Maharashtra

Kolhapur

CC/17/214

Nasir Husen Harun Jamadar - Complainant(s)

Versus

Me.Chetan Motors - Opp.Party(s)

S.M.Potdar

10 Jun 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/17/214
( Date of Filing : 09 Jun 2017 )
 
1. Nasir Husen Harun Jamadar
Mangaon,Tal.Hatkangle,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Me.Chetan Motors
Gadmudshingi Road,Uchgaon,Tal.Karveer,
Kolhapur
2. Gautam Pise,Manager
As Above
Kolhapur
3. Rahil Mujavar,Sales Manager
Pl.no.4,Bottle Godawn,Ujalaiwadi,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 10 Jun 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार हे आपल्‍या उदरनिर्वाहासाठी मालवाहतुक व्‍यवसाय करतात.  तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून टाटा 207 डीआय एमएच-10/आय-5465 हे वाहन रोख रक्‍कम भरणा करुन खरेदी केले आहे.  तत्‍पूर्वी तक्रारदारांकडे छोटा हत्‍ती वाहन क्र. एमएच-09/बीसी-7008 हे वाहन होते.  दरम्‍यानचे काळात तक्रारदार यांना अन्‍य एका वाहनाची तातडीने निकड भासल्‍याने त्‍यांनी चौकशी केली असता त्‍यांना सदर वि.प. यांचेकडे वाहन एक्‍सचेंजची माहिती मिळून आली.  तक्रारदार यांनी वि.प. यांचेशी संपर्क साधला असता त्‍यांनी तक्रारदारांना टाटा 207 डीआय एमएच-10/आय-5465 हे वाहन दाखविले.  सदरचे वाहनाची किंमत रु.1,47,000/- वि.प. यांनी सांगितली होती.  त्‍यावर विश्‍वास ठेवून तक्रारदारांनी सदरचे वाहन खरेदी करण्‍याचे ठरविले.  त्‍यानुसार दि. 28/1/2013 रोजी वि.प.क्र.3 यांनी तक्रारदारांना संचकारपत्र करुन देवून रक्‍कम रु.1,47,000/- रोख स्‍वीकारुन सदरचे वाहन तक्रारदारांचे ताब्‍यात दिले आहे.  तक्रारदार यांनी सदरचे वाहन 4 महिने वापरल्‍यानंर ते परवडत नसल्‍याचे समजून आल्‍याने त्‍यांनी वि.प. यांचेकडे तक्रार केली असता वि.प. यांनी सदर वाहन परत घेवून त्‍याबदल्‍यात दुसरे चांगले वाहन देण्‍याची हमी दिली.  त्‍यानुसार वि.प. यांनी सदर वाहनाची किंमत रु. 1,30,000/- ठरवून सदर वाहन वि.प.क्र.1 कंपनीमध्‍ये जमा करुन घेतले व 15 दिवसांनी फक्‍त रु. 30,000/- तक्रारदारास दिले व उर्वरीत रक्‍कम रु. 1 लाख हे सदर वाहन विकलेवर परत करतो असे आश्‍वासन वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास दिले.  तदनंतर काही दिवसांनी वि.प. यांनी तक्रारदारास Super S MH-09/CA-8061 हे वाहन दाखविले.  तक्रारदारास हे वाहन चांगले वाटल्‍याने ते घेण्‍यास तक्रारदारांनी होकार दिला.  सदर वाहनाची किंमत रु. 3,20,000/- असल्‍याचे वि.प. यांनी सांगितले.  त्‍यावर तक्रारदारांनी वि.प. हे तक्रारदारास देणे लागत असलेल्‍या पूर्वीच्‍या मूळ व्‍यवहारातील रक्‍कम वजावट करावी असे सांगितले.  सदर तोडगा वि.प. यांना मान्‍य झालेने तक्रारदाराच्‍या सदर Super S MH-09/CA-8061 या वाहनाची किंमत रु. 2 लाख ठरवून उर्वरीत रक्‍कम रु.1,20,000/- रोखीने भरण्‍यास तक्रारदारास सांगितले.  त्‍यावेळी तक्रारदाराने पूर्वीच्‍या व्‍यवहारातील येणे रक्‍कम रु. 1 लाख ही वजा करावी व फक्‍त रु. 20,000/- रोख देतो असे वि.प. यांनी सांगितले.  परंतु त्‍यावेळी प्रत्‍येक गाडीचा व्‍यवहार हा वेगळा असतो. त्‍यामुळे मूळ व्‍यवहारातील पैसे नंतर देतो, प्रथम या गाडीचे मालकाचे पैसे द्यावयाचे आहेत, त्‍यामुळे पहिला हा व्‍यवहार पूर्ण करा असे तक्रारदारास सांगतले. तक्रारदाराने नाईलाजास्‍तव रक्‍कम रु. 1,20,000/- वि.प. यांचेकडे जमा केली.  त्‍यावेळी वि.प. यांनी तक्रारदाराचे ताब्‍यात वाहन दिले. परंतु कागदपत्रे दिली नाहीत.  सदर वाहन ताब्‍यात घेतलेनंतर एक महिन्‍याचे आतच श्री कुलकर्णी नावाचे इसम तक्रारदाराकडे आले व त्‍यांनी सदर Super S MH-09/CA-8061 या वाहनावर स्‍वतःचा कायदेशीर हक्‍क सांगितला.  त्‍यावेळी कुलकर्ण्‍ी यांनी तक्रारदारांना सांगितले की, त्‍यांनी वि.प. यांचेकडे वाहन एक्‍सचेंजकरिता ताब्‍यात दिलेले होते. त्‍यावेळी वि.प. यांनी सदर वाहनावरील कर्ज फेडूनच सदर वाहन विक्री करु, त्‍याची तोशीस श्री कुलकर्णी यांना लागू देणार नाही असे आश्‍वासन दिले होते. त्‍यावर तक्रारदार व कुलकर्णी यांनी वि.प. यांचेकडे जावून याबाबत विचारणा केली असता वि.प. यांनी कुलकर्णी यांना कर्ज परतफेडीपोटी लागणारे धनादेश देवून वादावर पडदा पाडला.  परंतु 15 दिवसांत श्री कुलकर्णी यांनी तक्रारदारांची भेट घेवून सदरचा दिलेला चेक न वटताच परत आल्‍याचे सांगितले.  याबाबत तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे विचारणा केली असता त्‍यांनी तक्रारदारांना दिलेले वाहन Super S MH-09/CA-8061 परत करण्‍यास सांगितले. त्‍यानुसार तक्रारदारांनी वाहन परत केले.  त्‍यावेळी वि.प. यांनी तक्रारदारास देय रक्‍कम रु,4,20,000/- चा चेक दिला.  परंतु सदर चेक वटला नाही.  अशा प्रकारे वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्‍याने प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, तक्रारदारास वि.प. यांचेडून वि.प. हे देणे लागत असलेली रक्‍कम रु.4,20,000/-, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,00,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत दि. 28/1/13 चे संचकारपत्र, तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या एफ.आय.आर. ची प्रत, तक्रारदार यांनी पोलिस अधिक्षक यांना दिलेल्‍या अर्जाची प्रत, वि.प. यांनी दिलेला धनादेश, वकील नोटीस व नोटीसची पोहोच इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प. क्र.1 व 2 यांनी याकामी दि.28/07/17 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल केले असून तक्रारअर्जातील बहुतांशी कथने नाकारली आहेत.  वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदरांनी दाखल केलेल्‍या संचकारपत्रावर तक्रारदार व राहील मुजावर यांच्‍या सहया आहेत.  सबब, तक्रारदार व राहिल मुजावर यांच्‍यात वैयक्तिक स्‍वरुपात झालेल्‍या संचकारपत्राच्‍या आधारे वि.प.क्र.1 व 2 यांना सामील करुन तक्रारदाराने तक्रार दाखल केली आहे. ती चालणेस पात्र नाही.  तक्रारअर्जामध्‍ये वि.प.क्र.1 व 2 हे कोणत्‍याही प्रकारे तक्रारदाराच्‍या अर्जाशी संबंधीत असलेचा उल्‍लेख नाही.  केवळ ग्राहक न्‍यायालयात दाद मागता यावी म्‍हणून तक्रारदाराने वि.प.क्र.1 व 2 यांचे नाव नमूद केले आहे.  वादातील चेक हा वि.प.क्र.3 यांनी तक्रारदारास दिलेला आहे.  तक्रारीस कारण हे दि. 10/10/14 रोजी झाले आहे.  तक्रारदारांनी प्रस्‍तुची तक्रार ही मुदतीत दाखल केलेली नाही.  वि.प.क्र.1 व 2 हे जुन्‍या गाडयांची खरेदी विक्री करीत नाहीत.  वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना कोणतीही गाडी विकलेली नाही.  असा कोणताही करार तक्रारदार व वि.प.क्र.1 व 2 यांचेमध्‍ये झालेला नाही.  तक्रारदारांनी कोणतीही रक्‍कम वि.प.क्र.1 व 2 यांना दिलेली नाही.  तक्रारदारांनी पोलिस स्‍टेशनला दाखल केलेल्‍या तक्रारीच्‍या अनुषंगाने पोलीस तपास होवून वि.प.क्र.3 यांनी तक्रारदारांची फसवणूक केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.  सबब, वि.प. क्र.1 व 2 यांनी कोणतीही त्रुटी न दिल्‍याने तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प.क्र.1 व 2 यांनी केली आहे.

 

4.    वि.प.क्र.3 यांनी याकामी दि.08/08/17 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल केले असून तक्रारअर्जातील बहुतांशी कथने नाकारली आहेत.  वि.प.क्र.3 यांचे कथनानुसार, तक्रारदार हे वि.प.क्र.3 यांचे ग्राहक होत नाहीत.  तक्रारदार यांनी व्‍यवसायाकरिता नमूद वाहने विक्री केली आहेत.  त्‍यामुळे संपूर्ण व्‍यवहाराचे स्‍वरुप हे व्‍यापारी कारणाकरिता तक्रारदार यांनी केलेले आहे.  सबब, तक्रार चालणेस पात्र नाही.  वि.प.क्र.3 यांनी तक्रारदार यांना कोणत्‍याही प्रकारचे संचकारपत्र लिहून दिलेले नाही.  वि.प.क्र.3 यांनी तक्रारदारांना वाहन एक्‍सचेंज करुन देतो अशी हमी दिलेली नव्‍हती.  वि.प.क्र.3 यांनी तक्रारदारांकडून कोणतही सेवा मोबदला स्‍वीकारुन दिलेली नाही.  तक्रारदाराची तक्रार ही मुदतीत नाही. तक्रारदारांनी वि.प.क्र.3 यांना मोबदला दिल्‍याबाबत कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही.   सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी मागणी वि.प.क्र.3 यानी केली आहे.

 

5.    वि.प.क्र.1 व 2 यांनी तसेच वि.प.क्र.3 यांनी याकामी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

6.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे नुकसान भरपाईपोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय ?

होय.

5

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

6

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

7.    तक्रारदार हे स्‍वतःचे व कुटुंबाचे उदरनिर्वाहाकरिता मालवाहतुकीचा व्‍यवसाय करतात.  सदरदचे मालवाहतुकीच्‍या व्‍यवसायाकरिता वाहनाची आवश्‍यकता असते.  यातील वि.प.क्र.1 ही मालवाहतुक कारणाकरिता लागणा-या गाडयांची विक्री करणारी कंपनी असून सदर कंपनीमार्फत वाहन खरेदी व विक्री व्‍यतिरिक्‍त जुन्‍या गाडया एक्‍स्‍चेंज करुन त्‍याचे व्‍यवहार केले जातात.  वि.प.क्र.2 हे सदर कंपनीमधील व्‍यवस्‍थापक असून वि.प.क्र.3 हे सेल्‍स मॅनेजर आह. सदर वि.प. कंपनीचे व्‍यवहार हाताळण्‍याचे अधिकार वि.प.क्र.2 व 3 यांना दिलेले आहेत.  तक्रारदार यांनी सदर वि.प. यांचेकडील टाटा 207 DI No. MH-10-I-5465 हे वाहन रोख रक्‍कम भरणा करुन वाहन खरेदी केलले आहे.  त्‍याअनुषंगाने तक्रारदारांनी तक्रारीसोबत ता. 28/1/2013 रोजीचे संचकारपत्र दाखल केले आहे.  सदरचे संचकारपत्राचे अवलोकन करता सदरचे संचकारपत्रामध्‍ये तक्रारदार यांनी टाटा मोटर्स वाहन क्र. टाटा 207 DI No. MH-10-I-5465 हे रक्‍कम रु.1,47,000/- संचकार रक्‍कम देवून खरेदी केलेले आहे. सदरचे संचकारपत्रावर आलिमखान जमादार व असिफ जमादार यांच्‍या साक्षीदार म्‍हणून सहया आहेत.  सदरचे संचकारपत्र वि.प. यांनी नाकारलेले नाही.  तथापि वि.प.क्र.1 व 2 यांनी सदरचे संचकारपत्र तक्रारदार व राहील मुजावर यांच्‍यात वैयक्तिक स्‍वरुपात झालेले आहे. त्‍यावर वि.प.क्र.1 व 2 यांची सही व शिक्‍का नाही.  वि.प.क्र.1 व 2 यांनी सदरचे वाहन तक्रारदाराचे ताब्‍यात दिलेले नाही.  वि.प.क्र.1 व 2 यांनी कोणताही व्‍यवहार केलेला नाही.  या कारणाने सदरचे तक्रारीशी वि.प.क्र.1 व 2 यांचा कोणताही संबंध नाही असे वि.प.क्र.1 व 2 यांनी म्‍हणणेत नमूद केले आहे. तथापि प्रस्‍तुतकामी तक्रारदारांनी दि. 07/03/2018 रोजी आयोगात कागदपत्रे दाखल केली असून सदर कागदपत्रांमध्‍ये अ.क्र.3 ला वि.प. यांचे व्‍यवहारांची कागदपत्रांची यादी पाहता ता. 24/1/13 रोजीचे चलनावरील मजकुराचे अवलोकन करता,

 

      Respected Sir,

 

            As per discussion with Mr. Mohan Dattatraya Joshi and as per our company rule, we are ready to take  your vehicle in buy back scheme 207 DI Pick up Reg.No. MH-10-I-5465, Model Oct. 204.

            We are offering you Rs.1,60,000/-  as it is in running condition.

 

सदरचे चलनावर वि.प.क्र.1 व 2 यांचे नाव नमूद असून त्‍यावर वि.प.क्र.1 व 2 यांची सही व शिक्‍का आहे.  तसेच सदरचे चलनावर वाहन टाटा 207 DI No. MH-10-I-5465 नमूद आहे.  त्‍या कारणाने सदरचे वाहन वि.प.क्र.1 व 2 यांचे ताब्‍यात ता. 24/1/13 रोजी असून सदरचे वाहन वि.प.क्र.1 व 2 यांनी रक्‍कम रु.1,60,000/- ला मोहन दत्‍तात्रय जोशी यांचेकडून Buy back scheme ने घेतलेले होते.  त्‍याकारणाने सदरचे वाहनाशी वि.प.क्र.1 व 2 यांचा काहीही संबंध नाही ही वि.प.क्र.1 व 2 यांची कथने पुराव्‍यानिशी शाबीत होत नाहीत.  तथापि दाखल कागदपत्रांवरुन वि.प.क्र.1 ही कंपनी जुन्‍या गाडयाची Buy back scheme द्वारे एक्‍स्‍चेंज करुन त्‍यांचे व्‍यवहार करतात व सदरचे वादातील वाहन वि.प.क्र.1 व 2 यांनी Buy back scheme मध्‍ये घेतलेले होते.  त्‍याकारणाने या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प.क्र.1 ते 3 यांचे ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.1 च उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

8.    वर नमूद केलेले वाहन क्र.एमएच-10-आय-5465 वाहन 4 महिने वापरल्‍यानंतर ते मेनटेनन्‍स तसेच मायलेजसाठी परवडत नसल्‍याचे समजून आल्‍यावर तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडे तक्रार केली.  सदर वि.प. यांनी तक्रारदारांचे सदर खरेदी घेतलेले वाहन परत घेवून त्‍याबदल्‍यात वाहन एक्‍स्‍चेंज करुन चांगले वाहन देणेची हमी व खात्री तक्रारदार यांना दिली.  वि.प.क्र.1 ते 3 यांनी सदचे वाहनाची किंमत रु. 1,30,000/- ठरवून सदरचे वाहन जमा करुन घेतले व तक्रारदारास रु. 30,000/- दिले. उर्वरीत रक्‍कम रु. 1 लाख सदर वाहन विकलेवर परत देतो असे वि.प. यांनी तक्रारदारास आश्‍वासन दिले.  सदरची कथने तक्रारदारांनी पुराव्‍याचे शपथपत्रावर आयोगात केलेली आहेत.  वि.प. यांनी तक्रारदारास एक्‍स्‍चेंजकरिता आलेले Super S MH-09/CA-8061 हे वाहन दाखवले.  सदरचे वाहन कर्जरहित, निर्वेध, निष्‍कर्जी सांगून वि.प. यानी तक्रारदारास सदरचे वाहनाची रक्‍कम रु. 3,20,000/- सांगितली.  तक्रारदार आर्थिक अडचणीमध्‍ये असलेमुळे तक्रारदार यांनी त्‍यांचेकडील MH-09/BC-7008 हे वाहन एक्‍स्‍चेंज करुन वि.प. हे देणे लागत असलेल्‍या पूर्वीच्‍या मूळ व्‍यवहारातील रक्‍कम वजावट करावी असे सांगितले.  वि.प. यांना सदरचा व्‍यवहार मान्‍य झालेने वि.प. यांनी तक्रारदारांचे MH-09/BC-7008 या वाहनाची किंमत रु. 2,00,000/- ठरवून उर्वरीत रक्‍कम रु. 1,20,000/- रोखीने भरण्‍यास सांगितले.  त्‍यावेळी तक्रारदारांनी पूर्वीचे म्‍हणजे मूळ व्‍यवहारातील येणे रक्‍कम रु. 1,00,000/- वजा करता फक्‍त रु. 20,000/- देतो सांगितले असता प्रत्‍येक वाहनाचा व्‍यवहार वेगळा असतो असे वि.प. यांनी सांगितले.  त्‍याकारणाने तक्रारदारांनी स्‍वतःचे वाहन MH-09/BC-7008 हे वाहन रोख रु. 1,20,000/- वि.प. कडे जमा केले.  तदनंतर वि.प. यांनी तक्रारदारांना MH-09/CA-8061 वाहन ताब्‍यात दिले.  तथापि वाहन ताब्‍यात घेतलेवर कुलकर्णी यांनी सदर वाहनावर कायदेशीर हक्‍क सांगून वाहनाचे मूळ मालक असून श्रीराम ट्रान्‍स्‍पोर्ट सदर वाहनावर कर्ज आहे.  सदचे वाहन चेतन मोटर्सकडे एक्‍स्‍चेंज दिलेले होते.  त्‍यावेळी वि.प. यांनी सदरचे वाहन श्रीराम ट्रान्‍स्‍पोर्ट कंपनीचे कर्ज फेडून वाहन विक्री अशी नोटीस दिली होती.  वि.प. यांनी श्री कुलकर्णी यांना फायनान्‍स कंपनीचे असणारे कर्जफेडीपोटी लागणारा धनादेश दिला तथापि सदरचा धनादेश न वटता आलेचे कुलकर्णी यांनी तक्रारदारांना सांगितले.  त्‍याकारणाने वि.प. यांनी तक्रारदारास रक्‍कम रु.3,20,000/- या किंमतीस एक्‍स्‍चेंज केलेले Super S MH-09/CA-8061 वाहन परत करा व तुमचे पैसे त्‍वरित देतो असे सांगितले त्‍या कारणाने तक्रारदारांनी सदरचे वाहन वि.प. यांना परत केले.  वि.प. यांनी तक्रारदारास पूर्वीच्‍या व्‍यवहाराचे रु. 1,00,000/- व वाहनाची रक्‍कम रु. 3,20,000/- अशी एकूण रक्‍कम रु.4,20,000- चा चेक नं. 846099 ता. 10/10/2014 इंडस बँक शाखा कोल्‍हापूर दिला. तथापि सदरचा धनादेश वटला नाही.  सबब, वि.प. यांनी तक्रारदारास पूर्वीच्‍या व्‍यवहारातील रक्‍कम रु.1,00,000/- व वाहनाची रक्‍कम रु. 3,20,000/- अदा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी ता. 24/12/2014 रोजी एफ.आय.आर. नं. 115/2014 ची प्रत दाखल केली आहे.  तसेच अ.क्र.3 ला तक्रारदार यांनी मा. पोलिस अधिक्षक, कोल्‍हापूर यांना ता. 2/2/2015 रोजी वाहन परत मिळणेबाबत अर्ज केलेला आहे.  सोबत गुन्‍हा रजि. नं. 115/2014 ची प्रत जोडली आहे.  सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली  नाहीत.  त‍थापि वि.प.क्र.3 यांनी दि. 8/8/2017 रोजी म्‍हणणे दाखल केलेले असून तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे.  वि.प.क्र.3 यांनी तक्रारदार यांना कधीही कोणत्‍याही कायदेशीर देणेपोटी धनादेश दिलेला नव्‍हता असे कथन केले आहे.  वि.प.क्र.1 व 2 यांनी म्‍हणणे दाखल केले असून वि.प.क्र.3 राहिल मुजावर यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रु. 4,20,000/- चा चेक ता. 10/10/2014 रोजी दिलेचे दिसून यते.  यावरुन असे स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार व वि.प.क्र.3 यांचेदरम्‍यान व्‍यवहार होवून त्‍यांचेमध्‍ये परस्‍पर तडजोड झालेली आहे. वि.प.क्र.1 व 2 यांचा कोणताही व्‍यवहार केलेला नाही त्‍या कारणाने वि.प.क्र.1 व 2 यांचा कोणताही संबंध नाही असे कथन केले आहे.  तथापि दाखल कागदपत्रांवरुन सदरचे वादातील वाहन टाटा 207 DI MH-10/I-5465 ता. 24/1/2013 रोजी वि.प.क्र.1 व 2 यांचे Buy back scheme अंतर्गत वि.प.क्र.1 व 2 यांचे ताब्‍यात होते हे कागदपत्रांवरुन शाबीत होते.  तसेच तक्रारदारांनी ता. 7/3/18 रोजी मे. राज्‍य पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई यांचेकडे तक्रारदार यांनी केलेली तक्रार दाखल केलेली आहे.  तसेच रे.क्रि.के. नं. 32/2016 मधील श्री जोशी यांचे तक्रारदारांचे मुद्देमाल मिळणेसाठी अर्जास म्‍हणणे दाखल केले आहे.  सदरचे म्‍हणणेमध्‍ये सदर गाडीबाबत सांगली आर.टी.ओ. कार्यालयाकडून NOC ही चेतन मोटर्स सांगणेवरुन तक्रारदारांचे नावे चेतन मोटर्स यांचे ताब्‍यात दिली होती. त्‍याप्रमाणे चेतन मोटर्स यांनी सदरचे वाहन तक्रारदारांचे नावे या वि.प. करिता विक्री केलेचे दिसते.  विक्री झालेप्रमाणे नोंदणी दाखल्‍यावर अ‍र्जातील वाहन तक्रारदारांचे नावे दि. 24/5/13 रोजी नोंद झालेले आहे असे जोशी यांचे म्‍हणणेमध्‍ये नमूद आहे.  सबब, सदरचे कागदपत्रांवरुन वाहन क्र. 207 DI MH-10/I-5465 वि.प.क्र.1 ते 3 यांचे सांगणेवरुन तक्रारदारांचे ताब्‍यात दिलेले होते ही बाब सिध्‍द होते.

 

9.    अ.क्र.4 ला तक्रारदारांनी Sr.2152 वि.प.क्र.1 व 2 यांचेकडील Inventory check list  दाखल केलेली आहे.  सदरचे कागदपत्रांचे अवलोकन करता त्‍यावर Consumer Name तक्रारदारांचे नाव नमूद असून Vehicle Reg.No. MH 09-CA-8061 नमूद आहे.  सबब, सदर कागदपत्रांवरुन वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांचे वाहन क्र. MH-09/CA-8061 ची इन्‍व्‍हेंटरी चेक लिस्‍ट दिलेली होती.  सदरचे वाहन तक्रारदाराचे ताब्‍यात दिले होते ही बाब सिध्‍द होते.  सदरचे कागदपत्रे वि.प.क्र.1 व 2 यांनी नाकारलेली नाहीत.  सबब, दाखल कागदपत्रांवरुन वादातील वाहनाचे वि.प.क्र.1 यांच्‍या अधिकृत प्रिमायसेस मधून व्‍यवहार झालेचे समजून देखील सदर वि.प.क्र.1 यांनी संबंधीत वि.प.क्र.2 व 3 यांचेवर कोणतीही कारवाई केलेली नाही.  सबब, वि.प.क्र.1 यांचे संमतीने वि.प.क्र.2 व 3 यांनी Buy back scheme राबविलेली आहे व त्‍या अन्‍वये तक्रारदारांचे बाबतीत अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे ही बाब कागदपत्रांवरुन सिध्‍द होते.

 

10.   प्रस्‍तुतकामी तक्रारदारांनी प्रदीप कुलकर्णी यांनी वि.प. यांचेकडून वाहन खरेदी केलेची पावती दाखल केलेली आहे.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत अ.क्र.4 ला वि.प.क्र.3 यांनी तक्रारदारास ता. 10/10/2014 रोजी दिलेली रक्‍कम रु. 4,20,000/- च्‍या धनादेशाची झेरॉक्‍स प्रत दाखल केलेली आहे.  सदरचा धनादेश वि.प.क्र.3 यांनी नाकारलेला नाही.  सदरचे धनादेशाचे अवलोकन करता सदर धनादेशावर तक्रारदारांचे नाव नमूद असून सदरचा धनादेश क्र. 846099 ता. 10/10/2014 रोजीचा आहे.  सदरचा धनादेश वि.प.क्र.3 यांनी तक्रारदारांना दिलेला असून त्‍यावर रक्‍कम रु. 4,20,000/- नमूद आहे. त्‍याअनुषंगाने तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्राचे अवलोकन करता वि.प. हे माझे कामाचे ठिकाणी येवून विश्‍वासापोटी पूर्वीच्‍या व्‍यवहारातील देय रक्‍कम रु. 1,00,000/- व सदर वाहनाची रक्‍कम रु. 3,20,000/- अशी एकूण होणा-या रक्‍कम रु. 4,20,000/- चा धनादेश नं. 46099 ता. 10/10/2014 रोजीचा इंडसइंड बँकेचा धनादेश मला देवून गेले.  सदर रक्‍कम रु. 4,20,000/- चा धनादेश मी बँकेत भरला असता तो वटला नाही असे तक्रारदार यांनी पुराव्‍याचे शपथपत्रावर कथन केलेले आहे.  त्‍याकारणाने सदरची बाब आयोगास नाकारता येत नाही.

 

11.   सबब, वरील सर्व दाखल कागदपत्रांचा बारकाईने विचार करता तक्रारदारांचे वादातील वाहनाचा व्‍यवहार हा वि.प.क्र.1 यांचे अधिकृत प्रिमायसेस मधून झालेला असताना देखील सदर वि.प.क्र.1 यांनी संबंधीत वि.प.क्र.2 व 3 यांचेवर कोणतीही कारवाई केलेली नाही.  तसेच वि.प.क्र.1 चे संमतीने वि.प.क्र.2 व 4 यांनी वादातील वाहनासाठी Buy back scheme राबविलेली होती हे कागदपत्रांवरुन सिध्‍द होत असलेने सदरचे स्‍कीम अंतर्गत सदर वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  तसेच वि.प.क्र.3 यांनी तक्रारदार यांना दिलेला धनादेश वटला नसलेचे तक्रारदारांनी पुराव्‍याचे शपथपत्रात कथन केलेले आहे.  सबब, वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांचेकडून Buy back scheme अंतर्गत वादातील वाहनाचा व्‍यवहार करुन तसेच सदरचे Buy back वादातील वाहनाचा मोबदला तक्रारदार यांना आजतागायत अदा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे. सबब, मुद्दा क.1 व 2 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3      

 

12.   उपरोक्‍त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  सबब, तक्रारदार हे वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून संयुक्तिकरित्‍या सदर वादातील वाहनाचे व्‍यवहारापोटी रक्‍कम रु. 4,20,000/- मिळणेस पात्र आहेत.  तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल ता. 14/6/2017 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4

 

13.   उपरोक्‍त मुद्दा क्र.1, 2 व 3 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदारांनी वि.प.क्र.1 ते 3 यांना ता. 27/3/2017 रोजी नुकसान भरपाईची रक्‍कम देणेबाबत कायदेशीर वकीलामार्फत नोटीस पाठविली.  सदरचे नोटीसीची प्रत तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेली आहे.  तसेच सदरचे नोटीसीची रजि. ए.डी. पोहोच सदरकामी दाखल केलेली आहे.  सबब, सदरची नोटीस वि.प. यांना प्राप्‍त होवून देखील वि.प. यांनी तक्रारदारास कोणतेही नोटीसीस उत्‍तर दिलेले नाही.  त्‍याकारणाने सदरचे तक्रारीस सततचे कारण घडत असलेने तक्रारदारांची तक्रार मुदतीत आहे.  सबब, मुद्दा क्र.4 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.5

 

14.   उपरोक्‍त मुद्दा क्र.1, 2, 3, 4 मधील विवेचनाचा विचार करता वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदारांना सदरची तक्रार या आयोगात दाखल करणे भाग पडले. त्‍या कारणाने तक्रारदार हे वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून संयुक्ति‍करित्‍या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.5 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.6  -  सबब आदेश.

 

 

- आ दे श -

 

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प.क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना वादातील वाहनाचे व्‍यवहारांच्‍या खरेदीपोटी नुकसानभरपाईची रक्‍कम रु. 4,20,000/- अदा करावी. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 14/06/17 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.

 

  1. वि.प. क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- अदा करावी. 

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 
 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.