(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 29 जानेवारी 2011)
1. अर्जदाराने, सदर तक्रार, ग्राहक संरक्षण अधिनियम कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. अर्जदार मौजा गोकुल नगर, वार्ड नं.14, गडचिरोली येथील रहिवासी असून स्वतःचे मालकीचे ताब्यात असलेली जमीन आहे. सदर जागेवर राहण्याचे घर बांधण्याकरीता अर्जदार व गैरअर्जदार यांचे मध्ये दि. 18.10.08 रोजी 100/- रुपयाचे स्टॅम्प पेपरवर करार करण्यात आला. बांधकाम करारानुसार नवीन घर तयार करण्यास लागणारा कच्चा माल व इतर साहित्य स्वखर्चाने पुरवठा करुन बांधकाम सुरु केल्याचे 4 महिन्यात नवीन घर रुपये 3,40,000/- किंमतीत
... 2 ... (ग्रा.त.क्र.34/2010)
गैरअर्जदार कराराच्या शर्ती व अटीनुसार बांधून देण्यास व सुस्थितीत राहण्यायोग्य घर बांधून अर्जदारास सुपूर्द करण्याचे निश्चित करण्यात आले. गै.अ. यास वेळोवेळी मागणी प्रमाणे पैशाचे टप्पाटप्याने रक्कम अर्जदाराने दिली.
2. गै.अ.ने घराचे बांधकाम 1 जानेवारी 2009 पर्यंत स्लॅब पर्यंत बांधकाम करुन बाकीचे बांधकाम करणे बंद केले. अर्जदाराने बांधकाम कराराच्या शर्ती व अटीचे पुर्तता केली. गै.अ.स मागणीप्रमाणे वेळोवेळी पैसे दिले, तरी गै.अ.नी 18.10.08 च्या करारानुसार घराचे संपूर्ण परिपूर्ण बांधकाम केले नाही.
3. गै.अ.ने दि.14.2.09 ला हमीपञाव्दारे 4 महिन्यात बांधकाम परिपूर्ण करण्याची हमी दिली. परंतु, निर्देशीत वेळात बांधकाम पूर्ण केले नाही. गैरअर्जदारास बरीच क्षमा याचना केल्यानंतर उर्वरीत अर्धवट अपूर्ण राहिलेले बांधकाम 31.5.09 पर्यंत पूर्ण करण्याचे दि.11.5.09 ला मान्य व कबूल केले. परंतु, गै.अ.ने कुठलीही दाद न देता बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडून दिले. अर्जदाराने 2.7.09 ला विनंती केली असता गै.अ.ने रुपये 90,000/- झालेली नुकसान भरपाई म्हणून 28.2.10 पर्यंत देण्याचे पंचासमक्ष कबूल करुन हमीपञ लिहून दिले. गै.अ.ने यांची ही पुर्तता केली नाही. शेवटी अर्जदाराने वकीला मार्फत 17.5.10 व 1.7.10 ला नोटीस पाठवून अपूर्ण राहिलेले बांधकाम पूर्ण करुन देण्याची विनंती केली. परंतु गै.अ.ने त्याकडेही दूर्लक्ष करुन करुन बांधकाम करुन दिले नाही.
4. गै.अ.ने, 18.10.08 च्या करारानुसार व दिलेल्या अभिवचनानुसार बांधकाम वेळीच पूर्ण करुन न दिल्यामुळे अर्जदारास आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अर्जदार रुपये 1000/- प्रतिमाह प्रमाणे किरायाने राहत होता. गै.अ. विहीत मुदतीत घर बांधून न दिल्यामुळे अतिरिक्त घर भाडयाचा बोजा रु.14,000/- ऐवढा करावा लागला. तसेच, सिमेंट, रेती व विटा व इतर साहित्याचे भाववाढ झाल्यामुळे जास्त किंमतीमध्ये वस्तू घेवून बांधकाम करावे लागले. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. गै.अ.यांनी कबूल केल्याप्रमाणे राहिलेल्या बांध्कामाचे व झालेल्या नुकसानाचे रुपये 90,000/- दि.28.2.10 पर्यंत देण्याचे कबूल व मान्य केले तरी ती रक्कम परत केली नाही. अर्जदारास अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यास रुपये 1,70,000/- खर्च आला. शारीरीक, मानसीक ञासापोटी 20,000/- प्रवास खर्चापोटी 10,000/-, घरभाडयापोटी द्यावे लागलेले रुपये 14,000/- असे एकुण रुपये 2,14,000/-, 12 टक्के व्याजासह गै.अ.कडून मिळवून द्यावे अशी मागणी केली आहे.
... 3 ... (ग्रा.त.क्र.34/2010)
5. अर्जदाराने, तक्रारीसोबत नि.4 नुसार 4 मुळ स्टॅम्प पेपरवर केलेल्या कराराच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. तक्रार नोंदणी करुन गै.अ.स नोटीस काढण्यात आले. गै.अ.हजर होवून नि.12 नुसार तक्रारीचे लेखी उत्तर सादर केले.
6. गै.अ.ने लेखी उत्तरात अर्जदाराची तक्रार अमान्य केली आहे. हे म्हणणे खरे नाही की, अर्जदाराचे मौजा गोकुल नगर वार्ड क्र.14 गडचिरोली येथे स्वमालकीचे स्वतःचे ताब्यात असलेली जमीन आहे. हे म्हणणे खरे नाही की, सदर जागेवरती स्वतःचे राहण्यास घर बांधण्यासंबंधी अर्जदार व गै.अ. यांचेमध्ये दि.18.10.08 रोजी 100/- रुपयाचे स्टॅम्प पेपरवर करार झाला.
7. गै.अ.ने लेखी उत्तरात हे म्हणणे खोटे असल्याने नाकबूल केले आहे की, गै.अ.ने अर्जदाराचे घराचे बांधकाम अंदाजे 1 जानेवारी 09 ला स्लॅब लेवल पर्यंत घर बांधून बाकीचे उर्वरीत बांधकाम बंद केले. हे म्हणणे नाकबूल की, अर्जदाराने दि.18.10.08 ला केलेल्या नवीन घराचे बांधकाम करारातील शर्ती व अटीची पुर्तता केली, तसेच गै.अ.ने वेळोवेळी केलेल्या पैशाच्या मागणी प्रमाणे गै.अ.स पैसे देवू केले. गै.अ.ने तक्रारीतील सर्व कथन अमान्य करुन तक्रारीतील मजकूर खोटा व कपोलकल्पीत असल्याने नाकबूल करुन अर्जदाराची प्रार्थना खारीज करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
8. गै.अ.ने लेखी बयानातील विशेष कथनात असे कथन केले आहे की, अर्जदार व गै.अ. यांचेमध्ये ठरल्याप्रमाणे 3 रुम, स्लॅब त्यावर टाईल्स तसेच, 3 रुम छावणीचे व त्यावर फ्लोरींग करण्याचे ठरले. परंतु, अर्जदाराने 3 रुम छावणीचे स्लॅबचे बांधायचे असे काम अर्धवट झाल्यानंतर सांगितले. गै.अ.ने 3,40,000/- मध्ये ते काम होऊ शकत नाही. त्यास जास्त पैसे द्यावे लागतात असे सांगितले, त्यावरुन अर्जदाराने दि.17.1.09 व 17.2.09 रोजी अगाऊ रक्कम देण्याचे कबूल केले, परंतु ती रक्कम दिली नाही. त्यामुळे, गै.अ. काम पूर्ण करु शकला नाही.
9. गै.अ.ने लेखी बयानातील विशेष कथनात पुढे असे ही कथन केले आहे की, उर्वरीत कामाचे रुपये 60,000/- हिशोबा अंती निघाले. गै.अ.ने दि.25.2.10 रोजी पंचासमक्ष परत केले. सदर दस्त रसीद अर्जदाराकडे आहे. अर्जदाराने सदर रक्कम अडचण असल्यामुळे गै.अ.कडून परत घेतले व तसे लिहून दिले की, गै.अ.याचेवर कसलाही कर्ज किंवा रुपये राहिलेले नाही, असे असतांना सुध्दा गै.अ.स केवळ ञास देण्याच्या उद्देशाने मामला दाखल केला असून तो खारीज होण्यास पाञ आहे.
... 4 ... (ग्रा.त.क्र.34/2010)
10. गै.अ.ने आपल्या लेखी बयाणासोबत नि.13 नुसार 3 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराने, तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ पुरावा, शपथपञ नि.14 नुसार दाखल करुन त्यासोबत नि.15 प्रमाणे नोटीसाची प्रत व पोष्टाचे पोचपावती दाखल केली आहे. अर्जदाराने आपले तर्फे साक्षदार बंडू बोंडकू चिकराम याचा शपथपञ नि.16 नुसार दाखल केला. गै.अ.तर्फे लेखी बयानातील कथना पृष्ठयर्थ लेखी उत्तर शपथपञ समजण्यात यावा या आशयाची पुरसीस गै.अ.चे वकीलानी नि.17 नुसार दाखल केली. अर्जदार व गै.अ. यांनी दाखल केलेले दस्ताऐवज शपथपञ आणि उभय पक्षानी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे : उत्तर
(1) गै.अ.यांनी घराचे बांधकाम अपूर्ण ठेवून सेवा : होय.
देण्यात न्युनता केली आहे काय ?
(2) तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे काय ? : होय.
(3) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? :अंतिम आदेशाप्रमाणे.
// कारण मिमांसा //
मुद्दा क्रमांक 1 व 2 :
11. गै.अ.यांनी लेखी उत्तरात अर्जदारासोबत 18.10.08 ला करार झालेला नाही, तसेच अर्जदाराचे मौजा गोकुलनगर वार्ड क्र.14, गडचिरोली येथे स्वतःच्या मालकीचे जमीन आहे, हे नाकारले आहे. त्याचप्रमाणे, सदर घराचे बांधकाम 4 महिन्यात बांधून देण्याचे दि.15.2.09 च्या हमी पञाव्दारे अर्जदारास हमी दिली, हे सुध्दा नाकबूल केले आहे. एकंदरीत, गै.अ.यांनी पूर्णपणे नकार (Total Denied) चा बचाव घेतलेला आहे. परंतु, अप्रत्यक्षपणे लेखी बयानातील विशेष कथनात मान्य केले की, अर्जदार व गै.अ.यांच्यात ठरल्याप्रमाणे 3 रुम स्लॅब व 3 रुम छावणीचे तयार करुन देण्याचे ठरविण्यात आले व ते बांधकाम 3,40,000/- मध्ये करायचे होते. परंतु, अर्जदार यांनी 3 रुमवर स्लॅब बांधायचे आहे असे अर्धवट बांधकाम झाल्यानंतर सांगितल्यामुळे ते बांधकाम रुपये 3,40,000/- मध्ये होऊ शकत नाही, त्याकरीता जास्त पैसे द्यावे लागतील असे गै.अ.ने सांगितले. अर्जदाराने 17.1.09 व 17.2.09 रोजी अगाऊ रक्कम देण्याचे कबूल केले. परंतू, ती रक्कम अर्जदाराने
... 5 ... (ग्रा.त.क्र.34/2010)
गै.अ.स दिली नाही, त्यामुळे बांधकाम पूर्ण होऊ शकला नाही. या गै.अ.च्या विशेष कथनातील, कथनावरुन एक बाब सिध्द होतो की, गै.अ.यांनी अर्जदाराच्या मौजा गडचिरोली येथील गोकुल नगर वार्ड क्र.14 मधील घराचे बांधकामासाठी पैसे प्राप्त करुनही पूर्ण केले नाही. दि.18.10.08 च्या करारात किती रुमचे बांधकाम करणे आहे त्याचा उल्लेख नाही, आणि कराराचे पाठीमागे, ‘‘घर बांधकामाकरीता लागणारे साहित्य’’ असे नमूद आहे. परंतु, गै.अ. यांनी त्यानुसार बांधकाम पूर्ण केले नाही हे स्वतः मान्य केले, ही गै.अ.चे सेवेतील न्युनता आहे, असे या न्यायमंचाचे ठाम मत आहे.
12. अर्जदाराने तक्ररीत गै.अ.स वेळोवेळी बांधकामाकरीता पैसे दिलेत, करारानुसार हप्त्याचे बांधकामाप्रमाणे पैसे देण्याचे ठरले होते त्याप्रमाणे पैसे दिले, असे तक्रारीत नमूद केले आहे. परंतु, गै.अ.यांनी लेखी उत्तरात अर्जदाराकडून किती रक्कम मिळाली याचा काही उल्लेख केलेला नाही व बांधकाम किती झाले याबद्दलही काही म्हणणे सादर केले नाही. उलट जानेवारी 09 पर्यंत स्लॅबपर्यंतचे बांधकाम झाल्याचेही अमान्य केले आहे. वास्तवीक, अर्जदाराने तक्रारीत दि.18.10.08 ते 27.5.09 पर्यंत एकुण रुपये 3,31,450/- दिल्याचे कथन केले आहे. याबाबत, अ-1 वर 18.10.08 च्या मुळ करारनाम्याची प्रत दाखल केलेली असून त्यावर वेळोवेळी गै.अ.स देण्यात आलेल्या रकमाचा उल्लेख करुन सह्या घेतलेल्या आहेत. परंतु, असे असतांनाही गै.अ. हेतुपुरस्परपणे आपली जबाबदारी टाळण्याकरीता 18.10.08 चा करार झालेला नाही, असे खोटे कथन करीत आहे. गै.अ.यांनी वेळोवेळी रकमा घेतल्यानंतरही बांधकाम केले नाही, त्यामुळे अर्जदाराने पंचासमक्ष चर्चाकरुन वचनपञ त्यांचेसमक्ष लिहून घेतला. त्यातील पंच बंडू चिकराम हा एक असून स्टॅम्प पेपरवर लिहिलेल्या कथनाच्या पृष्ठयर्थ त्याचा शपथपञ नि.16 नुसार दाखल केला आहे व त्यांनी कराराप्रमाणे गै.अ.यांनी बांधकाम केलेले नाही, उलट अर्जदाराने जास्तीचे पैसे रुपये 27,000/- कोणतीही लिखापढाई न करता त्याचे समक्ष गै.अ.स दिले. गै.अ.स वेळोवेळी बांधकाम करुन देण्याबाबत कळविले व बैठका घेवून पंचासमक्ष चर्चा करण्यात आली. त्यावेळी, कुमोद भोवये, रामलाल पांडे, श्री कालवा साहेब इत्यादी समक्ष 31.5.09 पर्यंत बांधकाम पूर्ण करुन देण्याचे अभिवचन कराराप्रमाणे दिले. गै.अ.यांनी अर्जदारातर्फे साक्षदाराच्या शपथपञावर आपले काहीही कथन केलेले नाही. उलट अर्जदाराचे कथनावर कोणतेही शपथपञ द्यावयाचे नाही अशी पुरसीस दाखल केली. एकंदरीत अर्जदाराने दाखल केलेल्या मुळ स्टॅम्प पेपरवरुन गै.अ.यांनी बांधकाम पूर्ण करुन दिले नाही व ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1)(ओ) नुसार न्युनतापूर्ण सेवा दिली ही बाब सिध्द होतो.
... 6 ... (ग्रा.त.क्र.34/2010)
13. गै.अ.ने, लेखी बयानासोबत नि.13 ब-1, ब-2 व ब-3 वर झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केलेले आहेत. सदर दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता, गै.अ.यांनी हे मान्य केले आहे की, किचन, देवघर, बेडरुम, 3 कॉलम, स्लॅबचे रोलींग इत्यादी काम करणे बाकी आहे व त्याकरीता रुपये 27,000/- दिले आहे. सदर दस्त हे 17.1.09, 17.2.09 आणि 25.2.10 ला तयार करण्यात आले आहे. अर्जदार यांनी गै.अ.स 17.2.09 पर्यंत अगाऊ पैसे दिले नाही, तरी गै.अ.यांनी अर्जदारास 12.5.09 ला टाईल्स अॅडव्हान्स कामाकरीता व सिमेंट आणण्याकरीता रुपये 15,000/- पंचासमक्ष देण्यात आले व ती रक्कम गै.अ.यांनी स्विकारली. त्याचप्रमाणे 27.5.09 ला रुपये 11650 नगदी मिळाल्याची नोंद 11.5.09 च्या करारनाम्यावर करुन दिली. तसेच, 2.7.09 ला उर्वरीत बांधकामाचे राहिलेली बांधकाम पूर्ण करण्यास लागणारा खर्च रुपये 90,000/- वाद मिटविण्याकरीता पंचासमक्ष देण्याचे गै.अ.यांनी मान्य केले, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या मुळ स्टॅम्प पेपर अ-1 ते अ-4 वरुन सिध्द होतो. अशापरिस्थितीत, गै.अ.यांनी दाखल केलेले दस्त हे झेरॉक्स दस्त असून त्यातील कथन बनावटी तयार केल्याची बाब सिध्द होतो. त्यामुळे, तो ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास पाञ नाही.
14. गै.अ.ने, लेखी बयानात उर्वरीत कामाचे रुपये 60,000/- हिशोबा अंती गै.अ.कडे निघाले, ती रक्कम अर्जदारास दि.25.2.10 रोजी पंचासमक्ष दिले. याबाबत, गै.अ.ने ब-3 वर झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. सदर दस्ताऐवजाचे झेरॉक्स असून ओव्हर राईटींग केलेली आहे, या दस्ताऐवजाच्या कथना पृष्ठयर्थ साक्षदाराचा पुरावा दाखल केलेला नाही, तर उलट अर्जदाराने साक्षदाराचा पुरावा दाखल करुन गै.अ.कडून 90,000/- घेण्याचे बाकी असल्याचे कथन केले आहे. अर्जदाराने तक्रारीत उर्वरीत बांधकाम करण्यास रुपये 1,70,000/- लागलेत, ती रक्कम गै.अ.कडून मिळवून द्यावे अशी विनंती केली आहे, परंतु त्याबाबत कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. तसेच, किरायाचे घरात राहत असल्याबाबतचा पुरावा रेकॉर्डवर दाखल नाही, त्यामुळे अर्जदाराने केलेली मागणी पूर्णतः मंजूर करण्यास पाञ नाही. परंतु, गै.अ.यांनी दि.2.7.09 ला लिहून दिलेल्या करारपञानुसार रुपये 90,000/- देणे बाकी असल्याचे मान्य केले. त्यापैकी, रुपये 60,000/- गै.अ.ने दिल्याचे कथन केले असले तरी त्याबाबत ठोस पुरावा सादर केला नाही. परंतु, गै.अ.यांनी रुपये 60,000/- हिशोबा अंती निघाल्याचे मान्य केले. अर्जदाराने एकूण रुपये 3,31,450/- दिले, त्यापैकी स्लॅबलेवल पर्यंतच गै.अ. यांनी काम केलेला आहे. त्यामुळे, गै.अ. अर्जदारास रुपये 60,000/- अपूर्ण बांधकामाबाबतची रक्कम देण्यास जबाबदार आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे.
... 7 ... (ग्रा.त.क्र.34/2010)
15. गै.अ.ने ञुटी युक्त सेवा दिल्यामुळे व घराचे बांधकाम दिलेल्या कालावधीत पूर्ण करुन न दिल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. तसेच, बांधकाम साहित्याच्या किंमती वाढल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आणि शेवटी अर्जदारास घराचे बांधकाम विलंबाने पूर्ण करावे लागले. गै.अ.च्या ञुटी युक्त सेवेमुळे झालेल्या मानसीक, शारीरीक ञासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी नुकसान भरपाई देण्यास गै.अ. जबाबदार असल्याने तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 :-
16. वरील मुद्दा क्र.1 व 2 च्या विवेचनेवरुन, तक्रार अंशतः मंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) गैरअर्जदाराने, अर्जदारास रुपये 60,000/- आदेशाच्या तारखे पासून दोन महिन्याचे आंत द्यावे.
(2) गैरअर्जदाराने, अर्जदारास मानसीक, शारीरीक ञास व आर्थिक नुकसान सर्व मिळून रुपये 5000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाच्या तारखे पासून दोन महिन्याचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदाराने वरील मुद्दा 1 मधील आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्यास वरील रक्कम द.सा.द.शे.9 % व्याजासह रक्कम अर्जदाराचे हातात पडेपर्यंत देय राहील.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 29/1/2011.