पारित दिनाक :-18/02/2020)- अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे.
अर्जदार ही जामगाव(बू)चंद्रपूर येथील रहिवासी असून मयत शेतकरी पद्माकर यांची पत्नी आहे. अर्जदार दिनांक 1.10.2016 योजनेअंतर्गत संपूर्ण कागदपत्रे देऊन तालुका कृषी अधिकारी वरोरा यांनी बजाज कॅपिटल इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड कडे पाठवले परंतु आजपर्यंत अर्जदार हिला विमा रक्कम मिळाली नाही. अर्जदार हिचे पती शेतकरी होते, व ते दिनांक 30.8.2016 झालेल्या अपघातामुळे मृत्यू पावले मयताचा अपघाती मृत्यूमुळे अर्जदार हिने गोपीनाथ मुंडे विमा योजनेअंतर्गत प्रमाणपत्रासह आवश्यक सर्व कागदपत्रे दोन प्रती देऊन अधिकारी यांना विहित मुदतीत अर्ज सादर केला अर्जदार विमा रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न करत राहिली परंतु विमा रक्कम न मिळाल्यामुळे नाईलाजाने ही तक्रार दाखल करावे लागले आहे. अर्जदार हिचे पती शेतकरी असून सदर शेतजमिनीत उत्पन्न घेत होते सदर मयत महाराष्ट्रातील शेतकरी असून उपरोक्त शेतकरी विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतकरी विमा काढलेला आहे व प्रीमियमची संपूर्ण रक्कम गैरअर्जदार क्रमांक एक कंपनीकडे भरून सदर त्याचा विमा उतरवलेला आहे. करिता अर्जदार बाईला विम्याचे रुपये 2,00,000/- देण्यास गैरअर्जदार क्रमांक एक जबाबदार आहे. अर्जदार बाईच्या मयत पतीची धामणगाव तहसील वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे शेती असून तिचा सर्वे क्रमांक 9/1 भो.वर्ग-1 क्षेत्रफळ 1.06 हेक्टर आर आहे अर्जदार हिने संपूर्ण कागदपत्रे तालुका माननीय तालुका कृषी अधिकारी वरोरा यांना दिली व माननीय तालुका कृषी अधिकारी वरोरा यांनी नुकसानभरपाई साठी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे पाठवले परंतु सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा यांनी आजपर्यंत अर्जदार विमा रक्कम दिली नाही सबब सदर तक्रार अर्जदार हिने दाखल केलेली आहे
2. अर्जदाराची मागणी अशी आहे की शेतकरी विमा अपघात योजनेअंतर्गत रुपये दोन लाख गैरअर्जदार क्रमांक एक कडून दसादशे टक्के व्याजासह मिळण्याचा आदेश गैरअर्जदाराच्या विरुद्ध पारित व्हावा तसेच अर्जदाराला आलेला प्रवास खर्च शारीरिक व मानसिक नुकसान भरपाई मंचाला योग्य वाटेल तेवढी रक्कम 18 टक्के व्याजासह मिळण्याचा आदेश पारित व्हावा 3. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदर प्रकरणात उपस्थित राहून तक्रारीत त्यांचे उत्तर दाखल करून अर्जदार हिचे तक्रारीतिल कथन खोडून काढीत विशेष कथनात नमूद केले की तथाकथित विमा पॉलिसीची संपूर्ण प्रत रेकॉर्डवर दाखल केलेली नाही या एकमेव कारणाने प्रकरण अदखलपात्र व बेकायदेशीर आहे. अर्जदार हिने सादर केलेल्या पोलीस दस्ता-ऐवजांवरून हे स्पष्ट होते की मयत पद्माकर याचा मृत्यू मोटर सायकल व क्रमांक एम एच 34/एज-4587निष्काळजीपणे चालवीत असताना समोरून येणाऱ्या बैलबंडी ला धडक दिल्याने झालेला असून सदर अपघाता करिता ते स्वतः जबाबदार आहेत म्हणून मृतकाचे विरुद्ध सदर घटनेचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीसोबत संबंधित मोटरसायकलची मालकी व विमा संबंधी मृतकाच्या मोटार वाहन परवाना सादर केलेला नाही म्हणून अर्जदाराने मंचापासून महत्त्वाचे पूर्ण दस्तावेज हेतूपुरस्पर लपवून ठेवलेले आहेत कारण घटनेच्या वेळी सदर दस्तावेज वैध नसावेत तसेच तक्रारीसोबत जोडलेल्या दस्तऐवज यामध्ये अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक तीन कडे सादर केलेला प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक दोन व तीन ने गैरअर्जदार क्रमांक एक कडे सादर केल्याची कोणतीही दस्तावेज रेकॉर्डवर उपलब्ध करून देण्यात आलेला नाहीत सबब महत्त्वाचे दस्तावेज अर्जदाराने न पुरविल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक एक विरूध लावलेले आरोप अदखलपात्र अविचाराधीन आहेत एकंदरीत तक्रारीसोबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपल्या सेवेत न्यूनता निर्माण केली याचा स्पष्ट पुरावा सादर करण्यात आलेला नाही वरील सर्व कारणाने उपरोक्त तक्रार गैरअर्जदार क्रमांक 1 विरुद्ध बेकायदेशीर असून खारीज करण्यात यावी. 4. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारीत उपस्थित राहून त्यांचे उत्तर दाखल केले अर्जदाराचे तक्रारीतील म्हणणे खोडून काढत विशेषत नमूद केले की अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याविरुद्ध दावा रक्कम न दिल्याबाबत सदर तक्रार दाखल केलेली असून गैरअर्जदार क्रमांक 2 हा गैरअर्जदार 1 व अर्जदार यांच्यातला दुवा आहे. दावा मंजूर वा नामंजूर करण्याबाबत गैर अर्जदार क्रमांक दोन चा काही संबंध नसतो, तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 व बजाज कॅपिटल हे दोन्ही वेगवेगळ्या कंपनी असून एका कंपनीच्या सेवेत न्यूनते बद्दल दुसऱ्या कंपनीला जबाबदार ठरू शकत नाही .ही बाब मान्य आहे की विमा दावा महाराष्ट्र सरकारतर्फे गैरअर्जदार क्रमांक एक कडे पॉलिसीची रक्कम भरली गेली होती परंतु सदरच्या गैरअर्जदार क्रमांक दोन ने अर्जदारकडून कोणतीही रक्कम स्वीकारलेली नाही. सदर तक्रार गैरअर्जदार क्रमांक दोन विरुद्ध खारिज करण्यात यावे 5. गैरअर्जदार क्रमांक 3 यांना नोटीस दी, 27.09.2018 रोजी प्राप्त होऊन सुद्धा तक्रारीत उपस्थित न राहिल्यामुळे गैरअर्जदार क्रं.3 विरुद्ध तक्रार दिनांक 30. 4 .2019 रोजी एकतर्फा चालविण्याचा आदेश निशाणी क्रं. 1 वर करण्यात आला. 6. अर्जदाराची तक्रार, दस्ताऐवज शपथपत्र, व लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदार क्र. 1 व २ लेखी म्हणणे उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे . कारणमीमांसा 7. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीत कथनावरून व दस्तएवजावरून ही बाब स्पष्ट होत आहे की अर्जदार हिच्या पतीच्या नावाने मोजा जामगाव (बू) तहसील वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे शेती सर्वे क्रमांक 9/1 भोगवट वर्ग 1 क्षेत्रफळ 1.06 हे.आर शेती असून अर्जदार हिच्या पतीचा गैरअर्जदार क्रमांक 1 कडून 3 मार्फत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना 2,00,000/- विमा उतरवला होता. परंतु दिनांक 30.08.2016 मोटर रोड अपघातमुळे मृत्यू झाला ही बाब तक्रारीत दाखल एफ.आय.आर व इतर पोलीस दस्तऐवजावरून सिद्ध होत आहे. तसेच तक्रारीत निशाणी क्रमांक 4 वरील दस्त क्रं. 14 अन्वय अर्जदाराचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्रही दाखल आहे,वरील दस्त यावरून सिद्ध होत आहे कि अर्जदाराचे पतीचा अपघाती मृत्यू झाला. तक्रारीत अर्जदार हिने गैरअर्जदार क्रमांक एक कडून गैरअर्जदार 2 व 3 च्या मध्यस्थीने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रुपये 2,00,000/- विमा उतरवला होता याबाबत तक्रारीत दस्त दाखल केले आहे. गैरअर्जदार ह्यांनी त्याच्या लेखी उत्तरात अर्जदार हिला विमा रक्कम न देण्याची कारणे अपघातच्या वेळी अर्जदारच्या पतीजवळ त्यांच्या गाडीच्या मालकी हक्काचा परवाना व गाडी चालविण्याचा वैध परवाना नसल्यामुळे तसेच त्याने निष्काळजीपणे वाहन चालविले असल्यामुळे सदर अपघात झाला असे नमूद केले आहे, परंतु अर्जदार हिने तक्रारीत त्याच्यामध्ये निशाणी क्रमांक 4 सह दस्त क्रमांक 13 सह अपघातात नमूद असलेल्या मोटरसायकलचा अर्जदारच्या पतीच्या नावाने असलेल्या गाडीचा मालकी परवाना दाखल केलेला आहे.तसेच गैरअर्जदार क्रं. 2 ह्यांनी तक्रारीत दाखल केलेल्या शासन परिपत्रक 2015-2016 चे जोडपत्राचे अवलोकन केले असता अपघात झाल्यास पुराव्याप्रकरणी दाखल कागदपत्राची सूची दिलेली आहे त्या सूचीप्रमाणे संपूर्ण कागदपत्रे अर्जदार हिने गैरअर्जदारकडे दाखल केलेले आहेत.तसेच शेतकरी अपघात विमा योजना मार्गदर्शक सूचनांनुसार अपघाती मृत्यू संदर्भात दुर्घटना घडल्याचे सिद्ध झाल्यास धोका पत्करला या कारणास्तव एकही प्रकरण नाकारता येणार नाही असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. असे असतांनासुद्धा गैरअर्जदार क्रं. 1 ह्यांनी अर्जदार हिला तिच्या पतीच्या अपघात विमा दाव्याची रक्कम न देऊन अर्जदार प्रती सेवेत न्यूनता दिली आहे ही बाब सिद्ध होत आहे.तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदार हिला अपघात विमा दावा दावा मिळवून देण्यासाठी योजनेत त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीनुसार काय प्रयत्न केले याचा कुठेही उल्लेख केला नाही तसेच गैरअर्जदार क्रमांक दोन ची जबाबदारी हे केवळ मध्यस्थ म्हणून नसून शेतकरी व कृषी विभाग विमा कंपनी दरम्यान समन्वयक म्हणून आहे. शासन निर्णयानुसार असलेली जबाबदारी पार न पाडल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक दोन ह्यांनी अर्जदार हिच्या प्रती सेवेत त्रुटी केल्याचे सिद्ध होत आहे असे मंचाचे मत आहे. 8. वरील विवेचांनावरून गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांनी अर्जदार हिला विमा दाव्याबाबत अटी व शर्तीचे पालन न केल्याची बाब सिद्धा होत असल्याने तसेच गैरअर्जदार यांचा तांत्रिक स्वरूपाचा बचाव प्रस्तुत वादकथनला लागू होत नसल्याने मंचाच्या मतानुसार अर्जदार हि विमा दावा रक्कम मिळण्यास पात्रअसून खलीलादेश पारित करित आहे. . अंतीम आदेश 1. अर्जदाराची तक्रार क्र.134/2018 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र. १ ह्यांनी अर्जदार हिला तिच्या पतीचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दाव्याची रक्कम रु. 2,00,000/-,व गैरअर्जदार क्र. २ ह्यांनी रु. 10,000/- द्यावे 3. गैरअर्जदार क्र. 3 विरुद्ध कोणताही आदेश नाही. 4. उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा. . . 6..उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी . (श्रीमती.कल्पनाजांगडे(कुटे) (श्रीमती.किर्ती वैद(गाडगीळ) (श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |