| Final Order / Judgement | मा.सदस्या , श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस यांच्या आदेशान्वये तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. - तक्रारकर्तीने तक्रारीत असे कथन केले आहे की, विरुध्द पक्ष क्रं.2 व 3 हे विरुध्द पक्ष क्रं. 1 चे भागीदार असून बांधकामाचा व्यवसाय करतात. त्याकरिता वेगवेगळया ठिकाणी जागा खरेदी करुन त्यावर गाळे बांधणे व ते ग्राहकांना विकण्याचा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रं. 2 व 3 ने बांधकाम केलेले मौजा- नरसाळा, खसरा नं. 208- सी, प.ह.नं. 37, स्थित प्लॉट क्रं. 80, 81 वर बांधकाम करण्यात येणारा गाळा खरेदी करण्याचे निश्चित केले. त्यानुसार तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष 2 व 3 यांच्या कडील गाळा क्रं. 203, 2 रा मजला, ज्याचे एकूण क्षेत्रफळ 103.09 चौ.मी. असून त्यात बालकनी व अन्य जागा सोडून तक्रारकर्तीला 4.026 टक्के अविभक्त हिस्सा असलेल्या व्ही.एम.ग्लोरी अपार्टमेंट मधील स्थितीत गाळयाची एकूण किंमत रुपये 9,10,000/- ला खरेदी करण्याचा करार दिनांक 19.01.2009 रोजी केला. उपरोक्त गाळा 2 वर्षाच्या आत पूर्ण करुन ताब्यात देण्याचे आश्वासन विरुध्द पक्ष 2 व 3 यांनी तक्रारकर्तीला दिले. त्याकरिता तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला विक्री करारनामा करते वेळी दि. 16.01.2009 रोजी रुपये 1,50,000/- व रुपये 1,60,000/- असे एकूण रुपये 3,10,000/- नगदी स्वरुपात दिले. त्यानंतर दिनांक 19.02.2009 रोजी रुपये 25,000/- दि. 27.02.2009 रोजी रुपये 25,000/-, दि. 30.04.2009 रोजी रुपये 15,000/- व दि. 13.09.2009 रोजी रुपये 50,000/- असे एकूण रुपये 4,25,000/- दिले. परंतु विरुध्द पक्षाने नियोजित वेळेवर कराराच्या अटी व शर्तीची पूर्तता केली नाही. विरुध्द पक्ष 2 व 3 यांनी तक्रारकर्तीकडून प्राप्त झालेली रक्कम इतरत्र खर्च केली. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांच्यात झालेल्या विक्री करारनामात नमूद केल्याप्रमाणे गाळाचे बांधकाम जास्तीत जास्त 24 महिन्याच्या आत पूर्ण करणे आवश्यक होते. परतु तक्रारकर्तीने जागेवर जाऊन निरीक्षण केले असता बिल्डींगचे काम पूर्ण झाले नसून त्यात बरेच काम शिल्लक असल्याचे दिसून आले. त्यासबंधी वि.प. 2 व 3 यांच्या निदर्शनास आणून दिले असता त.क.ला असे आश्वासन दिले की, सदरहू बिल्डींगचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन गाळयाचा ताबा व विक्रीपत्र करुन देण्यात येईल. त्याकरिता 3-4 महिन्याचा वेळ लागेल असे सांगितले. 4 महिन्याचा काळ उलटल्यानंतर त.क.ने वि.प. 2 व 3 यांच्याशी विक्रीपत्रा संबंधी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तुम्ही विक्रीपत्रा संबंधी लागणारी सर्व रक्कम तयार ठेवा आम्ही लवकरात लवकर विक्रीपत्र करुन देतो. त.क. ने आवश्यक ती सर्व रक्कम जमा करुन ठेवली परंतु वि.प. 2 व 3 यांनी त.क.ला अद्याप विक्रीपत्र करुनल दिल नाही. यासंबंधी अनेक वेळा विचारणा केली असता वि.प.ने त.क.ला उडवाउडवीचे उत्तर दिले. म्हणून त.क.ने वकिला मार्फत वि.प.ला कायदेशीर नोटीस पाठविली. त्यावर ही विरुध्द पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही व त.क.ला गाळयाचे विक्रीपत्र करुन दिले नाही ही वि.प. ची सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब केला असल्याने तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, विरुध्द पक्षाने मौजा- नरसाळा, प्लॉट क्रं. 80, 81, खसरा नं. 208-सी, प.ह.नं. 37, नरसाळा –उमरेड रोड स्थिती बांधकाम करण्यात येणारे व्ही.एम. ग्लोरी अपार्टमेंट मधील गाळा क्रं. 203, 2 रा मजला, ज्याचे एकूण क्षेत्रफळ 103.09 चौ.मी. बालकनी सोडून अविभक्त हिस्सा 4.026 टक्के असलेल्या गाळयाचे विक्रीपत्र करुन द्यावे व ते शक्य नसल्यास घेतलेली रक्कम रुपये 4,25,000/- दि. 18.01.2009 पासून 18 टक्के दराने परत करण्याचा आदेश व्हावा. तसेच तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक , मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश
- विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 ला मंचाची नोटीस दिनांक 01.05.2017 रोजी नवभारत वर्तमान पत्रात जाहीर नोटीस देऊन ही वि.प. 1 ते 3 प्रकरणात हजर झाले नाही. म्हणून दिनांक 10.10.2017 रोजी नि.क्रं.1 वर विरुध्द पक्ष 1 ते 3 यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार, नि.क्रं. 2 वर दाखल दस्तावेज व तोंडी युक्तिवाद ऐकून मंच खालीलप्रमाणे कारणमिमांसा नमूद करीत आहे.
कारणमिमांसा - तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार व नि.क्रं. 2 वर दाखल दस्ताऐवजावरुन असे निदर्शनास येते की, विरुध्द पक्षाने मौजा- नरसाळा, प्लॉट क्रं. 80, 81, खसरा नं. 208-सी, प.ह.नं. 37, नरसाळा –उमरेड रोड स्थिती बांधकाम करण्यात येणारे व्ही.एम. ग्लोरी अपार्टमेंट मधील गाळा क्रं. 203, 2 रा मजला तक्रारकर्तीला बांधून देण्याचे आश्वासन दिले होते व त्याकरिता दि. 19.01.2009 रोजी विक्रीचा करार नामा केला असून वेळोवेळी मिळून अशी एकूण रक्कम रुपये 4,25,000/- स्वीकृत केली होती. परंतु विक्रीचा करारनामा करुन देखील वादातीत गाळयाचे विक्रीपत्र करुन दिले नाही. सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 ला काढण्यात आलेली नोटीस वर्तमान पत्रात प्रसिध्दी करुन ही विरुध्द पक्ष 1 ते 3 प्रकरणात हजर झाले नाही व आपली बाजू मांडली नाही. म्हणून तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष 1 ते 3 यांच्या विरुध्द तक्रारीत लावलेले आरोप सिध्द होतात व विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 ने तक्रारकर्ती प्रति अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब केल्याचे सिध्द होते.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष 1 ते 3 ने तक्रारकर्तीकडून मौजा- नरसाळा, प्लॉट क्रं. 80, 81, खसरा नं. 208-सी, प.ह.नं. 37, नरसाळा –उमरेड रोड स्थिती बांधकाम करण्यात येणारे व्ही.एम. ग्लोरी अपार्टमेंट मधील गाळा क्रं. 203, 2 रा मजला, ज्याचे एकूण क्षेत्रफळ 103.09 चौ.मी. बालकनी सोडून अविभक्त हिस्सा 4.026 टक्के असलेल्या गाळयाची उर्वरित रक्कम स्वीकृत करुन विक्रीपत्र करुन द्यावे.
किंवा सध्या परिस्थितीत कायदेशीररित्या उपरोक्त गाळयाचे विक्रीपत्र करुन देणे शक्य नसल्यास विरुध्द पक्ष 1 ते 3 ने घेतलेली रक्कम रुपये 4,25,000/- व त्यावर दि. 19.01.2009 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याजसह रक्कम अदा करावी. - विरुध्द पक्ष 1 ते 3 ने वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5000/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक
महिन्याच्या आत विरुध्द पक्ष 1 ते 3 ने वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या करावी. - उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |