Maharashtra

Chandrapur

CC/18/4

Smt Janabai Laxman Rane At Majara - Complainant(s)

Versus

National Insurance Company Limited through Divisional Manager - Opp.Party(s)

Adv.Limaye

15 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/4
( Date of Filing : 03 Jan 2018 )
 
1. Smt Janabai Laxman Rane At Majara
At MaZARA tAH Chimur
chandrapur
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Company Limited through Divisional Manager
Divisiaonl office no9 camrcial union house theter Mumbai
Mumbai
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 15 Jan 2020
Final Order / Judgement

::: नि का ल प ञ:::

(मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्‍या) (पारीत दिनांक :- 15/01/2020)

1.   अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे अर्जदाराचा पती वरील पत्त्यावर राहत असून श्री लक्ष्मण देवाजी राणे13.09.2006 रोजी अपघातात मरण पावला॰ मयत शेतीचा व्यवसाय करीत असून त्यांच्या नावे जमीन होती तिचा भूमापन क्रमांक 5 असून सदर शेती ही मौजा मजरा बे तह चिमुर जिल्हा चंद्रपुर येथे      होती. अर्जदराचा पती शेतकरी होता व शेतीच्या उत्पन्नावर  कुटुंबाचे पालन पोषण करीत होता त्यांनी शेतकरी अपघात विमा काढला असल्याने गैरअर्जदार क्रमांक दोन कडे अर्ज केला होता सदर अर्ज करून तिला दावा रक्कम मिळालेली नसल्याने तक्रार दाखल केलेले आहेत.सदर पलिसीच्या  नियमानुसार गैरअर्जदार क्रमांक दोन हे सेव कागडपातरची शहानिशा करून दावे स्वीकारतात व पुढे इन्शुरन्स अद्व्हजर कडे पाठवतात. सदर योजनेप्रमाणे माय्यतचा 1,00,000/-  गैरअर्जदारतफे विमा काढण्यात आला होता सदर शासनाच्या नियमाप्रमाणे अर्जदार की मयत त्यांची पत्नी असल्यामुळे लाभार्थी आहे,अर्जदाराने सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक दोन यांच्याकडे दावा दाखल केलेला होता परंतु त्याबद्दल आजपर्यंत अर्जदार तिला काहीही कळविण्यात आले नाही अर्जदार क्रमांक दोन यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही अर्जदारच्या पतीचा मृत्यू हा अंगावर विज पडून म्हणजे अपघाताने झाला होता शेतात काम करत असताना त्याच्या अंगावर विज पडून त्याचा मृत्यू झाला होता गैरअर्जदार ह्यांनी  अर्जदार हिचा विमा प्रस्ताव दाव्याचे भुगतान न करता विमा दावा प्रलंबित ठेवून अर्जदार हिची फसवणूक केलेली आहे अर्जदार हिने विमा बद्दल चौकशी केली असता त्यांनी काहीही उत्तर दिले नाही गैरअर्जदार यांनी विमा दावा न देऊन सेवेत न्यूनता केलेली असल्यामुळे सदर तक्रार दाखल केलेली आहे

2.  अर्जदारची  मागणी आहे की अर्जदारची तक्रार मंजूर करून गैरअर्जदार यांनी रक्कम 1,00,000/- त्याच्याकडे प्रस्ताव दिल्यापासून दसादशे 18 टक्के व्याजासह द्यावे.  तसेच अर्जदार हिला झालेल्या मानसिक शारीरिक त्रासापोटी रु. 20,000/- तसेच तक्रारीचा खर्चापोटी 10,000/- र रक्कम देण्याचे आदेश यांना द्यावेत
3.  गैरअर्जदार क्रमांक एक यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली
गैरअर्जदार एक यांनी उपस्थित होऊन अर्जदाराच्या तक्रारीतिल म्हणणे   खोडून काढत विशेष कथनात नमूद केले की, तक्रारीसोबत अर्जदाराने संबंधित विमा पॉलिसीची प्रत सादर केलेली नाही त्या अभावी सदर तक्रार व त्यामधील आरोप न्यायसंगत असून बेकायदेशीर आहे तसेच सदर तक्रार हे दिनांक 13.09.2006 रोजी झालेल्या घटनेवर आधारित असून सदर घटना अंदाजे बारा वर्ष  अंदाजे पूर्वी झालेली आहे,तसेच संबंधित घटनेनंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक दोन कडे सदर प्रस्तावाची प्रत रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात आलेले नाही तरी सदर प्रस्तावास संबंधाने गैरअर्जदारावर लावलेले आरोप खोटे असून नाकबूल आहे तसेच घटनेच्या अंदाज अकरा वर्षांनंतर पाठवलेल्या कायदेशीर नोटीस ला न्याय देण्याच्या हेतूने कोणतीही कायदेशीर महत्त्व होत नाही कारण सदर नोटीस त्यामधील मागणी मुळातच मुदतबहया व बेकायदेशीर आहे.सादर बेकायदेशीर नोटिसचे आधारे कोंत्याहीओ तक्रारीला आपोआप मुदतवाढ मिळत नाही,असे विधान म. राज्य आयओगणे व म. राष्ट्रीय आयोगाने  दिलेले आहेत. सबब तक्रारीतील संपूर्ण मागणी आधारहीन व बेकायदेशीर आहे करिता अर्जदाराची उपरोक्त तक्रार खर्चासह खारिज करण्यात यावी
3॰   गैरअर्जदार क्रमांक दोन यांना सदर प्रकरणात क्रमांक-8 नुसार  नोटीस प्राप्त होऊन सुद्धा गैरअर्जदार क्र॰2 प्रकरणात उपस्थित न राहिल्यामुळे सदर तक्रार गैरअर्जदार क्रमांक दोन विरुद्ध एकतर्फा चालवण्याचे आदेश निशाणी क्रमांक एक वर करण्यात आले

6.     अर्जदाराची तक्रार, दस्तऐवज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद व गैर अर्जदार क्र. 1 ते 3 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहेत.

 

मुद्दे                                                                 निष्‍कर्ष

1)   अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 यांचा  ग्राहक आहे काय ?         होय.        

 (2)   अर्जदार गैरअर्जदार क्रं. 2  यांचा ग्राहक आहे काय ?          नाही. 

 (3)   प्रस्‍तूत तक्रार मुदतबाहय आहे  काय ?                          होय.   

     

 (4)  आदेश काय  ?                                                 अंतीम आदेशाप्रमाणे.

   कारण मिमांसा

मुद्दा क्र. 12 बाबत ः-

 5.     गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीच्‍या ग्राहकत्‍वाबाबत विवाद उपस्‍थीत केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र.1 ची निर्विवाद ग्राहक आहे. मात्र गैरअर्जदार क्र.1 हे शासकीय कार्यालय असून शेतकरी विमा योजनेसंबंधी शासनाने निर्धारीत किंवा विहीत करून दिलेली कार्ये विनामोबदला पार पाडतात. त्‍यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र.2 चे संदर्भात ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाही. सबब मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर त्‍यानुषंगाने देण्यात येत आहे.

मुद्दा क्र. 3 बाबत ः-

       उपरोक्त तक्रारीतील दोन्ही पक्षाचे कथन व दस्तेवज वरून असे दिसून येत कि अर्जदाराचे पतीचा मृत्‍यु दि. 13.09.2006 रोजी अंगावर विज पडून म्‍हणजेच अपघाताने झाला. अर्जदार हिच्या पतीचा गैरअर्जदार क्र. १ कडून शासनाने विमा काढलेला असून अर्जदार हिने लाभार्थी म्हणून विमा दावा मिळण्याकरिता अर्ज केला. अर्जदाराचे म्हणणे आहे कि गैरअर्जदारांनी पाठविलेल  दावा नाकारण्याचे पत्र अर्जदाराला मिळाले नाही. सबब अर्जदाराचे तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे. सदर बाब गैरअर्जदार क्र.1 ने नाकारली असून तक्रारकर्त्‍याचा विमादावा त्‍यांना प्राप्‍त झाला नसून त्‍यामुळे तक्रारीला कारण घडलेले नाही. शिवाय सदर शेतक-याचा अपघाती मृत्‍यु झाल्‍यापासून 12 वर्षानंतर दिनांक 30/12/2017 रोजी तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.1 ला नोटीस पाठविली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीला तक्रारीचे कारण नव्‍याने प्राप्‍त होत नाही व 2006 साली झालेल्‍या घटनेकरीता तक्रार दाखल करण्‍याची मुदत व्‍यपगत झाली असून त्‍या कारणास्‍तव प्रस्‍तूत तक्रार खारीज होण्‍यांस पात्र आहे.

    उभय पक्षांच्‍या परस्‍परविरोधी बयाणांचा विचार करता मंचाच्या मते इखाद्या व्यक्तीने विमा दावा दाखल केल्‍यानंतर, दावा प्राप्त करण्यासाठी ती 11 ते 12 वर्षे वाट पाहणार नाही आणी दावा मिळण्याकरिता तिचे प्रयत्न सतत चालू राहतील. परंतु प्रस्‍तूत प्रकरणात असा कोणताही पत्रव्‍यवहार किंवा पाठपूरावा केल्‍याचे तक्रारकर्तीने कोणताही दस्‍तावेज वा पुरावा दाखल करून सिध्‍द केलेले नाही. त्‍यामुळे प्रस्‍तूत प्रकरणात दावा दाखल केल्यानंतर फक्त दावा नाकारण्याचे पत्र गैरअर्जदाराकडून प्राप्त झाले नाही म्हणून तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे हि बाब ग्राह्य धरण्या सारखी नाही. सबब सदर तक्रार मुदतीत नाही हि बाब सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्र. 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.

मुद्दा क्रं. 2 बाबत ः- 

6.  मुद्दा क्रं. 1 ते 3 च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

अंतीम आदेश

       (1) तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र.4/2018 खारीज करण्‍यात येते.

       (2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा. 

       (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी .

 

 

(श्रीमती.कल्‍पना जांगडे(कुटे))  (श्रीमती.किर्ती वैदय (गाडगीळ))  (श्री. अतुल डी. आळशी)                    

       सदस्‍या               सदस्‍या                   अध्‍यक्ष 

                  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.