Maharashtra

Solapur

CC/10/454

V.B.Sonavne R/o Sharanagar,H.No33,Majale wada Rd,Solapur - Complainant(s)

Versus

Michelin India Tyers Ltd.Jaslok Dist.Center New Dilhi.2)Fida ali Wheel Subja Colony Toil; Chowki Hy - Opp.Party(s)

Sontake

27 Jun 2013

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum, Solapur.
 
Complaint Case No. CC/10/454
 
1. V.B.Sonavne R/o Sharanagar,H.No33,Majale wada Rd,Solapur
R/o Sharanagar,H.No33,Majale wada Rd,Solapur
Solapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Michelin India Tyers Ltd.Jaslok Dist.Center New Dilhi.2)Fida ali Wheel Subja Colony Toil; Chowki Hydrabad State,Andra Pradesh.
Michelin India Tyers Ltd.Jaslok Dist.Senter New Dilhi.2)Fida ali Wheel Subja Colony Toil; Chowki Hydrabad State,Andra Pradesh.
Center New Dilhi. & Hydrabad
Andra Pradesh
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Dinesh R. Mahajan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.J. Dalbhanjan MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 


ग्राहक तक्रार क्रमांक : 454/2010.

तक्रार दाखल दिनांक :  29/07/2010.

                                                           तक्रार आदेश दिनांक : 27/06/2013.                                निकाल कालावधी: 02 वर्षे 10 महिने 28 दिवस   

 

 

 


श्री. एस.बी. सोनवणे, वय 32 वर्षे,

रा. सहारा नगर नं.2, घर नं. 33-ए,

मजरेवाडी रोड, होटगी रोड, सोलापूर 3.                    तक्रारदार

 

                   विरुध्‍द

 

(1) मायकेलीन इंडिया प्रायव्‍हेट लि.,

    युनीट 401-404, चवथा मजला,

    कोपिया कार्पोरेट सुट्स, जसलोक डिस्‍ट्रीक्‍ट

    सेंटर, न्‍यू दिल्‍ली 110 076.

(2) फिदा अली व्‍हील्‍स्, 8-1-346/1/ए/2/1,

    सब्‍जा कॉलनी, टोली चौकी, हैद्राबाद-500 088 सी.

    स्‍टेट आंध्रप्रदेश.                                    विरुध्‍द पक्ष

 

                        गणपुर्ती  :-   श्री. दिनेश रा. महाजन, अध्‍यक्ष

                        सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्‍य 

 

 

                   तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ :  अरुण ना. सोनटक्‍के

                   विरुध्‍द पक्ष क्र.1 यांचेतर्फे विधिज्ञ : संतोष व्‍ही. न्‍हावकर

                   विरुध्‍द पक्ष क्र.2 यांचेतर्फे विधिज्ञ : चंद्रकांत ए. नाईकवाडे

 

आदेश

 

सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्‍य यांचे द्वारा :-

 

1.    प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्‍यात असा आहे की, ते टाटा इंडिगो जी.एल.एक्‍स. मॉडेल नं. एम.एच.12/बी.व्‍ही.1354 या वाहनाचे मालक आहेत. त्‍या वाहनाकरिता त्‍यांचे नातेवाईक श्री. एम.के. सुभेदार यांच्‍यामार्फत दि.14/4/2009 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी उत्‍पादीत केलेले 4 टायर (साईझ 175/56 आर-14) प्रतिटायर रु.3,500/- प्रमाणे रु.14,000/- किंमतीस खरेदी केले आहेत. टायर खरेदी केल्‍यानंतर तक्रारदार यांनी कारची व्‍हील बॅलन्‍सींग व अलायन्‍मेंट करुन घेतली. विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी टायरकरिता खरेदीपासून तीन वर्षाकरिता वॉरंटी दिलेली आहे. परंतु ते टायर सहा महिन्‍यामध्‍ये खराब झाले आणि त्‍यावरील डिझाईन पूर्णत: निघून गेली. तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांना टायर बदलून देण्‍याची विनंती केली असता त्‍यांच्‍या विनंतीची दखल घेण्‍यात आली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांच्‍याकडून टायरची किंमत द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजाने परत मिळावी आणि प्रवास खर्चाकरिता रु.12,500/-, मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.

 

2.    विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी दि.19/11/2010 रोजी आपले लेखी म्‍हणणे अभिलेखावर दाखल केले आहे. त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे त्‍यांचे व विरुध्‍द पक्ष क्र.2 यांच्‍यातील नाते Principal to Principal  असल्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांचे ग्राहक नाहीत. तसेच ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11(1)(बी) अन्‍वये तक्रार चालविण्‍यास मंचाला अधिकारक्षेत्र प्राप्‍त होत नाही. तक्रारदार यांची तक्रार दिवाणी न्‍यायालयात चालण्‍यास पात्र आहे. तक्रारदार यांच्‍या वाहनातील अयोग्‍य जिओमेट्रीकल सेटींगमुळे टायर खराब झाले आहेत. टायरमध्‍ये कोणताही उत्‍पादकीय दोष नाही. टायरमधील दोष हा वॉरंटीमध्‍ये अंतभूत होत नाही. शेवटी त्‍यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी झाल्‍यानंतर ते विधिज्ञांमार्फत हजर झाले. उचित संधी देऊनही त्‍यांनी अभिलेखावर लेखी म्‍हणणे दाखल केले नाही. त्‍यामुळे दि.28/12/2010 रोजी त्‍यांच्‍या विरुध्‍द कैफियतीशिवाय तक्रारीमध्‍ये चौकशी करण्‍याचा आदेश करण्‍यात येऊन सुनावणी पूर्ण करण्‍यात आली.

 

4.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष क्र.2 यांचे लेखी म्‍हणणे, उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन करता, तसेच लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले असता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                                  उत्‍तर

 

1. तक्रारदार यांची तक्रार चालविण्‍यास या मंचाला प्रादेशिक

   अधिकारक्षेत्र प्राप्‍त होते काय ?                             नाही.

2. काय आदेश ?                                       शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

 

 

निष्‍कर्ष

 

5.    मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी टाटा इंडिगो जी.एल.एक्‍स. मॉडेल नं. एम.एच.12/बी.व्‍ही.1354 या वाहनाकरिता दि.14/4/2009 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 यांच्‍याकडून 4 टायर (साईझ 175/56 आर-14) प्रतिटायर रु.3,500/- प्रमाणे रु.14,000/- केल्‍याचे त्‍यांचे कथन आहे. विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी त्‍यास आक्षेप नोंदविलेला नाही. प्रामुख्‍याने टायर खरेदी केल्‍यानंतर खरेदीपासून तीन वर्षाकरिता वॉरंटी दिलेली असताना ते टायर सहा महिन्‍यामध्‍ये खराब झाले आणि तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांना टायर बदलून देण्‍याची विनंती केली असता दखल घेण्‍यात आली नाही, अशी तक्रारदार यांची तक्रार आहे.

 

6.    विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी आपल्‍या लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याकरिता ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11(1)(बी) अन्‍वये तक्रार चालविण्‍यास मंचाला अधिकारक्षेत्र प्राप्‍त होत नसल्‍याची हरकत घेतली आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुत कायदेशीर मुद्दा प्रथम निर्णयीत होणे अत्‍यावश्‍यक आहे. तक्रारदार यांनी आपल्‍या लेखी युक्तिवादामध्‍ये टायरची वॉरंटी संपूर्ण देशभरात दिलेली असल्‍यामुळे व वॉरंटी कार्डवर कोठेही न्‍यायालयीन अधिकाक्षेत्राचा उल्‍लेख केला नसल्‍यामुळे तक्रार चालविण्‍यास या मंचाला अधिकारक्षेत्र असल्‍याचे नमूद केले आहे.

 

7.    उभय पक्षकारांचे प्रादेशिक अधिकारक्षेत्राबाबत उपस्थित मुद्याबाबतचे कथन विचारात घेता, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष क्र.2 यांच्‍या हैद्राबाद (आंध्रप्रदेश) येथील दुकानातून विवाद उपस्थित टायर घेतल्‍याचे स्‍पष्‍ट आहे. याचाच अर्थ, विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 हे अनुक्रमे दिल्‍ली व हैद्राबाद येथील रहिवाशी आहेत.

 

8.    ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 असे स्‍पष्‍ट करते की,

 

          कलम 11 (2) ज्‍याच्‍या अधिकारतेच्‍या स्‍थानिक सिमेत :-

      (अ)   विरुध्‍द पक्ष किंवा ते एकापेक्षा अधिक असल्‍यास विरुध्‍द पक्षांपैकी प्रत्‍येक व्‍यक्‍ती फिर्याद दाखल करण्‍याच्‍या वेळी प्रत्‍यक्षपणे आणि स्‍वेच्‍छेने राहत असेल (किंवा व्‍यवसाय करीत असेल किंवा तिचे शाखा कार्यालय असेल) किंवा लाभासाठी व्‍यक्तिश: काम करीत असेल, किंवा

      (ब)   विरुध्‍द पक्ष एकापेक्षा अधिक असल्‍यास त्‍यापैकी कोणीही, फिर्याद दाखल करण्‍याच्‍यावेळी प्रत्‍यक्षपणे आणि स्‍वेच्‍छेने राहत असेल (किंवा व्‍यवसाय करीत असेल किंवा शाखा कार्यालय असेल) किंवा लाभासाठी व्‍यक्तिश: काम करीत असेल, परंतु अशा प्रकरणी जिल्‍हा मंचाने परवानगी दिली असेल किंवा ज्‍या राहत नसतील (किंवा व्‍यवसाय करीत नसतील किंवा शाखा कार्यालय नसेल) किंवा व्‍यवसाय करीत नसतील किंवा प्रकरणपरत्‍वे लाभासाठी व्‍यक्तिश: काम करीत नसतील अशा विरुध्‍द पक्षांनी फिर्याद दाखल करण्‍यास मुक संमती दिली असेल; किंवा

      (क)   वादाचे कारण पूर्णपणे किंवा भागश: घडले असेल;

      अशा जिल्‍हा मंचाकडे फिर्याद दाखल करण्‍यात येईल.

 

9.    तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष क्र.2 यांच्‍याकडून हैद्राबाद येथून टायर खरेदी केलेले आहेत आणि विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 हे सोलापूर जिल्‍ह्यामध्‍ये व्‍यवसायासाठी कार्यरत असल्‍याचे सिध्‍द होत नाही. तसेच तक्रारदार यांनी वॉरंटी देशभर लागू होती, असे जरी म्‍हटले असले तरी तसा पुरावा रेकॉर्डवर दाखल नाही. वरील विवेचनावरुन तक्रारदार यांची तक्रार चालविण्‍यास या मंचाला प्रादेशिक अधिकारक्षेत्र प्राप्‍त होत नाही, या अनुमानास आम्‍ही आलो आहोत. अशा परिस्थितीत प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये उदभवलेल्‍या इतर प्रश्‍नांना स्‍पर्श न करता तक्रारदार यांनी योग्‍य न्‍यायालय / मंचापुढे तक्रार दाखल करणे उचित होईल आणि त्‍याप्रमाणे तक्रारदार यांना योग्‍य न्‍यायालयासमोर जाऊन तक्रार दाखल करण्‍यास त्‍यांना स्‍वातंत्र आहे. +Énù®úhÉÒªÉ ºÉ´ÉÉæSSÉ xªÉɪÉɱɪÉÉxÉä '±ÉI¨ÉÒ <ÆÊVÉÊxÉ+®úÓMÉ ´ÉCºÉÇ /ʴɯûvnù/ {ÉÒ.BºÉ.VÉÒ. <Æb÷º]ÅõÒªÉ±É <xº]õÒ]õªÉÖ]õ,' 2 (1995) ºÉÒ.{ÉÒ.VÉä. 1 (BºÉ.ºÉÒ.) या निवाडयामध्‍ये असे नमूद केले आहे की,

 

  If  the appellant chooses to file a suit for the relief claimed in these proceedings, he can do so according to law and in such a case he can claim the benefit of Section 14 of the Limitation Act to exclude the period spent in prosecuting the proceedings under the Consumer Protection Act, while computing the period of limitation prescribed for such a suit.

 

10.   उपरोक्‍त न्‍यायिक तत्‍वानुसार तक्रारदार यांना मुदतीच्‍या कायद्यातील कलम 14 चा लाभ मिळू शकतो. शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

      1. तक्रारदार यांची तक्रार चालविण्‍याकरिता प्रादेशिक अधिकारक्षेत्र नसल्‍यामुळे तक्रार निकाली काढण्‍यात येते.

      2. उभय पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.

      3. उभय पक्षकारांना निकालपत्राची प्रत नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

 

 

 

(सौ. विद्युलता जे. दलभंजन)                              (श्री. दिनेश रा. महाजन÷)

       सदस्‍य                                              अध्‍यक्ष

       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                           ----00----

 (संविक/स्‍व/26613)

 

 
 
[HON'ABLE MR. Dinesh R. Mahajan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.J. Dalbhanjan]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.