Maharashtra

Kolhapur

CC/16/314

Mahesh Ashok Kademani - Complainant(s)

Versus

Me.Trendy Wheels Pvt.Ltd.Through Authorised Officer - Opp.Party(s)

T.R.Patil

26 Sep 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/16/314
 
1. Mahesh Ashok Kademani
Plot No.7,Maheshwar Colony,Balinga,Tal.karveer,Kolhapur 315/C,S.P.M.Road,Belum,Karnataka
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Me.Trendy Wheels Pvt.Ltd.Through Authorised Officer
448/B,Shiroli MIDC,Pune-Banglore Road,Nagaon Fata,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
Adv. T.R. Patil
 
For the Opp. Party:
Adv. A.R. Bichkar
 
Dated : 26 Sep 2017
Final Order / Judgement

                                       

                                        तक्रार दाखल तारीख – 14/10/16

                                       तक्रार निकाली तारीख – 26/09/2017

 
 
 

                              न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1)     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार हे बेळगावी येथील रहिवासी असून वि.प. हे महिंद्रा कंपनीच्‍या गाडयांचे अधिकृत वितरक व विक्रेते असून ते त्‍यांचा व्‍यवसाय ट्रेन्‍डी व्‍हील्‍स प्रा.लि. या नावाने करतात. तक्रारदार हे सध्‍या बेळगावी येथे राहणेस असून महिंद्रा कंपनीची चार चाकी गाडी XUV 500 W6 (FWD) Refresh White  ही गाडी घेण्‍याचा त्‍यांचा मानस होता. त्‍याप्रमाणे त्‍यांनी कोल्‍हापूर येथील वि.प. यांचे शोरुममध्‍ये येवून सदर गाडीची चौकशी दि.11/3/2016 रोजी केली.  त्‍यावेळी वि.प. यांच्‍या शोरुममधील कर्मचा-यांनी XUV 500 W6 (FWD) Refresh White या गाडयांची संपूर्ण माहिती तक्रारदाराला दिली.  त्‍यानंतर दि.15/3/2016 रोजी सदर गाडीचे रितसर कोटेशन वि.प. ने तक्रारदार यांना दिले.  सदर गाडी तक्रारदार यांना पसंत असलेने तक्रारदाराने प्रस्‍तुत गाडी खरेदी करणेचे निश्चित केले व त्‍याप्रमाणे दि.18/3/2016 रोजी तक्रारदाराने वि.प. चे शोरुमधून वर नमूद  XUV 500 W6 (FWD) Refresh White ही गाडी खरेदी करणेसाठी कोटेशनप्रमाणे संपूर्ण रक्‍कम अदा केली.  परंतु कोटेशनमध्‍ये नमूद केलेप्रमाणे गाडी वि.प. ने तक्रारदाराला दिली नाही, कोटेशनप्रमाणे नवीन गाडीचे मॉडेलमध्‍ये 7 इंची कलर टचस्‍क्रीन, जी.पी.एस. सिस्‍टीम, आयपॉड कनेक्‍टीव्‍हीटी, वॉलपेपर सेटींग करणे, गाडीला समोरचे ग्रील क्रोमचे आहे, शिवाय चालक सीट आठ प्रकारे वळवता येणे शक्‍य आहे, अशा प्रकारची सर्व वैशिष्‍टये कोटेशनमध्‍ये नमूद गाडीमध्‍ये असताना वि.प. यांनी या वैशिष्‍टयांव्‍यतिरिक्‍त असलेली जुन्‍या मॉडेलची गाडी तक्रारदाराला दिली आहे.  ही वैशिष्‍टये असलेली गाडी तक्रारदाराला अपेक्षित होती मात्र वि.प. यांना सदर वैशिष्‍टयांशिवाय असलेली गाडी तक्रारदाराला खरेदी देवून तक्रारदाराची घोर निराशा केली आहे.   अशा पध्‍दतीने तक्रारदार यांना त्‍यांची फसवणूक झालेचे दि.20/3/16 रोजी कळून आलेनंतर तक्रारदाराने तातडीने वि.प. यांची कोल्‍हापूर येथे येवून भेट घेतली असता व फसवणूकीबाबत जाब विचारला असता व ही गाडी परत घेवून कोटेशनप्रमाणे मागणी केलली गाडी तक्रारदाराला द्या असे तक्रारदाराने वि.प. यांना सुनावले असता वि.प. यांनी प्रस्‍तुत बाब नजरचुकीने झाली असून तुम्‍हाला तुमच्‍या गाडीमध्‍येच नवीन वैशिष्‍टये असलेली गाडी तयार करुन देवू व त्‍याबाबत कंपनीमध्‍ये विचारणा करणेसाठी थोडा अवधी द्या, अशी विनंती केली. परंतु त्‍यानंतरही वेळोवेळी वि.प. यांची भेट घेवूनही वि.प. यांनी कोणतीही नवीन बाब केली नाही. याउलट तक्रारदाराने त्‍यांचे वकीलामार्फत पाठवलेल्‍या नोटीसला खोटे उत्‍तर पाठवले व तक्रारदाराला अपेक्षीत व कोटेशनप्रमाणे वैशिष्‍टये असलेली गाडी दिली नाही.  सबब, तक्रारदाराला वि.प. ने सदोष सेवा पुरविलेने तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे. 

 

2.    तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी वि.प. यांचेकडून XUV 500 W6 (FWD) Refresh White ही नवीन मॉडेलची गाडी दि.15/3/2016 रोजी वि.प. ने दिले कोटेशनप्रमाणे त्‍यात असलेल्‍या वैशिष्‍टयांसह बदलून द्यावी अथवा सदर गाडीची किंमत रक्‍कम रु.15,33,708/- खरेदी तारखेपासून बँकेचे प्रचलीत व्‍याजदराने (रक्‍कम रु.1,38,000/- व्‍याजापोटी) अदा करावेत, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/-, नोटीस खर्च रु.5,000/-, व तक्रारअर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसुल होवून मिळावा अशी विनंती याकामी तक्रारदाराने केली आहे.      

 

3.    तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादीसोबत गाडीचे कोटेशन, तक्रारदाराने वि.प. चे खात्‍यात आर.टी.जी.एस.ने रक्‍कम रु.15,33,708/- जमा केलेची पावती, डिलीवरी चलन, टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस, गाडीची इन्‍शुरन्‍स कव्‍हर नोट, तक्रारदाराचे वकीलांनी पाठविलेली नोटीस, वि.प. यांनी तक्रारदाराला दिलेली उत्‍तरी नोटीस, पुराव्‍याचे शपथपत्र, तक्रारदाराने सदर काम चालवणेसाठी भावास दिलेले वटमुखत्‍यारपत्र, लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.   

 

4.    वि.प.ने प्रस्‍तुतकामी म्‍हणणे/कैफियत, कागदयादीसोबत गाडीचे कोटेशन, व्‍हेईकल ऑर्डर टेकींग फॉर्म, टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस, गाडीचे डीलीव्‍हरी चलन, तक्रारदार व महिंद्रा कंपनीचे प्रतिनिधी यांचेशी झाले बातचीत बाबत सी.डी. रुपांतरण, गाडीचे लिफ्लेट, पुरावा शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस, लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे वि.प. ने याकामी दाखल केली आहेत.  वि.प. ने त्‍यांचे म्‍हणणे/कैफियतीमध्‍ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळली आहेत.  वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील प्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत. 

 

i)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्‍यातील कथने मान्‍य व कबूल नाही.

ii)         तक्रारदाराने वि.प. यांचेकडे सदर XUV 500 W6 (FWD) Refresh White या गाडीबाबत माहिती विचारली.  वि.प.चे प्रतिनिधी यांनी त्‍यांना उपलब्‍ध असलेल्‍या सर्व  मॉडेलची माहिती व प्रस्‍तुत मॉडलेमध्‍ये असले फिचर्स, सोयी याबाबत तक्रारदाराला माहिती समजावून सांगितली.  त्‍याप्रमाणे वि.प. यांनी सदर मॉडेल पूर्णपणे चेक करुन त्‍याची ट्रायल घेतली व सदर उपलब्‍ध मॉडेल तक्रारदार यांना पसंत असलेचे तक्रारदाराने सांगितले व त्‍याप्रमाणे वि.प. ने दि.11/3/2016 रोजी तसेच दि.14/3/2016 रोजी वाहन ऑर्डर फॉर्मवर तक्रारदाराच्‍या सहया घेतल्‍या व त्‍याप्रमाणे तक्रारदाराकडून रक्‍कम रु.15,33,708/- इतकी रक्‍कम स्‍वीकारुन सदर गाडी तक्रारदाराचे ताब्‍यात, पुनश्‍च तक्रारदाराला सोयी फिचर्स यांची माहिती देवून, दिली व त्‍याप्रमाणे गाडी ताब्‍यात मिळालेबाबत डिलीवरी चलनावर तक्रारदार यांनी दि.17/3/2016 रोजी सही केली आहे.  तसेच सदर गाडीची कागदपत्रे वि.प. ने कंपनीकडे रजिस्‍टर करणेसाठी पाठवली. 

 

iii)    सदर गाडी तक्रारदाराने खरेदी केलेवर दीड महिन्‍यानंतर गाडीचा वापर करुन वि.प. कडून पैसे उकळण्‍याच्‍या इराद्याने सदर गाडी मला नको आहे, ती परत घ्‍या, माझे पैसे व्‍याजासहीत परत द्या, अन्‍यथा मी तुम्‍हाला कोर्टात खेचेन अशी तक्रारदाराने वि.प. ला धमकी दिली व वि.प. ला त्रास देणेच्‍या उद्देशाने वकीलामार्फत नोटीस दिली आहे. 

 

iv)        तक्रारदाराने मार्च 2016 मध्‍ये उपलब्‍ध असलेली XUV 500 W6 (FWD) Refresh White पाहूनच, त्‍या मॉडेलची चौकशी करुन सोयी व फिचर्सची माहिती घेवून व सदरचे मॉडेल पसंत असलेचे पाहून, त्‍याप्रमाणे त्‍याबाबत वि.प. यांचेकडे कोटेशनची मागणी केली. त्‍याप्रमाणे वि.प. यांनी तक्रारदार यांना उपलब्‍ध असले वाहनाचे कोटेशन दि.11/3/2016 रोजी दिले. 

 

v)         तदनंतर दि.17/3/2016 रोजी सदर गाडीची पुन्‍हा तपासणी करुन ट्रायल घेवून डिलीव्‍हरी घेतली व डिलीवरी चलनावर सहया घेतल्‍या.

 

vi)        वास्‍तविक वि.प. हे महिंद्रा कंपनीने तयार केलेल्‍या व उत्‍पादित केलेल्‍या वाहनाचे वितरक असून वि.प. स्‍वतः पात्र झालेल्‍या वाहनामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा बदल, सुधारणा अगर तांत्रिक दृष्‍टया अतिरिक्‍त फिचर्स देवू शकत नाहीत व देत नाहीत. त्‍याचबरोबर अशा वाहनाचे कोणतेही फिचर्स अगर सोयी काढून देखील घेवू शकत नाहीत. अशा प्रकारे झालेला बदल केवळ उत्‍पादक कंपनीच करु शकते.  तक्रारदाराने केलेली मागणी ही वितरक वि.प. यांचे अधिकार कक्षेबाहेरील आहे.  तसेच वि.प. यांना अशी अनाधिकृत मागणी पूर्ण करणे अशक्‍य आहे.  तसेच याकामी उत्‍पादक कंपनीस आवश्‍यक पक्षकार म्‍हणून सामील केलेले नाही.

 

vii)       तक्रारदाराला दिलेले वाहनाचे कोटेशन फिचर्स बाबतचे मा‍हितीपत्रक, वाहन ऑर्डर फॉर्म, डिलीवरी चलन, वाहन नोंदणी, डिलीवरी पासूनचा कालावधी या सर्व बाबींची शहानिशा करता तक्रारदाराची तक्रार खोटी व पश्‍चात बुध्‍दीची असून ती पैसे उकळणेचे कारणाने केली आहे हे स्‍पष्‍ट होते. वि.प. यांनी कसल्‍याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही. 

      सबब वरील सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करावा. अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर याकामी घेतलेले आहेत.

 

5.   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

 

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार वि.प. यांचेकडून मागणीप्रमाणे पूर्तता होवून   मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

वि वे च न

 

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत, कारण तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून वादातील चारचाकी कार XUV 500 W6 (FWD) Refresh White खरेदी करणेसाठी  वि.प. यांना रक्‍कम रु.15,33,708/- ही किंमत अदा केली याबाबत कोटेशन व रक्‍कम अदा केलेल्‍या पावत्‍या तक्रारदाराने दाखल केल्‍या आहेत.  वि.प. ने सदर बाब मान्‍य केली आहे.  सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत.  तसेच तक्रारदाराने वि.प. ने दिलेल्‍या कोटेशनमध्‍ये नमूद कार XUV 500 W6 (FWD) Refresh White खरेदी करणेचे ठरवले व त्‍याप्रमाणे Vehicle Order Taking Form वर वि.प. नेच माहिती भरली व तक्रारदाराच्‍या सहया घेतल्‍या आहेत. पंरतु सदर Order फॉर्ममध्‍येही गाडीचे मॉडेल XUV 500 W6 (FWD) Refresh White असे नमूद आहे व तक्रारदाराला वि.प. ने दिले कोटेशनमध्‍ये गाडीचे मॉडेल XUV 500 W6 (FWD) Refresh White असे नमूद आहे.  तसेच डिलीवरी चलनावर व टॅक्‍स इन्‍व्‍हॉईसवर गाडीचे वर्णन MAHINDRA XUV 500 FWD W-6 BS4 असे नमूद आहे.  वि.प. ने तक्रारदारकडून गाडीची किंमत रक्‍कम रु.15,33,708/- घेतलेली आहे ही बाब  वि.प. ने मान्‍य केली आहे.  तसेच वि.प. ने त्‍यांचे म्‍हणणे पॅरा नं.12 मध्‍ये कथन केले आहे की, वि.प. हे महिंद्रा कंपनीने तयार व उत्‍पादन कलेल्‍या वाहनाचे वितरक असून वि.प. स्‍वतः प्राप्‍त झालेल्‍या वाहनामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा बदल, सुधारणा अगर तांत्रिकदृष्‍टया अतिरिक्‍त फिचर्स, सोयी, देवू शकत नाहीत.  अशा प्रकारे झालेला बदल केवळ कंपनीच करु शकते.  म्‍हणजेच तक्रारदाराने बुक केले वाहनामध्‍ये व तक्रारदाराला वि.प. ने विक्री केले वाहनामध्‍ये बदल/फरक असलेचे वि.प. ने मान्‍य केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तसेच तक्रारदाराने दिले ऑर्डरमध्‍ये व कोटेशनमधील गाडीचे मॉडेल व डिलीवरी चलन व टॅक्‍स इन्‍व्‍हॉईसमध्‍ये नमूद गाडीचे मॉडेल यामध्‍ये तफावत असलेचे स्‍पष्‍ट होते.  तसेच तक्रारदाराने गाडीची डिलीवरी घेतलेनंतर तक्रारदाराचे लक्षात आले की, प्रस्‍तुत गाडीत वि.प. ने कथन केलेप्रमाणे फिचर्स/वैशिष्‍टये नाहीत.  तसेच वि.प. ने कागदयादी अ.क्र.7 ला गाडीचे लिफलेट हजर केले आहे. त्‍यामध्‍ये XUV 500 W6 (FWD) Refresh White या गाडीची वैशिष्‍टये comfort  या कॉलमखाली Adjustable Driver seat मध्‍ये दिली आहेत. ती वैशिष्‍टये तक्रारदाराला दिलेल्‍या गाडीत नाहीत तसेच गाडीला समोर असलेले ग्रील हे क्रोमचे असलेबाबत उल्‍लेख आहे परंतु तक्रारदाराला दिले गाडीत असे वैशिष्‍टय नाही.  तसेच नवीन गाडीमध्‍ये तक्रारदाराने बुक केले गाडीत 7 इंची कलर टचस्‍क्रीन, जी.पी.एस.सिस्‍टीम, आयपॉड कनेक्‍टीव्‍हीटी, वॉलपेपर सेटींग करणे, गाडीला समोरचे ग्रील क्रोमचे व ड्रायव्‍हर सीट आठ प्रकारे वळवता येणे शक्‍य आहे अशी वैशिष्‍टये असतानाही तक्रारदार यांना वि.प. यांनी नमूद वैशिष्‍टयांसह कोटेशनप्रमाणे बुकींगप्रमाणे गाडी न देता जुन्‍या मॉडेलची गाडी तक्रारदाराला दिलेली आहे.  तसेच तक्रारदाराने वि.प. यांना गाडी खरेदी केलेनंतर तात्‍काळ दि.20/3/2016 रोजी ही बाब लक्षात आणून दिली व त्‍याबाबत जाब विचारला असता वि.प. ने सदर बाब नजरचुकीने झालेचे व तक्रारदाराचे गाडीतच नवीन वैशिष्‍टये तयार करुन देवू असे सांगितले परंतु नंतर वि.प. ने काहीही केले नाही व तदनंतर एप्रिल 2016 चे पहिल्‍या आठवडयात पुन्‍हा तक्रारदाराने याबाबत विचारणा करता आता गाडीचे रजिस्‍ट्रेशन झाले आहे, शिवाय गाडी 15 दिवसांपेक्षा जास्‍त वापरली आहे, त्‍यामुळे गाडी बदलून देता येत नाही व याच गाडीत नवीन सुधारणा करता येत नाही असे सांगितले.  या सर्व बाबी तक्रारदार व वि.प. ने दिले कागदपत्रांवरुन व  शपथपत्रांवरुन स्‍पष्‍ट व सिध्‍द झाल्‍या आहेत.  म्‍हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराला दिले कोटेशनमध्‍ये नमूद XUV 500 W6 (FWD) Refresh White ही गाडी न देता जुन्‍या मॉडेलची XUV 500 W6 BS4 Pearl white ही पर्ल व्‍हाईट रंगाची गाडी देवून तक्रारदाराला, अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा पुरविली आहे हे स्‍पष्‍ट व सिध्‍द झाले आहे. सबब, याकामी तक्रारदार हे वि.प.यांचेकडून तक्रारदाराला वि.प.ने दिलेल्‍या जुन्‍या मॉडेलची गाडी परत घेवून, दि.11/3/2016 रोजी तक्रारदाराला दिले कोटेशनमध्‍ये नमूद XUV 500 W6 (FWD) Refresh White ही नवीन मॉडेलची गाडी मिळणेस किंवा सदर गाडीची तक्रारदाराकडून वि.प.ने स्‍वीकारलेली रक्‍कम रु.15,33,708/- व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

      सबब, प्रस्‍तुत कामी आम्‍ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. 

 

- आ दे श -

  

                              

1)     तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो. 

 

2)     वि.प. यांनी तक्रारदाराला विक्री केलेली XUV 500 W6 BS4 Pearl white ही गाडी परत घेवून तक्रारदाराने बुक केलेली नवीन मॉडेलची XUV 500 W6 (FWD) Refresh White ही गाडी तक्रारदाराला अदा करावी. काही तांत्रिक अडचणीमुळे सदरची पूर्तता करणे वि.प. यांना अशक्‍य झालेस वि.प. यांनी तक्रारदाराला विक्री केलेली  XUV 500 W6 BS4 Pearl white ही गाडी परत घेवून त्‍याची किंमत रक्‍कम रु.15,33,708/- (रक्‍कम रु. पंधरा लाख तेहतीस हजार सातशे आठ फक्‍त) तक्रारदार यांना परत अदा करावी.

 

3)    मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- (रक्‍कम रुपये पंधरा हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) वि.प. ने तक्रारदाराला अदा करावेत. 

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश प्राप्‍त तारखेपासून 45 दिवसांत करावी.   

 

5)    विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.