ग्राहक तक्रार क्र. : 251/2014
दाखल तारीख : 17/11/2014
निकाल तारीख : 14/03/2016
कालावधी: 01 वर्षे 02 महिने 22 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. रमेश मारुती लबडे,
वय – 35 वर्षे, धंदा – शेती,
रा.महादेववाडी, ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मॅनेजर, कस्टमर केअर डिपार्टमेंट,
कृषिधन सिडस प्रा.लि. कृषीधन भवन,
डी-3 ते डी-6, अॅडीशनल एम.आय.डी.सी. एरीया,
औरंगाबाद रोड, जालना-431213.
1. महंमद शफीउल्ला शहा,
प्रो.प्रा. शहा कृषि सेवा केंद्र,
बेंबळी, ता.जि.उस्मानाबाद-413501. ...विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.व्हि.पी.भोसले.
विरुध्द पक्षकारा क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.एन.व्हि.मनियार.
विरुध्द पक्षकारा क्र.2 तर्फे विधीज्ञ : श्री.के.ए.शेख.
आदेश
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा :
1) सदर ग्राहक त.क्र.251/2014 मंचात दि.17/11/2014 रोजी दाखल केलेली असून सदर प्रकरणात दि.23/02/2016 रोजी उभयतांनी पुरसिस दाखल केली आहे. सदर पुरसिस नुसार सदर प्रकरणी तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांच्यात न्यायालयाबाहेर आपसात तडजोड झाली असून विप यांनी नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले असल्याने सदर प्रकरण तक्रारदार चालवू इच्छीत नाही अशी विनंती करण्यात आलेली आहे. म्हणून सदर प्रकरण तडजोडीने मंजूर करुन निकाली काढण्यात येते.
आदेश
1) तक यांची तक्रार तडजोडीने मंजूर करण्यात येते.
2) तडजोड हा आदेशाचा भाग समजण्यात यावा.
2) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराने परत न्यावेत
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (श्रीमती विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
tyle='color:black;mso-bidi-language:MR'> उस्मानाबाद.