Maharashtra

Kolhapur

CC/13/157

M/s.Mahalaxmi Agro Product & Braveries for Propa.-Mr. Nil Sheshmal Karnavat, - Complainant(s)

Versus

M/s. Nil Hydrotech for Mr. Ajay V.Kulkarni - Opp.Party(s)

K.B.Shirsat

30 May 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/13/157
 
1. M/s.Mahalaxmi Agro Product & Braveries for Propa.-Mr. Nil Sheshmal Karnavat,
6, Mahadik Colony, near Shinde Residency, E ward,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Nil Hydrotech for Mr. Ajay V.Kulkarni
S.No.841, Shop no.7 & 8, Sadashiv Peth, Gadgil Path, near New Amar Agencies,
Pune-30
2. Mrs. Nila Ajay Kulkarni
as above
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:
Adv. Sou.S.S. Karnawat for Complainant
 
For the Opp. Party:
ORDER

नि का ल प त्र :- (श्री. संजय पी. बोरवाल,  अध्‍यक्ष) (दि .30-05-2014) 

(1)    प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे  वि. प. मे. निल हायड्रोटेक यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेमुळे यांनी नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे. 

      प्रस्‍तुत तक्रार अर्ज स्विकृत करुन वि.प. यांना  नोटीसीचा आदेश झाला.  वि.प. यांना नोटीसीची बजावणी होऊन ते गैरहजर राहिले व त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले नाही.  सबब, वि. प. नं. 1 व 2 यांचेविरुध्‍द दि. 31-10-2013 रोजी एकतर्फा आदेश पारीत करणेत येते­.   प्रस्‍तुतची तक्रार, त्‍यासोबतचे कागदपत्र पाहून गुणदोषावर खालीलप्रमाणे निकाल पारीत करणेत येतो.    

 (2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,

      तक्रारादार यांनी स्‍वत:चे उपजिविकेकरिता उद्योग/ व्‍यवसाय करणेचे ठरवून त्‍यांनी चांदोली, ता. शाहुवाडी, जि. कोल्‍हापूर या ठिकाणी जमीन खरेदी केली.  यातील वि.प. नं. 1 ही पाण्‍यावर प्रक्रिया करुन शुध्‍द पाणी तयार करणे व ते वेगवेगळया पॅकिंगमध्‍ये भरणेबाबत आवश्‍यक ती मशिनरी  तयार करणार व त्‍यांचा प्‍लँट इन्‍स्‍टॉलेशन  करुन देणारी कंपनी आहे.  वि.प. नं. 2 व 3 हे वि.प. नं. 1 कंपनीचे भागीदार/मालक आहेत.   वि.प. यांनी तक्रारदार  यांची भेट घेऊन वि.प. कडून पाणी शुध्‍द  करणेचा प्‍लांट घेतलेस त्‍याचा भरपूर फायदा तक्रारदार यांना होईल असे सांगितले व चांदोली येथे पाणी  भरपूर, मुबलक व स्‍वच्‍छ आणि स्‍वस्‍तात पाणी मिळेल व त्‍यावर प्रक्रिया  करुन पाणी विक्री केलेस खूप फायदा होईल असे वि.प. यांनी तक्रारदारांना सांगितले.  व आवश्‍यक ती मशिनरी आणून त्‍याचा प्‍लँट इन्‍स्‍टॉल करुन देऊन पाणी शुध्‍द  करण्‍याची  प्रक्रिया करुन,  शुध्‍द झालेले पाणी  विक्री करणेकरिता वेगवेगळया पॅकींगमध्‍ये भरणेची प्रक्रिया पूर्ण करुन देऊन माल विक्रीस तयार करुन देईपर्यंत सर्व  बाबींची पुर्तता वि.प. यांनी प्रत्‍यक्ष जागेवर येऊन करुन देतो असे तक्रारदार यांना सांगितले व व्‍यवसायाकरिता आवश्‍यक ते शासकीय लायसन्‍स, बी.एस.आय. परवाना लायसन्‍सना हरकत प्रमाणपत्र मिळवून देऊन  प्रत्‍यक्ष जागेवर मशिनरी बसवून प्रोजेक्‍ट शासकीय नियमानुसार पूर्ण करुन देतो असे वि.प. यांनी सांगितले. 

     तक्रारदार त्‍यांचे तक्रारीत पुढे नमूद करतात, वि.प. यांचेवर विश्‍वास ठेवून तक्रारदार यांनी वि.प.  यांचेकडून प्‍लँट बसवून घेणेचे ठरविले त्‍याबाबत चांदोली, ता. शाहूवाडी, जि.कोल्‍हापूर या ठिकाणी तक्रारदार व वि.प. यांचेमध्‍ये प्रत्‍यक्ष बोलणी होऊन वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रु. 15,10,000/- या किंमतीस संपूर्ण प्रोजेक्‍ट शासकीय नियमानुसार प्‍लँट  तयार करुन देणेचे वि.प. यांनी कबूल केले.  तशी सर्व  प्रोजेक्‍टची माहिती त्‍यांनी लेखी स्‍वरुपात दिली.  व वि.प. यांनी चांदोली येथे लेखी स्‍वरुपात दोन महिन्‍यात  मशिनरी देण्‍याचे  व परवाने  लायसन्‍स मिळवून देणेचे व लॅबोरेटरी तयार करुन देण्‍याचे व सर्व मशिनरी योग्‍य त-हेने कार्यान्वित करुन देणेचे मान्‍य केले.  तक्रारदार व वि.प. यांचे दरम्‍यान झालेल्‍या कराराप्रमाणे वि.प. यांनी तक्रारदार यांना  किंमत व डिलीव्‍हरी शेडयूल टर्मस, कंडीशन नमूद तसे पत्र चांदोली इथे तक्रारदार यांना दिले.  तक्रारदार व वि.प. यांचे ठरलेप्रमाणे तक्रारदार यांनी वि.प. यांना त्‍यांचे  मागणीप्रमाणे रक्‍कम रु. 13,57,000/- दिलेले आहेत पैकी रक्‍कम रु. 50,000/- ही रक्‍कम व्‍यवहार ठरला त्‍यावेळी चांदोली इथे वि.प. यांना दिले आहे.

          तक्रारदार त्‍यांचे तक्रारीत पुढे नमूद करतात,  वि.प. यांनी दोन महिन्‍यात ठरलेप्रमाणे मशिनरी बसवून योग्‍य त्‍या परवानगी प्‍लँट सुरु करुन देणे आवश्‍यक होते. परंतु वि.प. यांनी तसे केले नाही.  तक्रारदार यांनी सातत्‍याने विचारणा केलेनंतर व तगादा लावलेनंतर वि.प. यांनी चांदोली येथे मशिनरी पाठविली.  तक्रारदार व वि.प. यांचेत ठरलेप्रमाणे वि.प. यांन मशिनरी प्रत्‍यक्ष जागेवर बसवून दिली नाही.  तसेच शासकीय परवाने ना हरकत दाखले घेऊन दिले नाहीत.  प्‍लँट  पूर्ण करुन दिला नाही.  वि.प. यांनी पाठविलेले मशिन हे ठरल्‍यापेक्षा वेगळे कमी ग्रेडचे व निकृष्‍ट  दर्जाचे होते.   तक्रारदार यांनी वि.प. यांना  सदर जमीन बदलून देऊन चांगली मशिनरी देऊन प्‍लँट सुरु करुन देणेबाबत सांगितले.  वि.प. यांनी त्‍याप्रमाणे पूर्तता करतो असे कबूल केले.  परंतु खोटी कारणे देऊन त्‍यास टाळाटाळ करु लागलेनंतर वि.प. हे  तक्रारदारांची फसवणूक केली आहे असे तक्रारदारांचे लक्षात आले.  वि.प. पाठविलेली मशिनरी ही  निकृष्‍ट दर्जाची असलेने व वि.प. यांनी प्‍लँट  न करुन दिल्‍याने तशीच पडून आहे.  90 %  स्विकारुन  वि.प. यांनी अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केली आहे.  तक्रारदार यांनी वि.प. यांचेवर विश्‍वास ठेवून रक्‍कम रु. 13,57,000/- दिले. व बँक ऑफ  महाराष्‍ट्र यांचेकडून लघुउद्योगाकरिता रक्‍कम रु. 20,00,000/- कर्ज काढले.  त्‍याचबरोबर वि.प. यांचे सांगणेवरुन चांदोली येथे फॅक्‍टरी शेड उभा केले.  परंतु वि.प. यांनी फसवणूक केलेमुळे  तक्रारदार  यांना नुकसानीत गेले.   व तक्रारदार यांना नाहक बँकेच्‍या कर्जाचा हप्‍ता भरावा लागत आहे.   त्‍याचबरोबर गुंतवणूकही उत्‍पन्‍न नसलेने तक्रारदारांना नुकसानीत आहे.  वि.प. यांनी तक्रारदारांना दरमहा रु. 50,000/- नफा होईल अशी हमी व खात्री दिली होती  परंतु  वि.प. यांचे चुकीमुळे तक्रारदार नुकसानीत गेले आहेत.  तक्रारदारांना अन्‍य कोणतेही दुसरे उत्‍पन्‍नाचे साधन नाही,  त्‍यामुळे बँकेच्‍या कर्जाचा हप्‍ता भरणे अशक्‍यप्राय झाले आहे.  या सर्वांचा परिणाम तक्रारदार यांना मानसिक, शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे त्‍यास वि.प. हे सर्वस्‍वी जबाबदार आहेत.  सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली रक्‍कम रु. 13,,57,000/- व   त्‍यावर होणारे व्‍याज द.सा.द.शे. 12 %  प्रमाणे रु. 1,35,700/- व वि.प. यांनी प्रोजेक्‍ट पूर्ण न करुन दिलेले दरमहा रु; 50,000/- प्रमाणे ऑक्‍टोंबर 2012 पासून झालेले नुकसान रु. 3,00,000/- व मशिन वाहतुकीसाठीचा खर्च रु. 20,000/-, तक्रारदार यांना फॅक्‍टरी  शेडसाठी केलेला खर्च रु. 80,000/- व तक्रारदार यांनी बँकेला रक्‍कम रु. 20,00,000/- वर द.सा.द.शे. 12 %   प्रमाणे भरावे लागणारे व्‍याज रु. 1,00,000/- अशी एकूण रक्‍कम रु. 19,92,700/- ची मागणी केलेली आहे. तसेच वि.प. रक्‍कम देईपर्यंत तक्रारदार यांनी काढलेले कर्ज रु. 20,00,000/- वर द.सा.द.शे. 12 %  प्रमाणे होणारे व्‍याज वि.प. यांनी तक्रारदार यांना देणेचे  आदेश व्‍हावेत.  व तक्रारदार यांना झालेल्‍या  त्रासापोटी व तक्रारीचा खर्च रु. 2,000/- वि.प. कडून मिळावा अशी‍ विनंती तक्रारदारांनी तक्रार अर्जात केली आहे.                        

(3)     तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दि. 31-05-2013 रोजी एकूण 10 कागदपत्रे दाखल केलेले आहेत.   अ.क्र. 1 कडे वि.प. यांनी आवश्‍यक ती वॉटर, ट्रीटमेंटची मशिनरी माहिती कोटेशन, अ.क्र. 2 कडे निल हायड्रोटेकने काम पूर्ण करुन देणेबाबतचे सहपत्र दि. 4-12-2012, अ.क्र. 3 कडे तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेल्‍या रक्‍कमेच्‍या वि.प. यांचे सहीच्‍या एकूण 9 पावत्‍या, अ.क्र. 4 कडे भारतीय मानक ब्‍युरो चे पत्र दि. 4-04-2012, अ.क्र. 5 कडे बँकेला लिहून दिलेले गहाणखत दि. 1-01-2012, अ.क्र. 6 कडे तक्रारदार यांनी दिलेले पत्र बिलबाबत दि. 24-04-2013, अ.क्र. 7 व 8 कडे पाठविलेल्‍या नोटीसीच्‍या पोस्‍टाच्‍या दोन पावती  दि. 24-04-2013 व 27-04-2013, अ.क्र. 9 कडे नोटीस परत आलेले लखोटे दि. 8-05-2013, अ.क्र.  10 कडे रजि.  पोस्‍टाची ए.डी. ने पाठविलेली नोटीस दि. 27-04-2013 व दि. 27-04-2013 रोजी वकिलामार्फत पाठविलेली नोटीस,  इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. व तक्रार अर्जासोबत तक्रारदारांनी  शपथपत्र दाखल केले आहे. तसेच दि. 16-01-2014 रोजी  तक्रारदारांनी एकूण 16 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अ.क्र. 1 कडे Details of meeting between applicant and opp. Parties on O.P. letterhead dt. 16-05-2013, अ.क्र. 2 कडे BIS  Discrepancy/Valuation Report dt. 11-06-2013, अ.क्र. 3, 4 कडे Food Tech. Consultant Quotation , Food Tech. Consultant Quotation Report dt- 26-08-2013,  अ.क्र. 5 कडे  Tax Invoice of Jaybee Chemical purchased by Neel Karnawat page 1 and 2 dtd. 18-07-2013, अ.क्र. 6 कडे Tax Invoice of Jaybeen Chemicals of single PAN Balance purchased by Neel Karnawat. Dt. 26-07-2013, अ.क्र. 7 कडे N.P.K. Founders Lab Report Challan dt. 24-07-2013, अ.क्र. 8 कडे MAARC Labs Pvt. Ltd. Receipt dt. 26-08-2013, अ.क्र. 9 कडे DD to BIS by Applicant dt. 26-09-2013, अ.क्र. 10 कडे 3 Vouchers of money paid dt. 18-07-2013, अ.क्र. 11 कडे 2 Vouchers of money paid dt. 04-09-2013, अ.क्र. 12 कडे 3 Vouchers of money paid dt. 25-09-2013, अ.क्र. 13 कडे Receipt of Travel Co. dt. 5-09-2013, अ.क्र. 14 कडे BIS Report dt. 16-08-2013, अ.क्र. 15 कडे Machinery Repairing Report dtd. 1-09-2013 अ.क्र. 16 कडे SPAN Balance Report dt. 25-09-2013 इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

(4)   तक्रारदारांची तक्रार, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, तसेच तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र व तक्रारदारांचे वकिलांचा युक्‍तीवादाचा विचार करता पुढील  मुद्दे निष्‍कर्षासाठी उपस्थित होतात.

              मुद्दे                                                                            उत्‍तरे

                

1.   वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेत

     त्रुटी ठेवली आहे का ?                                                            होय.

2.   तक्रारदार  वि.प. यांचेकडून व्‍याज

     मिळण्‍यास पात्र आहेत का ?                                               होय.

3.   तक्रारदार हे नुकसानभरपाई, मानसिक व

     आर्थिक, शारिरीक त्रासापोटी नुकसान

     भरपाईपोटी रक्‍कम मिळणेस

      पात्र आहेत का ?                                                                होय.        

4.   आदेश काय ?                                                                   तक्रार अशंत: मंजूर.

कारणमीमांसा:-

मुद्दा क्र.1  :

 

     तक्रारदार यांनी स्‍वत:चे उपजिविकेकरिता/व्‍यवसाय करण्‍याकरिता वि.प. यांचेकडून पाण्‍यावर प्रक्रिया करुन शुध्‍द पाणी तयार करणे व ते वेगवेगळया पॅकींगमध्‍ये  भरुन त्‍यासाठी लागणारे आवश्‍यक मशिनरी  व तसा प्‍लँट इन्‍स्‍टॉलेशन करुन घेण्‍याकरिता वि.प. यांचेबरोबर चांदोली, ता. शाहुवाडी, जि. कोल्‍हापूर  दोघांमध्‍ये संमती होऊन  तक्रारदाराने 90 %  रक्‍कम अदा केल्‍यानंतर वि.प. यांनी निकृष्‍ट दर्जाची/कमी ग्रेडची मशिनरी पाठवून वि.प. यांन तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो त्‍या अनुषंगाने कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदाराने  त्‍याचवेळेस रक्‍कम रु. 50,000/- दिले व वेळोवेळी वि.प. यांचे मागण्‍यानुसार रक्‍कम रु. 13,50,000/- दिले.  त्‍या अनुषंगाने तक्रारदाराने दाखल केलेल्‍या- रिसीट नं. NH 0002, रक्‍कम रु. 1,00,000/- दि. 4-06-2012, रिसीट नं. NH 0003 रु. 1,00,000/- दि. 10-06-2012, रिसीट नं. NH 0005 रु. 2,00,000/- दि. 13-07-2012, रिसीट नं. NH 0004 रु. 3,00,000/-  दि. 13-07-2012, रिसीट नं. NH 0009 रु. 2,00,000/- दि. 14-06-2012, रिसीट नं. NH 0013 रु. 50,000/- दि. 29-02-2012, रिसीट नं. NH 0010 रु. 2,00,000/-  दि. 9-10-2012, रिसीट नं. NH 0012 रु. 1,00,000/-,  दि. 2-11-2012, रिसीट नं. NH 0011 रु. 1,00,000/- दि. 2-11-2012 अशी एकूण रक्‍कम रु.  13,50,000/- वि.प. यांना दिलेबाबतच्‍या पावत्‍या या कामी छायांकित  प्रतदाखल आहेत. वि.प. यांनी तक्रारदार यांना मशिनरी पाठविली त्‍यासाठी वाहतुकी खर्च  तक्रारदार यांना करावा लागला.  त्‍याबाबत खर्च केल्‍याचे पावती याकामी दाखल आहे. अ.क्र.1 कडे दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन Price and delivery schedule

The complete packaged drinking water plant of 1500 LPH capacity

WATER TREATMENT                 : RS. 5,50,000/-

LAB                                  : Rs.  3,25,000/-

JAR FILLING/RINSING                : Rs.   80,000/-

Filling machine 18 bpm semi auto     : Rs. 3,50,000/-

BIS fee –                             : Rs.   90,342/-

Analysis Charges                     : Rs.   60,000/-

Office expenses                      : Rs.   50,000/-

       या कागदपत्रांचे अवलोकन केल असता असे दिसून येते की, BIS Fee Rs. 90,342/-  तक्रारदारांनी वि.प. यांना शासकीय लायसेन्‍स काढण्‍यासाठी  अदा केले आहे असे दिसून येते.  मशिनरी इन्‍स्‍टॉल करण्‍याची जबाबदारी वि.प. यांची होती.  व त्‍यासाठी आवश्‍यक असणारे शासकीय लायसेन्‍स काढून देण्‍याची जबाबदारी वि.प. यांनी स्विकारली होती.  वि.प. यांनी असे आश्‍वासन दिलेनंतरच तक्रारदाराने त्‍यांचे बरोबर प्‍लँट उभारण्‍यासाठी संमती दिली व त्‍याबाबत त्‍यांना वेळोवेळी एकूण रु. 13,50,000/- रक्‍कमा दिलेल्‍या आहेत. दि. 10-01-2014 रोजी दाखल केलेली कागदपत्रे अ.क्र.नं. 1 ते 16 त्‍यामध्‍ये अ.क्र. 4 Food Tech. Consultant Quotation Report dt- 26-08-2013 दाखल केलेला आहे. सदरची प्‍लँट उभारणीसाठी मशिनरी बसवून देण्‍याची जबाबदारी वि.प. यांनी पुर्ण केलेली नाही.  तक्रारदारांनी दि. 16-01-2014 रोजी पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले त्‍यासोबत मशिनरीचे इन्‍पेक्‍शन रिपोर्ट श्री. एस.पी. रावताले, फूड टेक कन्‍सलटंट, पुणे यांचे रिपोर्टचे अवलोकन केले असता सदर रिपोर्टमध्‍ये खालीलप्रमाणे निरिक्षण नोंदविलेले आहे.

 (1) Semi Auto Rinsing Filling Capping Machine :-

          It is not newly purchased Machine (2nd hand machine)

          2 leakage points are there.

          Shrink tunnel is in improper condition.

          Bottle capping and sealing not proper, so leakage in bottles.

          Glasses are not placed properly.

          Inspection Screen absent.

          Rotometer needed to be changed.

 (2) Laboratory :-

       Single pan balance not working.

       BOD incubator showing deflection in temperature.

       Ph meter not working properly.

       Digital colony count working properly.

       Some chemical and 1 Thermometer are missing.

       Fume hood absent.

       Gas stripping apparatus not installed flow meter absent.

   The filing machine needs to be replaced due to many issues and laborator material needs to be purchased or required.    Report By. S.P. Rawatale, Food Tech Consultant, Pune यांनी दिलेल्‍या रिपोर्टमध्‍ये बरेच दोष होते असे दिसून येते.   याबाबत तक्रारदारांनी वेळोवेळी वि.प. यांना कळविले की पाठविलेले मशिनरी ही ठरलेपेक्षा  वेगळी आहे, कमी ग्रेडची व निकृष्‍ट दर्जाची आहेत.  काही मशिनरीचे पार्टस जुने आहेत. तसेच तक्रारदारांनी अ.क्र. 6 ला दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी दि. 4-04-2013 रोजी वि.प. यांना  subject – delay in working by you चे पत्र पाठविले आहेत.  सदर पत्रामध्‍ये The project is delay by 4 months. Kindly get following work completed as soon as possible (1) (5)  before the BIS visit come असे नमूद आहे.    यावरुन तक्रारदारांनी याबाबत पत्रव्‍यवहार वि.प. बरोबर वेळोवेळी केला आहे  असे दिसून येते.  वि.प. यांनी तक्रारदारांना तोंडी आश्‍वासन दिले होते  की, तुम्‍हाला आम्‍ही मशिनरी बदलून देऊ.  वि.प. यांनी तक्रारदारांना अद्याप मशिनरी बदलून दिलेली नाही अथवा काहीही त्‍या अनुषंगाने कळविलेले नाही असे दिसून येते.    वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून 90 % रक्‍कम स्विकारल्‍यानंतर जुनी मशिनरी व निकृष्‍ट दर्जाची कमी ग्रेडची मशिनरी तक्रारदार यांना पाठवून सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे.  तक्रारदाराची फसवणूक केली आहे व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   म्‍हणून , मुद्दा क्र. 1  यांचे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.    

 

मुद्दा क्र. 2

 

     तक्रारदार व वि.प. यांचे दरम्‍यान मशिनरी वॉटर प्‍लँट उभारण्‍यासाठी दोघांमध्‍ये अ.क्र. 2 कडे  दि. 24-12-2012 रोजीचा कागदपत्राव्‍दारे संमती दर्शविली त्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता  असे दिसून येते की, वि.प. यांनी ठरलेल्‍या वेळेत वॉटर प्‍लँट पुर्णपणे  सुरु करुन देईन व त्‍यामध्‍ये वि.प. कडून विलंब झाल्‍यास किंवा वॉटर प्‍लँट वेळेत पुर्ण न झालेस तक्रारदारांना व्‍याज मागणेचा अधिकार राहील असे नमूद आहे.        दि. 24-12-2012 रोजीचे पत्राप्रमाणे Any thing delay in that will be liable to pay with interest  असे नमूद आहे त्‍याअनुषंगाने दि. 4-04-2013 रोजी तक्रारदारांनी वि.प. यांना delay बाबत कळविले होते असे स्‍पष्‍ट नमूद आहे, त्‍यास वि.प. यांनी कोणतेही उत्‍तर आजतागायत कळविलेले नाही त्‍याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून दि. 4-04-2013 रोजीपासून सदर रक्‍कमेवरती द.सा.द.शे. 9 % व्‍याज मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.  म्‍हणून, मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर  हे मंच होकारार्थी देत आहे.

 

              ‍ 

मुद्दा क्र. 3 :

 

     वर नमूद मुद्दा क्र. 1 व 2 चे विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांना द्यायच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी केली आहे. तसेच बँक ऑफ महाराष्‍ट्र लघुउद्योग अंतर्गत तक्रारदार यांनी चांदोली येथील मिळकत  तारणगहाण ठेवून सुमारे 20 लाख  कर्ज घेऊन तक्रारदारांनी  दि. 16-01-2014  रोजीचे शपथपत्रामध्‍ये त्‍याअनुषंगाने अ.क्र. 5 कडे दि. 1-11-2012 रोजीचे सदर मिळकतीचे गहाणखत दाखल केलेले आहे.  वि.प. यांना त्‍यांचे मागणीनुसार तक्रारदार यांचेकडून सर्व रक्‍कमा स्विकारुन देखील वेळेत वॉटर प्‍लँट पुर्ण करुन दिले नाहीत.   तसेच निकृष्‍ट दर्जाची/कमी ग्रेडची मशिनरी  पाठविल्‍यामुळे तक्रारदारांला वेळेत प्रोजेक्‍ट पुर्ण करता येणे शक्‍य नाही  त्‍यामुळे  बँक ऑफ महाराष्‍ट्र यांचेकडून घेतलेल्‍या कर्जाची हप्‍त्‍याची परतफेड व त्‍यावरील व्‍याज तक्रारदारांना भरावे लागत आहे.  त्‍यामुळे तक्रारदार हे शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु. 30,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- मिळण्‍यास तक्रारदार हे पात्र आहेत.   तक्रारदाराला वाहतुकीसाठी खर्च करणेस भाग पाडलेमुळे वाहतुकीचा खर्च रु. 7,232/- इतकी रक्‍कम तक्रारदार मिळण्‍यास पात्र आहेत.    म्‍हणून, मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर  हे मंच होकारार्थी देत आहे.

   मुद्दा क्र. 4 :  

     या उपरोक्‍त सर्व बाबीचा व विवेचनाचा विचार करता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.   सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. 

             

                                                               दे

1.    तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.

2.   वि. पक्ष  यांनी तक्रारदाराला  निकृष्‍ट दर्जाची/कमी ग्रेडची मशिन 30 दिवसाचे आत बदलून द्यावी अथवा मशिन बदलून देणे शक्‍य नसल्‍यास रक्‍कम रु. 13,50,000/-(अक्षरी रुपये तेरा लाख पन्‍नास  हजार फक्‍त) तक्रारदारांना 30 दिवसांचे आत द्यावे.  वि.प. यांनी तक्रारदारांना सदरचा प्रोजेक्‍ट वेळेत पुर्ण करुन न दिलेमुळे तक्रारदारांना सदर रक्‍कमेवर दि. 4-04-2013 रोजीपासून द.सा.द.शे. 9 % प्रमाणे  व्‍याज अदा करावे.

3.     वि.प. यांनी मशिनरी वाहतुकीचा खर्च रक्‍कम रु 7,232/-(अक्षरी रुपये सात हजार दोनशे बत्‍तीस फक्‍त) द्यावा. तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त)  व  मानसिक व शारिरीक, आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रु. 30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्‍त)  तक्रारदाराला द्यावेत.

4.   वरील आदेशाची पूर्तता वि.प. यांनी 30 दिवसांचे आत करावी.

5.   सदर आदेशाच्‍या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना  विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.