Maharashtra

Kolhapur

CC/81/2015

Sagar Baburao Patil - Complainant(s)

Versus

Mobile Mantra Through Sandip Kesarkar - Opp.Party(s)

Sandip Jadhav

17 Feb 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/81/2015
 
1. Sagar Baburao Patil
Belawale, Tal Kagal
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Mobile Mantra Through Sandip Kesarkar
23/24, Egal Pride, Mirajkar Tikati
Kolhapur
2. Prathamesh Electronics
Laxmipuri,
Kolhapur
3. Shri Services
Shop No. 8, Station Road, Ayodhya Towers, Dabholkar Corner
Kolhapur
4. Samsung India Electronics Pvt. Ltd.
B 1 Sector Phase 2, Noida, Gautam Buddhanagar,
Uttarpradesh
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Sharad D. Madake PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:Sandip Jadhav, Advocate
For the Opp. Party:
ORDER

नि का ल प त्र:-   (व्‍दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्‍यक्ष) (दि. 17-02-2016)                                                                                                        

1)    वि.प. नं. 1 ते 4 यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्‍वये प्रस्‍तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.  

2)   तक्रारदार हे कायदा सल्‍लागार आहेत.  वि.प. नं. 1 हे वेगवेगळया ब्रँडचे उत्‍पादनाचे मोबाईल हॅन्‍डसेट विक्रेते आहेत. वि.प. नं. 2 व 3 हे वि.प. नं. 4 यांनी उत्‍पादित केलेले मोबाईल हॅन्‍डसेटचे विक्री पश्‍चात सेवा देणारे कोल्‍हापूर येथील सर्व्हिस सेंटर आहे.

3)   तक्रारदार यांनी वि.प. नं. 1 यांचेकडून सॅमसंग कंपनीचा 19060 आय गॅलक्‍सी ग्रॅन्‍ड निओ  प्‍लस या मॉडेलचा व 358312060994719 IMEI नंबरचा हॅन्‍डसेट दि. 20-02-2015 रोजी रक्‍कम रु.10,800/- या किंमतीस खरेदी केला असून त्‍याची वि.प. नं. 1 यांनी खरेदीची पावती दिलेली आहे. वि.प. नं. 1 यांनी मोबाईल हॅन्‍डसेटची विक्री पश्‍चात सेवेची खात्री दिली होती. सदर  मोबाईल हॅन्‍डसेटला खरेदीवेळी 12 महिन्‍याची वॉरंटी दिलेली होती. 

4)   तक्रारदार हॅन्‍डसेट वापरीत असताना वॉरंटी कालावधीत हॅन्‍डसेटचा डिस्‍प्‍ले आपोआप बंद पडत असे, टच स्‍क्रीन पॅड काम करीत नव्‍हते. डिस्‍प्‍ले पुर्णत: ब्‍लॅक व हँग होणे इत्‍यादी तक्रारी निर्माण झालेने तक्रारदारांनी दि. 2-03-2015 रोजी हॅन्‍डसेट वि.प. नं. 1 यांना दाखविला.  वि.प. नं. 1 यांनी वि.प. नं. 2 सर्व्हिस सेंटर यांचे संपर्क साधणेस सांगितले. वि.प. नं. 2 यांना हॅन्‍डसेट मधील तक्रारी सांगून हॅन्‍डसेट दुरुस्‍तीकरिता देऊन त्‍याची रितसर नोंदीची पावती घेतली.  वि.प. नं. 2 यांनी 7-8 दिवसांत  हॅन्‍डसेट दुरुस्‍त झालेवर कळविणेत येईल असे सांगितले.  वि.प. नं. 2 यांनी हॅन्‍डसेट 15 दिवसानंतर दुरुस्‍त झालेचे भासवून हॅन्‍डसेटमधील सर्व दोषांचे निवारण न करता सदोष हॅन्‍डसेट दि. 18-03-2015 रोजी घेण्‍यास तक्रारदार यांना भाग पाडले.

5)   तक्रारदार यांनी त्‍यानंतर दोषयुक्‍त हॅन्‍डसेट वि.प. नं. 3 यांचेकडे दि. 20-03-2015 रोजी दिला असून सदरचा हॅन्‍डसेट वि.प. नं. 3 यांचे ताब्‍यात आहे.  तक्रारदारांना हॅन्‍डसेटमध्‍ये उत्‍पादित दोष  असलेची खात्री झाली आहे. वि.प. नं. 2 व 3 हे तक्रारदारांना हॅन्‍डसेटबाबत कोणतीही खरी माहिती न  देता तक्रारदार यांची दिशाभूल करीत आहेत.   

6)  वि.प. नं. 3 यांनी हॅन्‍डसेटचा डिस्‍प्‍ले खराब झालेचे सांगून तो वॉरंटी कालावधीत असलेने बदलणेकरिता वि.प. नं. 4 यांचेकडे पाठविलेचे सांगितले.  सदरचा हॅन्‍डसेट दुरुस्‍ती करिता ठेवून घेतला असून अद्याप तक्रारदार यांना परत केलेला नाही.

7)    तक्रारदार यांचेकडून वि.प. यांनी हॅन्‍डसेटची खरेदी किंमतीचा मोबदला स्विकारलेला आहे.  हॅन्‍डसेटच्‍या विक्री पश्‍चात व वॉरंटी कालावधीत सेवा देणेची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी वि.प. नं.1 ते 4 यांची असताना तक्रारदार यांना मानसिक व आर्थिक नुकसान पोहचवून सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला.   वि.प. नं. 3 यांनी दि. 20-03-2015 रोजीच्‍या जॉब कार्ड नुसार दुरुस्‍तीकरिता घेतलेला हॅन्‍डसेट तक्रारदार यांना दुरुस्‍त करुन दिलेला नाही. तक्रारदार वेळोवेळी   यांनी तोंडी व लेखी मागणी करुनही  वि.प. नं. 1 ते 4 यांनी कोणतीही दाद दिली नाही. 

8)   तक्रारदार यांनी तक्रार अर्जात वि.प. यांनी सॅमसंग कंपनीचा 19060 आय गॅलक्‍सी ग्रॅन्‍ड निओ प्‍लस या मॉडेलचा नवीन हॅन्‍डसेट द्यावा अथवा  किंवा हॅन्‍डसेटची किंमत रु. 10,800/- परत द्यावी. व हॅन्‍डसेट वापरात न आलेने नुकसानीची रक्‍कम रु. 10,000/- व मानसिक त्रासापोटीची रक्‍कम रु. 10,000/- व तक्रार अर्ज खर्च रु. 5,000/- असे एकूण रक्‍कम रु. 35,800/- ची मागणी केलेली आहे.                 

9)   तक्रारदारांनी तक्रारीसोबत मोबाईल खरेदीची पावती/बील,  वि.प. नं. 2 व 3 यांचेकडील जॉब कार्डच्‍या प्रती इत्‍यादी कागदपत्रे व तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे.        

10)    वि.प. नं. 1 व 2  यांना मंचाचे नोटीसा बजावणी होऊनही वि.प. हजर नसलेने त्‍यांचेविरुध्‍द दि. 30-06-2015 रोजी ‘एकतर्फा’ आदेश पारीत केले. तक्रारदार तर्फे वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला. 

11)   वि.प. नं. 3 यांनी हजर होऊन म्‍हणणे दाखल केले.  तक्रारदार यांनी दि. 20-03-2015 रोजी हॅन्‍डसेट दुरुस्‍तीकरिता दिलेचे मान्‍य केले.  हॅन्‍डसेटमध्‍ये malfunctioning Touch Pad   चा दोष होता.  सॉफटवेअर अपडेट करुन दोन दिवस निरिक्षणाखाली ठेवून दोष आढळलेस स्‍पेअर पार्टची गरज भासलेस तो मागवून दुरुस्‍त करणेत येईल, त्‍यासाठी 4-5 दिवस लागतील याची तक्रारदारांना पुर्वकल्‍पना देऊन हॅन्‍डसेट दुरुस्‍तीसाठी जमा केला. 

12)   हॅन्‍डसेटमध्‍ये टचपॅडमध्‍ये दोष निष्‍पन्‍न झाले नंतर दि. 23-03-2015 रोजी स्‍पेअरपार्ट मागविण्‍यात आला.  संबंधित पार्ट मोबाईलमध्‍ये बसवून दुरुस्‍त झालेची खात्री करुन दि. 27-08-2015 रोजी तक्रारदारांना कळविण्‍यात आले.  तक्रारदारांनी हॅन्‍डसेट स्विकारण्‍यास मनाई केली.  तक्रारदारांना वारंवार फोन करुनही त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही.  हॅन्‍डसेट 7 दिवसांत दुरुस्‍त केलेला हॅन्‍डसेट स्विकारण्‍यास विलंब केला असून तक्रारदारांना घेऊन जाणेबाबत तक्रारदारांना पत्रव्‍यवहार केला असून त्‍यांनी पत्र स्विकारण्‍यास नकार दिला.   तक्रारदार आजअखेर हॅन्‍डसेट घेऊन गेलेले नाहीत.  वि.प. नी तक्रारदारांचा हॅन्‍डसेट दुरुस्‍त झाला असून तो तक्रारदारांनी घेऊन जावे असे म्‍हणणेत नमूद केले.

13)  वि.प. नं. 4 यांनी म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अर्जातील मजकूर परिच्‍छेदनिहाय नाकारला आहे.  तक्रारदार यांनी मोबाईलमधील दोष तज्ञ व्‍यक्‍तींचा रिपोर्टप्रमाणे सिध्‍द केला नाही व  मोबाईलचा वापर योग्‍य केला नाही.  तक्रारदार हे प्रथमत: 2 मार्च 2015 रोजी मोबाईल तपासणीसाठी घेऊन आले.  त्‍यावेळी कागदपत्रे न आणल्‍याने त्‍यांना परत येण्‍यास सांगितले.  दि. 12-03-2015 रोजी टच स्‍क्रीन बदलून दिला तसेच परत दि. 24-03-2015 रोजी तक्रारदाराच्‍या तक्रारीनुसार परत एकदा बदलून दिला.  तक्रार खोटी असून ग्राहक सरंक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 26 नुसार रद्द करण्‍यात यावी.  वि.प. यांनी आपले म्‍हणणेसंदर्भात मा.वरिष्‍ट न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे नमूद करुन, तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी विनंती केली.                

14)   तक्रारदाराची तक्रार, सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, खालील मुद्दे विचारात घेता येतात.

                 मुद्दे                                                                  उत्‍तरे                 

  1.   वि.प. यांनी तक्रारदार यांना दोषयुक्‍त 

      मोबाईल हॅन्‍डसेट‍ दिला काय ?                                    होय

  2.   वि.प. यांनी तक्रारदार यांना देण्‍यात

      येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ?                            होय

  3.   काय आदेश ?                                                          अंतिम आदेशाप्रमाणे.

 

का र ण मि मां सा

 

15)   तक्रारदार यांचे वकिलांनी युक्‍तीवाद केला.  तक्रारदार यांनी दि. 20-02-2015 रोजीचीसॅमसंग कंपनीचा 19060 आय गॅलक्‍सी ग्रॅन्‍ड निओ  प्‍लस या मॉडेलच्‍या मोबाईल खरेदी पावती, वि.प. नं. 1 मे. मोबाईल मंत्रा यांचेकडील जॉब कार्ड इत्‍यादी दाखल केलेले आहे.      

16)   तक्रारदार यांनी आपल्‍या अर्जामध्‍ये म्‍हटले आहे की, दि. 20-02-2015  रोजी घेतलेला मोबाईल हॅन्‍डसेटचा डिस्‍प्‍ले आपोआप बंद पडणे, टच स्‍क्रीन पॅड व्‍यवस्थित काम करीत नव्‍हते,   त्‍यामुळे तक्रारदारांनी हॅन्‍डसेट दुरुस्‍तीसाठी वि.प.  नं. 2 कडे दुरुस्‍तीसाठी दिला. व  वि.प. नं. 2 यांनी हॅन्‍डसेट दि. 2-03-2015 रोजी दुरुस्‍तीकरिता ठेऊन घेतला. व वि.प. नं. 2 नी हॅन्‍डसेटमधील दोषांचे निवारण न करता हॅन्‍डसेट दि. 18-03-2015 रोजी तक्रारदारास घेण्‍यास भाग पाडले असे तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केले.  त्‍यानंतर सदरचा हॅन्‍डसेट वि. प. नं. 3 यांचे ताब्‍यात असून वि.प.नं. 3 यांनी हॅन्‍डसेटचा डिस्‍प्‍ले खराब झालेचे सांगून वॉरंटी कालावधीत असलेने वि.प. नं. 4 कडे पाठविलेचे सांगितले.  प्रस्‍तुतचा हॅन्‍डसेट वि.प. नी दुरुस्‍त करुन तक्रारदारास परत केलेला नाही.  त्‍यामुळे तक्रारदारांना मोबाईल हॅन्‍डसेटचा वापर करता आलेला नाही.  

17)    माल विक्री कायदा, 1930 प्रमाणे ज्‍या उद्देशासाठी वस्‍तु विकत घेतली जाते.  त्‍यासाठी सदर वस्‍तु योग्‍य असली पाहिजे.  तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रार अर्जात, सदर  मोबाईल हॅन्‍डसेटचा डिस्‍प्‍ले आपोआप बंद पडणे, टच स्‍क्रीन पॅड व्‍यवस्थित करीत नव्‍हते. वि.प. नं. 2 यांचेकडे हॅन्‍डसेट दुरुस्‍तीसाठी देऊनसुध्‍दा दुरुस्‍त करुन दिलेला नाही.  वि.प. नं. 1 यांनीसुध्‍दा तक्रारदारांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.   वि.प.नं. 2 यांनी तक्रारदारांना मोबाईल हॅन्‍डसेट दुरुस्‍त झाल्‍याचे त्‍यातील सर्व दोषाचे निवारण न करता सदोष हॅन्‍डसेट घेतला. त्‍यानंतर तक्रारदारांनी दि. 20-03-2015 रोजी  वि.प. नं. 3 यांचेकडे दिला.  वि.प. नं. 3 यांनी हॅन्‍डसेटमध्‍ये उत्‍पादित दोष असलेमुळे हॅन्‍डसेट वॉरंटी कालावधीत असलेने बदलणेकरिता वि.प. नं. 4 कडे पाठविलेचे सांगितले.  यावरुन तक्रारदारांना वि.प. नं. 1 ते 4 यांनी हॅन्‍डसेट दुरुस्‍त करुन परत दिलेला नाही हे दिसून येते.   तक्रारदाराचा हॅन्‍डसेट हा वॉरंटी कालावधीमध्‍ये नादुरुस्‍त होऊन तक्रारदारास त्‍याचा उपयोग करता आला नाही.  तक्रारदार यांनी हॅन्‍डसेट घेतल्‍यापासून सतत 8 दिवसही त्‍याचा उपयोग झाला नसुन, सतत नादुरुस्‍त झाल्‍याचे दिसून येते.           

18)     तक्रार अर्जामध्‍ये असे नमूद केले आहे की, सदर मोबाईल दुरुस्‍तीसाठी देऊनही वि.प. नं. 1 ते 4  यांनी तक्रारदारास योग्‍य प्रतिसाद दिलेला नाही. माल विक्री कायद्याचे कलम, 16 प्रमाणे खरेदीदाराने खरेदी केलेली वस्‍तु त्‍याच्‍या उपयोगी आलीच पाहिजे असे ध्‍वनित आश्‍वासन व्‍यापारी क्षेत्रातील रुढीप्रमाणे विक्री करारात असते.

19)    कोणत्‍याही उत्‍पादनाची विक्रीपश्‍चात उत्‍पादीत कंपनीने कोणत्‍याही उत्‍पादनाची विक्रीपश्‍चात असणारी सेवा देण्‍याची जबाबदारी उत्‍पादित कंपनी व त्‍याचे विक्रेत्‍याची असते. तसेच सदरची जबाबदारी ही केवळ उत्‍पादन विक्री करण्‍यापुरती मर्यादत नसून विक्रीपश्‍चात सेवा देणेची असते. वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे  मोबाईल हॅन्‍डसेटचा डिस्‍प्‍ले आपोआप बंद पडणे, टच स्‍क्रीन पॅड व्‍यवस्थित करीत नव्‍हते.  हॅन्‍डसेट वर नमूद दोष निर्माण झाला असतानाही सदरच्‍या सदोष मोबाईलबाबत  वि.प. यांनी तक्रारदारांना कोणताही प्रतिसाद न देऊन अथवा हॅन्‍डसेट  दुरुस्‍ती करुन न देऊन, अथवा नविन मोबाईल न देऊन वि.प. नं. 1 ते 4 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे.  तक्रारदार यांचा मोबाईल वि.प. कडे दुरुस्‍त करण्‍यास दिला असता, तो मुदतीत दुरुस्‍त करुन देणे बंधनकारक होते कारण वॉरंटीच्‍या मुदतीत असतानाही वि.प. यांनी तक्रारदारास योग्‍य विक्रीपश्‍चात सेवा न  देणे ही वि.प. सेवेतील त्रुटी आहे                   

20)    मंचाचे मते वि. प. नं. 1 ते 4 यांनी तक्रारदारास ग्राहक सरंक्षण कायदा कलम 14 (1) (क)  प्रमाणे ‘‘सॅमसंग कंपनीचा 19060 आय गॅलक्‍सी ग्रॅन्‍ड निओ  प्‍लस या मॉडेलचा नवीन हॅन्‍डसेट द्यावा. अथवा ते शक्‍य नसल्‍यास हॅन्‍डसेटची किंमत रक्‍कम रु.10,800/- (अक्षरी रुपये दहा हजार आठशे फक्‍त) द.सा.द.शे. 9 % तक्रार दाखल दि. 26-03-2015 रोजीपासून व्‍याजासह देणेस जबाबदार आहेत.  तक्रारदारास वि.प. नं. 1 ते 4  यांनी सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदारास तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेने वि.प. नं. 1 ते 4 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.                                                  

21)    न्‍यायाचे दृष्‍टीने मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.  सबब, आदेश.

                                                                   आ दे श

1)   तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.

2)  वि.प. नं. 1 ते 4  यांनी तक्रारदारांना ‘‘सॅमसंग कंपनीचा 19060 आय गॅलक्‍सी ग्रॅन्‍ड निओ  प्‍लस या मॉडेलचा नवीन हॅन्‍डसेट द्यावा. अथवा ते शक्‍य नसल्‍यास हॅन्‍डसेटची किंमत रक्‍कम रु.10,800/- (अक्षरी रुपये दहा हजार आठशे फक्‍त) द.सा.द.शे. 9 % तक्रार दाखल दि. 26-03-2015 रोजीपासून व्‍याजासह द्यावेत.

3)   वि.प. नं. 1 ते 4 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त) द्यावेत.

4)   वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.

5)   सदर आदेशाच्‍या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.                                                                                                                                                             

 

 

 
 
[HON'BLE MR. Sharad D. Madake]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.