Maharashtra

Chandrapur

CC/18/48

Smt Shobha Chindhu Rokade At Yerkheda - Complainant(s)

Versus

National Insurance Company Ltd through Divisiaonl Manager Mumbai - Opp.Party(s)

ADv. Kshirsagar

15 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/48
( Date of Filing : 05 Mar 2018 )
 
1. Smt Shobha Chindhu Rokade At Yerkheda
At yekhed Tah Chimur
chandrapur
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Company Ltd through Divisiaonl Manager Mumbai
Union house 1 floor Woles Stet Forut Mumbai
Mumbai
Maharashtra
2. National Insurance Company Limited thropugh kshetriya manager
skshetriya office nagpur
Nagpur
maharashtra
3. Tahashildar Chimur
chimur
chandrapur
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 15 Jan 2020
Final Order / Judgement

::: नि का ल प ञ:::

(मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्‍या) (पारीत दिनांक :- 15/01/2020)

  1.    अर्जदार ही राहणार येरखेडा तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून अर्जदाराचा पती श्री चिंधू लक्ष्मण रोकडे यांच्या मालकीची मौजे नवेगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे क्रमांक 201 ही शेतजमीन आहे. अर्जदाराचा पती शेतीचा व्यवसाय करीत होता म्हणजेच थोडक्यात शेतकरी होता त्यावर अर्जदाराचा पती कुटुंबाचे पालन पोषण करीत होता गैरअर्जदार क्रमांक एक व दोन विमा कंपनी असून गैरअर्जदार क्रमांक 3 शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्वीकारते शासनाच्या वतीने विरुद्ध पक्ष क्र,३ तर्फे  अर्जदाराच्या पतीचा 1,00000/- शासनाच्यावतीने उतरवला होता सदर दावा शासनाच्यावतीने उतरवण्यात आला असला तरी अर्जदार ही श्री चिंधू  लक्ष्मण रोकडे यांची पत्नी असल्याने सदर योजनेचे लाभधारक आहे सदर दाव्याचा प्रस्ताव विरुद्ध पक्ष 3 तर्फे सर्व कागदपत्राची शहानिशा करून सर्व प्रस्ताव बरोबर आहे हे पाहून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना दिला जातो व विरुद्ध पक्ष क्रमांक 1 सदर दाव्याचे भूगतान करतात . अर्जदाराचा पतीचा मृत्यू दिनांक 6 .11. 2006 रोजी विषारी साप चावल्याने विषबाधा होऊन  झाला पतीच्या निधनाने अर्जदाराला मानसिक धक्का बसला. शासनातर्फे अर्जदार महिलेच्या पतीचा शेतकरी अपघात विमा काढला असल्याने अर्जदार महिलेच्या पतीचा शेतकरी पतीचा अपघातात मृत्यू झाल्याने अर्जदार हिने 1,00000/-विमा रक्कम घेण्यास आवश्यक दस्तावेज सह गैरअर्जदार क्रमांक तीन कडे अर्ज केला व वेळोवेळी विरुद्ध पक्षाने मागितलेले दस्तावेज पूर्तता केली परंतु त्यानंतर बारा वर्षं उलटून गेले तरी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदार यांचा दावा मंजूर अथवा नामंजूर न कळल्याने तिच्या वकिलामार्फत दिनांक 2.2.2018 रोजी कायदेशीर नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना पाठवला. सदर नोटिस प्राप्त होऊन सुद्धा  गैरअर्जदार  क्रं1 ते 3 ने उत्तर दिले नाही सबब अर्जदारांचा दावा अद्याप मंजूर अथवा नामंजूर हे न कळ्वून  गैरअर्जदार यांनी अर्जदारची फसवणूक केलेली असल्यामुळे व सेवा देण्यास कसूर केलेली असल्यामुळे अर्जदार हिने गैर अर्जदारविरूद्धविद्यमान मंचत तक्रा दाखल केलेली आहे.

    2.   अर्जदार यांची मागणी अशी आहे की  अर्जदारची तक्रार मंजूर करून गैरअर्जदार ह्यांनी विमा रक्कम रु, १,००,०००/- प्रस्ताव दाखल केल्यापासून दसादशे 18 टक्के व्याजासह देण्यात यावे तसेच अर्जदारास झालेल्या शारीरिक मानसिक आर्थिक त्रासापोटी  3०,०००/- व तक्रारीचा खर्च 10,000/- रक्कम देण्याचे आदेश व्हावेत 

    3.  अर्जदारची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार त्यांना नोटीस काढण्यात आले.
   4.   गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांनी तक्रारीत उपस्थित राहून त्यांचे उत्तर  दाखल करीत अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेले मुद्दे खोडून काढत विशेष कथन केले की, गैरअर्जदार क्रमांक 3 ने काबल इन्शुरन्स सर्विस प्राइवेट लिमिटेड विभागीय कार्यालय नागपूर यांना माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत दिनांक 20 .11. 2006 फॉर्म पाठवला त्यामुळे काबल इन्शुरन्स सर्विस प्राइवेट लिमिटेड हा या तक्रारींमध्ये आवश्यक पक्ष असून त्याला त्यात गैरअर्जदार करणे जरुरी आहे व ते न केल्यामुळे सदर तक्रार खारिज  होण्यास  पात्र आहे, तसेच कबाल इन्शुरन्स आणि क्लेम फॉर्म सोबत पाठवलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता जमीन नावावर असलेला फेरफार ,तहसीलदारच्या सहीशिक्क्यासह मृत्यूचा दाखला, तहसीलदारच्या सहीशिक्क्यासह व रासायनिक विश्लेषण अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहीसह असेटीन महत्वाचे कागद पत्र त्यात नसल्याचे त्यांना आढळले आहे  दिनांक 10.06.2007 व 10.08,2008 रोजी गैर अर्जदारान वरील कागदपत्रांची मागणी केली परंतु अर्जदाराने मागणी केलेले दस्तावेज या गैरअर्जदारला  पाठवले नाही, गैरअर्जदाराने वरील दस्तऐवजाची वाट बराच वेळ पाहिली परंतु त्याच्या मागणीची पूर्तता अर्जदाराने न केल्यामुळे नाईलाजाने सदर फाईल बंद करण्यात आली व तसे दिनांक 12.02.2009 रोजी अर्जदाराला फाईल बंद झाल्याचे कळविले यावरून स्पष्टपणे दिसून येते की दिनांक 12 02.2009 रोजी  किवा नजीकच्या काळात अर्जदाराला तिचा दावा नामंजूर झाल्याचे समजले असे असतानासुद्धा अर्जदाराने काहीही कारवाई केली नाही व ही मुदतबाह्य तक्रार दाखल करण्यात आली सदर तक्रार मुदतबाह्य असल्यामुळे खारीज करण्यात यावी तसेच सर्पदंशाने अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाल्याचे कथन असल्यामुळे व शवविच्छेदन अहवालांमध्ये विसरा राखून रासायनिक विश्लेषणासाठी पाठवल्याचे दिसून येत असल्यामुळे वीसेरा चा  रासायनिक विश्लेषण अहवाल हा एक महत्त्वाचा दस्तावेज ठरतो त्यामुळे रासायनिक विश्लेषण अहवाल आल्याशिवाय खरोखरच अर्जदाराच्या पतीचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याची खात्री होत नाही. सारांश हा की परिछेद क्रमांक पंधरा मध्ये नमूद केलेले दस्तावेज आवश्यक दस्तावेज होते व त्याच्याशिवाय गैरअर्जदारला अर्जदाराच्या दाव्याचा योग्य तो निर्णय घेणे अशक्य होते त्यामुळे त्याच्या सेवेमध्ये कुठलीही त्रुटी नाही या सर्व प्रकरणांमध्ये गैरअर्जदाराचे कुठलीही चूक नसल्यामुळे सदर तक्रार खारीज  करण्यात यावी
5.   गैरअर्जदार क्रमांक 3 यांना मंचातर्फे नोटीस पाठवण्यात आला गैरअर्जदार क्रमांक 3 यांना दिनांक 6. 4. 2018 रोजी प्राप्त होऊन सुद्धा क्रमांक 3 प्रकरणात हजर न झाल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालवण्याचे आदेश  निशाणी क्रमांक एक वर करण्यात आले 

6.     अर्जदाराची तक्रार, दस्तऐवज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद व गैर अर्जदार क्र. 1 ते 3 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहेत.

मुद्दे                                                                 निष्‍कर्ष

1)   अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 यांचा  ग्राहक आहे काय ?         होय.        

 (2)   अर्जदार गैरअर्जदार क्रं. 2  यांचा ग्राहक आहे काय ?          नाही. 

 (3)   प्रस्‍तूत तक्रार मुदतबाहय आहे  काय ?                          होय.   

     

 (4)  आदेश काय  ?                                                 अंतीम आदेशाप्रमाणे.

   कारण मिमांसा

मुद्दा क्र. 12 बाबत ः-

 ६.     गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीच्‍या ग्राहकत्‍वाबाबत विवाद उपस्‍थीत केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र.1 ची निर्विवाद ग्राहक आहे. मात्र गैरअर्जदार क्र.1 हे शासकीय कार्यालय असून शेतकरी विमा योजनेसंबंधी शासनाने निर्धारीत किंवा विहीत करून दिलेली कार्ये विनामोबदला पार पाडतात. त्‍यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र.2 चे संदर्भात ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाही. सबब मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर त्‍यानुषंगाने देण्यात येत आहे.

मुद्दा क्र. 3 बाबत ः-

       उपरोक्त तक्रारीतील दोन्ही पक्षाचे कथन व दस्तेवज वरून असे दिसून येत कि अर्जदाराचे पतीचा मृत्‍यु दि. ०६.११.२००६ रोजी विषारी साप चावल्याने आकस्मित मृत्यू  झाला. अर्जदार हिच्या पतीचा गैरअर्जदार क्र. १ कडून शासनाने विमा काढलेला असून अर्जदार हिने लाभार्थी म्हणून विमा दावा मिळण्याकरिता अर्ज केला. अर्जदाराचे म्हणणे आहे कि गैर अर्जदारांनी पाठविलेल  दावा नाकारण्याचे पत्र अर्जदाराला मिळाले नाही. सबब अर्जदाराचे तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे. सदर बाब गैरअर्जदार क्र.1 ने नाकारली असून तक्रारकर्त्‍याचा विमादावा त्‍यांना प्राप्‍त झाला नसून त्‍यामुळे तक्रारीला कारण घडलेले नाही. शिवाय सदर शेतक-याचा अपघाती मृत्‍यु झाल्‍यापासून 12 वर्षानंतर दिनांक 02/02/2018 रोजी तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.1 ला नोटीस पाठविली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीला तक्रारीचे कारण नव्‍याने प्राप्‍त होत नाही व 2006 साली झालेल्‍या घटनेकरीता तक्रार दाखल करण्‍याची मुदत व्‍यपगत झाली असून त्‍या कारणास्‍तव प्रस्‍तूत तक्रार खारीज होण्‍यांस पात्र आहे.

    उभय पक्षांच्‍या परस्‍परविरोधी बयाणांचा विचार करता मंचाच्या मते इखाद्या व्यक्तीने विमा दावा दाखल केल्‍यानंतर, दावा प्राप्त करण्यासाठी ती 11 ते 12 वर्षे वाट पाहणार नाही आणी दावा मिळण्याकरिता तिचे प्रयत्न सतत चालू राहतील. परंतु प्रस्‍तूत प्रकरणात असा कोणताही पत्रव्‍यवहार किंवा पाठपूरावा केल्‍याचे तक्रारकर्तीने कोणताही दस्‍तावेज वा पुरावा दाखल करून सिध्‍द केलेले नाही.  त्‍यामुळे प्रस्‍तूत प्रकरणात दावा दाखल केल्यानंतर फक्त दावा नाकारण्याचे  पत्र गैरअर्जदाराकडून प्राप्त झाले नाही म्हणून तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे हि बाब ग्राह्य धरण्या सारखी नाही. सबब सदर तक्रार मुदतीत नाही हि बाब सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्र. 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. 2 बाबत ः- 

७.  मुद्दा क्रं. 1 ते 3 च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

अंतीम आदेश

 

 

       (1) तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र.48/2018 खारीज करण्‍यात येते.

       (2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा. 

       (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी .

 

 

(श्रीमती.कल्‍पना जांगडे(कुटे))  (श्रीमती.किर्ती वैदय (गाडगीळ))  (श्री. अतुल डी. आळशी)                    

       सदस्‍या               सदस्‍या                     अध्‍यक्ष 

                  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.