न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. प्रस्तुतची तक्रार स्वीकृत होवून जाबदार यांना नोटीस आदेश झाले. मात्र जाबदार मंचसमोर हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणेही दाखल केले नाही. सबब नि.1 वर त्यांचेविरुध्द “एकतर्फा” आदेश पारीत करण्यात आले. जाबदार ही वाहन खरेदी करणेकरिता कर्जाचा पुरवठा व देवाणघेवाण करणारी संस्था आहे व तक्रारदारांनी जाबदार संस्थेकडून आपले दुचाकी वाहन स्टार सीटी प्लस इ.एस. गोल्ड 110 सीसी गाडीचा रजि.नं. एम.एच. 09-इए 9438 या वर्णनाची दुचाकी रक्कम रु. 48,275/- इतक्या रकमेस खरेदी केलेली आहे व जाबदार संस्थेशी करार करुन अॅडव्हान्स रक्कम रु.19,585/- इतकी रक्कम भरलेली होती व करारानुसार रक्कम रु.2,004/- वेळोवेळी अशी एकूण रक्कम रु.26,179/- इतकी रक्कम कर्ज खात्यात जमा केली आहे. तथापि तक्रारदाराचे 2/3 हप्ते थकीत गेल्याने तक्रारदाराचे वाहन जाबदार यांनी ओढून नेले व विक्री करणेचेही प्रयत्नात असलेने तक्रारदारास तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
जाबदार ही वाहन खरेदी करणेकरिता कर्जाचा पुरवठा व देवाणघेवाण करणारी संस्था आहे व तक्रारदारांनी जाबदार संस्थेकडून आपले दुचाकी वाहन स्टार सिटी प्लस इ.एस. गोल्ड 110 सीसी गाडीचा रजि.नं. एम.एच. 09-इए 9438 या वर्णनाची दुचाकी खरेदी करण्याकरिता रक्कम रु.48,275/- इतक्या रकमेचे कर्ज जाबदार यांचेकडून घेतलेले आहे. सदर कर्जाचा हप्ता रक्कम रु.2,004/- इतका ठरलेला होता. तक्रारदाराने जाबदार संस्थेशी करार करुन अॅडव्हान्स रक्कम रु.19,585/- इतकी रक्कम भरलेली होती. तक्रारदारांनी कर्जापोटी रक्कम रु.26,179/- इतकी रक्कम वेळोवेळी फेड केली आहे. घरगुती अडचणीकरिता माहे जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये जादा खर्च झालेने तक्रारदार दोन ते तीन महिने कालावधीकरिता हप्ते भरु शकले नाहीत. त्यावेळी जाबदार यांनी तक्रारदारांना नोटीसा पाठविल्या. तदनंतर जाबदारांनी रक्कम रु. 22,609/- थकीत असलेबाबत तक्रारदारांना कळविले व सदरची संपूर्ण रक्कम न भरलेस योग्य ती कार्यवाही केली जाईल असे कळविले व त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता तक्रारदाराचे वाहन ओढून नेले आहे. सदरचे वाहन जाबदार विक्री करणेच्या प्रयत्नात आहेत. अशा प्रकारे तक्रारदाराचे वाहन बेकायदेशीरपणे ओढून नेवून जाबदारांनी सेवेत त्रुटी केली आहे. सबब, वादातील वाहन जाबदार यांचेकडून परत ताब्यात मिळावे, जाणे-येणेच्या खर्चापोटी रु.20,000/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत वाहनाचे आर.सी.टी.सी. बुक, तक्रारदार यांनी भरलेल्या रकमेचा खातेउतारा इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
4. जाबदार यांना नोटीस लागू होवूनही जाबदार हे मंचात हजरही नाहीत व त्यांनी आपले म्हणणेही दाखल केले नसलेने त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेचे दिसून येते.
5. तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
6. तक्रारदारांनी जाबदार संस्थेकडून आपले दुचाकी वाहन स्टार सिटी प्लस इ.एस. गोल्ड 110 सीसी गाडीचा रजि.नं. एम.एच. 09-इए 9438 या वर्णनाची दुचाकी रक्कम रु. 48,275/- इतक्या रकमेस खरेदी केलेली आहे व जाबदार संस्थेशी करार करुन अॅडव्हान्स रक्कम रु.19,585/- इतकी रक्कम भरलेली होती व करारानुसार रक्कम रु.2,004/- वेळोवेळी अशी एकूण रक्कम रु.26,179/- इतकी रक्कम कर्ज खात्यात जमा केली आहे. या संदर्भात तक्रारदाराने जाबदार संस्थेकडे हप्ते भरलेचा खातेउताराही दाखल केला आहे. व जाबदार यांनीही ही बाब मंचासमोर हजर होवून नाकारलेली नसलेने तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवा देणार व घेणार असे नाते प्रस्थापित झालेने ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) खाली तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4 एकत्रित
7. तक्रारदारांनी जाबदार संस्थेकडून आपले दुचाकी वाहन स्टार सिटी प्लस इ.एस. गोल्ड 110 सीसी गाडीचा रजि.नं. एम.एच. 09-इए 9438 या वर्णनाची दुचाकी रक्कम रु. 48,275/- इतक्या रकमेस खरेदी केलेली आहे व जाबदार संस्थेशी करार करुन अॅडव्हान्स रक्कम रु.19,585/- इतकी रक्कम भरलेली होती व करारानुसार रक्कम रु.2,004/- वेळोवेळी अशी एकूण रक्कम रु.26,179/- इतकी रक्कम कर्ज खात्यात जमा केली आहे. तक्रारदाराने जाबदारांकडून रक्कम रु.48,275/- इतके कर्ज घेतलेले आहे. सदरचे कर्जाची मुदत दि. 7/6/16 पासून ता. 7/5/2019 अशी एकूण 36 महिने आहे. तसेच तक्रारदाराने वाहन जप्त करुन दि. 17/1/18 रोजी नोटीस पाठविली असलेचे कथन तक्रारदारांनी केले आहे. दि. 3/11/17 रोजीही जाबदार यांनी नोटीस पाठविलेचे कथन तक्रारदार यांनी केले आहे. मात्र कोणतीही नोटीस तक्रारदाराने याकामी हजर केलेली नाही. तक्रारदार यांनी दाखल केले खातेउता-यावरुन माहे 7/11/17 पर्यंतचे हप्ते भरलेचे दिसून येते. तथापि माहे 7/6/16 पासून सदरचे हप्ते भरलेचे चेक्स Insufficient funds या शे-यानिशी वटले नसल्याचे दिसून येते. तथापि जाबदार यांनी नोटीस लागू होवूनही सदरची बाब मंचासमोर शाबीत केलेली नाही. सबब, तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांचा विचार हे मंच करीत आहे व जाबदार यांनी वाहन ओढून नेणेपूर्वी due procedure follow केली की नाही ही बाब मंचासमोर स्पष्ट होत नाही. इतकेच नव्हे तर सदरचे वाहन विक्री केले किंवा नाही याबाबतही हे मंच अनभिज्ञ आहे व तसा कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने मंचासमोर दाखल केलेला नाही. सबब, निश्चितच जाबदार मंचासमोर नसलेने त्यास अर्जातील सर्व कथने मान्य आहेत असे मंचाचे ठाम मत झाले आहे. सबब, जाबदारांनी कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता तक्रारदाराचे वाहन ओढून नेणे ही निश्चितच सेवात्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
8. तक्रारदारांचे कथनांचा विचार करता, तक्रारदाराचे तक्रारअर्जातील नमूद वाहन स्टार सिटी प्लस इ.एस. गोल्ड 110 सीसी रजि.नं. एम.एच. 09-इए 9438 हे वाहन जाबदार कंपनीने तक्रारदारास त्याचे थकीत कर्जाचे हप्ते भरुन घेवून परत करावे असे आदेश जाबदार यांना करणेत येतात व कर्जाची मुदतही 2019 पर्यंत असलेने कर्जाची मुदत संपेपर्यंत उर्वरीत हप्ते तक्रारदार यांनी जाबदार कंपनीचे नियमाप्रमाणे वेळेत भरावेत. तसेच तक्रारदाराने मानसिक व आर्थिक त्रासापोटी मागितलेली रक्कम रु.50,000/- ही या मंचास संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु. 2,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार टी.व्ही.एस.क्रेडीट सर्व्हिसेस यांनी तक्रारदार यांचेकडून थकीत कर्जाचे हप्ते भरुन घेवून सदरचे अर्जातील नमूद वाहन तक्रारदारास परत करावे व तक्रारदार यांनी पुढील कर्जाचे हप्ते वेळेत भरावेत.
3. जाबदार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.5,000/- मानसिक त्रासापोटी देणेचे आदेश करणेत येतात.
4. जाबदार यांनी तक्रारदार यांना अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
5. वर नमूद आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6. विहीत मुदतीत जाबदार यांनी आदेशाची पूर्तता न केलेस तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 खाली दाद मागणेची मुभा राहिल.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.