| Complaint Case No. CC/173/2015 | | ( Date of Filing : 31 Mar 2015 ) |
| | | | 1. Purushottam Wamanrao Swan | | r/o Plot No 10,Arvind Society Narendra Nagpur | | Nagpur | | Maharastra |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. M/s. Shri Sadguru Builders & Developers, Through Partner/Power of Attorney Holder, Shri. Gajanan Gulabrao Palade | | R/o. Lotus Apartment, Plot No. 17/18, Flat no 102, 1st floor, Shakti Mata Nagar Vakradant Sahakari Gruhanirman Society, kharbi ring road, Nagpur | | Nagpur | | Maharastra |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | (आदेश पारित व्दारा - श्री संजय वा. पाटील, मा.अध्यक्ष ) अंतीम आदेश - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असुन तक्रारकर्तीची तक्रार खालीलप्रमाणे..
- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडुन दिनांक 4.10.2008 रोजी यु-1, हे दुकान रुपये 8,00,000/-, खरेदी करण्याचा करारनामा केला. सदरहू दुकान मिळकतीचे पूर्ण वर्णन हे तकारीमधील परिच्छेद क्रं. 1 मधे नमूद केलेले आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीतील परिच्छेद क्रं.3 मधे नमुद केल्याप्रमाणे वेळोवेळी धनादेशाव्दारे व रोख असे एकुण रुपये 5,39,000/- दिनांक 11.12.2012 पर्यत विरुध्द पक्षाला दिले.
- तक्रारकर्ता पूढे नमुद करातत की विरुध्द पक्षाला रक्कम दिल्यानंतरही विरुध्द पक्षाने बांधकामामधे प्रगती दाखविली नाही व तक्रार दाखल करेपर्यत सुध्दा सदरहू इमारतीचे बांधकाम पूर्ण केले नाही. तक्रारकर्त्याने उर्वरित रक्कम विरुध्द पक्षाला देण्याची तयारी दर्शविली तरीसुध्दा सदरहू रक्कम स्वीकारली नाही आणि विक्रीपत्र करुन दिले नाही. सबब विरुध्द पक्षाने आपले सेवेत त्रुटी करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत विरुध्द पक्षाने सदरहू दुकानाचे विक्रीपत्र करुन ताबा दयावा अशी विंनती केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शरिरिक त्रासापोटी रुपये 50,000/- मिळण्याची मागणी केली.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्याचा आदेश पारित.
- विरुध्द पक्षाने आपला जवाब व आक्षेप नि.क्रं.12 वर सादर केला. तक्रारकर्त्याची तक्रार या मंचासमक्ष चालू शकत नाही असा आक्षेप विरुध्द पक्षाने घेतला आहे आणि तक्रारकर्त्याचे तक्रारीत मजकूर विरुध्द पक्षाने नाकारला आहे. परंतु तक्रारकर्त्याने रुपये 4,89,000/- दिल्याचे कबूल केले व रुपये 5,39,000/- दिल्याचे नाकारले. विरुध्द पक्षाने सदरहू दुकानासमोर अतिक्रमण असल्याचे नाकारले आहे. विरुध्द पक्षाने पूढे असे कथन केले की, सदरहू करारनामा झाल्यानंतर सन 2015 मधे दाखल केलेली ही तक्रार मूदत बाहय आहे आणि तक्रारकर्त्याने शेवटचा हप्ता 2010 मधे दिला. सबब सदरहू तक्रार ही मुदतबाहय आहे. विरुध्द पक्षाने पूढे असे कथन केले की, तक्रारकर्ता हा वेळोवेळी कराराप्रमाणे पैसे देण्यास कधीही तयार नव्हता आणि विरुध्द पक्षाने सदरहू दुकारनाचा व्यवहार हा स्वतः करता केलेला नसल्याने सदरहू दुकान परत अन्य व्यक्तीला विकण्याचे व्यापारी हेतूने केलेला आणि म्हणून सदरहू तक्रार या मंचाचे चालू शकत नाही. विरुध्द पक्ष पूढे असे नमुद करतात की तक्रारकर्त्याने सन 2010 मधे त्याच इमारती मधील सदनिकेबाबत प्रतिक स्वान, गिरीश चरडे, अभय आगलावे, रामा आचरेकर, आणि प्रविण नागरे यांना विक्रीपत्र करुन दिलेले आहे. विरुध्द पक्षाने त्यांचे इमारतीमधील दुकाने अरविंद मानके, सुजाता गायकवाड,केशव थूल, आणि उमेश निगम, यांना 2013 विक्रीपत्राव्दारे विकले आहे. परंतु तक्रारकर्ता हा वयस्कर झाल्याने त्यांनी कधीही तक्रार केली नाही आणि याउलट तक्रारकर्त्याने उमेश निकम यांचे कडुन रुपये 1,00,000/- याचेबरोबर दुकान विकण्याचा करारनामा केला आणि सदरहू व्यवहार हा व्यापारी स्वरुपाचा असल्याने या न्यायमंचासमक्ष चालू शकत नाही म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विंनती केली आहे.
- वरील दोन्ही पक्षाचे वकीलांचे कथनावरुन खालील मुद्दे विचारात आले.
मुद्दे निष्कर्ष 1. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय 2. तक्रारकर्त्याची तक्रार ही व्यावसाईक स्वरुपाची आहे काय? नाही 3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे सेवेत त्रुटी करुन अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंक केला आहे काय ? होय 4. आदेश आदेशाप्रमाणे -// - कारणमिमांसा -\\ - आम्ही तकारकर्त्याचे वकील श्री कस्तुरे व विरुध्द पक्षाचे वकील श्री उपेद्र जोशी यांचा युक्तीवाद ऐकला. तकारकर्त्याचे वकीलांचे थोडक्यात असे कथन केले आहे की, विरुध्द पक्ष यांनी बांधकाम पूर्ण न केल्यामूळे तक्रारकर्त्याला ही तक्रार दाखल करावी लागली आणि विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे. तक्रारकर्त्याने बरेचदा विरुध्द पक्षाला उर्वरित रक्कम स्वीकारुन पंजीकृत खरेदी खत करुन द्यावे अशी विनंती केली तरीसुध्दा विरुध्द पक्षाने खरेदी खत करुन दिले नाही. सदरहू दुकानाचे समोर अतिक्रमण केलेले आहे आणि सदरहू अतिक्रमण काढून दुकानाचा ताबा देण्याची आदेश करावे अशी विंनती केली आहे.
- या उलट विरुध्द पक्षाचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याने सदर दुकान उमेश निकम या व्यक्तीला विकण्याचा करारनामा केला आणि सदरहू दुकान हे त्यांनी स्वतः करता खरेदी केलेले नव्हते आणि म्हणुन सदरहू व्यवहार हा व्यापारी स्वरुपाचा असल्याने या मंचासमक्ष चालू शकत नाही. पूढे असा युक्तीवाद केला की विरुध्द पक्ष हे खरेदी खत करुनदेण्याकरिता तयार होते परंतु तकारकर्त्याने उर्वरित रक्कम दिलेली नाही आणि म्हणुन सदरहे तक्रार ही खारीज करण्यात यावी.
- आम्ही दोन्ही पक्षाचा युक्तीवाद विचारात घेतला आणि दोन्ही पक्षानी दाखल केलेल्या कागदपत्राचे बारकाईने अवलोकन केले. तक्रारकर्त्याने दुकान खरेदी करण्याचा करार केला होता आणि तक्रारकर्त्याने रुपये 8,00,000/- रक्कमेपैकी रुपये 5,39,000/- एवढी मोठी रक्कम विरुध्द पक्षाला दिलेली आहे असे दाखल कागदपत्रांवरून स्पष्ट होते. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रार दाखल करण्याकरिता कारण सतत घडत असल्याने तक्रारकर्त्याची तक्रार ही मुदतीत आहे.केवळ उमेश निकम यांना सदरहू दुकान देण्याचे ठरल्यामूळे सदरहू व्यवहार हा व्यापारी स्वरुपाचा होऊ शकत नाही असे आमचे मत आहे. ज्या व्यवहाराचे काळात विरुध्द पक्ष यांनी सदरहू जागेचे बांधकाम पुर्ण केलेले नव्हते आणि उमेश निकम यांना विरुध्द पक्षाचे संमती शिवाय सदरहू दुकान तक्रारकर्त्याला विकता येऊ शकत नाही. त्यमूळे सदरहू व्यवहार हा व्यापारी स्वरुपाचा आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारकर्ता हा उर्वरित रक्कम देण्यास तयार नव्हता याबाबत विरुध्द पक्षाने कोणताही पुरावा अथवा पत्र व्यवहार दाखल केलेला नाही आणि म्हणुन विरुध्द पक्षाने घेतलेल्या बचावात तथ्य असल्याचे दिसून येत नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खरेदी खत करुन देण्याबाबत मंजूर करणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे. तक्रारकर्त्याने सदर दुकाना समोर इतर व्यक्तींनी केलेले बांधकाम व अतिक्रमण काढुन द्यावे अशी विंनती केलेली आहे परंतु अतिक्रमणाची विंनती ही या मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही आणि सदरहू अतिक्रमण हे विरुध्द पक्षने केले आहे अशी परिस्थीती नाही आणि सदरहू बाब ही दिवाणी स्वरुपाचा वाद आहे आणि त्याबाबत पुरावा ही नाही. सबब तक्रारकर्त्याची सदरहू विनंती मान्य करता येत नाही म्हणुन तक्रार ही अंशतः मंजूर करणे आवश्यक आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
- //अंतीम आदेश // - - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- तक्रारकर्त्याने दुकानाचे खरेदी व्यवहाराची उर्वरित रक्कम रुपये 2,61,000/- विरुध्द पक्षाला आदेश पारित दिनांकपासून 30 दिवसाचे आत द्यावी आणि विरुध्द पक्षाने ती स्वीकारुन सदरहू दुकानाचे खरेदी खत /विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे करुन द्यावे आणि तक्रारकर्त्याला सदरहू दुकानाचा ताबा देण्यात यावा असे आदेशीत करण्यात येते.
- जर विरुध्द पक्षाने उर्वरित रक्कम स्वीकारली नाही तर तक्रारकर्त्याने सदरहू रक्कम या मंचाचे कार्यालयात आदेशाचे दिनांकापासून 2 महिन्याचे आत जमा करावी.
- तक्रारकर्त्याची अतिक्रमणाबाबतची विनंती नामंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरिक, मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसान भरपाई म्हणुन रुपये 10,000/-(रुपये दहा हजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
- वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन उर्वरित रक्कम स्वीकारल्यापासून अथवा या मंचाचे कार्यालयात रक्कम जमा केल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| |