सौ. मंजुश्री खनके, सदस्या यांचे कथनांन्वये. - आदेश - (पारित दिनांक – /0 /2014) 1. तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा आहे की, तक्रारकर्ता वापरत असलेले विद्युत मिटर हे श्री अमजद अली अहमद अमीन यांच्या नावावर आहे व त्यांचेकडून सन 1987 मध्ये तक्रारकर्त्याच्या मृतक वडिलांनी घर विकत घेतले होते व तेव्हापासून तक्रारकर्ता या विद्युत मिटरद्वारे विद्युत वापर करीत आहे. त्याचा ग्राहक क्र. 410011418574 असून, मिटर क्र. 6661236 असा आहे. तक्रारर्त्याने वि.प.ने दिलेल्या देयकाप्रमाणे दि.29.12.2011 पर्यंत पूर्ण बील भरणा केलेले आहे. परंतू अचानकपणे दि.29.12.2011 ला वि.प.चे जवळपास 7 ते 8 माणसे येऊन, पाहणी केली व कागदपत्रांवर सही घेतली. तसेच तुम्ही विज चोरी केलेली आहे असे सांगितले. रु.40,801.27 चे बिल दिले आणि ते ताबडतोब भरणा करण्यास सांगितले. त्यावर तक्रारकर्त्याने आपण घरगुती वापरासाठी विजेचा वापर करीत असल्याने एवढे बील कसे निघाले याबद्दल विचारणा केली असता वि.प.चे अधिका-यांनी विजेच्या मिटरमध्ये लहान तार सापडला असून त्यामुळे मिटर हे हळू धावत असल्याचे सांगितले व मिटर घेऊन गेले. मागणीपत्रामध्ये मिटर सँक्शन लोड 0.020 कि.वॅट व कनेक्शन लो 3.663 कि.वॅट दर्शविण्यात आला. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे म.रा.वि.म. यांनी वारंवार तपासणी केली असता त्यांना अशी कोणतीही त्रुटी आढळून आली नाही, त्यामुळे वि.प.चे सदर कृत्य हे त्यांचे कमचा-यांचे आपसातील संगनमत करुन घडवून आणले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाचा मोबदला मिळण्यात यावा. तसेच वि.प.ने दिलेले रु.40,801.27 मागणीपत्र व रु.20,000/- दंड रक्कम रद्द करण्यात यावी अशी प्रार्थना केलेली आहे. 2. वि.प.ला मंचामार्फत नोटीस पाठविण्यात आला. वि.प.हजर होऊन प्राथमिक आक्षेपासह लेखी उत्तर दाखल केले. त्यातील प्राथमिक आक्षेपातच प्रस्तुत प्रकरण विज चोरीचे असल्याने मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही असे नमूद केले. अभिलेखावर दाखल कागदपत्रे, तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विचारात घेता मंचासमक्ष निष्कषार्थ मुद्दे खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष 1) प्रस्तुत प्रकरण मंचाचे अधिकार क्षेत्रात येते काय ? नाही. 2) वि.प.चे सेवेतील न्यूनता दिसून येते काय ? नाही. 3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. -कारणमिमांसा-
3. मुद्दा क्र. 1 बाबत – वि.प.ने दाखल केलेले प्राथमिक आक्षेप व लेखी उत्तर यात स्पष्टपणे नमूद केले की, प्रस्तुत प्रकरण हे विज चोरीचे असल्याने, मा. मंचास प्रस्तुत प्रकरण चालविता येणार नाही. मंचाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकला. वि.प.ने आपल्या युक्तीवादात स्पष्टपणे नमूद केले की, मा. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा CIVIL APPEAL NO. 5466 OF 2012, U.P.POWER CORPORATION & ORS. VA. ANIS AHMAD प्रमाणे विज चोरीचे प्रकरण मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही. त्यासाठी वेगळी तरतूद आहे. प्रस्तुत निवाड्याचे अवलोकन केले असता प्रस्तुत विज चोरीचे प्रकरण मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्याने, त्यावर मंच निर्णय देऊ शकत नाही. त्यामुळे सदर प्रकरण खारीज होण्यास पात्र आहे. तसेच मुद्दा क्र. 2 नुसार वि.प.चे सेवेत न्यूनता आहे किंवा नाही यावरसुध्दा मंच निर्णय देऊ शकत नाही. करीता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्याने ती खारीज करण्यात येत आहे. 2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सहन करावा. |