Maharashtra

Kolhapur

CC/21/289

Amit Dilip Aamte - Complainant(s)

Versus

M/S Apurv Constraction Prop. Bhimrao B Dongale - Opp.Party(s)

S.V.Jadhav

16 Nov 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/21/289
( Date of Filing : 13 Jul 2021 )
 
1. Amit Dilip Aamte
At.Shahunagar, Parite, Ta.Radhanagari
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/S Apurv Constraction Prop. Bhimrao B Dongale
Rajarmpuri 13th Galli, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Nov 2021
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

      

      वि.प. हे विविध ठिकाणचे भूखंड विकसीत करणे व त्‍यावर बहुमजली निवासी व व्‍यापारी संकुलाचे बांधकाम करुन त्‍याची विक्री करणे या स्‍वरुपाचा व्‍यवसाय करतात.  वि.प. यांनी शहर कोल्‍हापूर महानगरपालिका हद्दीतील कसबा करवीर ए वॉर्ड मधील भूखंड क्र.1015/3 क्षेत्र हे 0-25 आर पो.ख.0-02 आर, आकार रु. 0.69 पैसे ही मिळकत विकसीत करुन व फायनल ले आऊट मंजूर करुन घेण्‍याची हमी तक्रारदार यांनी दिली होती.  तक्रारदार यांनी सदर विकसीत झालेल्‍या मिळकतीतील 2000 चौ.फूट क्षेत्राचा भूखंड वि.प. यांचेकडून खरेदी घेण्‍याचे मान्‍य केले.  सदर भूखंडाची रक्‍कम रु. 24,00,000/- इतकी ठरवून वि.प. यांनी तक्रारदार यांना खरेदीपूर्व करारपत्र दि. 03/05/16 रोजी तक्रारदाराचे लाभात लिहून दिले आहे.  तथापि वि.प. यांनी सदर भूखंड हा 1000 चौ.फूटापेक्षा 400 चौ.फूट जादा होत असलेने सदर जादा क्षेत्रासाठी रक्‍कम रु. 7,50,000/- या किंमतीस विक्री करण्‍याचे मान्‍य करुन तसे दि. 18/6/2020 रोजीचे एकूण रक्‍कम रु. 31,50,000/- चे पुरवणी करारपत्र तक्रारदार यांचे लाभात करुन दिले आहे.  त्‍यानुसार तक्रारदारांनी वेळोवेळी रकमा अदा केल्‍या असून सदरची संपूर्ण रक्‍कम रु. 31,50,000/- वि.प. यांना अदा केली आहे.  परंतु वि.प. यांनी आजतागायत सदर भूखंडाचे खरेदीपत्र करुन दिलेले नाही.  वि.प. यांनी वादातील भूखंड मिळकतीचे विहीत मुदतीत ताबा व खरेदीपत्र पूर्ण करुन देणेची कायदेशीर जबाबदारी पार पाडलेली नाही व अशा प्रकारे तक्रारदार यांना सेवा देणेत अक्षम्‍य कसूर केली आहे व व्‍यापारी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. म्‍हणून, तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून वादातील भूखंडाचा ताबा व नोंद खरेदीपत्र करुन मिळावे, जर काही तांत्रिक कारणामुळे वि.प. यांना हे शक्‍य नसल्‍यास वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रु.31,50,000/- अदा करावी व सदर रकमेवर द.सा.द.शे.12 टक्‍के दराने होणारे व्‍याज, नुकसानीपोटी रक्‍कम रु.2,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.2,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.30,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत तक्रारदार व वि.प. यांचेमध्‍ये झालेले पुरवणी करारपत्र, गट नं.1015/3 चा उतारा वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

4.    प्रस्‍तुत कामी वि.प. यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे. 

     

5.   वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

 

होय.

2

वि.प. कंपनीने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे  काय ?     

होय.

3

तक्रारदार हे वि.प. यांचेकडून भूखंडाचा ताबा व नोंद खरेदीपत्र करुन मिळणेस अथवा भूखंडाचे मोबदल्‍यापोटी स्‍वीकारलेली रक्‍कम परत मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

वि वे च न

 

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्‍तरे आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण वि.प. यांनी शहर कोल्‍हापूर महानगरपालिका हद्दीतील कसबा करवीर ए वॉर्ड मधील भूखंड क्र. 1015/3 क्षेत्र हे 0-25 आर पो.ख.0-02 आर, आकार रु. 0.69 पैसे ही मिळकत विकसीत करुन व फायनल ले आऊट मंजूर करुन घेण्‍याची हमी तक्रारदार यांनी दिली होती.  त्‍यानुसार तक्रारदार यांनी सदर विकसीत झालेल्‍या मिळकतीतील 2000 चौ.फूट क्षेत्राचा भूखंड वि.प. यांचेकडून खरेदी घेण्‍याचे मान्‍य केले.  सदर भूखंडाची रक्‍कम रु. 24,00,000/- इतकी ठरवून वि.प. यांनी तक्रारदार यांना खरेदीपूर्व करारपत्र दि. 03/05/16 रोजी तक्रारदाराचे लाभात लिहून दिले आहे.  तथापि वि.प. यांनी सदर भूखंड हा 2000 चौ.फूटापेक्षा 400 चौ.फूट जादा होत असलेने सदर जादा क्षेत्रासाठी रक्‍कम रु. 7,50,000/- या किंमतीस विक्री करण्‍याचे मान्‍य करुन तसे दि. 18/6/2020 रोजीचे एकूण रक्‍कम रु. 31,50,000/- चे पुरवणी करारपत्र तक्रारदार यांचे लाभात करुन दिले आहे.  त्‍यानुसार तक्रारदारांनी वेळोवेळी रकमा अदा केल्‍या असून सदरची संपूर्ण रक्‍कम रु. 31,50,000/- वि.प. यांना अदा केली आहे.  तक्रारदार यांनी सदरचे पुरवणी करारपत्र याकामी दाखल केले आहे.  सदर करारपत्रामध्‍ये वि.प. यांनी तक्रारदाराकडून वेळोवेळी रकमा मिळाल्‍या असल्‍याचे नमूद करुन एकूण रक्‍कम रु.31,50,000/- मिळाल्‍याचे कबूल केले आहे.  वि.प. यांनी याकामी हजर होवून प्रस्‍तुत बाब नाकारलेली नाही.  सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट सिध्‍द झाली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

7.    तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, तक्रारदारांनी वादातील भूखंडाचे मोबदल्‍यापोटी वेळोवेळी रकमा अदा केल्‍या असून ठरलेली संपूर्ण रक्‍कम रु. 31,50,000/- वि.प. यांना अदा केली आहे.  परंतु वि.प. यांनी आजतागायत सदर भूखंडाचे खरेदीपत्र करुन दिलेले नाही.  वि.प. यांनी वादातील भूखंड मिळकतीचे विहीत मुदतीत ताबा व खरेदीपत्र पूर्ण करुन देणेची कायदेशीर जबाबदारी पार पाडलेली नाही व अशा प्रकारे तक्रारदार यांना सेवा देणेत अक्षम्‍य कसूर केली आहे व व्‍यापारी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत.  वि.प. यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्‍दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत.  म्‍हणून, वि.प. यांचेविरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.  म्‍हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.  तक्रारदारांनी त्‍यांचे कथनाचे पुष्‍ठयर्थ पुराव्‍याचे शपथपत्र व पुरवणी करारपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्‍वासार्हता ठेवणे न्‍यायोचित वाटते.  सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून रक्‍कम रु.31,50,000/- इतकी रक्‍कम स्‍वीकारुनही तक्रारदार यांना ठरले करारप्रमाणे भूखंडाचा ताबा व नोंद खरेदीपत्र करुन दिलेले नाही.  अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

8.    सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून शहर कोल्‍हापूर महानगरपालिका हद्दीतील कसबा करवीर ए वॉर्ड मधील भूखंड क्र. 1015/3 क्षेत्र हे 0-25 आर पो.ख.0-02 आर, आकार रु. 0.69 पैसे या मिळकतीतील 2400 चौ.फूट क्षेत्राच्‍या भूखंडाची कायदेशीर बाबींची पूर्तता करुन ताबा व नोंद खरेदीपत्र करुन मिळणेस पात्र आहेत.  वैकल्पिकरित्‍या तक्रारदार हे वि.प. यांचेकडून भूखंडापोटी घेतलेली रक्‍कम रु.31,50,000/- परत मिळणेस पात्र आहेत.  तक्रारदाराने दाखल केलेल्‍या पुरवणी खरेदीपूर्व करारपत्राचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये तक्रारदाराने वि.प. यांना दिलेल्‍या रकमांचा तपशील नमूद आहे.  सदर तपशीलाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचेकडून रक्‍कम रु. 31,50,000/- या रकमेवर दि. 10/05/2016 पासून संपूर्ण रक्‍कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के दराने व्‍याज वसूल होवून मिळणेस पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- अशी रक्‍कम वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग मंच येत आहे.

      सबब, प्रस्‍तुत कामी आम्‍ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. 

 

 

आदेश

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2)    वि.प. यांनी तक्रारदार यांना शहर कोल्‍हापूर महानगरपालिका हद्दीतील कसबा करवीर ए वॉर्ड मधील भूखंड क्र. 1015/3 क्षेत्र हे 0-25 आर पो.ख.0-02 आर, आकार रु. 0.69 पैसे या मिळकतीतील 2400 चौ.फूट क्षेत्राच्‍या भूखंडाची कायदेशीर बाबींची पूर्तता करुन ताबा व नोंद खरेदीपत्र करुन द्यावे.

 

3)    जर वि.प. हे काही तांत्रिक कारणामुळे वर नमूद भूखंडाचा ताबा व खरेदीपत्र करुन देण्‍यास असमर्थ असतील तर वैकल्पिकरित्‍या वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रु. 31,50,000/- अदा करावी व सदर रकमेवर दि.10/5/2016 पासून संपूर्ण रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

 

4)    मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/-  वि.प. यांनी तक्रारदारास अदा करावेत.

 

5)    वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

6)    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 व 72 अन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

7)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.