नि का ल प त्र:- (मा. सदस्या, सौ. रुपाली डी. घाटगे) (दि .28-01-2014)
(1) प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे वि. प. श्री. सुरेश ज्ञानोबा पोवार यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला असता वि.प.यांना नोटीस बजावणी होऊनदेखील ते सदर कामी हजर झाले नसलेने त्यांचेविरुध्द दि. 23-01-2014 रोजी एकतर्फा आदेश पारीत करणेत आला. तक्रारदारांचे वकिलांचा युक्तीवाद ऐकून प्रस्तुतचे प्रकरण गुणदोषावर निकाली करणेत येते. वि.प. गैरहजर.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
मिळकतीचे वर्णन:-
तुकडी व जिल्हा कोल्हापूर पाट तुकडी तहसिल करवीर शहर कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सी वॉर्ड, रविवार पेठ, ढोर गल्ली तील सि.स. नं. 1001 क्षेत्र 132 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या “सर्वपक्षी अपार्टमेंट” पैकी दुस-या मजल्यावरील फलॅट नं. 2 ही अंदाजे 531 स्के. फू. (49.35 चौ.मी.) सुपर बिल्टअप क्षेत्राची ही मिळकत त्याची चतु:सिमा- पूर्वेस- श्री. इस्माईल इंगळीकर यांचे सि.स. नं. 1000 ची मिळकत, दक्षिणेस- भूई गल्ली(पूर्व भाग) या नावाने परिचित सरकारी रस्ता, उत्तरेस- जय शिवराज गल्ली या नावाने परिचित सरकारी रस्ता, उर्ध्वदिशेस – थर्ड फलोअरची फलॅट युनिट क्र. 3 ची मिळकत, उधोदिशेस – फर्स्ट फलोअरची युनिट क्र. 1 ची मिळकत वि.प. यांनी तक्रारदार यांना दि. 20-12-2006 रोजी रजि. खरेदीपत्र- अॅग्रीमेंट टू सेल नं 06503/2006 ने दिलेली असून त्याच दिवशी तक्रारदारांन मिळकतीचा कब्जा दिलेला आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना एकूण मोबदला रक्कम रु. 4,50,000/- ला निश्चित करुन रक्कम रु. 4,00,000/- प्रथमत: (सुरुवातीस) वि.प. ना अदा केली आहे व ती मिळालेची दुबार कबुली दि. 13-11-2007 रोजी स्वतंत्र कराराने वि. प. ने दिलेले आहे. सदर मिळकतीचे तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये ठरलेप्रमाणे वि.प. यांनी दोन महिन्यात मिळकतीचे खरेदीपत्र तक्रारदारांचे नांवे पुर्ण करणेचे कबूल व मान्य केले असतानाही दोन महिन्याचा कालावधी होऊनही मिळकतीचे खरेदीपत्र पूर्ण करुन दिलेले नाही. दि. 22-03-2007 रोजी वि.प. यांन प्रत्यक्ष भेटून खरेदीपत्र पुर्ण करुन देण्याबाबत तक्रारदारांनी विनंती केली असता अद्यापी बांधकाम अपुरे आहे व बांधकाम पूर्ण झालेनंतर फीनिशिंग झालेशिवाय कंप्लीशन सर्टीफीकेट मिळत नाही व त्याशिवाय खरेदीपत्र होत नसलेमुळे अजून काही महिन्याचा कालावधी लागणार असलेचे सांगणेत आले. व माहे 2007 पर्यंत अपार्टमेंटचे बांधकाम अपूर्ण आहे.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत नमूद करतात की, दि. 13-11-2007 रोजी वि.प. यांनी तक्रारदार यांना अपार्टमेंट मधील अपूर्ण कामे पूर्ण करावयची असलेमुळे तक्रादाराकडून येणे असलेली रक्कम रु. 50,000/- द्यावेत व दि. 12-02-2008 पर्यंत सर्व अपूर्ण कामे व कंम्प्लीशन सटीफीकेट घेऊन खरेदीपत्र पूर्ण करुन देत असलेची हमी व खात्री वि.प. यांनी दिली. व तक्रारदारांकडून रक्कम रु. 50,000/- ची उचल केली व दिलेल्या मुदतीत काम न झालेस रक्कम रु. 50,000/- पैकी रक्कम रु. 35,000/- चा चेक देतो व तो वटवून घ्यावा असे वि.प. यांनी सांगितले. वि.प. यांनी तक्रारदारांना खात्री पटावी म्हणून रक्कम रु. 35,000/- चा बँक ऑफ इंडिया शाखा – लक्ष्मीपुरी काल्हापूर या बँकेचा दि. 20-04-2008 चेक नं. 024618 दिला. व वि.प. यांनी कामे करुन खरेदीपत्र पुर्ण करुन देणेची हमी व खात्री दिली. तक्रारदारांनी वि.प. यांचेवर विश्वास ठेवून संपूर्ण रक्कम वि.प. यांनी स्विकारुनही अपार्टमेंटची अपूर्ण कामे पूर्ण केली नाहीत व कंम्प्लीशन सर्टीफीकेट घेऊन खरेदीप्रत्र पूर्ण करुन दिले नाही. म्हणून तक्रारदारांनी दि. 1-07-2012 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून वि.प. यांना खरेदीपत्र पूर्ण करुन देणेसाठी कळविले. वि.प. त्यांचे पत्यावर राहत नसलेमुळे नोटीस परत आलेमुळे तक्रारदारानी दि. 9-08-2012 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून व प्रत्यक्ष भेटून खरेदीपत्र पुर्ण करुन देणेबाबत विनंती केली. वि.प. यांनी तक्रारदारांना खरेदीपत्र पुर्ण करुन न दिलेमुळे मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वि.प. यांचे निष्काळजीपणामुळे अपूर्ण कामे केली नसलेमुळे कंम्प्लीशन सर्टीफीकेट इत्यादी कागदपत्रांची पुर्तता झालेली नसलेने खरेदीपत्र पुर्ण दिलेले नाही. सबब, तक्रारदारांना प्रस्तुत मिळकतीचे खरेदीपत्र पूर्ण द्यावे व खरेदीपत्र पुर्ण करुन देईपर्यंत प्रत्येक दिवशी 100/- प्रमाणे दंड वि.प. यांचेकडून मिळावा व मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदारांनी या मंचास केली आहे.
(3) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 11 कागदपत्रे दाखल केलेली असून अ.क्र. 1 कडे तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यान दि. 13-11-2007 रोजीचे करारपत्र, अ.क्र. 2 ला दि. 20-12-2006 रोजीचे तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यानचे नोंद करारपत्र, अ.क्र. 3 ला दि. 17-04-2013 रोजी तक्रारदारानी वि.प. यांना पाठविलेली नोटीस अ.क्र. 4 ला पोस्टाची पोहोच पावती, अ.क्र. 5 व 6 ला सदरची नोटीस मिळालेची पोहोच पावती, अ.क्र. 7 ला वि.प. यांना दि. 7-08-2012 रोजी पत्ता बदलून पाठविलेली नोटीस, अ.क. 8 ला सदर नोटीसीची पोहच पावती, अ.क्र. 9 ला स्पीड पोस्टने पाठविलेली पोहोच पावती, अ.क्र. 10 ला दि. 1-07-2012 रोजी पाठविलेली नोटीसीची प्रत, अ. क्र. 11 ला सदरची नोटीस स्पीड पोस्टने पाठविलेली पोहोच पावती तसेच तकारदार यांनी दि. 21-12-2013 रोजी स्वतंत्र यादीने 4 कागदपत्र दाखल केलेले असून, अ.क्र. 1 ला दि. 18-10-2013 रोजी पोस्टाची पोहच पावती, अ.क. 2 ला दि. 21-11-2013 रोजी पोस्टाचा दाखला, अ.क्र. 3 ला दि. 18-10-2013 रोजी कंदलगांव पत्यावर पाठविलेली रजि. पोस्टाची पावती, अ. क्र. 4 ला सदर नोटीसीची पोहच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
(4) प्रस्तुत प्रकरणी वि.प. यांना नोटीसीचा आदेश करणेत आला तथापि वि.प. यांना वारंवार नोटीसीची बजावणी होऊन देखील सदर कामी हजर झाले नसलेने त्यांचेविरुध्द दि. 23-01-2014 रोजी या मंचाने एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांची तक्रार, व तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे वकिलांचे लेखी व तोंडी युक्तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1 वि.पक्ष यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय.
2. तक्रारदार हे नुकसानभरपाई व मानसिक त्रासापोटी
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? -----होय.
3. आदेश काय ? ----- अंतिम निर्णयाप्रमाणे.
कारणमीमांसा:-
मुद्दा क्र.1:
तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता, प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यान दि. 20-12-2006 रोजी नोंद करारपत्र रजि. दस्त नं. 06503/2009 ने झालेले असून सदरच्या नोंद करारपत्राप्रमाणे मिळकतीचे वर्णनामध्ये सि.स. नं. 1001, मिळकतीवर बांधण्यात येत असलेल्या “सर्वपक्षी अपार्टमेंट” पैकी सेकंड फलोअरवरील फलॅट नं. 2 अंदाजे क्षेत्र 531 स्के.फू. म्हणजेच 49.35 चौ.मी. मिळकत फलॅट असे नमूद आहे. सदर मिळतीची किंमत रक्कम रु. 4,50,000/- अशी ठरली आह असे नमूद आहे. तसेच तक्रारदार यांनी अ.क्र. 1 कडील दि. 13-11-2007 रोजीचे करारपत्राचे अवलोकन केले असता सदरचे करारपत्र वि.प. श्री. सुरेश ज्ञानोबा पोवार लिहून देणार यांनी तक्रारदारास करुन दिलेचे आहे. सदरचे करारपत्रामध्ये वर मिळकतीचे वर्णन नमूद असून त्यामध्ये वरील वर्णनाची मिळकत मी तुम्हांस रजि. करारपत्राने दिली असून सदरची मिळकत आज रोजी तुमचे कब्जेत आहे असे नमूद आहे. सदर मिळकतीबाबत तुम्ही मजला रु. 50,000/- फक्त देणेचे आहे. सदर व्यवहारापोटी मजला आजरोजी आपलेकडून युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा- कोल्हापूर यांचेकडील चेक क्र. 001976 ने रक्कम रु. 50,000/- चे मिळाला आहे. वरील सर्व बाबीवरुन तक्रारदाराने वि.प. यांना वर नमूद फलॅटची किंमत रक्कम रु. 4,50,000/- दिलेचे व वि.प. यांना सदरची रक्कम मिळालेचे स्पष्टपणे दिसून येते. तसेच तक्रारदारांनी वि.प. यांना ता. 20-04-2013, 7-08-2012 व 1-07-2012 रोजी मिळकतीचे खरेदीपत्र पुर्ण करुन देणेबाबत वारंवार नोटीसा पाठवून दिल्या आहेत. सदरच्या नोटीसा वि.प. यांना बजावणी होऊनदेखील तक्रारदारांना सदर मिळकतीचे खरेदीपत्र अद्याप पुर्ण करुन न दिलेने वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:
वर कलम 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि. प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला व सदरची तक्रार दाखल करणेसाठी खर्च करावा लागला. त्याकारणाने तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र. 2 उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 : उपरोक्त मुद्दा क्र. 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवल्याने तसेच तक्रार अर्जात नमूद मिळकतीचे खरेदीपत्र अद्याप पुर्ण करुन न दिल्याने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून खरेदीपत्र पुर्ण करुन घेण्यास पात्र आहेत. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांना सि.स. नं. 1001 “ सर्वपक्षी अपार्टमेंट ” मधील दुस-या मजल्यावरील फलॅट नं. 2 चे नोंद खरेदीपत्र पुर्ण करुन द्यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि. पक्ष यांनी तक्रारदार यांना सि.स. नं. 1001“ सर्वपक्षी अपार्टमेंट ” मधील दुस-या मजल्यावरील फलॅट नं. 2 चे नोंद खरेदीपत्र पुर्ण करुन द्यावे.
3. वि.पक्ष ने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.