तक्रारदार तर्फे वकील ः- श्री.सवादकर/श्री.सुळे
सामनेवाले तर्फे वकीलः-. श्री. अलोक
आदेश - मा. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या एम.ए. क्र 68/2016 वर आदेश.
1. तक्रारदारानी सामनेवालेविरूध्द दुचाकी वाहनाकरीता ही तक्रार दाखल केली व वाहनाची किंमत त्यांना परत मिळावी याकरीता मागणी केली. सामनेवाले यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर उपस्थित झाले व सविस्तर लेखीकैफियत दाखल केली. त्यानंतर तक्रारदारानी तक्रारीमध्ये दुरूस्ती करण्याकरीता उपरोक्त अर्ज दाखल केला. सामनेवाले यांनी तिव्र आक्षेप नोंदवित सविस्तर जबाब दाखल केला.
2. तक्रारदारातर्फे वकील श्री. सवादकर व सामनेवाले यांचे तर्फे वकील श्री. अलोक भट यांना ऐकण्यात आले.
3. तक्रारदारानी दुरूस्तीचा अर्ज दाखल करून त्यांना दुचाकी वाहनाचा मोबदला किंवा त्यांना दुचाकी वाहन देण्यात यावे व विलंबाकरीता 18 टक्के व्याज देण्यात यावे अशी दुरूस्तीद्वारे मागणी केली आहे. सामनेवाले यांचेनूसार तक्रारदारानी सामनेवाले यांनी लेखी कैफियतीमधील घेतलेला बचाव विचारात घेऊन हा अर्ज दाखल केला व अर्ज दाखल करण्यास 10 महिन्याचा विलंब झालेला आहे. त्यामुळे तो फेटाळण्यात यावा.
4. तक्रारदारानी मूळ तक्रारीमध्ये उपरोक्त अदा केलेली रक्कम नुकसान भरपाईसह परत मागीतलेली आहे. सामनेवाले यांची लेखीकैफियत वाचल्यानंतर तक्रारदारानी दुरूस्ती करण्याकरीता विलंबाने अर्ज दाखल केला. एकप्रकारे सामनेवाले यांनी बचावाकरीता घेतलेल्या पवित्र्याला शह देण्यासाठी ही दुरूस्ती तक्रारदार यांना करावयाची आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या अर्जामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, लेखीकैफियत वाचल्यानंतर सल्याप्रमाणे ते दुरूस्तीचा अर्ज दाखल करीत आहेत. तक्रारदार ही मागणी सुरूवाती पासून करू शकले असते. सामनेवाले यांनी लेखीकैफियत दाखल केली हे कारण दुरूस्तीकरीता असू शकत नाही. सामनेवाले यांनी घेतलेला बचाव किंवा तक्रारीमधील दाखविलेल्या उणीवा दुरूसतीचा आधार होऊ शकत नाही. दुरूस्तीचे स्वरूप विचारात घेता सामनेवाले यांचे म्हणण्यामध्ये तथ्य दिसून येते. तक्रारीचे स्वरूप, दुरूस्ती करण्यास दिलेले कारण, अर्ज दाखल करण्यास झालेला विलंब विचारात घेऊन खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदार यांचा अर्ज क्र एम.ए 68/2016 हा फेटाळण्यात येतो.
- प्रकरण तक्रारदार यांच्या पुराव्याच्या शपथपत्रासाठी नेमण्यात येते.
npk/-