1.प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदार यांचा तक्रार दाखल करणे कामी युक्तीवाद दि.24/09/2021 रोजी ऐकण्यात आला व प्रस्तुत तक्रार आज दि.30/09/2021 रोजी दाखल आदेश कामी नेमण्यात आली आहे तक्रारीमध्ये दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांनी उत्पादीत केलेला Samsung LED 32F5100-32” TV रक्कम रु.32,900/- या किंमतीस दि.10/04/2013 रोजी खरेदी केला. सदर टीव्हीच्या एलईडी स्क्रीन पॅनल मध्ये टीव्ही घेतल्यापासून केवळ पाच महिन्यात एलईडी च्या स्क्रीनचा डीस्प्ले जाण्याचा दोष निर्माण झाला. दि.29/09/2013 रोजी सदर एलईडी च्या स्क्रीनचा डीस्प्ले गेला, तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे त्याबाबत कळविल्यावर सामनेवाले क्र.1 यांनी एलईडी स्क्रीन पॅनल सदर एलईडी टीव्ही वॉरंटी कालावधीत असल्याने, सप्टेंबर 2013 मध्ये बदलून दिले. त्यानंतर नोव्हेंबर 2013 मध्ये पुन्हा सदर एलईडी टीव्हीचा स्क्रीन पॅनल डीस्प्ले गेल्याने, सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना ते बदलून दिले. सामनेवाले क्र.1 यांच्या हेल्पलाईनवर तक्रारदारांनी त्याबाबत कळविले परंतु सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना कोणताही प्रतिसाद दिला न दिल्याने तक्रारदारांनी दि.23/01/2014 रोजी सॅमसंग कंपनीचे चेअरमन (साऊथ कोरीया) यांना पत्र लिहून सदर एलईडी बदलून देणे बाबत अथवा एलईडी स्क्रीन पॅनलची वॉरंटी सात वर्षापर्यंत वाढवून दयावी अशी विनंती केली परंतु त्यांचेकडून तक्रारदारांना त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने, तक्रारदारांनी दि.25/03/2014 रोजी सामनेवाले क्र.2 (विक्रेता) यांना पत्र लिहून सदर एलईडीच्या स्क्रीन पॅनलमध्ये असलेल्या दोषा बाबत कळवून सदर एलईडी बदलून देणे बाबत किंवा त्यांच्या वॉरंटीचा कालावधी वाढवून देणे बाबत कळवीले, व सामनेवाले क्र.2 यांना दि.27/03/2014 रोजी तक्रारदाराचे सदर पत्र मिळाल्याचे तक्रारदारांनी नमुद केले आहे (Annexure-E) सामनेवाले क्र.2 कडून तक्रारदारांना काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तक्रारदारानी दि.01/06/2014 रोजी सामनेवाले यांना नोटीस (Annexure-F), एलईडी टीव्ही बाबतचा वाद सामनेवाले यांना नोटीस प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांत सोडवावा अन्यथा तक्रारदारांना सामनेवाले विरुध्द ग्राहक मंचात तक्रार दाखल करावी लागेल असे कळविले. सामनेवाले यांना तक्रारदाराची वर नमुद नोटीस दि.03/06/2014 रोजी मिळाली व सामनेवाले क्र.1 यांचेकडे तकारदारचा एलईडी टीव्ही विषयीची तक्रार पाठविण्यात आल्याचे सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांना कळविले.(Annexure-G), दि.18/01/2015 पर्यंत सामनेवाले क्र.1 यांनी त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही, म्हणून तक्रारदारांनी दि.27/01/2015 रोजी सामनेवाले क्र.1 यांचे प्रतिनीधी श्री.अमित साटम यांना ईमेलद्वारे कळवून पुढील कार्यवाही करण्यासाठी कळविले. परंतु सामनेवाले क्र.1 व 2 यांनी सदर एलईडी टीव्ही बाबत तो बदलून देणे अथवा स्क्रीन पॅनलची वॉरंटी कालावधी बदलून देणेबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये सदर एलईडीचा स्क्रीन पॅनल पुन्हा गेला, सामनेवाले क्र.1 च्या टेक्निशियनने दि.01/01/2018 रोजी तक्रारदाराकडे भेट देवून सदर एलईडीचा वॉरंटी कालावधी संपलेला असल्याने स्क्रीन पॅनल बदलण्यासाठी तक्रारदारांना रु.17,000/- खर्च येईल असे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदारांनी त्यानंतर सामनेवाले क्र.2 (विक्रेता) तक्रारदाराची एलईडी टीव्ही विषयीची तक्रार सोडविण्याची विनंती केली त्यांनी सामनेवाले क्र.1 यांना त्याबाबत पटवून देऊन लवकरच तक्रारदाराची एलईडी टीव्ही ची तक्रार सोडवणार असल्याचे तक्रारदारांना आश्वासन दिले त्यानंतर दीड वर्ष उलटले तरी सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराची सदर टीव्ही बाबतची तक्रार सोडविली नाही तो तक्रारदारांना बदलून दिला नाही किंवा त्याचा वॉरंटी कालावधी वाढवून दिला नाही, दि.08/08/2019 रोजी तक्रारदारानी सामनेवाले यांना पुन्हा नोटीस पाठविली व सामनेवालेनी तक्रारदाराच्या एलईडी टीव्हीचा दुरुस्तीचा खर्च सोसावा असे कळविले, दि.27/08/2019 रोजी सामनेवाले क्र.1 यांनी टेक्निशीयन नियुक्त करुन एलईडी टीव्हीची पाहणी केली व दि.03/09/2019 रोजी सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराच्या सदर एलईडी टीव्हीच्या दुरुस्तीसाठी रक्कम रु.21,133/- इतका खर्च येईल असे तक्रारदारांना कळविले त्यापैकी 50 टक्के रक्कम सामनेवाले क्र.1 स्वत: भरण्यास तयार असल्याचे सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना कळविले व दि.04/09/2021 रोजी सदर एलईडी टीव्हीची वॉरंटी संपली असल्याचे सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना कळविले असता, दुरुस्तीच्या रकमेपैकी केवळ रु.5,000/- तक्रारदार देण्यास तयार असल्याचे तक्रारदारानी सामनेवाले क्र.1 यांना दि.12/09/2019 रोजीच्या पत्राद्वारे कळविले त्यावर दि.26/09/2021 रोजी सामनेवाले क्र.1 यांनी पुन्हा तक्रारदाराच्या एलईडी टीव्ही बाबत “ the product is nomore in standard warranty term as per age असे तक्रारदारांना कळविले व पुन्हा सदर एलईडी टीव्हीच्या दुरुस्तीसाठी रक्कम रु.21,133/- इतका खर्च येणार असून त्याच्या 50 टक्के रक्कम सामनेवाले क्र.1 भरण्यास तयार असल्याचे व 50 टक्के रक्कम तक्रारदार यांना भरायची असल्याचे सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना सांगितले, त्यामुळे सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना त्रुटीपूर्ण सेवा दिली व अनुचित प्रथेचा अवलंब केला असे नमुद करुन तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 व 2 विरुध्द प्रस्तुत तक्रार दि.26/09/2019 रोजी तक्रारीचे कारण घडल्याचे नमुद करुन व ती विहीत मुदतीत दाखल करीत असल्याचे नमूद करुन दाखल कामी सादर केली आहे.
2. तक्रारदारांनी कथन केलेल्या प्रस्तुत तक्रारीतील वर नमुद तपशीला प्रमाणे असलेल्या घटनाक्रमांचा विचार केला असता, तक्रारदारानी दि.10/04/2013 रोजी प्रस्तुत एलईडी टीव्ही सामनेवाले क्र.2 कडून खरेदी केला असून त्यामध्ये एक वर्षाच्या वॉरंटी कालावधीत म्हणजे तो खरेदी केल्यापासून केवळ 5 महिन्यात (सप्टेंबर 2013) व त्यानंतर नोव्हेंबर 2013 मध्ये सदर टीव्हीचे स्क्रीन पॅनलचा डीस्प्ले जात असल्याचे तक्रारदारांना आढळले व त्याबाबत त्यांनी सामनेवाले क्र.1 यांना संपर्क केला सप्टेंबर 2013 व नोव्हेंबर 2013 मध्ये दोनवेळा सामनेवाले क्र.1 यांनी सदर टीव्ही वॉरंटी कालावधीत असल्याने तीचा स्क्रीन डीस्प्ले स्वखर्चाने तक्रारदारांना बदलून दिला, परंतु तक्रारदारांनी सदर एलईडी बदलून दयावा किंवा त्याचा वॉरंटी कालावधी बदलून 7 वर्षापर्यंत वाढवून दयावा ही तक्राराची मागणी मान्य केली नाही व तक्रारदारांना कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून तक्रारदारांनी सामनेवाले यांना कायदेशीर नोटीस दि.01/06/2014 रोजी बजावली व सामनेवाले विरुध्द ग्राहक मंचात तक्रार दाखल करणार असल्याचे सामनेवाले यांना कळविले. सदर नोटीस सामनेवाले यांना दि.03/06/2014 रोजी मिळाल्याचे तक्रारदारांनी नमुद केले आहे त्यानंतरही सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असे असतांना तक्रारदार यांनी ग्राहक मंचात सदर कारण घडल्यापासून दोन वर्षाच्या कालावधीत तक्रार दाखल न करता ते केवळ सामनेवाले क्र.1 व 2 यांचेशी पत्रव्यवहार करत राहीले व प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी दि.२४/०९/२०२१ रोजी विलंब माफीचा अर्ज दाखल न करता, दाखल करुन घेणे कामी आयोगात सादर केली आहे. यावरुन असे दिसते की, जेव्हा जेव्हा सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराचा टीव्ही स्क्रीन पॅनल स्वखर्चाने बदलून दिला तेव्हा तक्रारदार यांनी सदर एलईडी टीव्हीचा वापर केला, सन 2015 ते डिसेंबर 2017 म्हणजे (तिस-या वेळी टीव्ही स्क्रीन डीस्प्ले) जाईपर्यंत तक्रारदारानी प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल करण्याविषयी कोणतीही कार्यवाही केली नाही, सदर एलईडी टीव्हीचा तक्रारदार यांनी सन 2013 ते 2021 पर्यंत उपभोग घेतला व सामनेवाले क्र.1 यांनी सदर एलईडी टीव्ही वॉरंटी कालावधी बाहेर गेला असल्याने तक्रारदाराकडून स्क्रीन पॅनल दुरुस्तीच्या खर्चाच्या 50 टक्के रक्कम तक्रारदारांना भरण्यास सांगितली तेव्हा सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती त्रुटीपूर्ण सेवा दिल्याचे व अनुचित व्यापार प्रथेचा वापर केल्याचे नमुद करुन वॉरंटी कालावधी पलीकडेही उत्पादक व विक्रेत्याची जबाबदारी असते असे नमुद करुन तक्रारीत नमूद मागण्यांबाबत म्हणजे एलईडी टीव्ही ची रक्कम रु.३२९००/- तक्रारदारांना 9 टक्के व्याजाने परत दयावी किंवा एलईडी टीव्ही बदलून नवीन टीव्ही दयावा व रु.25000/- मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून दयावी असे नमुद करुन प्रस्तुत तक्रार दाखल कामी सादर केली आहे, परंतु सदर तक्रारीतील घटनाक्रम विचारात घेता, ती मुदतबाहय असल्याचे दिसून येते व सामनेवाले यांना दि.01/06/2014 मध्ये नोटीस दिल्यापासून तक्रारीचे कारण घडले असे मानले तरी तक्रारदारांनी ती जून 2016 पर्यंत दाखल करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदारांनी ती 2021 मध्ये विलंब माफीचा अर्ज दाखल न करता दाखलकामी सादर केली आहे व केवळ पत्रव्यवहार केल्याने किंवा कायदेशिर नोटीस पाठविल्याने तक्रारीचे कारणाची मुदत वाढवता येत नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रार मुदतबाहय ठरत असल्याने दाखल टप्यावर असतांना, दाखल करुन घेण्यास Consumer Protection Act 2019 च्या कलम 36(2) नूसार नाकारण्यात येते. खर्चाबाबत आदेश नाही.