तक्रारदार : श्री.अभिजीत धूमाळ मार्फत हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले क्र. 1 ही पर्यटन कंपनी आहे. (Toor and Travels)
2. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 यांचेंकडुन दिल्ली-सिमला-मनाली-चंदीगढ-दिल्ली दि.13.05.2008 ते दि.19.05.2008या कालावधीसाठी त्यांचे करीता व त्यांच्या कुटुंबियांकरीता असे एकुण चार जणांसाठी प्रवासाची नोंदणी केली. त्यासाठी त्यांनी एकुण रू.1,52,000/-,दिले.या प्रवास खर्चामध्ये वाहन खर्च,लॉजींग,बोर्डींग, साईटसिंग इत्यादी सम्मिलीतहोते.एकुण मोबदल्यापैकी तक्रारदारांनी सा.वालेयांना दि.15.04.2008रोजी रू.75,000/-,धनादेशाद्वारे अदा केले.व दि.06.05.2008रोजी 45,000/-रू.चा दुसरा धनादेश दिला. व उर्वरीत रक्कम रू.32,000/-,हे सिमला/मनाली येथे रोखीने दिले.
3. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, सा.वाले क्र 1 ते 3 यांनी प्रवासाच्या वेळी कराराचा भंग केला. व आश्वासन दिल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीची पूर्तता केली नाही. तसेच तक्रारदारांशी व त्यांच्या कुटुंबियांशी अमानुषपणे वागले व त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यामूळे तक्रारदारांनी सा.वाले क्र 1 ते 3 यांना पत्र लिहून झालेल्या घटनेबद्दल सांगीतले व रू.76,000/-,18% व्याजदराने व्याजासह परत द्यावे व माफी मागावी. अशी मागणी केली.
4. त्यास सा.वाले क्र 1 यांचेकडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर सा.वाले क्र 2 ते 3 यांनी प्रवासाची नोदणी त्यांच्याकडुन केली नव्हती.असे बेजबाबदार उत्तर दिले.त्यामूळे तक्रारदार यांनी मनाली येथील हॉटेल असोसिएशनला व पूंजा साहेब ट्रॉन्सफोर्ट कंपनीस पत्र पाठविले. तसेच मिनीस्ट्रर ऑफ टूरिझम हिमाचल गोव्हरमेंट यांनाही पत्र पाठविले.
5. सा.वाले क्र 1 ते 3 हे एकमेकाच्या संगनमताने मुद्दाम हेतूपुरस्कररित्या आश्वासन दिल्यानूसार आश्वासने न पाळून तक्रारदारांची घोर फसवणूक केली व त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.
6. म्हणून तक्रारदार यांनी ग्राहक मंचापूढे तक्रार दाखल करून सा.वाले यांनी रू.76,000/-,24% व्याजदराने परत करावी. तसेच रू.साडे चार लाख रूपये व्याजासह द्यावेत. व तक्रार अर्ज खर्च द्यावा अशी मागणी केली.
7. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी नोटीस मंचाकडुन पाठविण्यात आली. सा.वाले क्र 1 यांना पाठविलेली नोटीस परत आली व सा.वाले क्र 2 यांना नोटीस बजावली गेली. त्याची पोचपावती अभिलेखात दाखल आहे. सा.वाले क्र 1 यांना पुन्हा नोटीस वर्तमानपत्राद्वारे बजावण्यात आली.वर्तमानपत्राचे कात्रण अभिलेखात दाखल केले आहेत. तसेच तक्रारदार यांनी सा.वाले क्र 1 यांना नोटीस बजावल्याचे शपथपत्र दाखल केले. सा.वाले क्र 1 ते 3 यांचेवर नोटीस बजावूनही सा.वाले क्र 1 ते 3 गैरहजर राहीले म्हणून तक्रार अर्ज सा.वाले क्र 1 ते 3 यांचेविरूध्द एकतर्फा आदेश निकाली काढण्यात यावा असा आदेश पारीत करण्यात आला.
8. तक्रार अर्ज व अनुषंगिक कागदपत्रे व पुराव्याचे शपथपत्र तसेच लेखीयुक्तीवाद यांची पडताळणी केली. करून पाहिली असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले क्र 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे तक्रारदार सिध्द करतात काय? | नाही. |
2 | तक्रार अर्जात केलेल्या मागणीस तक्रारदार पात्र आहेत काय? | नाही. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
9. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 यांचेकडुन दि.13.05.2008 ते दि.19.05.2008 या कालावधीसाठी दिल्ली-सिमला-मनाली-चंदीगढ-दिल्ली या प्रवासासाठी रू.1,52,000/-,मोबदला देवून नोंदणी केली.तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी दि.15.04.2008रोजी रू.75,000/-चा कॅनेडा बँकेचा धनादेश दिला. दि.06.05.2008 रोजी रू.45,000/-,हजाराचे सिंध बँकेचा धनादेश दिला व दि.13.05.2008रोजी रू.17,000/-,सिमला येथे पोहचल्यानंतर रोखीने दिले.उर्वरीत रक्कम रू.15,000/-,हे दिल्ली येथे परत पोहचल्यानंतर प्रवासाबद्दल संपूर्ण समाधान झाल्यानंतर पंजाब साई ट्रॉन्सफोर्ट कंपनी यांनी नेमलेल्या ए.सी बसच्या ड्रॉयव्हरला द्यावयाचे होते.
10. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी वर नमूद केल्याप्रमाणे मोबदल्याची रक्कम सा.वाले यांना दिली. परंतू अभिलेखात तक्रारदारांनी दिलेल्या मोबदल्याचे पोचपावती दाखल केल्या नाहीत. किंवा मोबदला धनादेशाद्वारे दिले तरत्याबद्दलचे बँकेचे पासबुकातील नोंदी दाखल केलले नाही. तथापी तक्रारदारांनी तक्रारीत असे नमूद केले आहे की, मोबदल्याची उर्वरीत रक्कम रू.32,000/-,सिमला येथे पोहचल्यानंतर दि.13.05.2008 रोजी दिले. यावरून तक्रारदारांचा प्रवास ठरल्याप्रमाणे सुरू झाला हे स्पष्ट होते. कोणतीही पर्यटन कंपनी प्रवास/पर्यटन सुरू होण्याआधीच मोबदल्याचे पैसे वसूल करते. त्यावरून तक्रारदारांनी सा.वाले यांना नमूद केल्याप्रमाणे मोबदल्याचे पैसे दिले असावेत असा निष्कर्श काढावा लागेल.
11. तक्रारदारांनी तक्रार अर्जात सा.वाले यांनी करारानूसार कराराच्या अटी व शर्ती पाळल्या नाहीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही तक्रारदारांना अमानुषेतेची व अपमानास्पद वागणूक दिली. अशी तक्रार केली आहे.
12. तक्रारदारांनी अभिलेखात सा.वाले क्र 1 ते 3 यांच्यात झालेला प्रवास करार दाखल केला नाही किंवा सा.वाले यांची माहिती पुस्तीका दाखल केली नाही. त्यामूळे तक्रारदार व सा.वाले यांच्यात काय करार झाला होता हे सिध्द करू शकले नाही. तसेच तक्रारदार यांनी तक्रार अर्जात सा.वाले यांनी तक्रारदारंना कोणत्या प्रकारे अपमानास्पद/अमानुष वागणूक दिली याबद्दल खुलासा केलेला नाही. त्यामूळे तक्रार अर्ज असधिंग्द व अस्पष्ट आहे.
13. परंतू तक्रारदार यांनी सा.वाले क्र 3 सुर्या इंटरनॅशनल हॉटेल यांना प्रवासात कोणत्या प्रकारचा त्रास झाला हे दि.04.08.2008 रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे. ते पत्र अभिलेखात दाखल निशाणी ब वर आहे. त्यामध्ये तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी असे नमूद केले आहे की,. Sight seeing बरोबर Bed tea/ breakfast/ evening tea / Dinner with veg & non-veg dishes हे प्रवास पॅकेजमध्ये सम्मीलीत होते. हा प्रवास पाच जोडपी व सहा मोठी मुले व एक लहान मुल यांच्यासाठी नोंदविलेले होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार मोबदल्यापैकी रू.75,000/-,व रू.45,000/-,हे धनादेशाद्वारे दिले होते व 17,000/-,सिमल्याला दि.13.05.2008 रोजी आल्यानंतर रोखीने दिले व उर्वरीत 15,000/-,हे पंजाब साई ट्रॉन्सपोर्ट कंपनीकडून नेमलेल्या एसी/बस ड्रॉयव्हरला दिल्लीला परत आल्यानंतर प्रवासाचे संपूर्ण समाधान झाल्यानंतर द्यावयाचे होते.
14. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले यांनी कराराच्या अटी व शर्तींचा भंग केला व त्यामूळे तक्रारदारांना अमानुष व अपमानास्पद वागणूक दिली. दि.15.05.2008 रोजी तीन वाजता कुलु येथे गुरूद्वाराला पोहचल्यानंतर बसच्या वाहकाने बस मालकाच्या सूचनेवरून बसचे अंतीम देणे रू.15,000/-, दिल्याशिवाय बस पूढे चालविण्यास नकार दिला. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तसे करारात नमूद केलेले नव्हते.तरीही तक्रारदाराने पैसे लगेज केबीनमध्ये सुटकेसमध्ये असल्याकारणाने मनालीला पोहचल्यानंतर देण्याचे आश्वासन दिले. व सा.वाले क्र 1 यांनी वाहन चालकाशी त्याबाबत बोलणी केली. पण तरीही वाहन चालकाने ऐकले नाही. तसेच बस मालकानेपण फोनवरून रू.15,000/-,दिल्याशिवाय बस पूढे हलणार नाही असे सांगीतले.त्यामूळे तक्रारदारांपूढे पर्याय नसल्याने लगेज केबीनमध्ये असलेल्या सुटकेसमधील पैसे वाहन चालकास काढुन दिले या सर्व घटनेमूळे तक्रारदारांना मनाली पोहचण्यास उशिर झाला व जेवण वेळेवर मिळाले नाही.
15. या घटनेबाबत तक्रारदारांनी अभिलेखात सा.वाले यांचेसोबत काय करार झाला होता व पैसे केव्हा द्यावयाचे होते याबद्दल त्यांनी कोणताही लेखीपूरावा सादर केलेला नाही. तसेच सोबतच्या सहप्रवाशाचे शपथपत्र दाखल केले नाही यावरून ही घटना सिध्द होत नाही. तसेच सा.वाले यांनी त्यांच्या मोबदल्याचे पैसे मागितले यामध्ये सा.वाले यांनी सेवासूविधा पूरविण्यात कसुर केली असे म्हणता येणार नाही.
16. तक्रारदारांची अशीही तक्रार आहे की, तक्रारदारांना ज्याठिकाणाहून नाश्ता व जेवण पूरविल्या जात होते ती जागा अंत्यत अस्वच्छ व आरेाग्यास हानीकारक होती. तसेच सर्वसाधारणपणे न्याहरीसाठी breakfast comprises of juice /cornflakes with milk /stuff paratha / bread / puri with vegetable / curd / egg / sausages / confectionery tea coffee etc. व जेवणासाठी soup vegetable / salad papad / pickle / chicken/mutton /fish / Dal / curd/ chapatti/ roti/ Rice/ Biryani(veg-Non Veg) fruit / Ice-cream/pudding etc. अशा प्रकारचा मेनू असतो परंतू सा.वाले यांनी दि.15.05.2008 पासून ते दि.18.05.2008 म्हणजे या तीन दिवसात सा.वाले यांनी तक्रारदार यांना पूरेसे अन्न पुरविले नाही व वर नमूद केल्याप्रमाणे आदर्श न्याहारी किंवा पूर्ण जेवण पूरविले नाही व जे जेवण दिले ते हलक्या प्रतीचे होते तसेच जेवण व न्याहारी देतेवेळी पदार्थ गरमागरम पूरविले नाही.याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी तक्रारदारांनी हॉटेल मालकाकडुन सूचना पुस्तीकेची मागणी केली असता ती तक्रारदारांची मागणी नाकारण्यात आली. तसेच रजिस्ट्रर आम्ही ठेवत नाही असे सांगण्यात आले.
17. तक्रारदार वरील बाब सिध्द करू शकले नाही कारण तक्रारदारांनी याबाबत कोणत्याही सहप्रवाशाचे शपथपत्र दाखल केले नाही. तसेच अन्नाची आवड ही तुलनात्मक व व्यक्ती व्यक्तींनूसार बदलत जाते.
18. तक्रार अर्ज जरी सा.वाले यांचेविरूध्द एकतर्फा चालविले असले तरी तक्रारदारांनी त्यांची तक्रार पुराव्यानीशी सिध्द करणे आवश्यक असते. त्यानूसार तक्रारदार त्यांची तक्रार सिध्द करू शकले नाही म्हणून तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येते.
19. वरील विवेचनावरून खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 48/2009 रद्द करण्यात येते.
2 खर्चाबद्दल आदेश नाही
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात
.