Maharashtra

Chandrapur

CC/18/178

Shri Waman Maniram Doharkar - Complainant(s)

Versus

Maharashtra Rajya vij vitaran Company Ltd through Deputy Engineer - Opp.Party(s)

Adv.R.Dolkar

20 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/178
( Date of Filing : 03 Nov 2018 )
 
1. Shri Waman Maniram Doharkar
R/O.Heti,Post- sheraj,Tah-Korpana,Dist-Chandrapur
chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Maharashtra Rajya vij vitaran Company Ltd through Deputy Engineer
Gadchandhur,Tah-Korpana,Dist-Chandrapur
chandrapur
maharashtra
2. Maharashtra Rajya vij vitaran Company Ltd through Junior Engineer
Korpana.Tah-Korpana,Dist-Chandrapur
chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 20 Apr 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्‍पना जांगडे (कुटे), मा. सदस्‍या,)

                      (पारीत दिनांक २०/०४/२०२२)

 

                       

  1. प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२  अन्‍वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालिलप्रमाणे. 
  2. तक्रारकर्त्‍याची मौजा शेरज बु. तह कोरपणा येथे ३ एकर शेतजमिन आहे. तक्रारकर्त्‍याने शेतीमध्‍ये बोअरवेल बनविली आहे. शेतीला पाणी देण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने दिनांक १/१२/२०१५ रोजी विद्यूत कनेक्‍शन व विद्यूत मोटार पंप बसविण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांच्‍या कार्यालयात अर्ज केला.  त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी ३ एच.पी. मोटारीचे विद्यूत कनेक्‍शन करिता दिलेली डिमांड पावतीनुसार तक्रारकर्त्‍याने रुपये ५,२००/- चा भरणा केला होता. भरणा केल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक ४/१/२०१७ रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या   शेतजमिनीवरील विद्यूत पोलवरुन त्‍याच्‍या बोरवेलसह ३ एच.पी. मोटारीला विद्यूत कनेक्‍शनची जोडणी करुन विद्यूत पुरवठा सुरु करुन दिला होता. विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे विद्यूत मीटर उपलब्‍ध नसल्‍यामुळे  सदर कनेक्‍शनचे विद्यूत मीटर तक्रारकर्त्‍याच्‍या शेतात लावून देण्‍यात आले नाही. विरुध्‍द पक्ष यांनी विद्यूत जोडणी केल्‍यानंतर त्‍या स्थितीमध्‍येच तक्रारकर्त्‍याने दिनांक २५/१०/२०१८ पर्यंत विजेचा वापर केला. विरुध्‍द पक्ष यांनी विद्यूत पुरवठा सुरु केल्‍यापासून आजपर्यंत तक्रारकर्त्‍याच्‍या शेतामध्‍ये तक्रारकर्त्‍याने विनंती केल्‍यानंतरही विद्यूत मीटर लावून दिले नाही. तसेच दिनांक २५/१०/२०१८ पर्यंत कोणतेही वीज देयक दिले नाही. दिनांक २४/१०/२०१८ रोजी  विरुध्‍द पक्ष यांचे २ ते ३ कर्मचारी तक्रारकर्त्‍याच्‍या शेतात दुपारी आले व कोणतीही लेखी आणि तोंडी पूर्वसूचना न देता तक्रारकर्त्‍याचे शेतातील ३ एच.पी. मोटरचे विद्यूत कनेक्‍शन बंद करुन काढून घेतले त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याच्‍या शेतातील कापुस/पराटी या पिकांना पाणी देणे सुरु होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना विदयूत कनेक्‍शन बंद केल्‍याचे कारण विचारले असता त्‍यांनी काहीही माहिती दिली नाही आणि विद्यूत कनेक्‍शन सुरु करुन देण्‍याची विनंती केल्‍यावरही सुरु करुन दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता आणि त्‍यांचा मुलगा दिनांक २४/१०/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांच्‍या कार्यालयात गेले आणि विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यूत कनेक्‍शन बंद केल्‍याबाबत माहिती देवून विदयूतपुरवठा सुरु करुन देण्‍याबाबत विनंती केली परंतु त्‍यांनी सदर कनेक्‍शन सुरु करुन देण्‍याचे अधिकार विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडे असल्‍याचे सांगितले. दिनांक २५/१०/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक २  यांनी तक्रारकर्त्‍याला जुर्ले २०१८ चे चालु रिडिंग चे रुपये ५,४९०/- चे संगणकीय वीज देयक दिले परंतु देयकावर पेनाने रुपये १०,०००/- एवढी रक्‍कम लिहून होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍या कार्यालयात जावून त्‍यांना उपरोक्‍त देयकाची रक्‍कम जास्‍त असल्‍याने कमी करण्‍याबद्दल व रक्‍कम भरण्‍याकरिता मुदत मागितली होती आणि विद्यूत पुरवठा आठ दिवसापासून बंद असल्‍याने शेतातील मालाचे नुकसान होत आहे त्‍यामुळे विद्यूत पुरवठा पुर्ववत सुरु करुन देण्‍याची विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याची मागणी फेटाळून लावली व वीज देयकाची पूर्ण रक्‍कम भरल्‍यानंतर विद्यूत पुरवठा सुरु करुन दिला जाईल असे सांगितले. परंतु तक्रारकर्त्‍याकडे एवढी रक्‍कम नसल्‍यामुळे ते भरणे शक्‍य झाले नाही. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडून  विद्यूत पुरवठा सुरु करण्‍याची विनंती केल्‍यावरही विद्यूत कंपनीने विद्यूत मीटर लावून सुरु करुन दिले नाही, ही त्‍यांच्‍या  सेवेतील न्‍युनता असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांच्याविरुध्‍द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याकडील विद्यूत मीटर लावून विद्यूत पुरवठा पूर्ववत करुन देण्‍याचे निर्देश द्यावे तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रुपये ९०,०००/- व त्‍यावर १८ टक्‍के व्‍याज देण्‍योच आदेशीत व्‍हावे.  
  3. तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ विरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ हे आयोगासमक्ष हजर होवून त्‍यांनी आपले सयुंक्‍त लेखी उत्‍तर दाखल करुन त्‍यामध्‍ये नमूद केले की, तक्रारकर्त्‍याचे शेतामध्‍ये ३ एच.पी. मोटारीचे विद्यूत कनेक्‍शन घेण्‍याकरिता डिमांड पावती नुसार दिनांक २५/०१/२०१६ रोजी रुपये ५,२००/- चा भरणा केला होता व त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याचा हा ग्राहक क्रमांक ४५५३५०००११३९ आहे.  दिनांक ४/१/२०१७ रोजी विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याचे शेतजमिनीमधील विद्यूत पोलवरुन शेतातील बोअरवेलसह ३ एच.पी. मोटारीला जोडणी करुन सुरु केले, याबाबत वाद नाही आणि तक्रारकर्त्‍याचे उर्वरित कथन नाकबूल करुन पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या शेतामध्‍ये विद्यूत जोडणी करतेवेळी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे शेतात विद्यूत मीटर लावून दिले होते व त्‍यानंतर विद्यूत पुरवठा सुरु करण्‍यात आला होता परंतु तक्रारकर्त्‍याने त्‍यानंतर मीटर कधी काढून नेले याची कल्‍पना नव्‍हती. परंतु अचानक दिनांक २४/१०/२०१८  रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे विद्यूत वाहिनी सुव्‍यवस्‍थेच्‍या कामाकरिता कर्मचारीसोबत तक्रारकर्त्‍याचे शेत असलेल्‍या परिसराकडे गेले होते. त्‍यावेळी विद्यूत वाहिनीला सर्व्हिस वायर जोडून रस्‍त्‍यावरुन तक्रारकत्‍याचे शेतातील मोटारपंपला जोडलेला असल्‍याचे विरुध्‍द पक्ष यांना आढळले व त्‍या रस्‍त्‍याने कापसाने भरलेली वाहने जाणे येणे करण्‍याकरिता कापसाला आग लागून अपघात होऊ नये म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे पंचनामा करण्‍याकरिता गेले असता त्‍यावेळी तेथे त्‍यांना विद्यूत मीटर आढळले नाही. तक्रारकर्त्‍याचे मुलाला याबाबत विचारले असता त्‍यांनी विद्यूत मीटर घरी आहे असे सांगितले. तक्रारकर्त्‍याने  वीज चोरी करण्‍याच्‍या हेतुने विद्यूत मीटर बेकायदेशीर घरी घेवून गेले आणि वीज चोरी व विना विद्यूत मीटरने विजेचा वापर केला. तक्रारकर्त्‍याने तडजोड करण्‍याची तयारी दर्शविल्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द वीजेच्‍या चोरीबाबत कलम १३५ अन्‍वये गुन्‍हा दाखल केला नाही परंतु तक्रारकर्ताने त्‍याचा गैरफायदा घेवून विरुध्‍द पक्ष यांचे विरुध्‍द आयोगासमक्ष खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्ता हा आयोगाचे दिशाभूल करील असल्‍यामुळे सदर तक्रार खर्चासह खारीज करण्‍यास पाञ आहे.
  4.  तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार, दस्‍तावेज, मुळ तक्रारीलाच शपथपञ समजण्‍यात यावे अशी पुरसिस दाखल तसेच लेखी युक्तिवाद, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी उत्‍तर, दस्‍तावेज, शपथपञ आणि लेखी युक्तिवाद आणि उभयपक्षांचा तोंडीयुक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले व त्‍याबाबतची कारणमीमांसा आणि निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे.

 

    अ.क्र.                 मुद्दे                           निष्‍कर्षे

 

   1. विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याप्रति                         नाही                    

     न्‍युनतापूर्ण सेवा दिली आहे काय

   2. आदेश कायॽ                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •  

मुद्दा क्रमांक १ बाबतः-

   5.   तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे. प्रस्‍तुत तक्रारीत विरुद्धपक्षांनी  तक्रारकर्त्‍याच्‍या शेतामध्‍ये बोअर सह ३ एचपी मोटारीची विदयुत जोडणी करुन विदयुत पुरवठा सुरु करुन दिला परंतु विजमिटर लावुन दिले नाही याबाबत उभयपक्षांत वाद आहे.तक्रारीत दाख्‍ल दस्‍तावेजांचे अवलेाकन केले असता असे निदर्शनास येते की, दि.२४/१०/२०१८ रोजी विरुध्‍द  पक्षांचे कनिष्‍ठ अभियंता बाखले हे त्‍यांचे सहकर्मचारी शेरेकर यांचे सोबत हेटी या गावात रोहित्राचे व डिस्ट्रीब्‍युशन बॉक्सचे दुरुस्‍ती करिता गेले त्यावेळी बॉक्‍स जळण्‍याचे कारण तपासण्‍याकरीता जवळ असणा-या शेतक-यांकडच्या विदयुत संच मांडणीची तपासणी केली तेव्‍हा हेटी-शेरज या गाव रस्‍त्‍यावर काळया रंगाची वायर ही तीन फेज लघु दाब वाहिनीवर जोडलेली त्‍यांना आढळली परंतु जीआय वायरने न बांधता ती वायर जवळच्‍या झाडावरुन वेटोळे मारुन काटेरी झुडुपात मोटर-स्‍टार्टर, किटकॅट आढळला, परंतु मिटर जोडलेले नव्‍हते. याबाबत विचारणा केली असता सदर शेत तक्रारकर्त्‍याच्‍या मालकीचे आहे असे तक्रारकर्त्‍याच्‍या मोठया मुलाने सांगितले तसेच तक्रारकर्त्‍याने शेती  पंपाकरिता डिमांड भरलेली आहे व मिटर घरी आहे व सोबतच मिटर जोडणी न करता विज डायरेक्‍ट घेतली याची सुध्‍दा कबुली दिली. या वायरामुळे विदयुत अपघाताची शक्‍यता होती व नागरिकांच्‍या जिवितास धोका निर्माण होईल म्‍हणुन विरूध्‍दपक्षांच्या अभियंत्‍याने सदर काळया रंगाची वायर मिटरची संच मांडणी व्‍यवस्थित होईपर्यंत जनमित्र शेरेकर यांना केबल काढण्‍याचे आदेश दिले व तात्‍पुरता विज पुरवठा खंडित केला. त्‍यांनतर दि.१८/११/२०१८ रोजी विरुद्ध पक्षांचे अभियंता यांनी  तक्रारकर्त्‍याच्‍या घरी जाउुन त्‍याच्‍या घरी असलेले क्रं.०२४८२११६ चे मीटर त्याचा मुलगा सुनिल दोहारकर कडुन हस्‍तगत केले व नंतर तक्रारकर्त्‍याच्‍या शेतामध्‍ये जाऊन उपरोक्‍त मिटर क्रमांकाची नविन विदयुत जोडणी करुन दिली असे विरुध्‍द पक्षांनी दि.२३/१०/२०१९ रोजी दाखल केलेल्‍या शेतामधील तसेच घरी केलेला असे दि.२४/१०/२०१८ दस्‍त क्र.ब-१  व दि.१८/११/२०१८  ब-३ वर दाखल  घटनास्‍थळ पंचनामा मध्ये नमूद आहे. यावरुन विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याच्‍या शेतामध्‍ये दिनांक ४/१/२०१७ रोजीच ३ एचपी मोटारीची विदयुत जोडणी करुन विजमिटर लावुन विज पुरवठा सुरु करुन दिला होता परंतु तक्रारकर्त्‍याने मिटर काढुन घेतले व डायरेक्‍ट कनेक्‍शन घेतल्‍याचे निदर्शनास आल्‍याने अपघात होऊ नये म्‍हणुन तात्‍पुरता विज पुरवठा खंडित केला व आयोगाच्‍या दिनांक ६/११/२०१८ चे अंतरीम आदेशानंतर तक्रारकर्त्याने वीज देयकाचा भरणा केल्यानंतर   दि.१८/११/२०१८ रोजी विरूध्‍दपक्षांनी, तक्रारकर्त्‍याकडून हस्तगत केलेला विजमिटर  लावुन विदयुत पुरवठा पुन्‍हा पुर्ववत सुरु करून  दिला त्‍यामुळे विरूध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍यास कोणतीही त्रुटीपूर्णसेवा दिलेली नाही या निष्‍कर्षावर आयोग आलेले आहे. सबब मुद्दा क्र. १ चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक २ बाबतः-

  1.  

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. १७८/२०१८ खारीज करण्‍यात येते.
  2. प्रस्‍तूत तक्रारीत दिलेला अंतरीम आदेश निष्‍प्रभ करण्‍यात येतो.
  3. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  4. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.

 

 

 

 

     (किर्ती वैद्य (गाडगीळ))     (कल्‍पना जांगडे (कुटे))       (अतुल डी. आळशी)

            सदस्‍या                सदस्‍या                  अध्‍यक्ष

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.