::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सदस्या, किर्ती वैदय (गाडगीळ)
1. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२.. अर्जदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असून गैरअर्जदार क्र. १ ही मेसर्स मटरीक्स इन्फ्रा केअर इंडिया प्रा. ली. या नावाने चंद्रपूर जिल्ह्यात प्लॉट व त्यावर घर बांधून देण्याचा व्यवसाय करतात. गैरअर्जदार ह्यांनी मोजा दाताला खसरा क्र. १६८, आरजी ०.७४ आणि खसरा क्र. १६९ अर्जी ०.१९ आरजी ओ.९३ जागेचे प्लॉट पडून त्यावर घर/flat बांधाण्याची योजना मार्च एप्रिल २०१२ मध्ये सुरु केली. अर्जदाराने त्यावर विश्वास ठेऊन flat क्र. ti-4-१०७ हा बुक केला व गैरअर्जदाराला दि ४..३.२०१२ रोजी रु. ५०००/- व१३.३.२०१२ रोजी रु. १,००,००० /-व ५.०४.२०१२ रोजी ११,०२५०/-असे एकूण रु.२,१५,२५०/- दिले. . गैरअर्जदार क्र. २ ने लेखी करार रु. १००/- स्टंप पेपरवर दि.२६.०४.२०१२ रोजी करुन करारापासून २ वर्षाच्या आत flat बांधून व विक्री करुन देतो असे सांगितले. परंतु त्यानंतर गैरअर्जदाराकडून काहीही प्रतिसाद दिसला नाही. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराला दिलेली अग्रिम रक्कम रु. २,१५२५० /- परत देण्याची मागणी नोटीस द्वारे केली. परंतु गैरअर्जदाराने त्यावर काहीही उत्तर दिले नाही. सबब, अर्जदाराने सदर तक्रार मंचासमोर दाखल केली आहे.
३ . अर्जदाराने तक्रारीत मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्र. १ ते ७ ह्यांनी अर्जदारासोबत अनुचित पद्धतीचा व्यवहार केला आहे असे घोषित करावे तसेच १ ते ७ ह्यांनी स्वतंत्र व संयुक्तपणे अर्जदाराकडून घेतलेली रक्कम रु. २,१५२५०/-अर्जदाराला द्यावी. तसेच त्यावर दि. ०५.०४.२०१२ पासून १२ टक्के व्याज दराने व्याजासह अर्जदाराला द्यावे. शारीरिक मानसिक त्रासापोटी रु २५,०००/-व तक्रारीचा खर्च रु. १०,०००/- देण्यात यावे.
४ . वि.प.क्र. १ व २ यांनी रोजी लेखी म्हणणे दाखल करुन प्राथमिक आक्षेप घेतला कि, अर्जदाराने शेतमालक यांना पक्ष केलेले नाही. जमीन मालक श्रीमती शोभा शालिग्राम सदाफळे व शिरीष सदाफळे हे वरील स्कीम मधील २५ टक्के भागीदार असून त्यांच्या स्वमालकीच्या जमिनीवर बहुमजली इमारत उभारून ग्राहकांना विकण्याकरिता गैरअर्जदार क्र. २ यांना अधिकृत अधिकार व परवानगी दिली होती. त्याप्रकारचा मौखिक करारनामा दि ०८.०१.२०११ ला झाला होता त्या करारानुसार जमिनीची किमत रु. १,७८,००,०००/- ठरविण्यात आली होती व जमीन मालक यांना २५ टक्के नफ्यातील भागीदारी देण्याचे ठरले. परतू त्यानंतर जमीन मालक ह्यांनी संपूर्ण प्रोजेक्ट स्वतः करण्याची इच्छा जाहीर केल्यामुळे डेव्हलपर्स, गैरअर्जदार क्र. २ आणि जमीन मालक याच्यात संपूर्ण ग्राहकांच्या साक्षीने सिटी पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे तडजोड होऊन जमीन मालक ह्यांना संपूर्ण प्रोजेक्ट देण्याचे अटी व शर्तीनुसार ठरले. जमीन मालकाने कराराप्रमाणे सुखसुविधा व अतिरिक्त रक्कम न घेता प्रोजेक्ट पूर्ण करणे, जे ग्राहक flat वा दुकान घेण्यास समर्थ नसतील त्यांना रक्कम परत करणे, ह्या अटी व शर्ती होत्या त्या प्रमाणे जमीन मालक्काने रक्कम परत न केल्यामुळे ग्राहकांनी मंचात तक्रारी दाखल केल्या. गैरअर्जदार ह्यांनी मोखिक करारनुसार रु. ५५,००,०००/- किमतीच्या मोबदल्यात ग्राहकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन व्यक्तिना ८० लाख रु. किमतीचे मोबदल्यात येथील जमीन नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये सुपूर्द केली आहे. अर्जदार यांनी सौ शोभा शालीकराम सदफले जमीन मालक २०१४ रोजी संदर्भीय flat करता केलेल्या खरेदीचा करार हा ग्राहक संघटना जमीन मालक व डेवलपर्स यांच्यात झालेल्या कराराची पुर्तता म्हणूनच करून दिलेला करारनामा हा अर्जदार व जमीन मालक यांच्यातील नवीन करार हे सिद्ध करण्यास पुरेसा आहे की ग्राहक संघटना जमीन मालक व डेवलपर्स यांच्यात तडजोड झाली होती गैरअर्जदार 1 ने आपल्या मार्केटिंग प्रमोशन करता मिळालेल्या ५० लाखापैकी १५ लाख रुपये जमीन मालकाला अतिरिक्त दिली जेणेकरून ग्राहकांना आधीच्या ठरलेल्या दरात बंगलो प्लाट मिळावेत यासाठी गैरअर्जदार क्रमांक २ ने आर्थिक भुर्दंड सहन केला सबब अर्जदाराला गैरअर्जदार मुळे शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागला हे म्हणणे अनुचित व न्यायसंगत असल्यामुळे अर्ज नामंजूर करण्यात यावा
५.. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, तक्रारदारांचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद तसेच तसेच तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकालकामी खालील मुद्दे तयार करण्यांत येतात.
मुद्दे निष्कर्ष
(१ ) गैरअर्जदार क्र. १ ते ७ ह्यांनी अर्जदारास सेवासुविधा पुरविण्यात कसूर होय
केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ?
(२) गैरअर्जदार .1 ते ७ तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास होय
पाञ आहे काय ?
(३ ) आदेश ? आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
१. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे मौजा दाताळा तालुका व जिल्हा चंद्रपूर येथील खसरा क्रमांक १६८,१६९ मधील प्रस्तावित सदनिकेतील तिसर्या माळ्यावर सदनिका क्रमांक t- ४-१०७ रुपये १०,५१,२५० /- किमतीत बुक केला त्यानुसार अर्जदाराने गैर अर्जदारांना वेळोवेळी सदनिकेच्या किमतीपोटी रुपये. २,१५,२५०/- दिले व त्यानुसार अर्जदाराने तक्रारीत गैर अर्जदाराला दिलेल्या पावत्या दाखल केलेल्या आहेत व त्यावर गैर अर्जदाराची स्वाक्षरी असून सदर सदनिका बद्दल गैरअर्जदाराने अर्जदाराला करारनामा करून दिला. करारनामा तक्रारी दाखल असून त्यावरही अर्जदाराची स्वाक्षरी आहे वरील दस्तावेज वरून असे स्पष्ट होत आहे की अर्जदाराने गैरअर्जदार ह्यांना रुपये. २,१५,२५०/- सदनिकेसाठी दिले व ती रक्कम गैर अर्जदाराने स्वीकारलेली आहे ही बाब सिद्ध होत आहे प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांनी त्यांच्या उत्तरात अर्जदाराने सदर प्रकरणात जमीन मालकाला पक्ष केलेले नाही असा आक्षेप घेतला आहे.तसेच गैरअर्जदार यांनी जमीन मालकासोबत झालेला करार तक्रारीत दाखल केला आहे परंतु अर्जदार व गैरअर्जदार ह्यांच्यात झालेल्या दि.१५.०३.२०१२ च्या कराराबद्दल कोणतीही बाब त्यात नमूद नाही.गैरअर्जदार क्र.१ ते ७ ह्यांच्या सोबत झालेला दि.१५.०३.२०१२ चा करार रद्द झाल्याची बाब तक्रारीत कुठेही नमूद नाही.दि. १५.०३.२०१२ चा करार रद्द झाल्याशिवाय गैरअर्जदार क्र. १ ते २ ह्यांनी दाखल केलेला अर्जदाराचा जमीन मालकाशी केलेला करार कायदेशीर ठरत नाही. याउलट अर्जदाराने तक्रारीत त्यांनी गैर अर्जदाराला करारापोटी रुपये. २,१७,५००/- दिले याबद्दलच्या पावत्या व करार तक्रारी दाखल केला सदर करारनाम्यात नंबर ३ वर अर्जदाराने गैर अर्जदाराला सदर .रक्कम दिली, तसेच पुढील रक्कम अर्जदार गैरअर्जदाराला बांधकामाच्या प्रगती प्रमाणे देईल व त्यानंतर सदर सदनिकेचा ताबा गैरअर्जदार अर्जदाराला देणार असे नमूद केलेले असून त्यावर गैर अर्जदाराची स्वाक्षरी आहे असे असून सुद्धा गैरअर्जदाराने अर्जदाराकडून रक्कम स्वीकारूनही नमूद वेळेत काम सुरू केले नाही, किंवा त्याबद्दल अर्जदाराला सूचनाही केली नाही अर्जदाराकडून करारानुसार रक्कम स्वीकारून सदनिकेची विक्री गैरअर्जदाराने अर्जदाराला करून दिली नाही ही बाब गैरअर्जदार क्रमांक १ ते ७ ह्यांनी अर्जदार आपल्यातील सेवेत न्यूनता असून अर्जदार ने अवलंबलेली अनुचित व्यापारी पद्धत आहे सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्रमांक २ व ३ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६. गैरअर्जदार क्रमांक ३ ते ७ यांना मंचा तर्फे नोटीस प्राप्त होऊन सुद्धा प्रकरणात उपस्थितीत न रहिल्यमुळे गैरअर्जदार क्रमांक 3 ते 7 विरुद्ध सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक २७.७.१७ रोजी करण्यात आले.सदर आदेश
आज रोजि अबाधित आहेत.
मुद्दा क्रं. 5 बाबत ः-
७. मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रार क्र. २८/२०१५ अंशत मान्य करण्यात येते.
(2) गैरअर्जदार क्र. १ ते ७ यांनी वैयक्तिक व सायुकात्रीत्या तक्रारदारांस सेवा सुविधा पुरविण्यांत कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
(३) गैरअर्जदार क्र.१ते ७ यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या रक्कम रु. २,१५,२५०/- अर्जदारास दि.०१.०९.२०१५ पासून अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह अदा करावी
. .
(4) गैरअर्जदार १ ते ७ वैयक्तिक व संयुक्तरीत्या तक्रारदारांस झालेल्या शारीरिक मानसिक ञास व तक्रार खर्चापोटी एकत्रीत रक्कम रु 3०,०००/-तक्रारदारांस, आदेश प्राप्त दिनांकापासून 30 दिवसांत द्यावे.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
अधि. कल्पना जांगडे (कुटे) अधि. किर्ती वैदय (गाडगिळ) श्री. उमेश वि. जावळीकर
मा.सदस्या मा.सदस्या मा. अध्यक्ष