तक्रारकर्त्या : तर्फे वकील श्री.एस.बी.डहारे हजर.
विरूध्द पक्षा : तर्फे वकील श्रीमती. सुजाता तिवारी हजर.
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री. भास्कर.बी. योगी, अध्यक्ष -ठिकाणः गोंदिया
न्यायनिर्णय
(दि. 23/10/2018 रोजी घोषीत.)
1. तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
तक्रारकर्त्याचा रहिवाशी विज जोडणी सन- 2014 मध्ये झालेली असून त्याचा ग्राहक क्र. 432960003290 व मिटर क्र. 98425380000 आहे. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, सुरूवातीला माहे में ते जुलै- 2014 चे विज देयक त्यांना पाठविले नाही. त्यानंतर, माहे ऑेगष्ट 2014 चा दि. 21/08/2014 ला विज देयक पाठविला. तो विज देयक रू. 19,133/-, व थकबाकी रू. 1,092/-,असा एकुण रू. 20,230/-, चा होता. तक्रारकर्त्याच्या घरी फक्त दोन बल्ब व एक पंखा वापरतात. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाच्या कार्यालयात सदरचे देयकासोबत व सदरची चुकी व जास्तीचा देयकाबाबत विचारणा केली असता, विरूध्द पक्षांच्या अधिका-याने तक्रारकर्त्याला सल्ला दिले की, मिटरची तपासणी करण्याबाबत अर्ज करावे. त्यानंतर विरूध्द पक्षांच्या अधिका-याने मिटरची तपासणी केली. तेव्हा सदर मिटर खुप जोरात फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी तक्रारकर्त्याला आश्वासन दिले की, पुढील महिन्यातील विज देयक सरासरी पाठविण्यात येईल. परंतू, पुन्हा विरूध्द पक्षांनी सप्टेंबर- 2014 चा दि. 17/09/2014 ला रू. 20,700/-,चा विज देयक पाठविला. तक्रारकर्त्याने पुन्हा विरूध्द पक्षांच्या कार्यालयात जाऊन भेट दिली व सदरचा चुकीचा व जास्तीचा विज देयकाबाबत विचारणा केली असता, विरूध्द पक्षांनी मिटर तपासणीच्या रिपोर्टच्या आधारे विज देयकात दुरूस्ती केली व विज बिलापोटी रू. 11,00/-,चा भरणा करावयास सांगीतले. तक्रारकत्याने ती रक्कम भरलेली आहे. यानंतर त्यांचेवर कोणतेही थकबाकी नव्हती.
3. विरूध्द पक्ष यांनी माहे ऑक्टोंबर- 2014 चा दि. 18/10/2014 ला रू. 12,210/-,चा विज देयक पाठविला. त्यात एकुण विज वापर 39 युनिट असा झाला होता व युनिटनूसार रू.294/-,भरावयाचे होते. परंतू विरूध्द पक्षांनी विज देयकात रू. 11,918/-,ची थकबाकी दाखवून रू.12,210/-,चा चुकीचा विज देयक पाठविला होता. तक्रारकर्त्याने परत विरूध्द पक्षाचे कार्यालयात जाऊन चुकीची माहिती दिली आणि वारंवार होत असलेल्या चुकामूळे विरूध्द पक्ष यांनी नविन मिटर लावून देण्याचे आश्वासन दिले. या कारणाने तक्रारकर्त्याने डिसेंबर- 2014 रोजी मिटर बदलविण्याबाबत विरूध्द पक्षांना विनंतीचा अर्ज दिला. त्यावरून विरूध्द पक्ष यांनी नविन मिटर क्र. 9803209567 लावून दिला. नविन मिटर नूसार एकुण विज वापर 13 युनिट होते व त्यानूसार रू. 210/-,भरावयाचे होते व ती रक्कम त्यांनी भरली. परंतू विरूध्द पक्ष यांनी माहे डिसेंबर- 2014 चे दि. 16/12/2014 ला विज देयकात रू.11,249/-,ची थकबाकी दाखवत बिल पाठविला. वारंवार विनंती करून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या विज देयकात दुरूस्ती केली नाही. याउलट अवाजवी चुकीचे व जास्तीचे विज देयक थकबाकी दाखवून माहे जानेवारी 2015 ते सप्टेंबर 2015 पर्यंत पाठविले. तक्रारकर्त्याचे पुढे असे कथन आहे की, ऑक्टोंबर- 2015 मध्ये विरूध्द पक्ष यांनी मिटर बदलविला व पुन्हा नविन मिटर क्र. 4104006460 लावला. विरूध्द पक्ष यांनी ऑक्टोंबर 2015 चे दि. 17/10/2015 च्या विज देयकात मागील रिडींग 1, व चालु रिडींग 26 दाखविली आहे. विरूध्द पक्ष यांनी 336 युनिट समायोजित करून, 261 युनिटचे रू. 459/-,व थकबाकी रू. 17,128/-,असे एकुण रू. 17,590/-,चे विज देयक दिले. विरूध्द पक्ष हे चुकीच्या पध्दतीने थकबाकी दाखवून, विज देयक पाठवित आहेत, विज भरण्यास मजबुर करीत आहेत. हे कृत्य विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील न्यूनता आहे. एवढेच नाही तर पुन्हा विरूध्द पक्ष यांनी नोव्हेंबर-डिसेंबर 2015 चे विज देयक दुरूस्त न करता, पाठविले.
4. विरूध्द पक्ष यांनी पुन्हा माहे जानेवारी- 2016 ला परत रू. 18,730/-,चे एकुण बिल पाठविले. आणि जेव्हा तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षास संपर्क साधला असता, तेव्हा त्यांनी एकाच वेळी रू.3,000/-,भरावयास सांगीतले. त्यानूसार तक्रारकर्त्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून, नातेवाईकाकडून उधारी उसणे घेऊन रू.3,000/-,बिलाचा भरणा केलेला आहे. एवढी रक्कम भरल्यानंतर तक्रारकर्त्याला वाटत होते की, यानंतर येणारा अवाजवी व जास्तीचा बिल देयकापासून मुक्ती मिळेल. परंतू असे झाले नाही. परत माहे फेब्रृवारी- 2016, विरूध्द पक्ष यांनी विज देयक बिल रू. 16,090/-,असा एकुण बिल पाठविला. अशाप्रकारे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला दोन वर्षापासून जास्तीचा व अवाजवी बिल पाठवून त्यांच्याकडून विज देयकाचा भरणा करीता रक्कम घेतलेली आहे, वारंवार विरूध्द पक्ष यांना त्यांची चुक लक्षात आणून देऊन सुध्दा आणि देानदा मिटर बदली केल्यानंतरही सुरूवातीपासून विरूध्द पक्ष यांनी कधीही विज वापरानूसार योग्य व वाजवी बिल दिले नाही व शेवटी मार्च- 2016 रोजी विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला 15 दिवसाची नोटीस देऊन रू. 16,088/-,न भरल्यास विज जोडणी कापण्यात येईल असे इंग्रजी भाषेत लिहीलेले नोटीस पाठविले. हे ऐकल्यावर तक्रारकर्त्याला धक्काच बसला व लगेच विरूध्द पक्ष यांच्या कार्यालयात जाऊन भेट दिली आणि त्यांनी माहे जानेवारी- 2016 पर्यंतचे पटविलेले विज देयक दाखविले व एकही थकबाकी नसल्याचे निदर्शनास आणून दिले. परंतू वारंवार विनंती करून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी काहीही एक समजून घेण्याच्या परिस्थितीत नाही. हे कृत्य विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील न्यूनता आहे. आणि विरूध्द पक्ष हे कधीही विज जोडणी खंडित करू शकतात. म्हणून हि तक्रार तक्रारकर्त्याने या मंचात उपयुक्त दाद मागण्याकरीता दाखल केली आहे.
5. विरूध्द पक्ष यांनी आपली लेखीकैफियत या मंचात सादर करून, तक्रारकर्ता हा त्यांचा ‘ग्राहक’ आहे हे मान्य करतात. विरूध्द पक्ष यांनी आपल्या लेखीकैफियतीमध्ये असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याचे माहे जुलै- 2014 चे बिल पाठविता वेळी तक्रारकर्त्याचा मिटर रिप्लेसमेंट फॉर्मवर चुकीने दर्शविलेला ग्राहक क्रमांक दर्शवून तक्रारकर्त्याला मागील रिडींग – 01, ते चालु रिडींग- 174, दर्शवून विज देयक निर्गमीत केला. त्यानंतरचे माहे ऑगष्ट- 2014 चे विदयुत देयकातील मागील रिडींग- 174, व ग्राहकाची संग्रहित चालु रिडींग 1840 याप्रमाणे जास्तीचे देयक आकारणीप्रमाणे निर्गमीत केले व त्याप्रमाणे कनिष्ठ अभियंता गोरेगांव व ग्राहकांचे अर्जानूसार बिलात दुरूस्ती करण्यात आली. कारण, जेव्हा तक्रारकर्त्याचे मिटर लागले त्यावेळेस IR-1590 इतकीच होती व अशाप्रकारे तक्रारकर्त्यास रू. 8779.99 पैशाचे बिल रक्कम रिव्हिजन सिस्टीमद्वारे पध्दतीने वजा करण्यात आली व ते करतांना चुकीने मागील रिडींग, 1590/-,दर्शविण्याऐवजी जुनीच रिडींग- 01, दाखविण्यात आले व चालु रिडींग 1840, दर्शविण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्त्याला विज देयकातील रक्कम कमी वजा झाली. विरूध्द पक्ष यांनी हे मान्य केले की, सुरूवातीपासून सिस्टिममध्ये होत असलेल्या चुकांमूळे माहे ऑक्टोंबर- 2014 चे विज देयकात युनिटप्रमाणे रू.294/-,चे बिल व त्यात थकबाकी रू. 11,918/-, असे एकुण रू. 12,210/-,चे विज देयक पाठविले होते. त्यांनी पुढे असेही मान्य केले की, पुढील महिन्यातील विज देयकामध्ये उल्लेखीत विज देयकाबाबतीत मिटर बदलवून झाल्यावरही सिस्टिममध्ये दर्शविलेली चुकीची थकबाकी आल्याने तसे विज देयक निर्गमीत करण्यात आले होते. त्या पुढेही जेव्हा मिटर पुन्हा बदलवून झाल्यावरही सिस्टिममध्ये दर्शविलेली चुकीची थकबाकी आल्याने तसे विज देयक निर्गमीत करण्यात आले होते. सदर वरील चुकी माहे ऑगष्ट 2015 ला लक्षात आल्यानंतर मॅनुअली कॅल्कुलेशनद्वारे मागील माहे जुलै- 2014 व ऑगष्ट 2014 मध्ये चुकीने आकारलेली रक्कम, दुरूस्ती करण्यात येऊन मागील वजा करण्यात आलेली रक्कम रू. 8779.99 पैसे कमी करून, उर्वरीत रक्कम रू. 6128.73 पैसे विज देयकातुन वजा करण्यात आली आहे. वरील प्रमाणे ऑगष्ट 2014 व ऑगष्ट 2015 च्या देयकातुन एकुण रक्कम रू. 14,908.72 पैसे वजा करण्यात आले. परंतू सदर देयकात तक्रारकर्त्याला लावण्यात आलेली व्याजाची व डिपीसीची रक्कम वजा करण्यात आलेली नाही व तसेच दोन्ही बिलींगमध्ये वजा करण्यात आलेली रकमेचे पुन्हा मॅनुअली कॅल्कुलेशनद्वारे दुरूस्ती व व्याज + डिपीसीची रक्कम वजा करण्याकरीता विदयुत देयकात बिल दुरूस्ती केल्याने तक्रारकर्त्याला एकुण माहे ऑगष्ट 2014 व ऑगष्ट 2015 ची एकुण रक्कम रू. 19,612.07 पैसे वजा केलेली आहे. विरूध्द पक्ष यांनी जानेवारी 2016 चे बिल दुरूस्ती करून, तक्रारकर्त्याला प्रोव्हीजनल बिल म्हणून रक्कम रू. 3,000/-,भरण्यास सांगीतले होते. परंतू त्यावेळी तक्रारकर्त्याला असे पण सांगण्यात आले होते की, सिस्टिममध्ये दिसून आलेली चुक मॅनुअली कॅल्कुलेशन शिट्सद्वारे दुरूस्ती करण्यात येईल. त्यांनी असे मान्य केले की, फेब्रृवारी–2016 मध्ये तक्रारकर्त्याला देण्यात आलेल्या बिलाच्या वेळी मॅनुअली कॅल्कुलेशन सिट व सिस्टिममची चुक शेाधण्याचा व तक्रारकर्त्याची थकबाकीत असलेली रक्कम कॅल्कुलेट करणे बाकी असल्याने त्याप्रमाणे दरमहा बिल जारी करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मॅनुअली कॅल्कुलेशन शिट्सद्वारे तक्रारकर्त्याच्या थकबाकीतुन एकुण रू. 19,612.07 पैसे एवढे वजा होत आहेत. तसेच मागील माहे ऑगष्ट 2014 व ऑगष्ट- 2015 ची एकुण वजा केलेली रक्कम रू. 14,408.72 पैसे इतकी वजा केली असता, तक्रारकर्त्याला चालु महिन्यातील रू. 4,703.35 पैसे इतके वजा करण्यात आले आहे. विरूध्द पक्षांनी हे मान्य केले की, विज देयक जारी करतेवेळी सिस्टिममध्ये दर्शविण्यात आलेली थकबाकीची रक्कम असल्याने तसा नोटीस जारी करण्यात आला होता व बिल रिव्हीजन पध्दतीने त्याबाबतीत नंतर फरक आढळल्याने त्याप्रमाणे रक्कम वजा करण्यात आली आहे व चालु महिन्यातील रू. 4,703.35 पैसे इतके वजा करण्यात आले असून, त्याप्रमाणे एकुण रक्कम ग्राहय धरण्यात येईल व थकबाकी नसेल तर ती नोटीस रद्द समजण्यात येईल. शेवटी विरूध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, सिस्टिममध्ये दिसून आलेल्या रकमेप्रमाणे वेळोवेळी विज देयक देण्यात आले होते. परंतू तक्रारकर्त्याची तक्रारवर वेळोवेळी त्यात चुक शोधत-शोधत त्याचप्रमाणे रक्कम वजा करण्यात आलेली आहे व सुधारणा करून विज देयक निर्गमीत केलेला आहे, बाकीचे कथन खोटे व अमान्य आहे.
6. तक्रारकर्त्याचे विद्वान वकील यांनी तक्रारीच्या पृष्ठर्थ माहे जुलै- 2014, 2015, 2016, 2017, माहे जुलै- 2018 पर्यंतचे विज देयक या मंचात सादर केलेले आहे.
7. तक्रारीसोबत तक्रारकर्त्याने जोडलेल्या कागदपत्राची यादी व पुरावा शपथपत्र तसेच लेखीयुक्तीवाद व विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेली लेखीकैफियत, पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवादासोबत जोडलेले कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता, तसेच तक्रारकर्त्याचे विद्वान वकील श्री. एस.बी.डहारे तसेच विरूध्द पक्षाचे विद्वान वकील श्रीमती. सुजाता तिवारी यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला. यावरून निःष्कर्षासाठी मुद्दे व त्यावरील आमचे निःष्कर्ष कारणासहित खालीलप्रमाणे आहेतः-
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारकर्ता सिध्द करतात काय? | होय |
2. | विरूध्द पक्षांकडून तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय? | होय |
3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
8. या तक्रारीत विरूध्द पक्ष यांनी हे मान्य केले आहे की, तक्रारकर्ता हा त्यांचा ‘ग्राहक’ आहे. तसेच त्यांचा मिटर देानदा बदलला गेलेला आहे व जुलै- 2014 ते तक्रार दाखल करेपर्यंत सिस्टिमची चुक असल्याकारणाने वेळोवेळी विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला मॅनुअल कॅल्कुलेशन सिटप्रमाणे विज देयकामध्ये जास्तीची आकारणी केलेली रक्कम निर्गमित केलेली आहे. त्यांनी हे मान्य केले की, सिस्टिमच्या चुकीमूळे अवाजवी व जास्तीचे पाठविलेले बिल जर थकबाकी नसल्यास असे आढळून आले तर विदयुत पुरवठा खंडित करण्यासाठी पाठविलेली नोटीस रद्द समजण्यात येईल. यावरून असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने तक्रारीत जे नमूद केले आहे ते सुर्यप्रकाशाइतके खरे आहे. तक्रार दाखल केल्यानंतर, विरूध्द पक्षांनी पाठविलेल्या विज देयकामध्ये परत तीच चुक दर्शविली आहे असे या मंचाचे लक्षात आले आहे, म्हणजे विरूध्द पक्ष यांनी या मंचात तक्रार दाखल केल्यानंतरही त्यांची चुक सुधारली नसून परत तिच -तिच चुकी करीत राहिले. हेच त्यांच्या सेवेतील त्रृटी व सेवेतील कमतरता आहे. विरूध्द पक्षाच्या या कृतीमूळे तक्रारकर्त्याला माहे जुलै- 2014 पासून आजपर्यंत निःश्चितच मानसिक त्रास व शारीरीक धावपळ केल्यामूळे आर्थिक नुकसानही झाला असले हि बाब सिध्द होते. विरूध्द पक्षाने त्यांच्याकडे तक्रारकर्त्याद्वारे वारंवार चुकीत सुधारणा करण्याकरीता केलेले प्रयत्न आजपर्यंत तीच चुक सुरूच असल्याने वाया गेलेला आहे, आणि तक्रारकर्त्याला या मंचापुढे दाद मिळण्याकरीता भाग पाडले, असा मंचाचा निःष्कर्ष आहे, म्हणून आम्ही मुद्दा क्र 1 व 2 चा निःष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहोत. या मंचात तक्रार दाखल झाल्यानंतरही, विरूध्द पक्षांनी त्यांच्या चुकीमध्ये सुधारणा केली नसून, तीच चुक वारंवार करीत राहीले, म्हणून ग्रा.सं.कायदा कलम 14 (1) (d), (e), (f) & (i) प्रमाणे तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
वरील चर्चेवरून व नि:ष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केला आहे असे जाहीर करण्यात येते.
3. विरूध्द पक्ष यांनी माहे जुलै 2014 पासून आदेशाच्या तारखेपर्यंत विज देयकातील संपूर्ण थकबाकी रद्द करण्यात यावी व विज वापराप्रमाणे, विज बिल यापुढे तक्रारकर्त्याला देण्यात यावा.
4. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांला मानसिक व शारिरिक त्रासाबाबत रू. 20,000/-,व दंडात्मक नुकसान भरपाई रू. 10,000/-, व तक्रारीचा खर्च रू. 5,000/-, दयावा.
5. विरूध्द पक्ष यांना असा आदेश देण्यांत येतो की, उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी. तसे न केल्यास, त्या रकमेवर द.सा.द.शे 6 टक्के व्याज अदा करेपर्यंत लागु राहील
6. विरूध्द पक्ष यांना असा आदेश देण्यांत येतो की, विज देयकावर कोणताही प्रकारचा व्याज किंवा दंड आकारू नये.
7. न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
8. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्तीला परत करावी.