::: नि का ल प ञ::: (मंचाचे निर्णयान्वये, मा.सौ.किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या) (पारीत दिनांक :- 10/03/2021) |
|
अर्जदार ह्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये सदर तक्रार दाखल केलेलीआहे
१. अर्जदार हा मोजा सेलुर नागरेड्डी तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून मयत राकेश रमेश कोतपल्लीवार अर्जदाराचा मुलगा आहे. मयत राकेश कोतपल्लीवार यांचा दिनांक 18/02/2016 रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला मयताचे पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे मृतक हा खातेदार शेतकरी असल्यामुळे अर्जदाराने शेतकरी विमा योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रासह दोन प्रतीत अर्ज भाग 1 ते 4 तालुका कृषी अधिकारी पोंभूर्णा येथे दिनांक 30/05/2016 रोजी सादर केला.परंतु गैरअर्जदार दोन वर्षे उलटून सुद्धा अर्जदाराच्या क्लेमची कारवाई केली नाही व अर्जदाराला सदरच्या क्लेम ची रक्कम दिली नाही अखेर गैरअर्जदार क्रमांक 1ने दिनांक 04/05/2018 चे अर्जदारास पत्र पाठवून वीमा दावा मुदतीत नसल्याच्या कारणावरून नाकारले. वास्तविक महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या विमा योजनेनुसार दावे मुदतीत नसल्याच्या कारणावरून गैरअर्जदारास विमा दावा नाकारता येणार नाही असे स्पष्टपणे नमूद आहे. मयत्त विमाधारक महाराष्ट्रातील शेतकरी असून शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतकरी अपघात विमा केलेला असून त्यासंबंधी वरील विमा कंपनी सोबत शासनाचा सन 2015 ते 2016 करिता करारही झाला व प्रीमियमची सर्व रक्कम सरकारने बजाज कॅपिटल इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड कंपनी कडे भरलेली
..3..
..3..
आहे. अर्जदाराने तालुका कृषी अधिकारी, पोंभुर्णा यांचेमार्फत गैरअर्जदार कडे फॉर्म सादर केला अशा प्रकारे मृतक हा गैर अर्जदाराच्या ग्राहक झाला. गैरअर्जदाराने सदर विमादाव्याची रक्कम एक महिन्याच्या आत अर्जदारास देणे बंधनकारक आहे. परंतु अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमा फॉर्म दाखल करून दोन वर्षे उलटून गेली तरी गैरअर्जदाराने अर्जदारास क्लेम रक्कम दिली नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केलेली आहे. तरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा क्लेम रुपये 2,00,000/- अर्जदाराला द्यावे त्याचप्रमाणे अर्जदारास सदर रू 2,00,000/- रकमेवर 18 टक्के व्याज देण्यात यावे व अर्जदाराला झालेल्या मानसिक नुकसान पोटी गैरअर्जदाराने 50,000/- नुकसानभरपाई द्यावी त्याचप्रमाणे इतर किरकोळ खर्च व तक्रारीचा खर्च 20,000/- असे एकूण 2,70,000/- व्याजासह अर्जदारास द्यावे या रकमेवर प्रस्ताव दिनांक 30/05/2016 रोजी दाखल केले तेव्हापासून रक्कम हाती पडेपर्यंत 18 टक्के व्याज आकारून द्यावी अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार क्रमांक 1, 2 व 3 यांना नोटीस पाठविण्यात आले.
2. गैरअर्जदार क्रमांक 1 ने तक्रारीत प्राथमिक आक्षेप दाखल करून पुढे नमूद केले की महाराष्ट्र सरकार च्या योजने प्रमाणे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात पोलीसी आण्यात आली आहे व अपघाती मृत्यू झालेल्या शेतकरयाला रू 2,00,000/- चे संरक्षण दिले आहे. या योजनेची अमलबजावणी करण्यासाठी नियमावली तयार केली असून त्यात राज्य सरकार विमा कंपनी व बजाज कॅपीटल इन्शुरन्स यांच्यात त्रीपक्षीय करार झालेला आहे. मयत राकेश रमेश कोतपल्लीवार दिनांक 18/02/2016 रोजी मरण पावला परंतु त्याचा विमा दावा
अर्जदाराने दिनांक 26/08/2016 रोजी दाखल केला असून तो मुद्तबाहय आहे.
शेतकरी विमा योजना पॉलिसी म्हणजे तीन पक्षांमधील मृद्रीत करार असून पॉलीसीच्या अटी शर्तीनुसार कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या वारसदार यांना
..4..
..4..
पॉलिसी बद्दल शिक्षित करून पॉलिसी केव्हा दाखल करावी याबद्दल माहिती दिली
पाहिजे त्यामुळे अर्जदाराचा दावा नाकारून गैरअर्जदार क्रमांक 1 ने सेवेत कोणतीही त्रुटी दिली नाही त्यामुळे सदर दावा हा गुणवत्तेवर खारीज करण्यात आला असून मुदतबाह्य आहे तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदार यांचा दावा मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत सबब सदर तक्रार गैरअर्जदार क्रमांक 1 विरुद्ध खारीज करण्यात यावी.
3. गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्यांचे उत्तर दाखल करून अर्जदाराची तक्रार परिशीष्टनिहाय नाकरलेली आहे तसेच ते पुढे कथन करतात कि विमा मिळनेबाबत असून ती गैरअर्जदार क्र.1 यांच्याशी संबंधीत आहे कराराप्रमाणे विमा दावा मंजुर करणे अथवा नामंजूर करण्याची जवाबदारी ही गैरअर्जदार क्र.1 ची आहे. गैरअर्जदारक्र.2ची भुमीका केवळ मध्यस्थची व विमा योजनाची कार्यवाही सुरळीत ठेवण्यासाठी आहे विमा दावा मंजूर किंवा नामंजुर करण्याची जवाबदारी गैरअर्जदारक्र.2यांची नाही सदरची बाब त्रीपक्षीय करारात स्पष्ट करण्यात आलेली आहे. सब गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराला सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नसल्यामुळे तक्रार गैरअर्जदार क्र.2 विरूध्द खारीज करण्यात यावी.
4. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी त्यांचे उत्तर दाखल करीत पुढे नमूद केले की अर्जदार श्री.रमेश कोतपल्लीवार राहणार सेलूर नागरेड्री तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर यांचा मुलगा श्री.राकेश रमेश कोटपल्लिवर याचा पाण्यात बुडून 18/02/2016 चा मृत्यू झाला होता. कृषी विभागाच्या शेतकरी जनता अपघात
विमा योजनेअंतर्गत अपघाताने मृत्यू पावलेल्या श्री राकेश रमेशकोतपल्लीवार यांच्या वडिलांनी अर्जदार या नात्याने अपघात विमा प्रकरण 30/05/2016रोजी कार्यालयात सादर केला या कार्यालयाने सदर प्रस्ताव पत्र क्रमांक 453/ दिनांक 31/05/2016 चंद्रपूर या वरिष्ठ कार्यालयात पुढील कारवाई करता सादर केला.
..5..
..5..
सदर प्रस्तावातील त्रुटी संबंधी बजाज कॅपिटल इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड नवी
दिल्ली या कंपनीने दिनांक 13/06/2016, 29/06/2016 व 04/10/2016रोजी पत्र पाठवले या तिन्ही पत्रातील त्रुटीची पूर्तता या कार्यालयाने पत्र क्रमांक नुसार वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार करून पूर्ण केलेली आहे तालुका कृषी अधिकारी पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर या कार्यालयाने वरील प्रमाणे प्रस्ताव संबंधित योग्य व परिपूर्ण आवश्यक ती कार्यवाही निमित्त नियमित पत्रान्वये आवश्यक कागदपत्रासह त्रुटीची पूर्तता करून वरिष्ठ कार्यालयास सादर करून पूर्ण केलेली आहे.
5) अर्जदाराची तक्रार दस्तावेज, पुरावा व गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवादाची पुरसीस तसेच अर्जदार व गैरर्जदार यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील कारण मिमासा व निष्कर्ष कायम करण्यात येत आहे.
6) महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय शेअवी 15/2015 प्र.क्र.15/924 नोव्हेंबर 2015 शेतकऱ्यां करता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. याबाबत उभय पक्षांचा वाद नाही अर्जदार मयत त्याचे वडील आहे अर्जदाराने निशाणी क्र.5 दस्त क्र.6 प्रमाणे दस्तऐवज यादी सोबत वारसा
प्रमाणपत्र दाखल केलेले असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदार यांनी मुलाच्या मृत्यूनंतर आवश्यक सर्व कागदपत्राची पूर्तता करून गैरअर्जदाराकडे क्रमांक तीन कडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज पाठवला परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी नामंजूर केला त्याबददलचे पत्र निशाणी क्रमांक पाच दस्त क्रमांक 27 वर दाखल आहे.
तक्रारीत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांच्या उत्तरात अर्जदार यांनी त्यांचा दावा
मुदतीत दाखल न केल्यामुळे खारीज करण्यात आला असे नमूद केले आहे तर गैरअर्जदार क्रमांक दोन यांनी दावा मंजूर किंवा नामंजूर करणे याची जबाबदारी त्यांची नसून गैरअर्जदार क्रमांक एकची आहे असे कथन केले आहे तर गैरअर्जदार क्रमांक तीन यांनी अर्जदाराकडून प्राप्त झालेला विमा प्रकरण दिनांक 30/05/2016 रोजी त्यांच्या कार्यालयाला प्राप्त झाले व त्यानंतर गैरअर्जदार
..6..
..6..
क्रमांक दोन कडून आलेल्या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून प्रकरण वरिष्ठ कार्यालयास सादर केले असे नमूद केले आहे गैरअर्जदार क्रमांक 1,2 व 3 यांचे परस्पर विरोधी कथन ऐकून मंचाचे असे मत आहे की केवळ विमा प्रस्ताव मुदतीत दाखल केला नाही या तांत्रिक कारणाचा आधार घेता येत नाही याबद्दल विमा प्रस्ताव विलंबाने दाखल करण्याच्या संदर्भात अर्जदार यांनी दाखल केलेल्या 2015-16 च्या शासन निर्णय दाखल केलेला आहे सदर शासन निर्णय विचारात घेणे आवश्यक असून त्यात नमुद आहे कि विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तर तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांत साठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 90 दिवसांपर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहतील शिवाय समर्थनीय कारणासह 90 दिवसांनंतर प्राप्त होणारे विमा प्रस्ताव सुद्धा स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहतील प्रस्ताव विहित मुदतीत सादर केले नाही या कारणास्तव विमा कंपनीला विमा प्रस्ताव नाकारता येणार नाही
या कलमाप्रमाणे अर्जदाराने विहित मुदतीत प्रस्ताव सादर न केल्याने गैरअर्जदार
यांना नाकारता येणार नाही प्रस्ताव उशिरा प्राप्त झाला हे कारण योग्य व
संयुक्तिक नाही. माननीय राज्य आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स विरुद्ध श्रीमती सिंधुबाई खंडेराव खैरनार दिनांक 17/01/2008 या न्याय निवाड्यात खालील प्रमाणे मार्गदर्शक तत्त्व नमूद करण्यात आले आहे. Clause regarding time limit for submission of claim not mandatory तरी हे मंच या निष्कर्षाप्रत आले आहे की सदर शेतकरी अपघात विमा योजना ही शासनाने शेतकऱ्यांकरिता रस्त्यावरील अपघात,विजेचा शॉक बसणे पूर सर्पदंश वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मृत्यू ओढवतो घरातील कर्त्या व्यक्तीचा झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता सदर योजना कार्यान्वित झालेली आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा शेतकरी कुटुंबियांना आर्थिक लाभ देण्यासाठी तयार केले गेली असल्यामुळे अपघात विमा योजनेचा लाभ नियमानुसार या तक्रारितील
..7..
..7..
अर्जदारास सदर विमा रक्कम मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच आलेले असून गैरअर्जदार क्रमांक एक यांनी तांत्रिक बाबींचा विचार न करता आणि अर्जदाराची विमा रक्कम रुपये 2,00,000/- ही अर्जदाराला देणे रास्त होईल. गैरअर्जदार क्रमांक दोन व तीन यांच्यावर केवळ विमा प्रस्ताव स्वीकारणे व त्याची तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी विमा कंपनीकडे पाठवणे, हे दोनीही मध्यस्थीचे कामे असूनगैरअर्जदार क्र. २ व ३ ती निशुल्क सेवा पुरवतात त्यामुळे त्यांच्यावर विमा क्लेम देण्याची जबाबदारी नाही असे या मंचाचे मत आहे गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांच्याविरुद्ध कोणतेही आदेश नाही
उपरोक्त सर्व विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराचा तक्रार अर्ज खालिलप्रमाणे अशत: मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास मय्यत राकेश रमेश कोतपल्लीवार यांच्या अपघाती मृत्युबाबत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा पॉलिसीची रक्कम रुपये 2,00,000/- अदा करावी. तसेच गैरअर्जदार क्रमाक 1 ने अर्जदार ह्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी एकूण रुपये 10,000/- द्यावे.
- गैरअर्जदार क्रमाक 2,व 3 याच्या विरुद्ध कोणताही आदेश नाही .
- सदर आदेशाची प्रत विनामोबदला सर्व संबंधीतांना पाठविण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती.किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर.