तक्रारदार : वकील श्री.बाबु हजर.
सामनेवाले क्र.1 : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-
न्यायनिर्णय
1. तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. सा.वाले क्र.1 ही कंपनी असून सा.वाले क्र.2 हे त्यांचे कार्यकारी संचालक आहेत.
3. सा.वाले क्र.1 यांनी गोल्डकार्ड मेंबरशिप योजना काढली. त्या योजनेमध्ये सभासदत्व मिळण्यासाठी रु.36,000/- भरावयाचे होते. सभासदत्व मिळाल्यानंतर पाच वर्षानंतर ही रक्कम परत मिळणार होती. व प्रत्येक वर्षी सात रात्री विना मोबदला रिसॉर्टमध्ये रहाता येणार होते.
3.4. या योजनेनुसार तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे रु.36,000/- भरुन सा.वाले यांच्या योजनेचे सभासदत्व घेतले सा.वाले यांचे महाबळेश्वर स्टॅाबेरी कन्ट्री नावाचे रिसॉर्ट होते. योजनेअंतर्गत असलेल्या सुविधा प्रमाणे तक्रारदार यांनी तीन रात्री महाबळेश्वर येथील रिसॉर्टमध्ये राहीले.
5. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार दिनांक 5.11.2011 रोजी मुदत ठेवीची मुदत संपली. योजनेनुसार सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.36,000/- परत करणे आवश्यक होते. परंतु दिनांक 23.1.2006 रोजी सा.वाले यांनी पत्राव्दारे तक्रारदारांना कळविले की, त्यांचे सभासदत्व आणखी एका वर्षासाठी वाढविण्यात येत आहे. व त्यांनी न उपभोगलेल्या उर्वरित 14 रात्री पुन्हा ते उपभोगू शकतील. त्यानंतर तक्रारदार सा.वाले यांचेकडे दोन वेळा प्रत्यक्ष भेटून पैसे परत करण्याबद्दल मागणी केली. सा.वाले यांनी पैसे परत करण्याबाबत आश्वासन दिले. परंतु आश्वासनाप्रमाणे सा.वाले यांनी पैसे परत केले नाही. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 18.8.2007 रोजी पत्राव्दारे पैसे 15 टक्के व्याज दराने परत करावेत अशी मागणी केली. तरीही सा.वाले यांचेकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
6. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, मुदत संपल्यानंतर दिनांक 1.11.2005 रोजी सा.वाले यांनी पैसे परत करणे आवश्यक होते. परंतु पैसे परत न करता एक तर्फा मुदत ठेवीची कालमर्यादा एका वर्षानी वाढविली. त्यानंतरही म्हणजे दिनांक 1.11.2006 नंतरसुध्दा सा.वाले यांनी पैसे परत केले नाही.
7. म्हणून प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करुन तक्रारदार यांनी रु.36,000/- मुदत ठेवीची रक्कम, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5000/- अशी रक्कम सा.वाले यांनी तक्रारदारांना द्यावेत अशी मागणी केली.
8. तक्रार अर्ज शपथपत्र व अनुषंगीक कागदपत्रासह दाखल केले आहेत.
9. सा.वाले यांनी हजर होऊन तक्रार अर्जास उत्तर दाखल करावे अशी मंचाकडून नोटीस पाठविण्यात आली. सा.वाले क्र.1 यांचा पाठविलेली नोटीस लेप्ट असा शेरा मारुन परत आली. म्हणून सा.वाले क्र.1 यांना स्थानिक वृत्त “कोकण सकाळ” दिनांक 3.8.2011 व्दारे नोटीस बजावण्यात आली. सा.वाले क्र.2 यांना नोटीस बजावल्याची पोच पावती अभिलेखात दाखल आहे. सा.वाले क्र.1 व 2 यांना नोटीस बजावूनही सा.वाले गैर हजर राहीले. सा.वाले यांना नोटीस बजावल्याचे शपथपत्र तक्रारदारांनी अभिलेखात दाखल केलेले आहे. नोटीस मिळूनही सा.वाले गैर हजर राहीले म्हणून त्यांचे विरुघ्द तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्यात यावा असा आदेश पारीत करण्यात आला.
10. तक्रार अर्ज, शपथपत्रे, कागदपत्रे, यांची पडताळणी करुन पाहीले असता निकालासाठी पुढील प्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदार यांना सा.वाले यांनी मुदत ठेवीनंतर पैसे परत न देऊन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार तक्रार अर्जात नमुद केलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
11. सा.वाले यांनी काढलेल्या गोल्डकार्ड मेंबरशिप योजनेखाली तक्रारदार यांनी रु.36,000/- भरुन दिनांक 1.11.2000 मध्ये त्याचे सभासदत्व घेतले. या योजनेनुसार सभासदांना रु.36,000/- पाच वर्षाच्या मुदतीसाठी गुंतावावयाचे होते. व मुदतीनंतर ती रक्कम परत मिळणार होती. तसेच सभासदांना प्रत्येक वर्षी 7 रात्री रिसॉर्ट मध्ये विनामोबदला रहाता येणार होते. तक्रारदारांनी अभिलेखात निशाणी क्र.1 वर मेंबर शिप फीक्स डिपॉझीट पावती दाखल केलेली आहे.
12. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सा.वाले यांचे महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी कन्ट्री ये रिसॉर्ट असून तक्रारदारांनी तेथे तिन रात्री विनामोबदला राहीले.
13. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार दिनांक 5.11.2005 रोजी सभासदत्वाची/ मुदत ठेविची मुदत संपत होती. त्यानंतर सा.वाले यांनी रुपये 36,000/- परत करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता सा.वाले यांनी दिनांक 23.1.2006 रोजी पत्र पाठवून मुदत ठेवींची कालमर्यादा एका वर्षाने वाढविली. व उर्वरित 14 न उपभोगलेल्या रात्री पुन्हा उपभोगण्याची मुभा दिली. दिनांक 23.1.2006 रोजीचे पत्र निशाणी क्रमांक सी वर दाखल आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे रु.36,000/- परत करण्याची मागणी केली. परंतु सा.वाले यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
14. तक्रारदारांचे तक्रार अर्जातील म्हणणे सा.वाले यांनी हजर राहून नाकारले नाही. तसेच तक्रारदारांच्या म्हणण्यास अनुषंगीक कागदपत्रावरुन पुष्टी मिळणे म्हणून तक्रारदारांचे म्हणणे ग्राहय धरण्यात येते.
15. सा.वाले यांनी तक्रारदार यांना गोल्डकार्ड मेंबरशिब योजनेच्या अटी व शर्ती नुसार मुदत ठेवीची रक्कम मुदतीनंतर परत देणे आवश्यक होते. परंतु सा.वाले यांनी तक्रारदार यांना ते पैसे परत न देवन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हे स्पष्ट होते. म्हणून सा.वाले तक्रारदारास मुदत ठेवीची रक्कम/सभासदत्व मिळण्यासाठी भरलेली रक्कम रु.36,000/- परत देण्यास जबाबदार आहेत.
16. मुदत ठेवी नंतर सा.वाले यांनी तक्रारदारांना रक्कम परत दिली नाही या बद्दल तक्रारदारांना त्रास सहन करावा लागला नाही असे म्हणता येणार नाही. म्हणून सा.वाले हे तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु.10,000/- व तक्रार अर्ज खर्च रु.5000/- देण्यास जबाबदार राहातील. सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 कार्यकारी संचालक असल्याने विरोधी पक्षात आवश्यक पक्ष आहे. परंतु सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 चे प्रतिनिधीत्व करतात. सा.वाले क्र.1 चे सभासदत्व मिळणेसाठी मोबदला तक्रारदारांनी सा.क्र.1 यांचेकडे दिला व तो सा.वाले क्र.1 ने स्विकारला. त्यामुळे सा.वाले क्र.2 चे विरुध्द आदेशानुसार तक्रारदारांना पैसे देण्याची कोणतीही जबाबदारी नाही.
17. वरील विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 542/2008 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना मुदत ठेवीची रक्कम रु.36,000/-परत करावी.
3. सामनेवाले क्र.1 यांनी वरील आदेशाची पुर्तता न्याय निर्णयाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून आठ आठवडयाचे आत करावी. अन्यथा विहीत मुदतीनंतर वरील रक्कमेवर 9 टक्के व्याज रक्कम अदा करेपर्यत द्यावे.
4. सामनेवाले वांनी तक्रारदार यांना मानिसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- द्यावेत.
5. तक्रारदारांना तक्रार अर्ज खर्च रुपये 5000/- द्यावेत.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.