सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 01/2010
तक्रार दाखल झाल्याचा दि. 02/01/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि. 08/01/2010
श्री बाळकृष्ण अंनत पराडकर
वय वर्षे 72, धंदा शेती,
रा.शेमाड-राणेवाडी, रामेश्वर नगर,
कांदळगाव-मालवण, ता.मालवण,
जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
मेसर्स संकल्प डेव्हलपर्स
करीता – प्रोप्रा. भूषण शिवाजी साटम
वय वर्षे 40, धंदा – कॉन्ट्रॅक्टर,
रा.6 – इंदीरा कॉम्प्लेक्स, मालवण,
ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री एस.एस. गव्हाणकर.
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ गैरहजर.
आ दे श
(दि. 08/01/2010)
1) सदरचे तक्रार प्रकरण विरुध्द पक्षाच्या कंत्राटदाराने अपूर्ण बांधकाम केल्यामुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल करणेत आले आहे.
2) सदर तक्रारीचे अवलोकन केल्यावर तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांचे दरम्यान झालेला बांधकामाचा करार हा रु.37,44,300/- एवढया रक्कमेचा झालेला दिसून आल्यामुळे मंचाने Pecuniary Jurisdiction च्या मुद्यावर सुनावणी करणेसाठी तक्रारदारास दि.04/01/2010 चे आदेशान्वये नोटीस पाठविली व सुनावणीची तारीख दि.18/01/2010 ला ठेवण्यात आली.
3) त्यानुसार आज तक्रारदाराचे वकील मंचासमोर हजर झाले व त्यांनी सुनावणी करणेसाठी नि.6 वर अर्ज देऊन प्रकरण आजचे बोर्डवर घेण्याची विनंती केली, त्यानुसार आज प्रकरण सुनावणीसाठी बोर्डवर घेण्यात आले व तक्रारदाराचे वकीलांचे तोंडी युक्तीवाद ऐकून घेतले.
4) सदर तक्रारीचे सुक्ष्म अवलोकन करता तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचे दरम्यान झालेला बांधकामाचा करार हा रु.37,44,300/- एवढया रक्कमेचा झालेला दिसून येतो. या लेखी करारनाम्याची प्रत तक्रारदाराने नि.3 वरील दस्तऐवजाच्या यादीसोबत जोडलेली आहे. सदरची बाब तक्रारदाराने त्याच्या तक्रारीमध्ये नमूद केली नसली तरी उभय पक्षांदरम्यान झालेल्या करारनाम्यात कराराची रक्कम स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे.
5) जिल्हा ग्राहक मंचाचे Pecuniary Jurisdiction हे फक्त रु.20 लाख रुपयापर्यंत असल्यामुळे व सदरच्या तक्रारीतील करारनामा हा त्यापेक्षा जास्त रक्कमेचा असल्यामुळे सदरची तक्रार ही जिल्हा ग्राहक मंचाच्या Pecuniary Jurisdiction च्या अधिकारक्षेत्राच्या बाहेरील असल्याचे दिसून येते. सदरची तक्रार जरी बांधकामातील सेवेतील त्रुटींच्या संबंधाने नुकसान भरपाई मिळणेसाठी असली तरी उभय पक्षात झालेला बांधकामाचा करारनामा हा रु.20 लाखापेक्षा जास्त रक्कमेचा असल्यामुळे, सदरची तक्रार जिल्हा ग्राहक मंचाचे आर्थिक कक्षेत अजिबात बसत नाही.
6) त्यामुळे आम्ही सदरची तक्रार, तक्रारदाराने योग्य त्या Pecuniary Jurisdiction असलेल्या मा.राज्य आयोग, मुंबई यांचेकडे दाखल करणेसाठी तक्रारदारास परत करण्याच्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श –
1) तक्रारदाराची तक्रार सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाचे Pecuniary Jurisdiction चे बाहेरील असल्यामुळे तक्रारदारास, तक्रार परत करणेचे आदेश पारीत करणेत येतात.
2) तक्रारदाराने मा.राज्य आयोग, मुंबई यांचेकडे तक्रार दाखल करणेची सूचना करणेत येते.
3) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
4) तक्रारदारास आदेशाची प्रत पाठविणेत यावी.
सिंधुदुर्गनगरी
दिनांकः08/01/2010
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-