मा. सदस्यांची पदे रिक्त मंच अपुरा.
तक्रारदार गैरहजर.
प्रकरण दाखल सुनावणीकामी नेमण्यात आले होते व तक्रारदार यांना अंतिम संधी दिल्यानंतर जिल्हा ग्राहक कल्याण निधीमध्ये रू.300/-,भरण्याच्या अटीवर दाखल सुनावणीकामी संधी देण्यात आली होती. परंतू ते गैरहजर.
मंच अपुरा. सबब, योग्य आदेश पारीत करण्याकरीता मागे ठेवण्यात येते. त्यानंतर मंच पूर्ण.
प्रकरण दुपारच्या सत्रात पुकारण्यात आले.
तक्रारदार गैरहजर.
तक्रारदारानी मंचाच्या आदेशाचे पालन केल्याचे दिसून येत नाही. तसेच तक्रारदार गैरहजर.
तक्रारदार हे मागील तारखेला सुध्दा गैरहजर होते. यावरून तक्रारदार यांना तक्रार चालविण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते ते त्याबाबत सजग व जागृकही नाहीत. मंचाचा कार्यभार बघता, त्यांना पुन्हा संधी देणे योग्य होणार नाही. सबब, खालील आदेश.
आदेश
1. आदेश तक्रार क्र 122/2017 फॉर वॉन्ट ऑफ प्रॉसुकेशन डिसमीस करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
4. अतिरीकत संच तक्रारदारना परत करण्यात येते.
5. प्रकरण वादसूचीमधून काढून टाकण्यात येते.
npk/-