::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 9/05/2019)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
तक्रारकर्त्याने वि.प.यांचेकडे अर्ज केल्यानंतर दि.7/5/2007 रोजी त्यांनी निवासी वापराकरीता विज कनेक्शन दिले असून त्याचा ग्राहक क्र. 450010522361आहे तक्रारकर्त्याकडे 4 खोल्या जरी असल्या तरी विजेचा वापर अतिशय कमी आहे तक्रारकर्त्याने दि.22/7/2017 चे 261 युनिट वीज वापराचे रु.2170/-चे वि.प.यांनी पाठवलेले विजदेयकाचा भरणा केल्यानंतर वि.प. यांनी तक्रारकर्त्याकडील विजमिटर कोणतीही सूचना न देता अथवा मिटर बदलविण्याचा कोणताही पंचनामा न करता तक्रारकर्त्याचे माघारी परस्पर बदलविल्याचे हे दि.24/8/2017 चे 348 युनिट सरासरी आकारणीचे रु.2770/-वि.प.यांनी पाठवलेले वीजदेयकावरून कळले . वि.प.यांनी तक्रारकर्त्या कडील मिटरचे वाचन उपलब्ध असतांनाही दि.25/10/2017 ते दि. 24/03/2018 या कालावधीकरिता सरासरी आकारणी केलेले देयके पाठविले या सर्व वीज देयकाचा भरणा तक्रारकर्त्याने मुदतीत केला आहे त्यानंतर वि.प.यांनी दि.25/4/2018 चे रक्कम रु.2440/-चे पाठविलेल्या देयकामध्ये मीटरमध्ये चालू रीडिंग व मागील रीडिंग शून्य दर्शविले असून तक्रारकर्त्याचा वीज वापर उणे 5362 युनिट झाल्याचे दर्शवले व समायोजित युनिट 5662 दाखवून तक्रारकर्त्यास 300 युनिटची आकारणी केली या देयकाचा भरणा सुद्धा मुदतीत केला आहे त्यानंतरदि. 23/5/2018 रोजी वी.प.यांनी 45,860/-चे एकूण 6473 य़ूनिट वीज वापराचे वादातील देयक पाठवले सदर देयकामध्ये मागील रीडिंग 12/4/2018 चे तर चालू रीडिंग दि.16/5/2018 चे 811 असे दर्शवले असून 5662 समायोजित युनिट दर्शवून एकूण 6473 युनिटचे आकारणी तक्रारकर्त्यावर लादली आहे वि.प.यांनी उपरोक्त दोन्ही देयकामध्ये 5662 युनिटची आकारणी करून एकूण 11224 युनिटची आकारणी तक्रारकर्त्यावर समायोजित युनिट म्हणून लादलेली आहे दि.16/5/2018 रोजीच्या मिटरचे वाचन 811युनिट होते व जुलै 2017 मध्ये लावलेल्या मिटरचे वाचन 0 होते असे जर गृहीत धरले तरी 10 महिन्याचे कालावधीचे दि. 16/5/2018 पर्यंत तक्रारकर्त्याचा वीज वापर फक्त 811 झालेला आहे तक्रारकर्त्याने जुलै2017 पूर्वी वि.प.यांचेकडे वीज मिटर नादुरुस्त आहे अशी तक्रार केली नव्हती व तक्रारकर्त्याचे वीज मिटर नादुरुस्त आहे असे वि. प.यांचे म्हणणे नव्हते दि.22/7/2017 पर्यंत अर्जदारास नियमितपणे मिटर वाचनाचे देयक प्राप्त झाले असलेल्या जुलै 2017मध्ये वीज मिटर बदलविल्याचे कोणतेही कारण नव्हते दस्त क्र अ. 10 दि.16/5/2018 चे वीज देयक प्राप्त झाल्यानंतर तक्रारकर्त्याने दि.26/6/2018 रोजी वि.प.यांचेकडे तक्रार दिली असता त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही व तक्रारकर्त्यास दि.22/6/2018चे रु55,180 /-चे 762युनिट वीज देयक पाठवले यामध्ये दस्त क्र .अ 10 वादातील देयकामध्ये रक्कम समाविष्ट असल्यामुळे तक्रारकर्त्याने या देयकाचा भरणा केला नाही त्यानंतर वि.प.यांनी दि 22/6/2018 रोजी तक्रारकर्त्यास पत्र पाठवून विज देयकाचा भरणा करण्यास सुचित केले वि.प.यांनी वादग्रस्त विजदेयकात कोणतीही दुरुस्ती बदल न केल्याने तक्रारकर्त्याने सदर वीज देयकाचा भरणा केला नाही वि. प.यांनी दोन वेळा 5662 युनिटची अतिरिक्त आकरणी लादली आहे वि. प. विजपूरवठा खंडित करण्याची धमकी देत आहे
सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष गैरअर्जदाराविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, वि. प. यांनी 23/5/2018 रोजीचे रु.45,860 /-चे पाठवलेले वीज देयक रद्द करण्यात यावे तसेच सदर देयकातील वा त्याचे थकबाकीकरीता विजपूरवठा खंडित करू नये असे आदेश वि.प. यांना द्यावे तसेच शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.20,000/- व तक्रार खर्च रू.10,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांला द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
2. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्षां विरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष हजर होवून त्यांनी लेखी उत्तर दाखल करून त्यामध्ये दिनांक दि.7/5/2017 रोजी तक्रारकर्त्याकडे वीज विज कनेक्शन जोडणी करून दिले ,वि.प.यांनी तक्रारकर्त्यास दि.22/7/2017चे 261 युनिट वीज वापराचे रु.2170/-चे व त्यानंतर दि. 25/4/2018 चे रु.2440/-वीज देयक व दि.23/5/2018 चे रु. 45,860/-चे एकूण 6473 युनिट वीज वापराचे वादातील देयक तक्रारकर्त्यास पाठविले वि.प.यांनी दि.26/6/2018 रोजी पाठविले पत्र तक्रारकर्त्यास प्राप्त झाले व सदर पत्रान्वये तक्रारकर्त्यास विजदेयकाचा भरणा करण्यास सूचित केले या बाबींबाबत वाद नाही असे नमूद करून तक्रारकर्त्याचे तक्रारीतील उर्वरित कथन नाकबूल करून पुढे नमूद केले कि वास्तविक्त: ऑगस्ट 2017 रोजी तक्रारकर्त्याकडील जुने वीज मिटर बदली करण्यात आले परंतु त्याची नोंद संगणकीय प्रणालित झाली नसल्यामुळे तक्रारकर्त्याला सरासरी युनिटचे देयके देण्यात आली तक्रारकर्त्यास ऑगस्ट 2017 ते मार्च 2018 या कालावधीकरीता युनिट 348 चे सरासरी देयके देण्यात आली तसेच माहे एप्रील 2018 चे 300 युनिट करीता देयक देण्यात आली व त्यानंतर दि.12/4/2018 रोजी तक्रारकर्त्याकडील वीज मिटर सुद्धा बदली करण्यात आले सदर संगणकीय प्रणालीत नोंद झाल्यावर तक्रारकर्त्यास एक महिन्याचा वापर 811 युनिट व मागील सरासरी देयकाचे कालावधीतील वीज वापर असे मिळून 10 महिन्याचे सदर देयक देण्यात आले सदर देयकात तक्रारकर्त्याने सरासरी देयकापोटी भरणा केलेली रक्कम रु. 25,109/ वळती करून रु.46,440/- चे देयक देण्यात आले व सदर बाब तक्रारकर्त्यास दि.22/6/2018 चे पत्रान्वये कळविले ज्या काळात तक्रारकर्त्यास सरासरी स्वरूपाचे देयक देण्यात आली त्या कालावधीत तक्रारकर्त्याने विजेचा वापर केला नाहीं असे तक्रारकर्त्याचे म्हणणे नाही तक्रारकर्त्यास दिलेले वीज देयक योग्य वापराचे असून सदर वीज देयक तक्रारकर्ता भरण्यास जबाबदार आहे .सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे अशी विनंती केलेली आहे.
3. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, तक्रारितील मजकूर व दस्तावेज यालाच तक्रारकर्त्याचा लेखी युक्तीवादसमजण्यात यावा अशी नि.क्र.18वर पुर्सीस दाखल तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे ,रिजॉईंडर शपथपत्र, लेखीयुक्तीवाद, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती न्युनता पूर्ण सेवा दिली आहे : होय
काय ?
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
| | कारण मिमांसा मुद्दा क्र.1 बाबत :- 4. तक्रारकर्त्याने निवासी वापराकरीता विरूध्द पक्ष यांचेकडून विद्युत पूरवठा घेतला व तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये माहे मे,2018 चे विजदेयकांबाबत वाद आहे. तक्रारकर्त्याने नि.क्र.4 वर दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दिनांक 7/5/2007 रोजी विजपुरवठा दिला. विरुद्ध पक्ष यांनी ऑगस्ट 2017 व त्यानंतर दि. 12.4.2018 असे दोन वेळा तक्रारकर्त्याकडील विज मीटर बदलविले आपले लेखी उत्तरामध्ये परी. क्र.11मध्ये नमूद केले आहे परंतु मिटर बदलीनंतर सुद्धा दि. 22/9/2017, दि.25/10/2017 चे वीज देयकांमध्ये आर. एन.ए . दर्शविले, दि.23.2.2018 व दि. 24.3.2018 या दोन्ही देयकांमध्ये चालू व मागील रीडिंग 29404 दर्शविले तसेच दि. 25/4/2018 चे विजदेयकामध्ये चालू व मागील रीडिंग दर्शविलेले नाही तक्रारकर्त्याने दि. 26/6/2018 रोजी वि.प.यांना लेखी तक्रार देऊन सुद्धा विरुद्ध पक्ष यांनी मागील रीडिंग पुढे समायोजित करून तक्रारकर्त्यास सुधारित विजदेयक विवरणासह दिलेले नाही तसेच जुने मिटर तपासणीकरिता पाठवलेले नाही.शिवाय नवीन विद्युत मिटर बसविले तेव्हा ही प्रक्रिया विरूध्द पक्षाने तक्रारकर्ता अथवा त्याचे कुटूंबातील जबाबदार व्यक्तीसमक्ष केल्याचा कोणताही दस्तावेज वा पुरावा गैरअर्जदाराने दाखल केलेला नाही. वरील सर्वबाबी विरूध्द पक्षाचे सेवेतील न्युनता दर्शवितात. त्यामुळे मंचाचे मते तक्रारकर्ता दि. 23/5/2018 चे विवादीत देयक रद्द करून त्याऐवजी नियमानुसार सुधारीत देयक मिळण्यांस तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासपोटी तो विरूध्द पक्षाकडून यथोचीत नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहे. सबब, मुद्दा क.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 2 बाबत :- 5. मुद्दा क्र. 1 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश |
|
| |
| |
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.97/2018 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे दिनांक 23/5/2018 चे विजदेयक रद्द करून तक्रारकर्त्याने अंतरीम आदेशानुसार भरलेल्या रकमेचे समायोजन करून सुधारित विजदेयक तक्रारकर्त्यास द्यावे व तक्रारकर्त्याने सदर वीज देयकाचा भरणा करावा.
(3) विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रू.20,000/- व तक्रार खर्च रू.5,000/- द्यावा.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.