आहे.


 

            तक्रारदारांनी शपथपत्र, कागदपत्रे, पुराव्‍याचे शपथपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.


 

 


 

2.          जाबदेणारांना या मे. मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होऊनसुध्‍दा ते मे. मंचात हजर राहिले नाहीत, त्‍यामुळे मे. मंचाने त्‍यांचेविरुध्‍द दि.1/3/2013 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.  


 

 


 

3.          प्रस्‍तुत   प्रकरणातील तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे यांचा एकत्रित विचार करता खालील मुद्दे (points for consideration) मंचाच्‍या विचारार्थ उपस्थित होतात.


 

                 


 

मुद्दा क्र. 1 :- जाबदारांनी तक्रारदारांना सेवा देण्‍यामध्‍ये


 

        कमतरता केली आहे का                          ... होय.  


 

 


 

मुद्दा क्र. 2 :- काय आदेश ?                                              ... अंतिम आदेशाप्रमाणे.


 

 


 

4.          मुद्दा क्र. 1:-  तक्रारदार यांनी जाबदेणार या संस्‍थेमध्‍ये Database Administrator in Oracle 9i या कोर्ससाठी प्रवेश घेतलेला होता, ही बाब तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या फी भरलेल्‍या पावत्‍यांवरुन स्‍पष्‍ट झालेले आहे. त्‍याबाबतचे तक्रारदार यांचे कथन जाबदेणारांनी या मंचात हजर राहून कोणत्‍याही प्रकारे नाकारलेले नाही. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे यांचा विचार होता, तक्रारदार हे जाबदेणारांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद आहे.


 

 


 

5.       तक्रारदारांनी जाबदेणार यांचे संस्‍‍थेमध्‍ये दि.26/8/2010 रोजी  Database Administrator in Oracle 9i या कोर्ससाठी प्रवेश घेतलेला होता. सदर कोर्ससाठी त्‍यांनी रक्‍कम रु.25,920/- एवढी फी भरलेली होती. त्‍यांचा स्‍टुडंट आय डी नंबर s111113300298 असा आहे. सदरचा कोर्स हा दि.15/10/2011 रोजी पूर्ण करण्‍यात आला असे तक्रारदारांनी तक्रार अर्जात नमुद केले आहे. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना त्‍यांच्‍या कोर्समधील 30 modules चे सर्टीफिकेटस दिलेले नाहीत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना फक्‍त Database Administration Fundamental-II (module-3) हे एकच सर्टीफिकेट दिलेले आहे.  तक्रारदार यांचा कोर्स सन 2011 मध्‍ये पूर्ण झालेला आहे. त्‍यानंतर आजअखेर जाबदेणार यांनी तक्रारदार यांना पूर्ण सर्टीफिकेटस दिले नसल्‍यामुळे तक्रारदार यांना नोकरीसाठी कोठेही अॅप्‍लाय करता आले नाही. वास्‍तविक पाहता जाबदेणार यांनी तक्रारदार यांचेकडून कोर्ससाठी आवश्‍यक असणारी फी मिळालेनंतर व तक्रारदारांनी कोर्स पूर्ण केल्‍यानंतर संबंधित कोर्सचे सर्टीफिकेट देणे योग्‍य व गरजेचे आहे. तक्रारदार यांनी या मे. मंचामध्‍ये जाबदेणार यांचेविरुध्‍द तक्रार दाखल केल्‍यानंतरही जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सर्टीफिकेट देण्‍याबाबत कोणतीही तजवीज केल्‍याचे दिसून येत नाही अगर जाबदेणार यांनी तक्रारदार यांना संबंधित कोर्सचे सर्टीफिकेट का दिले नाही याचा कोणताही खुलासा जाबदेणार यांनी या मे. मंचामध्‍ये हजर राहून केलेला नाही. संबंधित कोर्ससाठी तक्रारदार यांचेकडून आवश्‍यक ती फी घेऊन कोर्स पूर्ण झाल्‍यानंतर तक्रारदार यांना संबंधित कोर्सचे सर्टीफिकेट न देणे ही जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये केलेली कमतरता आहे असे या मंचाचे मत आहे.  सबब मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.


 

           


 

6.          तक्रारदार यांच्‍या अर्जातील कथनानुसार तक्रारदार यांचा कोर्स हा सहा महिन्‍याच्‍या कालावधीसाठी होता परंतु प्रत्‍यक्षात त्‍यांना एक वर्ष दोन महिने कोर्स पूर्ण करण्‍यासाठी कालावधी लागला त्‍यामुळे तक्रारदार यांना सहा महिन्‍यांऐवजी एक वर्ष दोन महिने पुणे येथे राहावे लागले त्‍यामुळे खर्च करावा लागला असे नमुद केलेले आहे. परंतु तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन तक्रारदारांच्‍या कोर्ससाठी सहा महिन्‍यांचा कालावधी ठरलेला होता ही बाब दिसून येत नाही त्‍याबाबत तक्रारदार यांनी जाबदेणार संस्‍थेचे संबंधित कोर्सबाबतचे माहितीपत्रक या तक्रार अर्जाचे कामी दाखल केलेले नाही.


 

 


 

7.          जाबदेणार यांनी तक्रारदार यांना Database Administrator in Oracle 9i हा कोर्स पूर्ण केल्‍यानंतर त्‍याचे 4 modules सर्टीफिकेट देणे जाबदेणार यांचेवर बंधनकारक होते परंतु कोणतेही योग्‍य व संयुक्तिक कारण नसताना जाबदेणार यांनी तक्रारदार यांना फक्‍त एकच सर्टीफिकेट दिलेले आहे इतर तीन सर्टीफिकेटस जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दिलेली नाहीत. तक्रारदार यांचा कोर्स पूर्ण होऊनही त्‍यांचेकडे संबंधित कोर्सचे सर्टीफिकेट नसल्‍यामुळे त्‍यांना आय्.टी. कंपनीत अगर इतर  नोकरीसाठी प्रयत्‍न करता आलेले नाहीत अगर सर्टीफिकेट नसल्‍यामुळे त्‍यांना नोकरी करता आली नाही त्‍यामुळे तक्रारदार यांचे निश्‍चितच आर्थिक नुकसान झालेले आहे. जाबदेणार  यांच्‍या  सदरच्‍या कृत्‍यामुळे तक्रारदार यांना निश्चितच   शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे याचा विचार होता, तक्रारदार हे नुकसानभरपाईपोटी म्‍हणून रक्‍कम रु.25,000/- जाबदेणार यांचेकडून वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. जाबदेणार यांचेकडून सर्टीफिकेट मिळण्‍यासाठी तक्रारदार यांना या मंचामध्‍ये अर्ज करावा लागला आहे व त्‍याअनुषंगाने खर्चही करावा लागला आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- जाबदेणार यांचेकडून वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 


 

8.          तक्रारदारांना कोर्स पूर्ण झाल्‍यानंतर सर्टीफिकेट न मिळाल्‍यामुळे नोकरी करता आली नाही. वास्‍तविक पाहता, जाबदेणार यांनी एखादया विदयार्थ्‍याने त्‍यांच्‍या संस्‍थेमधून कोर्स पूर्ण केल्‍यानंतर त्‍याबाबतचे सर्टी‍फिकेट त्‍या विदयार्थ्‍याला देणे जाबदेणारांवर बंधनकारक आहे. जाबदेणार यांच्‍या या सदरच्‍या कृत्‍यामुळे शिक्षण घेऊनही केवळ सर्टीफिकेट न मिळाल्‍यामुळे तक्रारदार नोकरीस पात्र ठरु शकले नाहीत. तक्रारदार यांच्‍या तक्रार अर्जातील कथनानुसार तक्रारदार यांनी दि.15/10/2011 रोजी कोर्स पूर्ण केला आहे. आजअखेर त्‍यांना जाबदेणार यांचेकडून सर्टीफिकेट मिळालेले नाही म्‍हणजेच तक्रारदार यांनी कोर्स पूर्ण करुन जवळ-जवळ दीड वर्ष पूर्ण होऊनही तक्रारदारांना संबंधित सर्टीफिकेट मिळालेले नाही, नोकरीही करता आली नाही म्‍हणजेच केलेल्‍या कोर्सचा विनीयोग करता आला नाही. तक्रारदारांच्‍या तक्रार अर्जातील कथनाप्रमाणे जाबदेणार यांनी तक्रारदारांना 4 modules पैकी एकच सर्टीफिकेट म्‍हणजेच Database Administration Fundamental-II (module-3) दिलेले आहे, याचा विचार होता, जाबदेणार यांनी तक्रारदारांना Database Administrator in Oracle 9i या कोर्सशी संबंधित उर्वरित तीन सर्टीफिकेटस म्‍हणजेच (Introduction to Oracle 9i:SQL, Database Administration Fundametntal-I, Oracle Performance Tunning) दयावीत असे आदेश करणे योग्‍य व न्‍यायोचित ठरेल असे मंचाचे मत आहे. या अर्जातील अंतिम आदेशाची पूर्तता जाबदेणार यांनी पंचेचाळीस दिवसात न केल्‍यास त्‍यानंतरच्‍या दर दिवसाला रककम रु.100/- प्रमाणे नुकसानभरपाई म्‍हणून वसुल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे.    


 

  


 

9.                     वर नमुद सर्व विवेचनाचा विचार होता खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेत.


 

 


 

// आदेश //


 

 


 

 


 

(1) तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

 


 

(2)  यातील जाबदेणार यांनी तक्रारदारांना Database Administrator in Oracle 9i या कोर्सशी संबंधित उर्वरित तीन सर्टीफिकेटस म्‍हणजेच (Introduction to Oracle 9i:SQL, Database Administration Fundametntal-I, Oracle Performance Tunning) दयावीत.


 

 


 

 


 

(3) यातील जाबदेणार  यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाईपोटी रक्‍कम रु.25,000/- (रक्‍कम रु.पंचवीस हजार मात्र)  दयावेत.


 

 


 

 


 

 


 

(4) यातील जाबदेणार   यांनी तक्रारदारांना रु.3,000/- (रक्‍कम रु.तीन हजार मात्र) तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी दयावेत.


 

 


 

 


 

(5) वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदेणार यांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून पंचेचाळीस दिवसांचे आत करावी. 


 

 


 

 


 

(6) जाबदेणार यांनी वर नमुद आदेशाची पूर्तता पंचेचाळीस दिवसात न केल्‍यास त्‍यानंतरच्‍या दर दिवसाला नुकसानभरपाईसाठी रककम रु.100/- तक्रारदारांना जाबदेणारांनी दयावी.


 

 


 

 


 

 


 

(7) निकालपत्राच्‍या प्रती दोन्‍ही पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात.


 

 


 

 
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Smt. Sujata Patankar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.