तक्रारदार : त्यांचे प्रतिनिधी वकील श्री.सत्यम श्रीधरन व
त्यांचे वकील श्रीमती सिंडा श्रीधरन हजर.
सामनेवाले 1 : करीता वकील श्रीमती बिंदू जैन हजर.
सामनेवाले 2 : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 हे हॉटेल व्यवसाय करणारे आहेत. तर सा.वाले क्र.2 हे आपल्या ग्राहकांना हॉटेलचे व प्रवासाचे आरक्षण वगैरे या प्रकारची सेवा सुविधा पुरविणारी कंपनी आहे. तक्रारदारांचे चीन मधील कंपनी सोबत काही व्यवसाईक संबंध होते व चीन मधून काही व्यक्ती व्यवसाईक कामाकरीता मुंबई येथे येणार होते. तक्रारदारांनी चीन मधील कंपनीसोबतचे व्यवसाईक संबंध विचारात घेऊन व शिष्टाचार म्हणून चीनमधून येणा-यसा पाहूण्यांकरीता मुंबई येथे हॉटेलमध्ये दोन खोलीचे आरक्षण करण्याचे ठरविले. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचे मार्फत सा.वाले क्र.1 यांचे हॉटेलमध्ये दोन खोल्या दिनांक 16.9.2007 व 17.9.2007 या दिनांकाकरीता आरक्षीत केल्या. त्या प्रमाणे चीन मधील पाहुणे सा.वाले क्र.1 यांच्या हॉटेलमध्ये दिनांक 16.9.2007 रोजी मुक्कामास राहीले व दिनांक 17.9.2007 रोजी हॉटेल सोडून निघून गेले. तक्रारदारांच्या तक्रारीत असे कथन आहे की, सा.वाले क्र.1 यांच्या हॉटेलमध्ये दोन खोल्यांचे आरक्षण करणेकामी तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांना रु.35,661/- क्रेडीट कार्डमार्फत अदा केले होते. तरी देखील सा.वाले क्र.1 हॉटेलने तक्रारदारांच्या पाहुण्यांकडून हॉटेल सोडण्यापूर्वी दोन्ही खोल्यांचे भाडे वसुल केले. या प्रकारे सा.वाले क्र.1 यांनी दोन्ही मार्गाने भाडे वसुल केले. या सर्व प्रकारामध्ये तक्रारदारांचा अपमान झाला व खोल्यांचे आरक्षण करण्याचा हेतु निष्फळ ठरला. त्यामुळे तक्रारदारांची बदनामी झाली, तसेच गैरसोय व कुचंबणा झाली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 व 2 यांचेशी ई-मेलव्दारे संपर्क प्रस्तापित केला व सर्व माहिती प्राप्त केल्यानंतर दिनांक 26.11.2008 रोजी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
2. सा.वाले क्र.1 यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचे मार्फत सा.वाले क्र.1 यांच्या हॉटेलमध्ये दोन खोल्यांचे आरक्षण केले होते व त्याप्रमाणे तक्रारदारांचे चीन मधील पाहुणे दिनांक 16.9.07 रोजी खोल्यामध्ये राहीले व दिनांक 17.9.2007 रोजी खोली सोडून गेले. तथापी दिनांक 17.9.2007 रोजी सकाळी 10.00 वाजता पाहुणे खोली सोडून जात असेपर्यत सा.वाले क्र1 यांना खोलीचे भाडे प्राप्त न झाल्याने सा.वाले क्र.1 यांनी पाहुण्यांकडून भाडे वसुल केले. व पाहुण्यांनी ते आपल्या क्रेडीट कार्डव्दारे अदा केले. सा.वाले क्र.1 यांनी त्यानंतर सा.वाले क्र.2 यांच्या कडून दिनांक 18.9.2007 रोजी म्हणजे दुस-याच दिवशी भाडयाची रक्कम प्राप्त झाली. त्यानंतर तक्रारदारांच्या ई-मेल संदेशाप्रमाणे व सा.वाले क्र.2 यांच्याकडून रक्कम प्राप्त झाल्याने सामनेवाले क्र.1 हयांनी दिनांक 22.10.2007 रोजी चीन मधील पाहुण्यांचे क्रेडीट कार्ड खात्यामध्ये त्याचे कडून वसुल केलेली रक्कम जमा केली. या प्रकारे सा.वाले क्र.1 यांनी असे कथन केले की, या संपूर्ण व्यवहारामध्ये त्यांचा काही दोष नसून सा.वाले क्र.2 यांचेकडून रक्कम उशिरा प्राप्त झाल्याने पाहुण्यांकडून क्रेडीट कार्डव्दारे खोलीचे भाडे वसुल केले.
3. सा.वाले क्र.2 यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांकडून मुंबई येथील हिलटॉन हॉटेलमध्ये दोन खोल्याचे आरक्षण करण्याची सूचना दिनांक 14.9.2007 रोजी प्राप्त झाली व त्याप्रमाणे सा.वाले क्र.1 हॉटेल हयांचेकडून दोन खोल्याचे आरक्षण करण्यात आले. तथापी सा.वाले क्र.1 यांना खोलीचे भाडे वसुल झालेले नसल्याने त्यांनी पाहुण्यांकडून क्रेडीट कार्डव्दारे भाडे वसुल केले व दिनांक 17.9.2007 रोजी सा.वाले क्र.2 यांनी सा.वाले क्र.1 यांना भाडे वसुली करु नये असे कळविले होते. या प्रकारे सा.वाले क्र.2 यांनी देखील या व्यवहारामध्ये त्यांचेकडून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली नाही असे कथन केले.
4. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सेाबत पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तसेच ई-मेल संदेशाच्या प्रती हजर केल्या. तक्रारदार व सा.वाले यांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही बाजुच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले वाले यांनी तक्रारदारांना हॉटेलमधील दोन खोल्याचे आरक्षणाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. सा.वाले क्र.2 यांचे कडून. |
2 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | होय. रु.25,000/- सा.वाले क्र.2 यांचेकडून. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अशतः मंजूर |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी त्यांच्या चीन मधील पाहुण्यांकरीता सा.वाले क्र.2 यांचे मार्फत दिनांक 16.9.2007 व दिनांक 17.9.2007 करीता दोन खोल्यांचे आरक्षण करविले व सा.वाले क्र.2 यांनी सा.वाले क्र.1 यांच्या हॉटेलमध्ये त्या सूचनेप्रमाणे दोन खोल्यांचे आरक्षण केले या बद्दल वाद नाही. तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांना आरक्षणाची सूचना देत असतांनाच दोन खोल्यांच्या भाडयापोटी रक्कम अदा केलेली होती या बद्ल वाद नाही. तक्रारदारांचे पाहुणे दिनांक 16.9.2007 रोजी सा.वाले क्र.1 यांच्या हॉटेलमध्ये मुक्कामास राहीले व दिनांक 17.9ृ2007 रोजी सकाळी 10.00 वाजता ते हॉटेल सोडून निघून गेले व जाण्यापूर्वी सा.वाले क्र.1 यांनी पाहुण्यांकडून त्यांच्या क्रेडीट कार्डव्दारे भाडयाची रक्कम वसुल केली या बद्दलही वाद नाही. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे ई-मेल संदेशाव्दारे सर्व बाबी स्पष्ट झाल्यानंतर सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांचे चीन मधील पाहुण्यांचे क्रेडीट कार्डमध्ये वसुली केलेली रक्क्म परत केली असे सा.वाले क्र.1 यांचे कथन आहे. त्यास तक्रारदारांनी नकार दिलेला नाही. तथापी तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे त्यांनी शिष्टाचार म्हणून व व्यवसाईक संबंधाचा भाग म्हणून चीनमधील पाहुण्यांकरीता मुंबई येथे दोन खोल्यांचे आरक्षण करण्याचे ठरविले होते. व तक्रारदारांनी त्या आरक्षणापोटी क्रेडीट कार्डव्दारे सा.वाले क्र.2 यांना रक्कम देखील अदा केलेली होती. तरी देखील सा.वाले क्र.1 हॉटेलने पाहुण्याकडून खोली भाडयाचे पैसे वसुल केल्याने तक्रारदारांचा व्यवसाईक संबंध जपण्याचा व शिष्टाचार सांभाळण्याचा हेतू विफल झाला व तक्रारदारांना मानसिक त्रास व कुचंबणा सहन करावी लागली.
7. तक्रारदारांनी तक्रारीसोबत ज्या ई-मेलचा संदेशाची प्रत हजर केलेली आहे त्यावरुन असे दिसते की, सा.वाले क्र.1 हॉटेल हिलटॉन यांना दिनांक 16.9.2007 व दिनांक 17.9.2007 रोजी हॉटेल भाडयाबद्दल सा.वाले क्र.2 यांचेकडून रक्कम प्राप्त झालेली नव्हती. सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना दिनांक 26.10.2007 रोजी पाठविलेल्या ई-मेल संदेशामध्ये असा उल्लेख आहे की, आरक्षणाबद्दल खोली भाडयाचे पैसे सा.वाले क्र.1 हॉटेल हिलटॉन यांना दिनांक 14.9.2007 म्हणजे खोलीचे आरक्षण झाले त्याच दिवशी पाठविण्यात आलेले होते. परंतु कुरीयरने पाठविण्यात आलेला तो चेक सा.वाले यांना उशिराने मिळाला असेल. सा.वाले क्र.1 हॉटेलने तक्रारदारांना दिनांक 4.11.2007 रोजी पाठविलेल्या ई-मेल संदेशाची प्रत तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी सी-7 येथे हजर केलेली आहे. त्यामध्ये सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना असे कळविले की, खोली आरक्षणाची सूचना सा.वाले क्र.2 यांच्याकडून दिनांक 14.9.2007 रोजी प्राप्त झाली व चीन मधील पाहुणे दिनांक 16.9.2007 व 17.9.2007 हॉटेलमध्ये थांबले. व दिनांक 17.9.2007 रोजी सकाळी 10.00 वाजता हॉटेल सोडून गेले. सा.वाले क्र.1 यांच्या व्यवस्थापकाने त्या ई-मेल संदेशाव्दारे तक्रारदारांना असे कळविले की, सा.वाले क्र.2 यांच्या कडून आरक्षणाचे पैसे वसुल झाल्याची सूचना दिनांक 17.9.2007 रोजी रात्री 9.30 वाजता प्राप्त झाली. परंतु तो पर्यत सकाळी 10.00 वाजता पाहुणे हॉटेल सोडून गेले होते. सा.वाले क्र.1 यांना ही सूचना सा.वाले क्र.2 यांच्याकडून ई-मेल संदेशाव्दारे प्राप्त झाली होती ही बाब सा.वाले क्र.1 यांच्या व्यवस्थापकाने तक्रारदारांना दिनांक 26.10.2007 रोजी पाठविलेल्या ई-मेल संदेशावरुन दिसून येते. त्याची प्रत तक्रारदारांनी निशाणी सी-8 येथे हजर केलेली आहे. त्यानंतर सा.वाले क्र.1 यांच्या कैफीयतीच्या परिच्छेद क्र.7 मधील कथनावरुन असे दिसते की, सा.वाले क्र.1 हॉटेलला सा.वाल क्र.2 यांचेकडून खोली भाडया पोटीची प्रत्यक्षात रक्कम दिनांक 22.10.2007 रोजी प्राप्त झाली. त्यानंतर सा.वाले क्र.1 यांनी चीन मधील पाहुण्यांच्या क्रेडीट कार्ड खात्यामघून वसुल केलेली रक्कम परत जमा केली.
8. या सर्व व्यवहारामध्ये सा.वाले क्र.1 यांचा काही दोष दिसून येत नाही. कारण तक्रारदारांचे पाहुणे दिनांक 17.9.2007 रोजी सकाळी 10.00 वाजता हॉटेल सोडून जाईपर्यत सा.वाले क्र.1 यांना भाडे वसुली झाल्या बद्दलची सूचना अथवा भाडयाची रक्कम सा.वाले क्र.2 यांचेकडून प्राप्त झालेली नव्हती. ती सूचना ई-मेलव्दारे दिनांक 17.9.2007 राजी रात्री 9.30 वाजता प्राप्त झाली. परंतु खोलीतील पाहुणे निघून गेलेले असल्याने त्या सूचनेचा काही उपयोग नव्हता. कुठलेही हॉटेल प्रवाशाकडून हॉटेल सोडण्यापूर्वी भाडे वसुल करते. व सा.वाले क्र.1 यांनी त्या प्रकारे तक्रारदारांच्या पाहुण्यांकडून भाडे वसुल केलेले असल्याने त्यात काही चूक केली अथवा सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे म्हणता येणार नाही.
9. तथापी सा.वाले क्र.2 यांनी मात्र सा.वाले क्र.1 यांना खोलीच्या भाडयाची रक्कम प्राप्त झाल्याची सूचना उशिरा दिल्याने ही समस्या निर्माण झाली. सा.वाले क्र.2 याच्याकडे हॉटेल आरक्षण करण्या बाबतची सूचना दिनांक 14.9.2007 रोजी प्राप्त झाली व हॉटेलचे आरक्षण दिनांक 16.9.2007 व 17.9.2007 असे होते. म्हणजे दिनांक 17.9.2007 चे सकाळपूर्वी सा.वाले क्र.2 यांनी ई-मेल संदेशाव्दारे सा.वाले क्र.1 यांना तक्रारदारांकडून दोन्ही जागेचे भाडे अनामत वसुल झाल्याचे कळविणे आवश्यक होते. परंतु ही सूचना सा.वाले क्र.2 यांचे कर्मचा-यांनी सा.वाले क्र.1 यांना दिनांक 17.9.2007 रोजी रात्री 9.30 वाजता दिली व ती सूचना व्यर्थ ठरली. त्यातही सा.वाले क्र.2 यांनी पाठविलेली प्रत्यक्ष भाडयाची रक्कम सा.वाले क्र.1 यांना दिनांक 22.10.2007 रोजी प्राप्त झाली. आरक्षणाचा दिनांक व हॉटेलमधील आरक्षणाचे दिवस या दरम्यान अतिशय कमी कालावधी होता. त्यामुळे सा.वाले क्र.2 यांनी आवश्यक ती तत्परता दाखवून सा.वाले क्र.1 यांचेकडे भाडयाची रक्कम पोहोचती करणे अशक्य हेाते. किमान आरक्षणाचे सूचने बरोबर दिनांक 14.9.2007 रोजी तक्रारदारांकडून भाडे वसुली झाल्याची सूचना सा.वाले क्र.2 यांनी सा.वाले क्र.1 यांना देणे आवश्यक होते. ती सूचना सा.वाले क्र.2 यांनी अतिशय उशिराने म्हणजे दिनांक 17.9.2007 रोजी रात्री 9.30 वाजता दिली. या प्रकारे सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना हॉटेलच्या भाडयाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो.
10. वर नमुद केल्याप्रमाणे सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांच्या बाहुण्यांकडून हॉटेलच्या भाडयाबद्दल वसुल केलेली रक्कम परत केलेली आहे. त्यामुळे ती रक्कमे संबंधात आदेश करण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांची अशी तक्रार नाही की, सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांच्या बाहुण्यांचे निवासस्थानाचे संदर्भात अथवा भोजनाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली. तक्रारदारांची येवढीच तक्रार आहे की, तक्रारदारांनी भाडयापोटी रक्कम जमा केली असतांना देखील त्यांचे पाहुण्यांकडून ती पुन्हा वसुल करण्यात आली व त्यामुळे तक्रारदारांचा अवमान झाला. यासाठी तक्रारदारांना ई-मेल संदेशाव्दारे बरीच माहिती प्राप्त करुन घ्यावी लागली व वकील नेमून तक्रार दाखल करावी लागली. व त्याकामी खर्च करावा लागला. तक्रारदारांना झालेली गैरसोय, कुचंबणा व खर्चाचे स्वरुप याची व्याप्ती लक्षात घेता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च यसा बद्दल एकत्रितपणे सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना रु.25,000/- अदा करावेत असा आदेश देणे योग्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
11. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 733/2008 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांना हॉटेल मधील आरक्षणाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाबद्दल एकत्रितपणे रु.25,000/- अदा करावेत असा आदेश देण्यात येतो.
4. सामनेवाले क्र.2 यांनी ही रक्कम आदेशाची प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत धनादेशाने अथवा पे-ऑर्डरने अदा करावी. अन्यथा त्यावर विहीत मुदत संपलेल्या दिवसापासून 9 टक्के दराने तक्रारदारांना व्याज द्यावे.
5. सामनेवाले क्र.1 यांचे विरुध्द तक्रार रद्द करण्यात येते.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.