तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ना.द. कदम, सदस्य - ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. सामनेवाले क्रमांक 1 हे सामनेवाले क्रमांक 2 यानी उत्पादीत केलेल्या ईलेक्ट्रानीक वस्तुंचे अधिकृत विक्रेते असून त्यांची व्यावसायिक शाखा सांताक्रृझ येथे आहे. तर सामनेवाले क्र.2 हे उत्पादक असून त्यांची उत्पादक कंपनी औरंगाबाद येथे आहे.
2. तक्रारदार हे सांताक्रृझ येथील रहिवासी असून ते सेवानिवृत प्राचार्य आहेत. तक्रारदारांच्या कथनानूसार त्यांचा मुलगा जगदीश रेडडी यानी तक्रारदारास दिवाळी भेट देण्यासाठी म्हणुन सामनेवाले क्र. 1 यांच्या सांताकृझ येथील शोरूम मधून दि. 17.10.2009 रोजी रू.7,600/-,किंमतीचा, सामनेवाले क्र. 2 उत्पादीत, व्हिडिओकॉन कलर टि.व्ही. व त्या बरोबरच रू.1650/-, किंमतीचा फिलीप्स कंपनीचा डी.व्ही.डी प्लेअर खरेदी केला.
तक्रारदाराने असे कथन केले आहे की, सदरहू टि.व्ही. चालू केल्यानंतर टी.व्ही. मधील चित्रांचा रंग वेगवेगळा दिसू लागला शिवाय पडदयावर अनेक रेखा दिसू लागल्या. त्यामुळे तक्रारदाराने दि.21.11.2009 रोजी तक्रार केल्यावर सामनेवाले 1, यानी त्या टिव्हीच्या बदल्यात नवीन टी.व्ही. दि.27.11.2009 रोजी दिला. तसेच डीव्हीडी प्लेअर सुध्दा व्यवस्थित चालत नसल्याने तो सुध्दा सामनेवाले यांनी दि.03.01.2010 रोजी बदलून दिला.
तक्रारदाराने पुढे असे कथन केले आहे की, सामनेवाले 1, यानी दि.27.11.2009 रोजी बदलून दिलेल्या टी.व्ही मध्ये सुध्दा पहिल्या टी.व्ही.प्रमाणेच दोष दिसू लागले. त्यामुळे टी.व्ही बघणे तक्रारदारास अशक्य झाल्याने त्यानी सामनेवाले क्र 1 याना दि. 04.04.2010 रोजी त्यांच्या प्रत्यक्ष शोरूममध्ये जाऊन तो नादुरूस्त टीव्ही संच बदलुन देण्याची विनंती केली त्यानंतर सामनेवाले क्र. 1 तक्रारदाराचा टी.व्ही. संच घेऊन गेले व चार दिवसांनी परत आणून दिला त्यावेळी सामनेवाले क्र. 1 यांच्या प्रतिनीधीने टीव्हीमध्ये कोणताही दोष नसल्याचे सांगीतले. परंतू तक्रारदारांच्या कथनानूसार टी.व्ही पुन्हा तशाचप्रकारचे सततपणे दोष दर्शवू लागला व त्यामुळे त्याना टी.व्ही बघणे अशक्य झाले. त्यामूळे कंटाळून त्यांनी दि04.04.2010 ते 24.06.2012 या कालावधीत 10 तक्रारी करून ही सामनेवाले 1, यानी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल करून, सामनेवाले यांनी त्यांना नादुरूस्त टी.व्ही संच दुरूस्त अथवा बदलून न दिल्याने ही बाब सामनेवाले क्र. 1 यांच्या सेवेमधील कमतरता असल्याचे जाहीर केले व रू.9250/-, 24% व्याजासहित मिळाची तसेच नुकसान भरपाई म्हणून 70000/-,मिळावेत अशी मागणी केली आहे.
3. सामनेवाले क्रमांक 1 याना सततपणे संधी देऊन सुध्दा आपली कैफियत दाखल करण्याचे टाळले आहे. सामनेवाले क्रमांक यांनाही संधी देऊन सुध्दा त्यांनी आपली कैफियत सादर केली नाही. त्यामुळे केवळ तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे व पुराव्याचे शपथपत्र यांचे वाचन प्रस्तुत मंचाने केले त्यावरून खालील मुद्दे तक्रार निकालकामी कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांचा टी.व्ही.संच अनेक तक्रारी करून सुध्दा दुरूस्त न करण्याबाबत अथवा दोषयुक्त टी.व्ही. च्या बदल्यात नवीन टी.व्ही. न देण्यातबाबत, तक्रारदार सामनेवाले यांच्या सेवेतील कमतरता/अनुचित व्यापारी प्रथा सिध्द करू शकतात काय? | होय. |
2 | तक्रारदार टी.व्ही.ची किंमत व नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय? | होय. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मान्य करण्यात येतो. |
कारण मिमांसा
4. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत कथन केल्यानूसार ते एक सुविघ निवृत प्राचार्य आहेत आणि त्यांच्या कथनानूसार त्यांनी केलेल्या “ थ्री इन वन वॉशींग वन्डर “ या शोधाबाबत त्यांचे नाव 1999 साली गिनीज बुकस् ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदीत आहे. तक्रारदारांना त्यांच्या मुलाने दिवाळी भेट म्हणून टी.व्ही संच व व्हीडीओ प्लेअर दिला या दोन्ही वस्तु योग्य चालत नसल्याचे दिसून आल्यावर सामनेवाले 1 यांनी त्या दोन्हीही वस्तु बदलून दिल्या. पैकी, व्हीडीओ प्लेअर व्यवस्थित चालू लागला परंतू टी.व्ही संच मात्र पहिल्या टी.व्ही सारखेच दोषयुक्त रंगीत चित्रे दर्शवू लागला त्यामूळे तक्रारदाराने पुन्हा सामनेवाले 1 यांच्याकडे तक्रार करण्यास सुरूवात केली तथापि, तक्रारदाराने एकदा तो संच नेऊन 4 दिवसात परत आणून दिला व त्या संचात कोणताही दोष आढळून न आल्याचे सांगितले. परंतू तक्रारदारांच्या कथनानूसार टी.व्ही.वरील चित्रे/दृश्य पहिले सारखेच दोषयुक्त दिसू लागले. यानंतर तक्रारदाराने दि04.04.2010 ते 24.06.2012 या 2 वर्षामध्ये 10 वेळा संपर्क साधूनही सामनेवाले 1 यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही.तक्रारदारांच्या कथनानूसार तो. टी.व्ही. संच आता पूर्णतः बिघडलेला असल्याने तो चालत नाही. याबाबत तक्रारदाराने सामनेवाले क्र.2 या उत्पादकानांही नोटीस पाठविली होती परंतू त्यांच्याकडूनही कोणताच प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत नाही.
वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदार ही एक सुविदय व्यक्ती आहे. त्यांनी आपल्या नादुरूस्त संचाबाबत वॉरंटी पेरीअडमध्ये संच बिघडल्याने सामनेवाले यांचेकडे अनेक वेळा तक्रार करूनही बिघडलेला संच दुरूस्त करून देण्यास अथवा बदलून देण्यास सामनेवाले 1 यानी कसूर केली असे उपलब्ध कागदपत्रावरून प्रस्तुत मंचास वाटते. याशिवाय सामनेवाले 1 याना ब-याचवेळा संधी देऊन सुध्दा त्यानी आपली कैफियत दाखल करण्याची संधी गमावली आहे. या प्रकरणामध्ये तक्रारदाराने व्हिडीओ प्लेअर व्यवस्थित चालू असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी सादर केलेली कागदपत्रे व वरील चर्चेनुरूप खालील प्रमाणे आदेश देण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 293/2012 अंशतः मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 यानी टी.व्ही.संच 1 वर्षाच्या वॉरंटी कालावधीत दुरूस्त
न केल्याबद्दल अथवा बदलून न दिल्याबद्दल टी.व्ही.संचाची किंमत
रू.7600/-, दि.04.04.2010 पासून म्हणजे सामनेवाले क्र.1 यांना
सादर केलेल्या तक्रार दिनांकापासून 9% व्याजासहित आठ आठवडयाचे आत तक्रारदारास अदा करावी.
3. तक्रारदारांनी त्यांच्याकडे असलेला नादुरूस्ती दूरदर्शनसंच सामनेवाला
क्रमांक 1 यांच्याकडे आठ आठवडयाच्या आत जमा करावी.
4. जर उपरोक्त कालावधीत सामनेवाले यानी पूर्ण रककम तक्रारदारास
देण्यात कसूर केल्यास त्यापुढे त्यांना 18 टक्के दंडात्मक व्याज आकारणी होईल.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.