Maharashtra

Gondia

CC/18/47

SMT. LAKSHMI RAMESH BISEN - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE CO.LTD. THROUGH ITS BRANCH MANAGER AND OTHERS. - Opp.Party(s)

MR. UDAY P. KSHIRSAGAR

30 Sep 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 24, SECOND FLOOR, NEW ADMINISTRATIVE BUILDING,
JAYSTAMBH CHOWK, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/18/47
( Date of Filing : 12 Jun 2018 )
 
1. SMT. LAKSHMI RAMESH BISEN
R/O. BHARATNAGAR, POST. KHAMARI (RAYPUR) TAH- GONDIA.
GONDIA.
MAHARASHTRA.
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE CO.LTD. THROUGH ITS BRANCH MANAGER AND OTHERS.
R/O. DHARAMPETH BRANCH, SAKET LAKSHMI BHAWAN CHAOWK, NAGPUR.
NAGPUR.
MAHARASHTRA.
2. NATIONAL INSURANCE CO.LTD. THROUGH ITS BRANCH MANAGER.
R/O. MAIN ROAD, NEAR SHRI TALKIES GONDIA.
GONDIA.
MAHARASHTRA.
3. TALUKA KRUSHI ADHIKARI.
R/O. TAH-DISTT. GONDIA.
GONDIA.
MAHARASHTRA.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. SARITA B. RAIPURE MEMBER
 
For the Complainant:MR. UDAY P. KSHIRSAGAR, Advocate
For the Opp. Party: MR. M. K. GUPTA, Advocate
Dated : 30 Sep 2019
Final Order / Judgement

तक्रारकर्तीतर्फे वकील              ः- श्री. उदय क्षिरसागर,

 विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 तर्फे वकील   ः- श्री. एम.के. गुप्‍ता,   

 विरूध्‍द पक्ष क्र 3                 ः- स्‍वतः  

निकालपत्रः- कु. सरीता ब. रायपुरे, सदस्‍या,     -ठिकाणः गोंदिया.

                                

                                                                                                 निकालपत्र

                                                                            (दिनांक  30/09/2019 रोजी घोषीत )     

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या    कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यू संबधात विमा दावा फेटाळल्‍या संबधाने दाखल केलेली आहे.

तक्रारकर्तीच्‍या अधिवक्‍तांनी तक्रारीमध्‍ये निशाणी क्र. 1 मध्‍ये श्रीमती. लक्ष्‍मी रमेश बिसेन असे नमूद केले आहे. तसेच तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र. 1 मध्‍ये तक्रारकर्तीच्‍या पतीचे नाव राजेश बिसेन असे नमूद करण्‍यात आले आहे. मंचानी संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केली असता, असे आढळून आले की,  मृत्‍यु प्रमाणपत्रामध्‍ये तक्रारकर्तीच्‍या पतीचे नाव श्री. राजेश बळीराम बिसेन असे स्पष्‍टपणे नमूद आहे. 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

            तक्रारकर्ती उपरोक्‍त नमुद पत्‍यावर राहत असून तिचे मृतक पती   श्री. राजेश बळीराम बिसेन, हा व्‍यवसायाने शेतकरी होता व त्‍याचे मालकीची मौजा खमारी ता. जि. - गोंदिया येथे भूमापन क्रं-37 ही शेत जमीन असून त्‍यावर त्‍याचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा  स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीच्‍या पतीचा  रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा काढण्‍यात आला असल्‍याने ती ‘पत्‍नी’   या नात्‍याने कायदेशीर वारसदार म्‍हणून “लाभार्थी” आहे.

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पतीचा मृत्‍यु दिनांक-15/11/2016 रोजी आपल्‍या गावाजवळील एका बांधकामाच्‍या ठिकाणी गेला असता डोक्‍यावर जड वस्‍तु पडत्‍याने जखमी होऊन झाला.  तिच्‍या पतीचा  शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा असल्‍याने तिने आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-3  यांचे कार्यालयात दिनांक-05/01/2017 रोजी विमा दावा प्रस्‍ताव दाखल केला आणि विरुध्‍द पक्षांचे मागणी नुसार वेळोवेळी दस्‍तऐवजांची पुर्तता केली. रितसर अर्ज केल्‍यानंतर व आवश्‍यक दस्‍ताऐवज दिल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष क्र 1 ने तक्रारकर्ती पतीच्‍या दाव्याबाबत दि. 27/07/2017 रोजी पत्र पाठवून तक्रारकर्तीचा दावा ‘रासायनिक विश्‍लेषन’ अहवाल डॉक्‍टरांच्‍या अंतिम मतासह सात दिवसात पाठविणे या शे-याचे पत्र पाठविले. विरूध्‍द पक्ष क्र 1 ने तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या शवविच्छिेदन अहवालामध्‍ये मृतक हा डोक्‍याला लागलेल्‍या मारामूळे मरण पावलेला आहे हे स्‍पष्‍ट दिले असतांना अकारण विसोरा रिपेार्ट मागवित आहे व तक्रारकर्तीची फसवणुक करीत आहे. ज्‍या उद्देशाने शासनाने मृतक शेतक-यांच्‍या वारसदारासाठी हि योजना सुरू केली त्‍या उद्देशालाच विरूध्‍द पक्ष तडा देत आहे. त्‍यामुळे सदर विरूध्‍द पक्ष हे सेवेमध्‍ये त्रृटी देत आहे. म्‍हणून तिने या तक्रारीव्‍दारे विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- विमा प्रस्‍ताव दाखल केल्‍याचा दिनांक-05/01/2017 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्‍याजासह मागितली असून तिला झालेल्‍या मानसिक, शारिरिक, आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्‍हणून रुपये-15,000/- मागितले आहे.

03.   तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्‍यामंचाने दि. 26/01/2018 रोजी दाखल करून विरुध्‍दपक्ष क्रं 1, 2 व 3  यांना मंचातर्फे नोटीस बजावण्‍यात आल्‍या.

04.   विरूध्‍द पक्ष यांना नोटीस प्राप्‍त झाल्यानंतर, विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 यांनी त्‍यांचा लेखीजबाब दि. 21/08/2018 रोजी मंचात दाखल केला. विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 यांनी त्‍यांच्‍या लेखीजबाबात तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचे खंडन केले असून, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु दि. 15/11/2016 रोजी झाला आणि  तक्रारकर्तीने आवश्‍यक असलेले दस्‍ताऐवज कधी सादर केले हे स्‍पष्‍ट केले नाही. जसे- तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा नविन घराचे बांधकाम चालु होते त्‍याठिकाणी झाला. तसेच त्‍या घराचा मालक मृतकाला ओळखत नाही आणि तो बांधकाम चालु असलेल्‍या घरी कसा आला आणि कोणत्‍या उद्देशाने आला याविषयी काहीही माहित नाही. तक्रारकर्तीच्‍या पतीला काही मानसिक त्रास असेल आणि त्‍यामुळे त्‍यांनी आत्‍महत्‍या केली असेल करीता तक्रारकर्तीला सदर विम्याचा लाभ घेता येणार नाही. असे विरूध्‍द पक्षाचे म्‍हणणे आहे.  विरूध्‍द पक्षाचे वकील श्री. एम.के. गुप्‍ता यांनी Special Pleading दिले त्‍यात त्‍यांनी म्हटले आहे की, तक्रारकर्तीला विम्‍याचा लाभ घेता येणार नाही व इतर परिच्‍छेद निहाय कथन अमान्‍य केले आहे. आपले विशेष कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्ती यांनी कृषी आयुक्‍ताला पक्षकार करणे गरजेचे असून या तक्रारीत त्‍यांना पक्षकार म्हणून सम्‍मीलीत न केल्‍यामूळे, या एकच कारणांवर हि तक्रार खारीज करण्‍यात यावी. तसेच विमा पॉलीसीनूसार तक्रारकर्तीने लवाद कायदयानूसार त्‍यांनी आर्बीट्रेटर पुढे तक्रार दाखल करायला पाहिजे हेाती. तक्रारकर्तीने सर्व दस्‍ताऐवज विरूध्‍द पक्षाला दिल्‍याबाबतचा कोणतेही स्वाक्षरी नसल्‍यामूळे दस्‍ताऐवज पुरविला आहे असे ग्राहय धरता येणार नाही तसेच दस्‍ताऐवजाच्‍या अभावी त्‍यांचे कथन मान्‍य करता येणार  नाही. करिता तक्रारकर्तीची सदर तक्रार विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 च्‍या विरूध्‍द खारीज करण्‍यात यावी.

05.   विरूध्‍द पक्ष क्र 3 यांनी त्‍यांचा दि. 24/07/2018 रोजी आपला लेखीजबाब पोस्‍टाद्वारे मंचात दाखल केला. त्‍यात त्‍यांनी म्‍हटले की, तक्रारकर्तीचा ‘शेतकरी जनता अपघात विमा’ योजने अंतर्गत विमा दाव्‍याचे प्रसताव दि. 05/01/2017 ला तालुका कृषी अधिकारी गोंदिया यांच्‍याकडे सादर केला. त्‍यानंतर सदर प्रस्‍ताव वरिष्‍ठ कार्यालयास दि. 02/02/2017 ला सादर करण्‍यात आले. तसेच तक्रारकर्तीने प्रस्‍ताव सादर केल्‍यानंतर, विरूध्‍द पक्ष क्र 1 ने “Rejected due to Other Reason, no claim for non Submission Chemical analysis report with final opinion on doctor” ‘असा शेरा मारून तक्रारकर्तीला कळविले. तक्रारकर्तीने तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे प्रस्ताव सादर केल्‍यानंतर संपूर्ण दस्‍ताऐवजाची पाहणी करून सदर प्रस्‍ताव जिल्‍हा कृषी अधिकारी गोंदिया यांच्‍याकडे सादर केला. अर्जदाराकडून प्रस्‍ताव स्विकारणे व पुढील कार्यवाहीसाठी वरीष्‍ठ कार्यालयाकडे सादर करणे एवढेच काम आहे. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष क्र 3 ने प्रस्‍ताव सादर केल्‍यानंतर, ते तपासून विमा कंपनीला सादर केल्‍यानंतर दाव्‍याची रक्‍कम विरूध्‍दपक्ष क्र. 1 व 2 यांनी मंजूर करावयाची आहे. विरूध्‍द पक्ष क्र 3 ने कोणत्याही प्रकारची सेवा देण्‍यात त्रृटी केलेली नाही. करिता तक्रारकर्तीची सदर तक्रार विरूध्‍द पक्ष क्र 3 च्‍या विरूध्‍द खारीज करण्‍यात यावी.

05.   तक्रारकर्तीने तक्रारीसोबत शेतकरी जनता अपघात विमा योजना 2015 – 2016 चा शासन निर्णय, तक्रारकर्तीच्‍या दाव्‍याबाबत विरूध्‍द पक्षाचे पत्र, तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष क्र 3 कडे सादर केलेला दावा, गाव नमुना 7/12 उतारा, धारण जमिनीची नोंदवही, अकस्‍मात मृत्‍यु खबरी, घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍केव्‍हेस्‍ट पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यु प्रमाणपत्र, वयाचा दाखला, वारसान प्रमाणपत्र इत्‍यादी कागदपत्रे सादर केलेली आहे.  

06.  तक्रारकर्तीचे वकील श्री. उदय क्षिरसागर यांनी सदरहू प्रकरणात लेखी युक्‍तीवाद दाखल केला असून तोंडीयुक्‍तीवाद केला आहे. तक्रारकर्तीच्‍या दाव्‍याबाबत विरूध्‍द पक्षांने म्हटले आहे की, डॉक्‍टरांनी विसेरा रिपोर्टवर अतिम मत दिले नसल्‍याने दावा फेटाळल्‍याचे नमूद केले आहे. परंतू तक्रारकर्तीचा पतीचा मृत्‍यु कोणतीतरी जड वस्‍तु डोक्‍यावर पडून जखमी होऊन झाला. कारण  शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये मरणाचे कारण डोक्‍याला मार लागून जखमी झाल्‍याने दिले असल्‍याने सदर डॉक्‍टरांचे अंतिम मत मागणे म्‍हणजे वेळेचा अपव्‍यय आहे. कारण तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा अपघाताने झाला. हे दाव्‍यामध्‍ये दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजावरून सिध्‍द होते. तक्रारकर्तीचा पती शेतकरी नव्‍हता व त्‍याचा अपघातात मृत्‍यु झाला नव्‍हता हे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी विरूध्‍द पक्षाची आहे. परंतू विरूध्‍द पक्षाने त्‍या संबधात कोणतेही पुरावे दाखल केलेले नाही तर विनाकारण तक्रारकर्तीचा दावा फेटाळून विरूध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रृटी आहे. तक्रारकर्ती वारसदार मृतकाच्‍या उत्‍पन्‍नावर अवलंबून होती आणि ती वारसदार म्हणून ‘लाभार्थी’ आहे. तक्रारकर्तीने कागदपत्राची पूर्तता करून सुध्‍दा विरूध्‍द पक्षाने कागदपत्राची पूर्तता केली नाही. यासाठी सदरचा विमा प्रस्‍ताव मंजूर केला नाही. हि बाब विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला सेवा देण्‍यात त्रृटी केली. त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करण्‍यात यावी. असे त्‍यांनी आपल्‍या लेखीयुक्‍तीवादात म्हटले आहे.  

07. विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 यांचे वकील श्री. एम.के. गुप्‍ता यांनी सदरहू प्रकरणात त्‍यांचा लेखीयुक्‍तीवाद दाखल केला असून त्‍यांनी आपल्‍या लेखीयुक्‍तीवादात म्‍हटले आहे की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु दि. 15/11/2016 रोजी झाला आणि  तक्रारकर्तीने आवश्‍यक असलेले दस्‍ताऐवज कधी सादर केले हे स्‍पष्‍ट केले नाही. जसे- तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा नविन घराचे बांधकाम चालु होते त्‍याठिकाणी झाला. तसेच त्‍या घराचा मालक मृतकाला ओळखत नाही आणि तो बांधकाम चालु असलेल्‍या घरी कसा आला आणि कोणत्‍या उद्देशाने आला याविषयी काहीही माहित नाही. तक्रारकर्तीच्‍या पतीला काही मानसिक त्रास असेल आणि त्‍यामुळे त्‍यांनी आत्‍महत्‍या केली असेल करीता तक्रारकर्तीला सदर विम्याचा लाभ घेता येणार नाही. असे विरूध्‍द पक्षाचे म्‍हणणे आहे. त्‍यासाठी विरूध्‍द पक्ष जबाबदार नाही. तसेच तक्रारकर्तीचा पती हा शेतकरी आहे व विमा पॉलीसीनसार ‘लाभार्थी’ आहे याबाबत उल्‍लेख केलेला नाही. तसेच याविषयी कोणतीच कागदपत्रे सदर तक्रारीत दाखल केलेली नाही. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 यांच्‍या सेवेतील त्रृटी नाही. करीता तक्रारकर्तीची सदर तक्रार त्‍यांच्याविरूध्‍द खारीज करण्‍यात यावी. 

08.   तक्रारकर्तीची तक्रार, पुराव्‍याचे शपथपत्र, लेखीयुक्‍तीवाद तसेच विरुध्‍दपक्ष क्रं-1) व 2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर व पुराव्‍याचे शपथपत्र, तसेच विरूध्‍द पक्ष क्र 3 यांनी पुरसीस दिली त्‍यात त्‍यानी म्‍हटले की, लेखीउत्‍तर हाच त्‍यांचा लेखीयुक्‍तीवाद समजण्‍यात यावा. तसेच तक्रारकर्तीने व विरूध्‍द पक्ष क्र. 1, 2 व 3 यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री. उदय क्षिरसागर आणि विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 तर्फे वकील श्री. एम.के.गुप्‍ता तसेच यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे-

                        :: निःष्‍कर्ष ::

09.  तक्रारकर्तीचे पती   राजेश बळीराम बिसेन, हा व्‍यवसायाने शेतकरी होते व त्‍यांच्‍या मालकीची मौजा – खमारी, जि. - गोंदिया येथे भूमापन क्रं-37 ही शेत जमीन आहे. तक्रारकर्तीचे पती हे शेती व्‍यवसाय करीत होते व शेतीतील उत्‍पन्‍नावरच त्‍यांच्‍या कुटूंबाचे पालनपोषन करीत होते. तक्रारकर्तीने तक्रारीत दाखल केलेल्‍या गाव नमूना 7/12 उतारा-यावरून हे सिध्‍द होते की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा शेतकरी जनता अपघात विमा उतरविला होता. त्‍यामुळे ते विम्‍याचे लाभार्थी होते. तसेच तक्रारकर्ती हि मृतकाची ‘पत्‍नी या नात्‍याने वारसदार आहे.

विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 यांनी त्‍यांच्‍या लेखीयुक्‍तीवादात आक्षेप घेतला की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा नविन बांधकाम चालु हेाते त्‍याठिकाणी झाला. परंतू तो बांधकाम चालु असलेल्‍या घरी आला कसा ? कोणत्‍या उद्देशाने आला ? याविषयी काहीही माहिती नाही तर तक्रारकर्तीच्‍या पतीला काही मानसिक त्रास असेल आणि त्‍यात दारूच्‍या नशेत आत्‍महत्‍या केली. या कारणास्‍तव तक्रारकर्ती विम्‍याची लाभधारक नाही. परंतू सदरहू प्रकरणात दाखल केलेल्‍या शवविच्‍छेदन अहवालानूसार व मेडिकल कॉलेज गोंदिया याच्‍या अहवालानूसार तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा डोक्‍याला मार लागल्‍याने (Head injury ) हे सिध्‍द होते. विरूध्‍द पक्षानी आत्‍म्‍हत्‍या केली आहे असे म्‍हटले आहे. परंतू त्‍यासंबधी त्‍यांनी पुरावा दाखल केला नाही. किंवा दस्‍तऐवजामध्‍ये कुठेही आत्‍म्‍हत्‍या केली असा उल्‍लेख नाही. त्‍यामुळे हे आत्‍महत्‍या केली हे सिध्‍द होत नाही. तसेच Chemical analysis  report मध्‍ये 103 mg & 99 mg of ethyl alcohol per 100g दिलेले आहे तसेच शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये consumed alcohol  असले तरी सुध्‍दा पुराव्‍याअभावी हे सिध्‍द होत नाही की, मृतक हा मद्यप्राशन करून  होता व शुध्‍दीवर नव्‍हता तसेच फॉरेनसीक सॉयन्‍स लेबॉरट्रीच्‍या अहवालानूसार तक्रारकर्तीला विम्याचा लाभ मिळू शकत नाही असे विरूध्‍द पक्ष म्‍हणू शकत नाही. परंतू विरूध्‍द पक्ष यांनी नमूद केलेले कारण मंचास संयुक्तिक वाटत नाही. कारण पॉलीसीच्‍या अटी व शर्तीनूसार 7/12 चा उतारा, वयाचा दाखला, गाव नमूना 6 ‘क’, 6’ड’, मृत्‍यु प्रमाणपत्र, बँक पासबुक, इ. वरून विमा कंपनीने तक्रारकर्तीचा दावा मंजूर करावयास पाहिजे होते. परंतू त्‍यांनी  रासायनिक Chemical analysis  report, शवविच्‍छेदन अहवाल या कारणावरून तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करणे ही विरूध्‍द पक्षची सेवेतील त्रृटी आहे. असे या मंचाचे मत आहे.

मा. राष्‍ट्रीय आयोगाने ANIL KUMAR V/S NATIONAL INSHURANCE CO. LTD & ORS. I (2018) CPJ 541 (NC) या न्‍यायनिवाडयामध्‍ये असे नोंदविले आहे.   

Consumer Protection  Act 1996 – section 2 (1) g, 14 (1) (d) 21 (b)- Insurance – Accident of two – wheeler- pillion rider sustained grievous injuries – 100% permanent disability-Intoxication alleged-Claim repudiated – Deficiency in service – District Forum allowed complaint – State commission allowed appeal – Hence revision – Merely because case history reveals factum of alcohol influence without any supportive or cogent evidence it cannot  be concluded as person was under alcohol influence – Investigator has not mentioned anywhere that complainant was under alcohol influence but he made just a presumption that a person i.e. .Pillion rider can fall form motorcycle if he consumes alcohol or under influence of alcohol – OP failed to prove that complainant was under influence of alcohol – Repudiation not justified.

M.SUJATHA V/S BAJAJ ALLANZE GENERAL INSURANCE CO. LTD. III (2015) CPJ 104 (NC) यात न्‍यायनिवाडयात सुध्‍दा असे नमूद केले की, -

Consumer Protection Act.1986 –Section 2(1)(g),14(1) (d),21(b)- Motor Vehicle Act.1988 – Se4ction 185,202 –Insurance – Death claim- Accidental benefit- Claim repudiated on ground that policy holder under influence of alcohol while driving vehicle-Deficiency in service- District Forum allowed complaint- State Commission allowed appeal – Hence revision – FSL report not conclusive – Mere smell of alcohol or presence of ethyl alcohol in tissue samples cannot lead to inference that a person is incapable of taking care of himself- Both post mortem report and investigators report merely. state that deceased had consumed alcohol without giving any details about actual; amount of alcohol if consumed – Repudiation not justified.

NEW INDIA ASSURANCE CO. LTD.- VS- ASHMINDER. 2015 (2) CPR 316(NC) यात न्‍यायनिवाडयात सुध्‍दा असे नमूद केले की, -

Consumer Protection Act 1986.- Section15,17,19 & 21 – Motor Vehicle Act.,1988 – Section 185- Car accident claim – Repudiated – on ground of smell of alcohol – Appellant not provided evidence of proof that respondent under influences of intoxication at time of accident – HELD – State Commission rightly allowed complaint – Rs.500000/-substituted place of Rs.700000/-as awarded by state commission- Rest of the order upheld

वरील न्‍यायनिवाडयाचा विचार करता, तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे.

10.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                             ::आदेश::

(01)  तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02)  विरुध्‍दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, तक्रारकर्तीला तिच्‍या पतीच्‍या अपघाती मृत्‍यू संबधाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा’ योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) तक्रार दाखल दिनांक-12/06/2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला द्यावी.

(03) विरुध्‍दपक्ष क्र 1 व 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-15,000/-(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष-(3) यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी  निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र 2 व 3 ची 30 दिवसांत पालन न केल्‍यास, द.सा.द.शे 12 टक्‍के व्‍याज देय राहिल.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध    करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्तीला  “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. SARITA B. RAIPURE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.