| DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR | | New Administrative Building | | 5th Floor, Civil Lines, | | Nagpur-440 001 | | 0712-2548522 |
|
| |
| Complaint Case No. CC/149/2017 | | ( Date of Filing : 16 Mar 2017 ) |
| | | | 1. Smt. Rukhmini Devi Nandkishor Sharma | | R/o. Chandak Layout, Cotton Market, Nagpur 440018 | | Nagpur | | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. M/s. Creative Real Estate, Through its Managing Partner Virendra Mohanlal Shah | | R/o. F-4, Nilkamal Apartment, 62, Bajaj Nagar, Nagpur 440010 | | Nagpur | | Maharashtra | | 2. Shri Pralhad Laxmanrao Ilmulwar | | R/o. 69/B, Pandey Layout, Khamla, Nagpur | | Nagpur | | Maharashtra | | 3. 2 A) SHRI VIKAS PRALADH ILMUNWAR | | R/O 69/B, PANDEY LAYOUT, KHAMLA, NAGPUR-440025 | | NAGPUR | | MAHARASHTRA | | 4. 2 B) SHRI MADHAV PRALHAD ILMULWAR | | R/O 69/B, PANDEY LAYOUT, KHAMLA, NAGPUR-440025 | | NAGPUR | | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
| |
| BEFORE: | | | | HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT | | | HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER | | | HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER | |
| |
| PRESENT: | Adv. Amit Khare, Advocate for the Complainant 1 | | | ADV. Anuj Saxena, Advocate for the Opp. Party 1 | |
| Dated : 19 Apr 2023 |
| Final Order / Judgement | आदेश मा. अध्यक्ष, श्री. अतुल डी. अळशी यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, विरुध्द पक्ष हे मेसर्स क्रिअटिव्ह रिअल इस्टेट या नावाने व्यवसाय करीत असून विरुध्द पक्ष 2 (a) व 2 (b) हे त्याचे भागीदार आहेत. वि.प. हे विकसन करुन बांधकाम, फ्लॅट स्कीम, करण्याचे कार्य करतात. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष 1 च्या नांवे असलेला मौजा- खामला, प.ह.नं. 20, खसरा क्रं. 72, तह.जि. नागपूर येथील पांडे ले-आऊट मधील को-ऑप. हाऊसिंग सोसायटी येथील प्लॉट नं. 69 B, वर बांधलेल्या चार मजली इमारती मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 3 हा एकूण रक्कम रुपये 1,15,000/- मध्ये खरेदी करण्याकरिता बुक केला होता. विरुध्द पक्षाने सदरचे बांधकाम हे नागपूर प्रन्यास विभागा द्वारे मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे केले असल्याने उभय पक्षात इमारत बांधकामाचा करार केला होता. त्याचप्रमाणे तक्रारकर्तीचा विरुध्द पक्षाशी दुकानाच्या विक्रीबाबतचा करारनामा दि. 27.04.1990 रोजी करण्यात आला असून त्याच दिवशी तक्रारकर्तीच्या नांवे तळ मजल्यावरील दुकान क्रं. 3 चे वाटप केल्याबाबतचे पत्र दिले होते. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दि. 30.05.1997 रोजीच तळ मजल्यावरील दुकान कं. 3 बाबत ताबापत्र दिला होता. तक्रारकर्तीने उभय पक्षात झालेल्या कराराप्रमाणे संपूर्ण रक्कम अदा केल्यानंतर सदरच्या दुकानाचे कायदेशीर विक्रीपत्र करुन देण्याकरिता अनेक वेळा विनंती करुन देखील विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या नांवे उपरोक्त नमूद दुकानाचे विक्रीपत्र करुन न दिल्यामुळे तक्रारकर्तीने दि. 10.10.2016 रोजी विरुध्द पक्षाला वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. त्याची देखील विरुध्द पक्षाने दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करून मागणी केली की, विरुध्द पक्षाने वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्तीच्या नांवे मौजा- खामला, पांडे ले-आऊट, खसरा नं. 72, तह. जि.नागपूर येथील प्लॉट नं. 69-B, आकाश अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 3, एकूण क्षेत्रफळ 18.595 चौ.मी.चे कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च ही देण्याचा आदेश द्यावा.
- विरुध्द पक्ष 1 ने आपला लेखी जबाब दाखल केला असून तक्रारकर्तीने तक्रारीत त्याच्यावर लावलेल्या आरोपाचे खंडन केलेले आहे. विरुध्द पक्ष 1 ने पुढे नमूद केले की, तो बांधकाम व्यावसायिक असून विरुध्द पक्ष 2 ने त्याच्या नांवे असलेल्या जागेवर बांधकाम व विक्री करण्यासाठी मुख्यत्यारपत्र दिले होते. परंतु विरुध्द पक्ष क्रं. 2 चे निधन झाल्यामुळे मुख्यत्यारपत्र रद्द झाले. विरुध्द पक्ष 2 चे विरुध्द पक्ष 2 (a) व 2(b) हे कायदेशीर वारस असल्यामुळे तक्रारकर्तीच्या नांवे दुकानाचे विक्रीपत्र करुन देण्याची सर्वस्वी जबाबदारी विरुध्द पक्ष 2 (a) व 2(b) ची आहे. त्याचप्रमाणे विरुध्द पक्ष हे तक्रारकर्तीच्या नांवे विक्रीपत्र करुन देण्यास तयार आहे व सदरचे दुकान हे तक्रारकर्तीच्या ताब्यात आहे. विरुध्द पक्ष कं. 1 ने तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष 2 (a) व विरुध्द पक्ष 2 (b) यांना आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन देखील विरुध्द पक्ष आयोगासमक्ष हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा दि. 24.01.2020 रोजी आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तऐवज व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
1 तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय 2 विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय ? होय 3 काय आदेश ? अंतिम आदेशानुसार कारणमीमांसा - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाच्या नांवे असलेला मौजा- खामला, प.ह.नं. 20, खसरा क्रं. 72, तह.जि. नागपूर येथील पांडे ले-आऊट मधील को-ऑप. हाऊसिंग सोसायटी येथील प्लॉट नं. 69 B, वर बांधलेल्या चार मजली इमारती मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 3 हा एकूण रक्कम रुपये 1,15,000/- मध्ये खरेदी करण्याकरिता बुक केला होता हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. विरुध्द पक्षाने सदरचे बांधकाम हे नागपूर प्रन्यास विभागा द्वारे मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे व इमारत बांधकाम परवानानुसार केल्याने इमारत बांधकामाचा करार केला होता. त्याचप्रमाणे तक्रारकर्तीचा विरुध्द पक्षाशी दुकानाच्या विक्रीबाबतचा करारनामा दि. 27.04.1990 रोजी करण्यात आला असून त्याच दिवशी तक्रारकर्तीच्या नांवे तळ मजल्यावरील दुकान क्रं. 3 चे वाटप केल्याबाबतचे पत्र दिले होते हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दि. 30.05.1997 रोजीच तळ मजल्यावरील दुकान कं. 3 बाबत ताबापत्र दिला होता. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीकडून उपरोक्त नमूद दुकान /गाळयाचे संपूर्ण रक्कम स्वीकारुन देखील तक्रारकर्तीच्या नांवे कायदेशीर विक्रीपत्र करुन दिले नाही किंवा दुकान विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम दुकानाचा विक्री करारनामा रद्द करुन व्याजासह परत केली नाही ही विरुध्द पक्षाची दोषपूर्ण सेवा असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्याचे दिसून येते.
- उपरोक्त नमूद जागा ही विरुध्द पक्ष 2 च्या नांवे असून त्यांनी विरुध्द पक्ष 1 च्या नांवे जागेवर बांधकाम करुन विक्रीपत्र करुन देण्याकरिता मुख्यत्यारपत्र करुन दिले होते. परंतु विरुध्द पक्ष 2 चे निधन झाल्यामुळे विरुध्द पक्ष 1 व 2 मध्ये झालेले मुख्यत्यारपत्र रद्द झाले. विरुध्द पक्ष 2 (a) व 2(b) हे विरुध्द पक्ष 2 चे कायदेशीर वारस असल्यामुळे त्यांनी तक्रारकर्तीच्या नांवे दुकानाचे कायदेशीर विक्रीपत्र करुन देण्यास जबाबदार आहे असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष 1 विरुध्द कोणताही आदेश नाही.
- विरुध्द पक्षा 2(a) व 2(b) यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्तीच्या नांवे मौजा- खामला, प.ह.नं. 20, खसरा क्रं. 72, तह.जि. नागपूर येथील पांडे ले-आऊट मधील को-ऑप. हाऊसिंग सोसायटी येथील प्लॉट नं. 69 B, वर बांधलेल्या आकाश अपार्टमेंट या चार मजली इमारती मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 3 चे कायदेशीररित्या नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे आणि विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्तीने सोसावा.
- विरुध्द पक्षा 2(a) व 2(b) यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई करिता रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 15000/- द्यावे.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
| |
| |
| | | [HON'BLE MR. ATUL D. ALSI] | PRESIDENT
| | | | | | [HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS] | MEMBER
| | | | | | [HON'BLE MR. SUBHASH R. AJANE] | MEMBER
| | | |