Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/12/370

MR. BHIMRAJ DEEPCHAND KOTHARI - Complainant(s)

Versus

M/S. MEDIAN IT SOLUTION PVT. TLD. & ANR. - Opp.Party(s)

ADV.RAJIV PANDEY

16 Sep 2013

ORDER

ग्राहक तक्रार निवारण मंच,
मुंबई उपनगर जिल्‍हा, मुंबई.
प्रशासकीय इमारत, 3 रा मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्याना जवळ,
वांद्रे (पूर्व), मुंबई 400051.
महाराष्‍ट्र राज्‍य
 
Complaint Case No. CC/12/370
 
1. MR. BHIMRAJ DEEPCHAND KOTHARI
BHAGWATI JEWELLER BAZAAR PETH MAROL, HANUMAN MANDIAR ROAD, ANDHERI (E),
MUMBAI-59
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. MEDIAN IT SOLUTION PVT. TLD. & ANR.
B- 509, KALPATARU, ROAD NO.7, MIDC, ANDHERI(E),
MUMBAI-93
MAHARASHTRA
2. MR. SHEHZAD ALLBAX MULLA
M/S. MEDIAN IT SOLUTION PVT. LTD. B- 509, KALPATARU, ROAD NO.7, MIDC, ANDHERI(E),
MUMBAI-93
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande PRESIDENT
 HON'ABLE MR. S.R.SANAP MEMBER
 
PRESENT:
तक्रारदार व त्‍यांचे वकील हजर
......for the Complainant
 
सामनेवाले एकतर्फा
......for the Opp. Party
ORDER

 

 

 

  तक्रारदारातर्फे      :  वकील श्री. राजीव पांडे     

 सामनेवालेतर्फे      :  एकतर्फा

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

 निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्‍यक्ष                 ठिकाणः बांद्रा

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*  

 

न्‍यायनिर्णय

1.    सामनेवाले क्रमांक 1 ही कंपनी असून सामनेवाले क्रमांक 2 हे तीचे मालक आहेत. तक्रारदार हे व्‍यवसायिक आहेत, ते सराफ व्‍यवसाय करतात. तक्रारदारांचे दुकानाच्‍या मागेच निवासस्‍थान आहे, तक्रारदारांच्‍या निवासस्‍थानाकडे दुकानातूनच रस्‍ता जातो. सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने तक्रारदारांनी सी.सी.टी.व्‍ही. कॅमेरा त्‍यांच्या घराच्‍या बाहेर व दुकानात लावून घ्‍यावयाचे ठरवले. त्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी सी.सी.टी.व्‍ही. कॅमेराचे सयंत्र दिनांक 2/8/2011 रोजी तक्रारदारांच्‍या निवासस्‍थानी व दुकानात बसविले. तक्रारदारांनी त्‍याबद्दल सामनेवाले यांना रुपये 37,096/- एवढी रक्‍कम अदा केली.

 

2.  तक्रारदारांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे सी.सी.टी.व्‍ही. कॅमेरामधील दृष्‍य हे अस्‍पष्‍ट होते त्‍यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे पत्राद्वारे वगेवेगळया तक्रारी केल्‍या व दूरध्‍वनीद्वारे सूचना दिली होती. सामनेवाले यांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले. याप्रकारे सी.सी.टी.व्‍ही. कॅमेरा बसविण्‍याचा तक्रारदारांचा उद्देश असफल झाला. त्‍यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांना त्‍यांच्‍या वकीलामार्फत दिनांक 18/06/2012 रोजी नो‍टीस दिली व सी.सी.टी.व्‍ही. कॅमेरा दुरुस्‍त करुन द्यावा अशी विनंती केली. त्‍या नोटीशीला देखील सामनेवाले यांनी दाद दिली नाही. त्‍यानंतर तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दिनांक 28/08/2012 सदरील मंचाकडे दाखल केली.

 

2.  तक्रारीची नोटीस सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांना पाठविण्‍यात आली होती. नोटीशीची बजावणी होऊन देखील सामनेवाले हे गैरहजर आहेत. त्‍यावरुन सामनेवाले यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारित करण्‍यात आला.

3.  तक्रारदारांनी आपल्‍या पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले, व त्‍यामध्‍ये त्यांनी संपूर्ण व्‍यवहाराबद्दल कथन केले, तसेच सामनेवाले यांना वेळोवेळी दिलेल्या नोटीशींचा देखील संदर्भ दिला.

 

4.  तक्रारदारांच्‍या शपथपत्रातील कथनास तक्रारदारांनी बिलासोबत दाखल केलेल्‍या बिलावरुन पुष्‍टी मिळते. त्‍यामध्‍ये तक्रारदारांनी सामनेवाले यांना रुपये 370,96/- एवढी रक्‍कम सी.सी.टी.व्‍ही. कॅमेरा बद्दल अदा केलेली दिसून येते. तसेच सयंत्र बसविल्‍यापासून 13 महिने हमी कालावधी राहील हे देखील त्‍यात नमूद आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत डिलेव्‍हरी चलन दिनांक 30/4/2012 व 6/1/2012 यांची प्रत जोडलेली आहे, त्‍यावरुन तक्रारदारांना सयंत्राचा पुरवठा दोन हप्‍त्‍यांमध्‍ये करण्‍यात आला असे दिसून येते. तक्रारदारांनी तक्रारीसोबत सामनेवाले यांच्या तांत्रिक विभागाने जो अहवाल तयार केला त्‍याची प्रत जोडलेली आहे. त्‍यामध्‍ये सामनेवाले यांच्‍या कर्मचा-यांनी सयंत्राची वेळोवेळी दुरुस्‍ती केल्‍याचे दिसून येते. तरीदेखील सयंत्र व्‍यवस्थित चालत नाही हे त्‍या अहवालातील नोंदीवरुन दिसून येते. सामनेवाले यांच्‍या कर्मचारी दिनांक 23/5/2012 रोजी तक्रारदारांच्‍या जागेमध्‍ये आले असतांना तक्रारदारांनी पुन्‍हा सयंत्र बसविण्‍यास नकार दिल्‍याचे देखील अहवालाच्‍या नोंदीवरुन दिसून येते. सामनेवाले यांनी बसविलेल्या सी.सी.टी.व्‍ही. कॅमेराची जोडणी व सयंत्र तांत्रिक दृष्‍टया बरोबर नसल्‍याने ते योग्‍यरित्या काम करीत नव्‍हते ही बाब तक्रारदारांनी जो दुरुस्‍ती अहवाल दाखल केलेला आहे त्‍यातील नोंदींवरुन दिसून येते. वरील अहवालातील नोंदी तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथनास पुष्‍टी देतात. याप्रकारे तक्रारदारांनी सामनेवाले यांना रुपये 37,096/- एवढी मोठी रक्‍कम अदा करुन देखील तक्रारदारांना सी.सी.टी.व्‍ही. कॅमे-याच्‍या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्‍यात कसूर केली ही बाब देखील सिध्‍द होते. सामनेवाले यांनी सी.सी.टी.व्‍ही. कॅमे-याचे सयंत्र व जोडणी पुन्‍हा करुन द्यावी व योग्‍य ती दुरुस्‍ती करावी असा आदेश देणे निरर्थक राहील असे मंचाचे मत आहे. कारण सामनेवाले यांच्‍या कारागिरांनी अनेक वेळेस प्रयत्‍न करुन देखील ही जोडणी निर्दोष होऊ शकली नाही. सबब मंचाचा आदेशानंतरही पुन्‍हा जोडणी केल्‍यास दोष निर्माण होणार नाहीत अशी खात्री नाही. त्‍या परिस्थितीमध्‍ये उभयपक्षकारांच्‍या दरम्‍यानचा वाद चिघळत जाईल, वरील परिस्थितीमध्‍ये सामनेवाले यांनी तक्रारदारांना सी.सी.टी.व्‍ही. कॅमे-याची जोडणी व सयंत्राबद्दल स्विकारलेली रक्‍कम रुपये 37,096/- परत करावी, व तक्रारदारांनी सर्व सयंत्र सामनेवाले यांना परत द्यावे असा आदेश देणे योग्‍य व न्‍याय्य राहील असे प्रस्‍तुत मंचाचे मत आहे.

5.  वरील चर्चेनुरुप व निष्‍कर्षानुरुप पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतो.

 

आदेश

  1. तक्रार क्रमांक 370/2012 अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सी.सी.टी.व्‍ही. कॅमे-याची जोडणी व सयंत्राबद्दल सेवा सुविधा पुरविण्‍यात कसूर केली, असे जाहिर करण्‍यात येते.

  1. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सी.सी.टी.व्‍ही. कॅमेरा सयंत्राची किंमत रुपये 37,096/- त्‍यावर 9 टक्‍के व्‍याज तक्रार दाखल दिनांक 28/8/012 पासून ही रक्‍कम न्‍याय निर्णयाची प्रत मिळाल्‍यापासून चार आठवडयाच्या आत अदा करावी असा आदेश सामनेवाले यांना देण्‍यात येतो.
  2. तक्रारदारा यांनी सामनेवाले यांना सी.सी.टी.व्‍ही. कॅमेरा सयंत्र परत केल्‍यानंतर सामनेवाले यांनी वरील कार्यवाही करावी.

 

  1. या व्यतिरिक्‍त सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई व तक्रारीच्‍या खर्चाबद्दल रुपये 10,000/- न्‍याय निर्णयाची प्रत मिळाल्‍यापासून चार आठवडयाच्‍या आत अदा करावेत.

 

  1. न्‍याय निर्णयाच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

ठिकाणः  मुंबई.

दिनांकः  16/09/2013

 

           ( एस. आर. सानप )               (ज.ल.देशपांडे)

              सदस्‍य                             अध्‍यक्ष 

एम.एम.टी./-

 
 
[HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.R.SANAP]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.