::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या) (पारीत दिनांक :- 15/01/2020)
- , अर्जदार हे निलज ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून मयत शालू उर्फ शारदा नरेंद्र यांचा मुलगा आहे अर्जदाराने दिनांक 10.06.16 योजनेअंतर्गत संपूर्ण कागदपत्र देऊन 22.6 2016 रोजी तालुका कृषी अधिकारी प्रमुख यांनी जावक क्रमांक 1023 बजाज कॅपिटल इन्शुरन्स लिमिटेड कडे पाठवले परंतु आजपर्यंत रक्कम मिळाले नाही कारण दिनांक 8.02,2018 कंपनीने नुकसानभरपाईचा दावा मृतकाचे नाव निश्चित न झाल्यामुळे नामंजूर करण्यात आलेला आहे.अर्जदारची आई ही शेतकरी असून दिनांक 21. 3. 2016 झालेल्या अपघातामुळे मृत्यू सर्पदंशाने मृत्यू झाला. अर्जदाराने गोपीनाथ मुंडे विमा योजनेअंतर्गत प्रमाणपत्रासह आवश्यक सर्व कागदपत्र दोन प्रतीत देऊन प्रस्ताव कृषी अधिकारी प्रमुख यांना विहित मुदतीत सादर केला. अर्जदार विमा रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे परंतु विमा रक्कम न मिळाल्यामुळे नाईलाजाने अर्जदाराने विद्यमान मंचत तक्रार दाखल करावी लागली. इन्शुरन्स कंपनीने त्रुटीची पूर्तता करण्याबाबत पत्र अर्जदारला पत्र दिले त्यात सहा क, आधार कार्ड ,निवडणूक ओळखपत्र व मृतकाच्या नावातील याबाबतची पूर्तता अर्ज्दरणे केली, तरीही इन्शुरन्स कंपनीने किरकोळ कारणामुळे अर्जदाराचे नुकसानभरपाई दी, 8,02.2018 रोजी रद्द केला व तसे पत्र अर्जदाराला पाठवले. मयत शारदा उर्फ शालू नरेंद्र मैद यांचा दिनांक 29.03.2016 रोजी मोजा निलज तह. ब्रह्मपुरी येथे विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. शारदा उर्फ शालू नरेंद्र मैद हिला शालू या नावाने ही ओळखत होते या नावाने ओळखत होते व तिचे काही सरकारी व निमसरकारी दस्तावेज शालू नरेंद्र मैद या नावाची नोंद आहे तिच्या सर्वे क्रमांक 233/2 भोगवटदार वर्ग-1 क्षेत्रफळ 0.80 हे,आर आहे तसेच अर्जदाराचे खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया कंपनीच्या पासबुकची प्रत व इतर संपूर्ण कागदपत्रासह तालुका कृषी अधिकारी यांना दिलेली अर्जदारने दिली असून सुद्धा दावा नाकारल्यामुळे सदर तक्रार अर्जदाराने गैरअर्जदाराविरुद्ध मंचासमक्ष दाखल केलेली आहे
2.. अर्जदारांची मागणी अशी आहे की अर्जदार हिला शेतकरी विमा योजनेअंतर्गत रुपये 2,00,000/- गैरअर्जदार क्रमांक एक कडून दसादशे 18% व्याजासह रक्कम मिळण्याचा आदेश व्हावा तसेच अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक त्रासाला पोटी रुपये 85,000/-व तक्रारीचा खर्च रु,5000/- अशी संपूर्ण रक्कम18% व्याजासह देण्यात यावी
3. गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 1उत्तरात प्राथमिक आक्षेप घेतला की सदर विमा
तक्रारीत अर्जदार यांनी महाराष्ट्र सरकार कृषी पुणे यांना सादर तक्रारीत पार्टी केलेले नाही सबब सदर तक्रार आवश्यक पक्ष जोडल्यामुळे खरीज करण्यात यावे तसेच तक्रारीतील इतर नमूद केलेले मुद्दे नामंजूर करीत त्यांनी विशेष कथनत असे नमूद केले की गैरअर्जदाराने अर्जदाराकडून आवश्यक असलेले दस्तएवज पाठवण्याकरिता पुरेशी संधी देऊन सुद्धा मुदतीत कागदपत्र न पाठवल्यामुळे अर्जदारचा सदर दावा गैरअर्जदार यांनी नामंजूर केलेला आहे. तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या सातबारा उतारा दिनांक 20 .2. 2016 च्या सातबारा उताऱ्यात व फेरफार दिनांक 11. 3. 2016 मध्ये निदर्शनास येते की शालू नरेंद्र मैद नाव अर्जदाराचे नमूद केले आहे,परंतु मयत हिच्या इतर दाखल केलेल्या दस्तएवजात राशन कार्ड 21. 2.14 यामध्ये शारदा नरेंद्र मैद असे नमूद आहे. या दोन कागदपत्रांमध्ये अर्जदाराच्या नावांमध्ये भिन्नता आढळते, त्यामुळे असा प्रश्न समोर येतो की शालू आणि शारदा या दोन्ही व्यक्ती एक आहे की दोन भिन्न व्यक्ती आहे, अर्जदार हे गैरअर्जदारला व मंचला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच जे नाव पब्लिक दस्तएवजवर आहे तेच नाव ग्राह्य धरण्यात येईल. या सर्व कारणामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी
4. गैरअर्जदार क्रमांक दोन बजाज कॅपिटल यांनी उपस्थित राहून तक्रार अर्ज तक्रार येथील म्हणणे खोडून काढत विशेषत नमूद केले की अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक एक यांच्याविरुद्ध दावा रक्कम न दिल्याबाबत सदर तक्रार दाखल केलेली असून गैरअर्जदार क्रमांक 2 हा गैरअर्जदार 1 व अर्जदार यांच्यातला दुवा आहे. दावा मंजूर वा नामंजूर करण्याबाबत गैर अर्जदार क्रमांक दोन चा काही संबंध नसतो, तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 व बजाज कॅपिटल हे दोन्ही वेगवेगळ्या कंपनी असून एका कंपनीच्या सेवेत न्यूनते बद्दल दुसऱ्या कंपनीला जबाबदार ठरू शकत नाही .ही बाब मान्य आहे की विमा दावा महाराष्ट्र सरकारतर्फे गैरअर्जदार क्रमांक एक कडे पॉलिसीची रक्कम भरली गेली होती परंतु सदरच्या गैरअर्जदार क्रमांक दोन ने अर्जदारकडून कोणतीही रक्कम स्वीकारलेली नाही. सदर तक्रार गैरअर्जदार क्रमांक दोन विरुद्ध खारिज करण्यात यावे
5. गैरअर्जदार क्रमांक तीन यांना मंचातर्फे नोटीस पाठवण्यात आले परंतु नोटीस प्राप्त होऊन सुद्धा ते प्रकरणात येऊन उपस्थित न झाल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले
6. अर्जदाराची तक्रार, दस्ताऐवज शपथपत्र, व लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदार क्र. 1 व २ लेखी म्हणणे उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे .
कारणमीमांसा
7. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीत कथनावरून व दस्तएवजावरून ही बाब स्पष्ट होत आहे की अर्जदार यांची पत्नीच्या नावाने मोजा पारडगाव तहसील ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे शेती सर्वे क्रमांक 233/2 भोगवट वर्ग 1 क्षेत्रफळ 0.80 हे.आर शेती असून तिचा गैरअर्जदार क्रमांक 1 कडून कडून 3 मार्फत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना 2,00,000/- विमा उतरवला होता परंतु दिनांक 21. 3. 2016 रोजी तिचा मौजा निलज तह.ब्रह्मपुरी येथे अपघातामुळे सर्प दंश अपघातामुळे मृत्यू झाला ही तक्रारीत दाखल एफ आय आर व इतर पोलीस दस्तऐवजा वरून सिद्ध होत आहे. तसेच तक्रारीत निशाणी क्रमांक 4 मधील दस्त क्रमांक 12 वरती तिचे मृत्यू प्रमाणपत्रही दाखल आहे, पुढे दस्त क्रमांक 10 अर्जदाराने शपथपत्र दाखल करून नमूद केले आहे की,त्याची पत्नी स्वर्गीय शारदा नरेंद्र मैद हिचे मालकीचे मोजा पारडगाव,तह.ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर येथे सर्वे क्र. . २३३/२ येथील ७/१२ उतारावर तिचे नाव सौ. शालु नरेंद्र मैद हे नाव पण माझ्या पत्नीचे नाव शारदा नरेंद्र मैद हे आहे व शारदा व शालू हि नावे एकाच व्यक्तीची असून दोन्ही माझ्याच पत्नीचे नाव आहेत.गैरअर्जदार यांनी त्यांच्या उत्तरात आक्षेप घेतला आहे की शारदा व शालू दोन्ही भिन्न नावाचे व्यक्ती असून तिच्या आधार कार्ड राशन कार्ड वर शारदा नाव असून नाव असून फेरफार व सातबारा यावर शालु हे नाव आहे त्यामुळे अर्जदार हा मंचाची दिशाभूल करीत आहे तसेच दोन्ही व्यक्ती भिन्न असून अर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तावेज योग्य नसून त्यांचा दावा नामंजूर करण्यात यावा. परंतु अर्जदराने त्याच्या तक्रारीची दस्तावेजांसोबत शपथपत्रा मध्ये ही बाब नमूद केलेली आहे की शारदा व शालूही एकाच व्यक्तीचे नावे आहे व दाखल दस्तावेज चे अवलोकन केले असता काही कागदपत्रावर शारदा शालू ही नावे ही बाब सिद्ध करत आहे,हि दोन्ही नावे एकाच नावाची व्यक्ती आहे तसेच मंचाच्या मते सदर तक्रार शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत दाखल केली असून त्याचे उद्दिष्ट शेतकरी कुटुंबास आर्थिक सहाय्य मिळवून देणे असा आहे, त्याकरता शासन निर्णयात दिलेल्या मार्गदर्शन व सूचनानुसार तांत्रिक बाबींत जास्त वाव दिलेला नाही, सदर प्रकरणात केवळ तांत्रिक बाबी उपस्थित करून गैरअर्जदार विनाकारण अर्जदाराचा विमा दावा नामंजूर केलेला आहे, सदर कृती गैर अर्जदाराची अर्जदाराप्रती सेवेत त्रुटी दर्शविते
8. गैरअर्जदार क्र. २ यांची अर्जदाराला विमा रक्कम मिळून देण्याची जबाबदारी आहे सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक २ यांनी अर्जदाराला विमा रक्कम मिळून देण्यास दुर्लक्ष केलेले असून मंचाच्या मते हि सुद्धा अर्जदारप्रति सेवेत त्रुटी दिसून येतआहे. 9. सबब गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांनी अर्जदार ह्याला विमा दाव्या बाबत अटी व शर्ती चे पालन न केल्याची बाब सिद्ध होत आहे,तसेच गैरअर्जदाराचा तांत्रिक स्वरूपाचा बचाव प्रस्तूत वादकथनाला लागू होत नसल्यामुळे मंचाच्या मतानुसार अर्जदार हा गैरअर्जदार कडून विमा दावा मिळण्यास पात्र आहे
10. वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे
अंतीम आदेश
१. अर्जदाराची तक्रार क्र.76/2018 अंश मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. १ ह्यांनी अर्जदाराला त्याचे पत्नीचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दाव्याची रक्कम रु. 2,00,000/-द्यावे,व गैरअर्जदार क्र. २ ह्यांनी रु. 10,000/- द्यावे
3. गैरअर्जदार क्र. 3 विरुद्ध कोणताही आदेश नाही.
4. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती.किर्ती वैदय(गाडगीळ)) (श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.