Maharashtra

Sangli

CC/14/280

SHRI MARUTI RAMA RUPNAR - Complainant(s)

Versus

NANASO SAGARE CO.OP. CREDIT SOC. LTD. THROUGH MANAGER ETC. 13 - Opp.Party(s)

ADV. M.N. SHETE

10 Apr 2015

ORDER

                                                        नि.24

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर

  मा.अध्‍यक्ष श्री ए.व्‍ही.देशपांडे

मा.सदस्‍या - सौ वर्षा नं. शिंदे

     मा.सदस्‍य – सौ मनिषा कुलकर्णी

ग्राहक तक्रार अर्ज क्र. 280/2014

तक्रार नोंद तारीख   :  29/11/2014

तक्रार दाखल तारीख  :   15/12/2014

निकाल तारीख         :   10/04/2015

 

श्री मारुती रामा रुपनर

रा. डोर्ली, ता.जत जि.सांगली                                 ....... तक्रारदार

 

विरुध्‍द

 

1.  नानासाहेब सगरे को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि.

    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली

    तर्फे व्‍यवस्‍थापक, श्री शिवलिंग मुरग्‍याप्‍पा आरळी

    रा.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

2.  श्री नारायण यशवंत पवार, चेअरमन

    रा.राजंणी, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

3.  श्री सुकुमार बाबा कोठावळे, व्‍हाईस चेअरमन

    रा.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

4.  श्री शिवलिंग चन्‍नया स्‍वामी

    रा.नागज, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

5.  श्री गणपती आप्‍पासो सगरे, संचालक

    रा.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

6.  श्री सुहास शिवाजी पाटील, संचालक

    रा.आगळगांव, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

7.  श्री विश्‍वनाथ विठोबा कोळेकर, संचालक

    रा.निमज, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

8.  श्री सत्‍यवान परशुराम कुंभारकर, संचालक

    रा.शिंदेवाडी (एम), ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

9.  श्री दत्‍तात्रय कृष्‍णा माळी, संचालक

    रा.कोकळे, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

10. श्री रामचंद्र सुखदेव जगताप, संचालक

    रा.अग्रणी धुळगांव, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

11. श्री शहाजी रामचंद्र एडके, संचालक

    रा.म्‍हैशाळ (एम), ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

12. सौ संगिता संभाजी बजबळे, संचालक

    रा.थबडेवाडी, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली

13. श्री विश्‍वास भगवान पवार, संचालक

    रा.देशिंग, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली                    ...... जाबदार

 

 

                                       तक्रारदार  तर्फे : अॅड  एम.एन.शेटे

                                               जाबदार क्र.1 ते 7 व 9 ते 13 :  एकतर्फा

                         जाबदार क्र.8 :  वगळले

 

- नि का ल प त्र -

द्वारा : मा. अध्‍यक्ष: श्री. ए.व्‍ही.देशपांडे  

 

1.    प्रस्‍तुतची तक्रार, ऊपरनिर्दिष्‍ट तक्रारदारांनी, जाबदार यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12(1)(क) नुसार, जाबदारांनी दिलेल्‍या दूषित सेवेबद्दल दाखल केली आहे. 

2.    थोडक्‍यात हकीकत अशी की, जाबदार संस्‍था ही महाराष्‍ट्र सहकारी कायद्यानुसार नोंदणीकृत संस्‍था आहे.  जाबदार क्र.1 ही संस्‍था असून, जाबदार क्र.2 हे तिचे चेअरमन आहेत व जाबदार क्र.3 हे व्‍हा.चेअरमन असून, जाबदार क्र.4 ते 13 हे संस्‍थेचे संचालक/संचालिका आहेत. जाबदार क्र.1 संस्‍थेचा लोकांचेकडून ठेव, पिग्‍मी इ. स्‍वरुपात ठेवी स्‍वीकारणे, त्‍यावर व्‍याज देणे, त्‍या स्‍वीकारलेल्‍या ठेवी गरजू सभासद लोकांना कर्ज म्‍हणून वाटप करणे व त्‍या पासून नफा मिळ‍वणे हा व्‍यवसाय आहे.  तक्रारदार यांनी भविष्‍यात येणा-या आर्थिक संकटाकरिता किंवा आर्थिक अडचणीकरिता काही रक्‍कम बचत असावी म्‍हणून जाबदार संस्‍थेत खालील परिशिष्‍टात नमूद केलेल्‍या रकमा मुदत ठेव योजने अंतर्गत खातेवर ठेवलेल्‍या आहेत.

परिशिष्‍ट

अ.क्र.

खातेदाराचे नाव

खाते नं.

पावती नं.

रक्‍कम ठेवल्‍याचा दिनांक

रक्‍कम परतीचा दिनांक

ठेव रक्‍कम रु.

मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम

1

श्री मारुती रामा रुपनर

350

2229

30/7/08

30/10/08

10,000

13,000

 

 

 

 

 

 

एकूण

13,000

 

तक्रारदार क्र.1 ते 4 हे एकत्र कुटुंबातील सदस्‍य आहेत.  त्‍या हक्‍काने प्रस्‍तुतची तक्रार त्‍यांन दाखल केली आहे. सदर ठेवपावत्‍यांची मुदत संपलेली आहे. तक्रारदार क्र.1 हे ह्दयविकाराने आजारी आहेत.  त्‍यांना औषधोपचारासाठी पैशाची अत्‍यंत आवश्‍यकता आहे.  तसेच शेतीकरीताही पैशाची आवश्‍यकता आहे.  वेळेत पैसे न मिळालेस तक्रारदारांचे कधीही भरुन न येणारे नुकसान होणार आहे.  जाबदार संस्‍थेचे मॅनेजर श्री शिवलिंग आरळी यांना या बाबीची कल्‍पना दिलेली आहे.  परंतु जाबदारांनी तक्रारदारांचे परिस्थितीची कोणतीही दखल घेतलेली नाही.  तक्रारदार हे रक्‍कम मागणीकरिता संस्‍थेत गेल्‍यावर, आम्‍हांला तुमची रक्‍कम एकरकमी देणे अशक्‍य आहे, सदरची रक्‍कम हप्‍त्‍याहप्‍त्‍याने देवू असे खोटे आश्‍वासन जाबदारांनी दिले.  जाबदार संस्‍थेची आर्थिक घसरण होण्‍याकरिता जाबदार क्र.1 ते 13 यांचा मनमानी कारभार, गैरव्‍यवस्‍थापन, पत नसणा-यांना कर्जाचे वितरण या बाबी जबाबदार आहेत.  सबब, सदर ठेवींची मुदत संपल्‍यानंतरची रक्‍कम रु.13,000/- द.सा.द.शे.18 टक्‍के दराने होणा-या व्‍याजासह तक्रारदार यांना जाबदार यांचेकडून वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या अदा करणेचे आदेश व्‍हावेत, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रु.30,000/- नुकसान भरपाई व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.4,000/- तक्रारदारांना देण्‍याबाबत आदेश व्‍हावा अशी मागणी तक्रारदारांनी जाबदारांकडून केली आहे.

3.    तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीचे पुष्‍ठयर्थ नि.2 ला आपले शपथपत्र दाखल केले असून नि.4 या फेरिस्‍त सोबत संबंधीत ठेव पावत्‍यांच्‍या स्‍वसाक्षांकीत सत्‍यप्रती दाखल केल्‍या आहेत.

4.    जाबदार क्र. 1 ते 7 व 9 ते 13 यांना रितसर नोटीसा बजावून देखील ते हजर न झाल्‍याने  जाबदार विरुध्‍द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश नि.1 वर पारीत करण्‍यात आला.  जाबदार क्र.8 यांचेविरुध्‍द दाद मागणेची नाही अशी पुरसीस तक्रारदाराने नि.19 ला दाखल केली आहे.

5.    तक्रारदाराने नि.20 ला, त्‍यांनी तक्रारअर्जासोबत जे शपथपत्र दाखल केले आहे, तेच पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र समजण्‍यात यावे अशी पुरसीस दाखल केली आहे व‍ नि.21 ला जादा लेखी अथवा तोंडी पुरावा देणेचा नाही अशी पुरसीस दाखल केली आहे.  तसेच नि.22 ला तक्रारदाराने पुरसीस दाखल करुन तक्रारअर्जामधील ठेवपावत्‍यांच्‍या परिशिष्‍टातील शेवटच्‍या कॉलममध्‍ये ‘मुदत संपल्‍यानंतर मिळणारी रक्‍कम’ या मजकुराऐवजी ‘ तक्रारअर्ज दाखल करतानाची येणे रक्‍कम ’  असा मजकूर समजणेत यावा असे नमूद केले आहे.

6.    जाबदार क्र. 1 ते 7 व 9 ते 13 विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारीत झाल्‍यामुळे प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये कोणाही जाबदारतर्फे लेखी कैफियत दाखल झालेली नाही आणि तक्रारदाराची संपूर्ण कथने ही अबाधीतरित्‍या अभिलेखावर आलेली आहेत.  तक्रारदाराने नि.2 ला आपले शपथपत्र दाखल केले आहे. सदर शपथपत्रामध्‍ये तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीतील संपूर्ण कथने ही शपथेवर उध्‍दृत केली आहेत व सदरचे शपथपत्र हेच पुराव्‍याचे शपथपत्र समजण्‍यात यावे अशी पुरसीस नि.20 ला दाखल केली आहे.  तक्रारदाराच्‍या वकीलांचा युक्तिवाद देखील आम्‍ही ऐकून घेतला आहे.

 

7.    तक्रारदाराची शपथेवरील संपूर्ण कथनांना आणि त्‍यांनी दाखल केलेल्‍या कागदोपत्री पुराव्‍याला जाबदारतर्फे कसलेही आव्‍हान देण्‍यात आलेले नाही.  त्‍यामुळे ही बाब स्‍पष्‍टपणे शाबीत होते की, तक्रारदाराने वर नमूद परिशिष्‍टात नमूद केल्‍याप्रमाणे मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्‍कम रु.10,000/- जाबदार क्र.1 संस्‍थेमध्‍ये गुंतविलेली होती व ती व्‍याजासह रक्‍कम रु.13,000/- इतकी तक्रारदारास देय झालेली होती.  सदर व्‍याजासह होणा-या रकमेची तक्रारदाराने जाबदारकडून वेळोवेळी मागणी केली असता जाबदारांनी ती रक्‍कम तक्रारदारास परत दिलेली नाही हे तक्रारदाराच्‍या शपथेवरुन दिसून येते.  तथापि, तक्रारदाराने तक्रारअर्जात वर नमूद परिशिष्‍टात शेवटच्‍या कॉलममध्‍ये मुदतीअंती देय रक्‍कम रु.13,000/- येणे असल्‍याचे नमूद केले आहे, ती चुकीची असल्‍याचे दिसते.  मुदतीअंती व्‍याजदराचा व एकूण मुदतीचा विचार करता एकूण येणे रक्‍कम रु.10,125/- इतकी होते.  तक्रारदाराने नि. 22 ला पुरसीस दाखल करुन परिशिष्‍टातील शेवटच्‍या कॉलममधील रक्‍कम तक्रार दाखल तारखेपर्यंत व्‍याजासह येणे बाकी रक्‍कम समजावी असे नमूद केले आहे.  त्‍यामुळे सदरची रक्‍कम रु.13,000/- तक्रार दाखल तारखेपर्यंत येणे बाकी असल्‍याचे दिसते. तक्रारदाराच्‍या या विधानांना जाबदारतर्फे कोणतेही आव्‍हान देण्‍यात आलेले नाही, त्‍यामुळे तक्रारदाराची संपूर्ण तक्रारच यथायोग्‍यरित्‍या शाबीत झालेली आहे असा या मंचाचा निष्‍कर्ष आहे.  हे स्‍वयंस्‍पष्‍ट आहे की, ठेव पावती व वचन दिल्‍याप्रमाणे जाबदार क्र. 1 ते 7 व 9 ते 13 यांचेवर मुदतीअंती देय होणारी रक्‍कम तक्रारदारास परत करण्‍याचे बंधन जाबदारावर आहे. तक्रारदार व जाबदार यांचेमध्‍ये ग्राहक व सेवा देणारे असे नातेसंबंध निर्माण झाल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते व त्‍याचा इन्‍कार जाबदारांनी केलेला नाही.  वचनाप्रमाणे तक्रारदारास त्‍यांची देय रक्‍कम परत न करणे ही जाबदारच्‍या सेवेतील त्रुटी आहे असा या मंचाचा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष आहे.  सबब, तक्रारदाराने आपली तक्रार पूर्णतया शाबीत केलेली आहे व त्‍याला जाबदारांनी सेवेत त्रुटी दिलेली आहे हे शाबीत‍ झालेले आहे असा या मंचाचा निष्‍कर्ष आहे.  सबब, तक्रारदारास ठेवीची व्‍याजासह होणारी देय रक्‍कम परत मागण्‍याचा अधिकार आहे.  जाबदार क्र. 1 ते 7 व 9 ते 13 हे वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या सदरची रक्‍कम तक्रारदारास व्‍याजासह देण्‍यास जबाबदार आहेत असा या मंचाचा निष्‍कर्ष आहे. 

 

8.    तक्रारदाराने, त्‍यास झालेल्‍या मानसिक व आर्थि‍क त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.30,000/- ची मागणी जाबदारकडून केली आहे.  प्रस्‍तुत प्रकरणातील एकूण तथ्‍यांश पाहता तक्रारदारास सदरचे नुकसान भरपाईपोटी रु.5,000/- मंजूर करणे इष्‍ट राहील असा या मंचाचा निष्‍कर्ष आहे.

 

9.    तक्रारदाराने सदर तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.4,000/- ची मागणी जाबदारकडून केली आहे.  ग्राहक मंचामध्‍ये तक्रार दाखल करण्‍यासाठी येणा-या खर्चाचा विचार करता, या मंचाच्‍या मते तक्रारदारास तक्रारअर्जाचा खर्च म्‍हणून रु.1,000/- देणे इष्‍ट राहील असा या मंचाचा निष्‍कर्ष आहे.  सबब आम्‍ही खालील आदेश पारीत करीत आहोत.

 

- आ दे श -

1.    तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2.    जाबदार क्र. 1 ते 7 व 9 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्‍‍तरित्‍या तक्रारदारास, परिशिष्‍टात नमूद केलेल्‍या ठेवपावत्‍यांची मुदतीअंती होणारी एकूण रक्‍कम रु.13,000/- अदा करावी.  तसेच सदर ठेवींच्‍या मूळ रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम हाती पडेपर्यंत ठेवपावतीमध्‍ये नमूद केलेल्‍या व्‍याजदराने म्‍हणजे द.सा.द.शे.5 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

3.    मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- तक्रारदारास जाबदार क्र. 1 ते 7 व 9 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या द्यावी.

4.    तक्रारअर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.1,000/- जाबदार क्र. 1 ते 7 व 9 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्‍‍तरित्‍या तक्रारदारांना द्यावेत.

5.    सदरच्‍या सर्व रकमा या आदेशाच्‍या तारखेपासून 45 दिवसांत तक्रारदारास द्याव्‍यात अन्‍यथा तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25(3) किंवा 27 खाली योग्‍य ती दाद मागता येईल.

6.    सदर निकालपत्राच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनामूल्‍य देण्‍यात याव्‍यात.

 

सांगली

दि. 10/04/2015                        

           

( सौ मनिषा कुलकर्णी )          ( सौ वर्षा शिंदे )                 ( ए.व्‍ही.देशपांडे )

       सदस्‍या                      सदस्‍या                         अध्‍यक्ष

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.