Maharashtra

Chandrapur

CC/16/129

Said Khan Hazi Mohamad Alli Khan - Complainant(s)

Versus

Maharash Rajya vij vitaran company Ltd through sub Ex engineer Rajura - Opp.Party(s)

Adv. Kullarwar

09 May 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/16/129
( Date of Filing : 21 Nov 2016 )
 
1. Said Khan Hazi Mohamad Alli Khan
At Rajaura
chandrapur
maharshtra
...........Complainant(s)
Versus
1. Maharash Rajya vij vitaran company Ltd through sub Ex engineer Rajura
At Rajura
chandrapur
mahrashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 09 May 2019
Final Order / Judgement

::: नि का :::

   (मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. कल्‍पना जांगडे (कुटे) मा.सदस्‍या)

(पारीत दिनांक :- 09/05/2019)

 

        तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.  सदर तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे.

2.     तक्रारकर्त्‍याने निवासीवापराकरीता विरूध्‍द पक्ष  यांचेकडून दि.6/3/2014 रोजी विज कनेक्शन घेतले व  त्यांचा ग्राहक क्र. 456538049305 हा  असून तक्रारकर्ता त्याचा वापर त्यांचे नविन राहत्या घरी करतो. तक्रारदाराने नविन विज कनेक्शन घेतल्यानंतर विरूध्‍द पक्षांकडून विजदेयक न आल्यामुळे वी.प.कडेचौकशी केली असता  त्यांनी सांगितले की नविन विज कनेक्शन घेतल्यावर देयक यायला 5 ते 6 महिने कालावधी लागतो त्यामुळे तक्रारकर्त्‍याने  विरूध्‍द पक्ष  यांचे कडे विजदेयका करिता पाठपुरावा केला नाही. परंतु विरूध्‍दपक्ष यांचेकडून जानेवारी 2015 पर्यंत विजदेयक न आल्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्‍द पक्ष  यांचे कडे  चौकशी केल्यानंतर त्यांनी तक्रारकर्त्‍यास कोणताही हिशोब व मीटरचे रिडींग न लिहीता दि.09/01/2015 रोजी4,680/- चे हस्तलिखीत  देयक बनवून दिले व त्यांचा भरणा तक्रारकर्त्‍याने  विरूध्‍द पक्ष यांचेकडे दि.21/1/2015 रोजी केला.  विरूध्‍द पक्ष  त्यांनी तक्रारकरर्त्‍यास दि.19/09/2015 रोजी रू.15,762/-थकबाकी असलेले देयक दिले त्यांचा सुद्धा भरणा दि.28/09/2015 रोजी केला. तक्रारकर्त्‍याकडे दिनांक 28/9/2015 रोजी कोणतीही थकबाकी नव्हती. त्यानंतर दि. 20/10/2015  ते दि. 15/06/2016 पर्यंत 10 महिन्याचा सर्व  देयकाचा नियमित भरणा विरुद्ध पक्ष यांचेकडे केला. विरूध्‍द पक्ष यांनी दि. 20/8/2016 चे रु.76380/- चे वीज देयक पाठविले त्यामध्ये रु.12,260/- थकबाकी व चालू वापर रु.64,653/- दर्शविले वीज कनेक्शन घेतल्यापासून तक्रारकर्त्‍याचा जुलै, 2016 पर्यंत कधीही एवढा जास्त वीज वापर नसल्याने त्यांनी विरुद्ध पक्ष यांचे कार्यालयात तक्रार केली असता त्‍यांनी मिटर नादुरुस्त आहे त्यामुळे चेक करण्याकरिता अर्ज करण्यास सांगितल्यामुळे तक्रारकर्त्याने अर्ज केला असता त्यांचेकडून मिटर चेक करण्याकरिता रु.500/- चार्जेस घेतले तक्रारकर्त्याचा वीज वापर सरासरी कमी आहे असे गृहीत धरून तक्रारकर्त्यास दि.20/08/2016  चे रु. 7,500/-चे विजदेयक दुरुस्त करून दिले असता तक्रारकर्त्याने त्याचा भरणा विरूध्‍द पक्ष  यांचेकडे केला विरूध्‍द पक्ष  यांनी आजपर्यंत तक्रारकर्त्‍यासमक्ष नादुरुस्त मिटरची तपासणी केली नाही किंवा समांतर नवीन वीजमिटर लावून तक्रारकर्त्याचा विजवापर किती होतो याची खात्री केली नाही यानंतर विरूध्‍द पक्ष  यांनी अनुक्रमे दि.19/09/2016 व दि.17/10/2016 चे 1599 युनिट वीज वापराचे रु.91,240/- व रु.92,830/-चे वीजदेयक तक्रारकर्त्यास पाठ्विले. मिटर सुस्थितीत ठेवणे व मिटर वाचनाप्रमाणे वीज देयक देण्याची जबाबदारी विरूध्‍द पक्ष .यांची असतांना ऑगस्‍ट २०१६ पासून विरूध्‍द पक्ष  यांनी तक्रारकर्त्‍यास कोणताही हिशोब नसलेले थकबाकी नसताना थकबाकी दर्शवून चुकीचे देयक पाठवीत आहे व चुकीच्या वीज देयकाकरिता विजपूरवठा खंडित करण्याची धमकी देत आहे.त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.17/11/2016 रोजी अधिवक्त्यामार्फत विरूध्‍द पक्ष यांना नोटीस पाठविले परंतु नोटीस प्राप्त होऊनसुद्धा त्यांनी दखल घेतली नाही सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष तक्रार दाखल करून त्यामध्ये अशी मागणी केली आहे की विरूध्‍द पक्ष  यांनी तक्रारकर्त्यास पाठविलेले दि.20/8/2016  चे रु. 76,380/- दि. 19/09/2016 व दि.  17/10/2016चे रु. 92,830/-चे वीजदेयक बेकायदेशीर ठरविण्यात यावे तसेच सदर बेकायदेशीर देयकाकरिता तक्रारकर्त्‍याकडील विजपूरवठा खंडित करू नये असा आदेश तक्रारकर्त्‍याकरीता व विरुद्ध पक्षांचे विरुद्ध देण्यात यावा, तसेच विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.50,000/- व तक्रारीचा खर्च रू.5,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍यांला द्यावा असे आदेश पारीत करण्‍यांत यावेत अशी विनंती केली.

 

3.    तक्रारकर्त्‍याची तक्रार स्विकृत करुन विरूध्‍द पक्षाविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. विरूध्‍द पक्ष हजर होवून त्‍यांनी आपले लेखी कथन दाखल करून त्यामध्ये विरूध्‍द पक्ष यांनी दि. 20/09/2016 रोजीचे 1599 युनिट विजवापराचे रु.91,240/- व दि.17/10/2016चे रु.92,830/-चे वीजदेयक तक्रारकर्त्यास पाठविले याबाबत वाद नाही असे नमूद केले असून तक्रारकर्त्याचे उर्वरित कथन नाकबूल करून पुढे नमूद केले की तक्रारकर्त्याला दिलेले देयक हे त्यांच्याकडे असलेल्या विजभाराप्रमाणे योग्य व बरोबर आहे व तक्रारकर्ता सदर वीजदेयक भरण्यास जबाबदार आहेत तक्रारकर्त्याला दिल्या गेलेले ऑगस्‍ट,2016 चे वीज देयक हे एप्रिल -मे 2016 ते जुलै-ऑगस्‍ट,2016 या चार महिन्‍यात वापरलेल्‍या विजेनुसार नोंद घेण्‍यांत आलेल्‍या रू.6397युनिटकरीता दिलेले आहे तसेच त्या कालावधीत तक्रारकर्त्याने सरासरी विजेच्या भरलेल्या देयकाची रक्कम समायोजित करून तक्रारकर्त्यास ऑगस्‍ट,2016 चे देयक दिलेले आहे तसेच विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीनुसार ऑक्‍टोबर, 2016 मध्ये जुने विजमिटर बदली करून नवीन वीज मिटर लावले. तक्रारकर्त्‍याच्या नवीन वीज मिटरचा तीन महिन्याचा  वीज वापर 994 युनिट असा आहे म्हणजेच प्रतिमाह सरासरी वीज वापर331  युनिट असा आहे. विरूध्‍द पक्ष  यांनी तक्रारकर्त्‍याकडील जुने वीज मिटर तपासणी विभागाकडे तपासणीकरिता पाठविले असता तपासणी अहवालानुसार विज मिटर सुस्थितीत आहे सबब विरूध्‍द पक्ष  यांनी तक्रारकर्त्‍यास योग्य सेवा दिली असून अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केलेला नाही. करिता तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह  खारीज होण्यास पात्र अशी विनंती केलेली आहे.

 

4. तक्रारदारांची तक्रार, दस्‍ताऐवज, रिजॉईंडर, शपथपत्र तसेच  गैरअर्जदाराचे लेखी म्‍हणणे, रिजॉईंडर, लेखी युक्तिवाद आणी उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवाद तसेच तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍याबाबतची कारणमिमांसा आणी निष्‍कर्ष पुढील प्रमाणे.

 

 

मुद्दे                                            निष्‍कर्ष

 

1)    विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याप्रती न्‍युनतापूर्ण सेवा दिली

      आहे काय ?                                                                                   :             होय

2)    तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पाञ आहे

      काय ?                                 :  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारण मिमांसा 

मुद्दा क्र.1 बाबत :-

5.    तक्रारकर्त्‍याने निवासी वापराकरीता विरूध्‍द पक्ष यांचेकडून विद्युत पूरवठा घेतला व त्‍याचा ग्राहक क्रमांक 456538049305 हा असून  व तक्रारकर्ता हा विरूध्‍द पक्षाचा ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे. तक्रारकर्ता व विरूध्‍द पक्ष यांच्‍यामध्‍ये माहे ऑगस्‍ट,2016 ते ऑक्‍टोबर, 2016 चे तीन विजदेयकांबाबत वाद आहे. तक्रारकर्त्‍याने नि.क्र.4 वर दाखल दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास दिनांक 6/3/2014 रोजी विजपुरवठा दिला. परंतु त्‍यानंतर वि.प.ने तक्रारकर्त्‍यास सदर विजवापराचे विजदेयकच दिले नाही व तक्रारकर्त्‍याने देयकाची मागणी केल्‍यानंतर दिनांक 9/1/2015 चे कोणतीही युनीट वापराची व इतर माहिती न लिहीता रू.4,680/- चे हस्‍तलिखीत विजदेयक दिले. सदर देयकाचा भरणा तक्रारकर्त्‍याने केला हे दस्‍त क्र.अ-1 वरून स्‍पष्‍ट होते. त्‍यानंतर दिनांक 19/9/2015 चे रू.18,300/- चे दिलेल्‍या ऑगस्‍ट,2015 च्‍या विजदेयकामध्‍ये रू.15,762.34 ची थकबाकी दर्शविलेली आहे. सदर विजदेयक दस्‍त क्र. अ-2 वर दाखल आहे. मात्र त्‍यानंतर अर्जदारांस देण्‍यांत आलेल्‍या अनुक्रमे मे व जून 2016 च्‍या दोन्‍ही विजदेयकांमध्‍ये चालू रिडींग उपलब्‍ध नाही, मागील रिडींग 5413 व अनुक्रमे रू.2870/- व रू.3450/- रक्‍कम दर्शविलेली आहे. सदर बाब दस्‍त क्र.अ-10 व अ-11 वर दाखल देयक या दस्‍तावेजांवरून स्‍पष्‍ट होते. उपरोक्‍त देयकांचा तक्रारकर्त्‍याने भरणा केला. परंतु त्‍यानंतरही ऑगस्‍ट,2016 चे रू.76,910/- चे दिलेल्‍या विजदेयकामध्‍ये एकूण थकबाकी रू.12,260/- चालू रिडींग 11810 व मागील रिडींग 5413 असे दर्शविलेले आहे.

6.     त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्षांकडे विजमिटर दोषयुक्‍त असल्‍यामुळे ते तपासण्‍याकरीता अर्ज करून रू.500/- शुल्काचा भरणा केला. परंतु विरूध्‍द पक्ष यांनी मिटर तपासणी न करताच दस्‍त क्र.अ -15 व अ-16 चे रिडींग नॉट अॅव्‍हेलेबल व एकूण विजवापर अनुक्रमे 1599 व 100 युनिट असे दर्शवून व थकबाकी जोडून अनुक्रमे रू.91,420/- व रु.92,840/- ची देयके दिली. वि.प.यांनी तक्रारकर्त्‍याकडील विजमिटर ऑक्‍टो.16 मध्‍ये बदलवून दिले. परंतु त्‍यानंतरही ऑक्‍टोबर,2016 चे विजदेयकामध्‍ये सुध्‍दा चालू रिडींग नॉट अॅव्‍हेलेबल असे दर्शविले. मात्र रिडींगची नोंद कां होऊ शकली नाही याचे कोणतेही संयुक्‍तीक स्‍पष्‍टीकरण विरूध्‍द पक्ष यांनी दिलेले नाही. सदर देयक दस्‍त क्र.अ-16 वर दाखल आहे. यावरून मिटर रिडींगची नोंदणी करण्‍यांत विरूध्‍द पक्षाने हयगय केल्‍याचे दिसून येते. परिणामतः मीटर वाचन न घेताच वि.प.हे तक्रारकर्त्‍याला सरासरी विजदेयके देत होते हे स्‍पष्‍ट होते. ही बाब विरूध्द पक्ष यांचे सेवेतील न्‍युनता दर्शविते.

7.     अर्जदाराने मीटर तपासणीबाबत शुल्‍क भरून अर्ज सादर केल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांनी जुने मीटर काढून दिनांक ऑक्‍टोबर,2016 मध्‍ये नवीन विद्युत मिटर बसविले. मात्र ही प्रक्रिया विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्ता अथवा त्‍याचे कुटूंबातील जबाबदार व्‍यक्‍तीसमक्ष केल्‍याचा कोणताही दस्‍तावेज वा पुरावा गैरअर्जदाराने दाखल केलेला नाही, तसेच प्रकरणात गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या स्‍थळ निरीक्षण अहवालावर तक्रारकर्त्‍याची स्‍वाक्षरी नाही. यानंतरदेखील विरूध्‍द पक्षाने सदर नवीन मीटरनुसार देखील वाचन न नोंदविता माहे ऑक्‍टोबरचे,2016 चे देयक तक्रारकर्त्‍यास दिले असून वरील बाबीदेखील विरूध्‍द पक्षाचे सेवेतील न्‍युनता दर्शवितात. त्‍यामुळे मंचाचे मते तक्रारकर्ता माहे ऑगस्‍ट, 2016 ते ऑक्‍टोबर,2016 चे विवादीत चे देयक रद्द करून त्‍याऐवजी नियमानुसार सुधारीत देयक मिळण्‍यांस तसेच त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसीक त्रासपोटी तो विरूध्‍द पक्षाकडून यथोचीत नुकसान भरपाई मिळण्‍यांस पात्र आहे. सबब, मुद्दा क.1  चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.

मुद्दा क्र. 2 बाबत :- 

 8.   मुद्दा क्र. 1 च्‍या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

अंतीम आदेश

 

 
 

    (1) तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र.129/2016 अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

    (2) विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचे दिनांक 20/8/2016, दिनांक 19/9/2016 व दिनांक 17.10.2016 चे विजदेयक रद्द करून तक्रारकर्त्‍याने अंतरीम आदेशानुसार भरलेल्‍या रकमेचे समायोजन करून सुधारित विजदेयक तक्रारकर्त्यास द्यावे व तक्रारकर्त्याने सदर वीज देयकाचा भरणा करावा.

    (3)  विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रू.20,000/- व तक्रार खर्च रू.5,000/- द्यावा.

    (4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी .

 

 

 

                                   

(श्रीमती.कल्‍पना जांगडे(कुटे))  (श्रीमती. कीर्ती वैदय (गाडगीळ))  (श्री. श्री.अतुल डी. आळशी)                     

      सदस्‍या                                        सदस्‍या                       अध्‍यक्ष 

                जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.