नि.31 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 31/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.29/06/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.15/10/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.अल्ताफ फकीर मोडक रा.फलॅट नं.3, तारामती संकुल, उद्यमनगर रोड, बाष्टे प्लाझाजवळ, रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1. आय.सी.आय.सी.आय. प्रुडेंशिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. करीता मॅनेजर, रत्नागिरी ऑफिस पत्ता – अपराध हॉस्पीटलजवळ, उद्यमनगर रोड, रत्नागिरी. 2. आय.सी.आय.सी.आय. प्रुडेंशिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. करीता मॅनेजर, ऑफिस – विनोद सिल्क मिल्स् कंपाऊंड, चक्रवर्ती अशोकनगर, अशोकरोड, कांदिवली पूर्व मुंबई 400 101. 3. आय.सी.आय.सी.आय. प्रुडेंशिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. करीता मॅनेजर, ऑफिस - आय.सी.आय.सी.आय. प्रु लाईफ टॉवर्स, 1089, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.फडके सामनेवालेतर्फे : विधिज्ञ सौ.आगाशे -: नि का ल प त्र :- अ) सदर कामी तक्रारदार यांनी विधिज्ञांसह उपस्थित होवून नि.30 वर पुरशीस दाखल केलेली आहे. ब) सदर पुरशीस खालीलप्रमाणेः- ‘‘प्रस्तुत कामी सामनेवाला यांनी तक्रारदारास त्याची हप्त्यापोटी भरुन घेतलेली पूर्ण रक्कम रुपये 50,000/- (पन्नास हजार मात्र) काही दिवसांपूर्वी चेकने परत केले आहेत. सदर चेकचे पैसे तक्रारदाराचे खात्यात जमा झाले आहेत. त्या अनुषंगाने उभयपक्षी बोलणी होऊन तक्रारदाराने सदर तक्रार अर्ज मागे घेण्याचे ठरवले आहे. सबब या कामी तक्रारदारास सदरचा तक्रार अर्ज यापुढे चालविणेचा नाही. ’’ याप्रमाणे पुरशिस आहे. क) सदर पुरशिसच्या अनुषंगाने प्रस्तुतचा तक्रार अर्ज निकाली करणेत येतो. रत्नागिरी दिनांक : 15/10/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| | [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |