तक्रारकर्तीतर्फे : वकील श्री. एस.बी.डहारे हजर.
विरूध्द पक्ष क्र 1तर्फे ः- वकील श्री. एस.बी.राजनकर हजर
विरूध्द पक्ष क्र 2,3 व 4 गैरहजर.
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री. भास्कर.बी. योगी, अध्यक्ष -ठिकाणः गोंदिया
न्यायनिर्णय
(दि. 28/09/2018 रोजी घोषीत.)
1. तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
2. तक्रारकर्ती ही मयत श्री. हुकूमंचद चुनीलाल ठाकरे यांची पत्नी असून, कायदेशीर वारसदार व नॉमीनी आहे. विरूध्द पक्ष क्र 1 हि विमा कंपनी आहे तर विरूध्द पक्ष क्र 2 हे विक्रेता असून, ते मिक्सर, कुकर असे प्रोडक्स विकतात. विरूध्द पक्ष क्र 3 व 4 विरूध्द पक्ष क्र 2 ची शाखा आहे.
3. तक्रारकर्तीच्या पतीने दि. 14/01/2014 रोजी बॉस मिक्सर + एअईट कुकर 5 लिटरचा + प्रिमीयम सुट लेन्थ विरूध्द पक्ष क्र 2 खरेदी केली. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी प्लॉन नं 316 ज्याची व्हॅलीडीटी सन 2017 पर्यंत होती. या प्लॉन अंतर्गत कोंबो (Combo) खरेदी केले तर त्यांना 20 प्रतिशत डिस्काऊंट तसेच विमा कव्हरेज व 20 प्रतिशत डिस्काऊंटचा हॉलीडे पॅकेजचा लाभ मिळतो. तक्रारकर्ती व त्यांचे पती श्री. हुकूमंचद सी. ठाकरे जर यांचा तीन वर्षात अपघात होऊन, मृत्यु झाला तर त्यांना सामुहिक वैयक्तिक अपघात विम्यामध्ये रू. 1,00,000/-, तसेच तक्रारकर्तीचे पती यांना वैयक्तिक अपघात एक वर्षात झाला तर त्यांना विम्याची रक्कम रू. 2,00,000/-,तसेच त्यांचा एका वर्षात जर नैसर्गीक मृत्यु झाल्यास तर त्यांना विम्याची रक्कम रू. 10,000/-,लागु होती.
4. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या पतीने असे दोन प्रोडक्ट्स प्लॉन ( नं. 213 ‘ए’ व प्लॉन नं. 316 ) घेतले होते. त्याचबरोबर विरूध्द पक्ष क्र 1 यांनी, प्लॉन 213 ‘ए’ प्रमाणे दोन विमा पॉलीसीची रक्कम रू. 3,00,000/-,(रू.2,00,000 + 1,00,000) तक्रारकर्तीला दिली. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, पहिली विमा पॉलीसी क्र. 270802/42/13/8200000137 (रक्कम रू.2,00,000/-,करीता)तसेच दुसरी पॉलीसी क्र. 270802/47/13/9600000590 (रक्कम रू.1,00,000/-,करीता)ची रक्कम त्यांना मिळालेली असून, विरूध्द पक्ष क्र 1 ते 4 यांनी प्लॉन नं. 316 प्रमाणे विम्याची रक्कम दिली नाही.
5. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, दि. 11/10/2014 रोजी दुर्देवाने त्यांच्या पतीचे मृत्यु रेल्वे अपघातामूळे त्या क्षणी निधन झाले. तसेच पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण यांनी मर्ग क्र. 21/2014 फौ.प्र.संहिता कलम 174 प्रमाणे, स्पॉट पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा व पी.एम. रिपोर्ट सादर केले. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या पतीच्या मृत्युनंतर विरूध्द पक्ष क्र 4 यांना भेटून विम्याची रक्कम मिळण्यासाठी त्यांनी जे-जे कागदपत्रे विरूध्द पक्ष क्र 4 यांनी मागीतले त्याप्रमाणे त्यांनी त्याचा रितसर पाठपुरावा दि. 01/11/2014 रोजी करून अनेकदा विरूध्द पक्ष क्र 4 कडे भेट दिली तरी सुध्दा त्यांनी विम्याची रक्कम दिली नाही. फक्त एकच सांगावयाचे की, आम्ही तुम्हाला कळवू. काही काळानंतर विरूध्द पक्ष क्र 4 यांनी तक्रारकर्तीला, विरूध्द पक्ष क्र 2 व 3 यांना भेटण्यास सांगीतले. त्यांनी तिकडेही त्याचा पाठपुरावा केल्यानंतर माहे जानेवारी 2016 रोजी विरूध्द पक्ष यांनी कोणताही कारण नसल्याने विम्याची रक्कम देण्यास नकार दिला, म्हणून त्यांनी दि. 09/02/2016 रोजी त्यांच्या वकीलामार्फत रितसर कानुनी नोटीस पाठविली व विरूध्द पक्षाना त्या नोटीसची बजावणी झाली तरी सुध्दा आजपर्यंत विरूध्द पक्षाने विम्याची रक्कम अदा केलेली नाही व त्या नोटीसचे प्रतिउत्तर आजपर्यंत दिले नाही. आणि विरूध्द पक्षाने असे कृत्य करून, ग्रा.सं.कायदाखाली सेवेत त्रृटीचा कसुर केलेला असून, तक्रारकर्तीला मानसिक व शारिरिक त्रास झाला असून, तक्रारकर्तीनी सदर तक्रार या मंचात दाखल केली.
6. विरूध्द पक्ष क्र 1 यांचेतर्फे वकील श्री. एस.बी.राजनकर हजर होऊन त्यांनी त्यांचा लेखी जबाब मंचात सादर केला. विरूध्द पक्ष क्र 2,3 व 4 यांचेतर्फे वकील श्री. राजेंद्र लांझे हे मंचात हजर होऊन त्यांनी आपले वकीलपत्र तसेच लेखीकैफियत सादर केली. विरूध्द पक्षांनी या मंचात पुरसीस सादर करून, त्यांना वेगळे पुराव्याचे शपथपत्र दाखल करावयाचा नाही. तक्रारकर्तीने यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र तसेच अतिरीक्त कागदपत्रे या मंचात सादर केली. विरूध्द पक्ष क्र 2,3 व 4 यांनी लेखीकैफियत दाखल केल्यानंतर, या मंचात ते सतत गैरहजर राहिले तसेच त्यांनी पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद सादर केले नाही.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफियत, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे व लेखीयुक्तीवाद यांचे वाचन केले आहे त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ती ही दावा मिळण्यास पात्र आहेकाय ? | होय |
2. | विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्तीला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारकर्ती सिध्द करतात काय? | होय विरूध्द पक्ष क्र 2 ते 4 च्या विरूध्द. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूरकरण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
8. तक्रारकर्तीने सादर केलेल्या दस्ताऐवजावरून हे स्पष्ट दिसून येते की, त्यांच्या मयत पतीने विरूध्द पक्ष क्र 2 ते 4 यांनी प्रायोजित केलेल्या प्लॉन नूसार त्यांच्याकडून माल खरेदी केला होता. त्याच अनुषंगाने विरूध्द पक्ष क्र 2 ते 4 यांनी प्लॉन क्र. 316, (पेज क्र 42) व प्लॉन क्र 213 ‘ए’(पेज क्र. 44) जारी केला होता. त्याप्रमाणे विरूध्द पक्ष क्र 1 यांनी सादर केलेल्या दस्ताऐवजावरून हे सिध्द होते की, त्यांनी प्लॉन क्र. 213 ‘ए’ नूसार विम्याची रक्कम तक्रारकर्तीला दिली आहे. विरूध्द पक्ष क्र 2 ते 4 यांनी प्लॉन क्र 316 नूसार विमा करून घेतला होता किंवा नाही यासाठी त्यांनी कोणतेही कागदपत्रे या मंचात सादर केले नाही. विरूध्द पक्ष क्र 1 यांचे असे म्हणणे आहे की, विरूध्द पक्ष क्र 2 ते 4 यांनी त्यांच्याकडून प्लॉन 213 ‘ए’ प्रमाणे तक्रारकर्तीच्या मयत पतीच्या नावाने दोन विमा पॉलीसी (सामुहिक वैयक्तिक अपघात रक्कम रू. 1,00,000/- + वैयक्तिक अपघात 2,00,000/-,) त्यांनी जारी केला होता आणि त्याचनूसार त्यांनी तक्रारकर्तीला रक्कम रू. 3,00,000/-,दिलेले आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या सेवेत कोणतीही त्रृटी केलेली नसून, विरूध्द पक्ष क्र 2 ते 4 यांच्या चुकीमूळे त्यांना या मंचात यावे लागले. या मंचाने दोन्ही प्लॉनची पावतीचे निरीक्षण केले असून त्यामध्ये हि बाब स्प्ष्टपणे नोंदविली आहे की, GPA – Rs. 1,00,000/-,For the period of 3 years, P.A - Rs. 2,00,000/-, For the period of 1 years,यावरून हे स्पष्ट होते की, विरूध्द पक्ष क्र 2 यांनी चार विमा पॉलीसी करून घ्यायला पाहिजे होती. परंतू त्यांनी फक्त एका प्लॉनची दोन विमा घेऊन, दुसरी प्लॉनच्या खाली तक्रारकर्तीच्या पतीचा विमा करून दिला नाही. विरूध्द पक्ष क्र 2 ते 4 यांनी माल विक्री करण्यासाठी ग्राहकांना खोटे आमीष दाखवून त्यांना दोन प्लॉन अंतर्गत त्यांचे माल विक्री करून सुध्दा प्लॉनच्या अंतर्गत त्यांनी विमा करून दिला नाही. म्हणून हि बाब स्पष्ट होते की, विरूध्द पक्ष क्र 2 ते 4 यांनी ग्रा.सं.कायदयाच्या तरतुदीनूसार सेवा देण्यात कसूर केला आहे. म्हणून या मंचाने मुद्दा क्र 1 चा निःष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहोत. तसेच मुद्दा क्र 2 खाली फक्त विरूध्द पक्ष क्र 2 ते 4 यांनी सेवेत त्रृटी केल्याने त्यांना कसुरवार ठरविण्यात येते व विरूध्द पक्ष क्र 1 यांनी जारी केलेली विमा पॉलीसीप्रमाणे तक्रारकर्तीला रू. 3,00,000/-, देऊन कोणतेही गैरव्यवहार किंवा सेवेत त्रृटी केली नाही, म्हणून त्यांना या तक्रारीत वगळण्यात येत आहे
9. विरूध्द पक्ष क्र 2 ते 4 यांनी प्लॉन क्र. 316 नूसार तक्रारकर्ती व त्यांचे मयत पती यांचा विरूध्द पक्ष क्र 1 कडून विमा काढून दिला नाही. आणि तक्रारकर्तीला रू. 3,00,000/-,चा नुकसान झाला असून, त्याव्यतिरीक्त त्यांना मानसिक व शारिरिक त्रास सोसावा लागला व त्यांना या मंचात तक्रार दाखल करण्यास भाग पडले, म्हणून या मंचाचे असे मत आहे की, प्लॉन क्र. 316 ची पावती नूसार तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यु विमा काळात झाला असल्याकारणाने रू.3,00,000/-,तसेच मानसिक व शारिरिक त्रासाबद्दल रू. 10,000/-,व तक्रारीचा खर्च रू.5,000/-,देणे योग्य व न्यायोचित होईल.
वरील चर्चेवरून व नि:षकर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष क्र 2 ते 4 यांनी तक्रारकर्तीला (विम्याची सामुहिक वैयक्तिक अपघात रक्कम रू. 1,00,000/- + वैयक्तिक अपघात 2,00,000/-,) अशी एकुण रक्कम रू. 3,00,000/-, तक्रारकर्तीला दयावे.
3. तक्रारकर्तीस मानसिक व शारिरिक त्रासाबाबत विरूध्द पक्ष क्र 2 ते यांनी रू. 10,000/-,व तक्रारीचा खर्च रू. 5,000/-, दयावा.
4. विरूध्द पक्ष क्र 2 ते 4 यांना आदेश देण्यांत येतो की, उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी. तसे न केल्यास त्या रकमेवर द.सा.द.शे 9 टक्के व्याज अदा करेपर्यंत लागु राहील
5. विरूध्द पक्ष क्र 1 यांचेविरूध्द कोणताही आदेश नाही.
6. न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
7. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्तीला परत करावी.
npk/-