::: आ दे श :::
( पारित दिनांक : 25/06/2018 )
माननिय सदस्या श्रीमती शिल्पा एस. डोल्हारकर, यांचे अनुसार : -
1) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे.
तक्रारकर्त्याचे घर वाशिम येथे असुन त्यामध्ये त्याने विद्युत पुरवठा घेतला आहे व त्याप्रमाणे 2012 पासुन विद्युत मिटर लावण्यात आले आहे. तक्रारकर्त्याचा विद्युत ग्राहक क्र. 326010323269 हा असुन मिटर क्र. 5312455977 हा आहे. सन 2012 ते 2015 मध्ये तक्रारकर्त्याने नियमीत विद्युत देयके भरलेली असून नोव्हेंबर 2015 पासुन तक्रारकर्त्याला अवाढव्य विद्युत देयके देण्यात आली. त्याबद्दल तोंडी तक्रार केली असता, देयकात कटौती करु असे सांगण्यात आले, पण कटौती केली नाही. तक्रारकर्त्याचे मीटर एकदम जंप करुन, जलदगतीने फीरुन चुकीचे रिडींग दर्शविते आहे. परंतु विरुध्द पक्षाने मीटर बदलले नाही किंवा तपासणी केली नाही. सप्टेंबर 2016 ला विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्याला 1,08,360/- रुपयाचे विद्युत देयक देण्यात आले. ऑक्टोंबर मध्ये 1,08,840/- व 1,22,720/- रुपयाचे विद्युत देयक देण्यात आले. विरुध्द पक्षाकडून कलम-56 विद्युत कायदा 2003 नुसार तक्रारकर्त्याला नोटीस देवून 15 दिवसात रक्कम भरण्याबाबत कळविण्यात आले असून, बील न भरल्यास, विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल, असे सांगण्यात आले. अशाप्रकारे तक्रारकर्त्याच्या तोंडी विनंतीला मान न देता, अवाढव्य रक्कमेची देयके विरुध्द पक्ष तक्रारकर्ता यांना देत आहे. म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द सदर तक्रार दाखल केली आहे व सप्टेंबर 2016 पासुन दिलेली अवाढव्य विद्युत देयके रद्द करण्याचा आदेश व्हावा म्हणून मंचाला विनंती केली आहे.
2) विरुध्द पक्षाच्या लेखी जबाबानुसार, त्यांचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याने वारंवार तोंडी विनंती केली, हे म्हणणे नाकबूल करुन, विद्युत मीटर मधुन विद्युत प्रवाह पास झाल्यावरच मीटर फिरते व त्या अनुषंगाने वापर दाखवते. विज वापरल्याशिवाय मीटर युनीट दाखवत नाही. ऑगस्ट मध्ये 7003 युनीटचा वापर झाला असुन, त्यानुसार देयक देण्यात आले आहे. दिनांक 28 सप्टेंबर 2016 रोजी तक्रारकर्त्याचे तोंडी विनंतीवरुन, पॅरलल मीटर ट्रेसींग करण्यात आली व त्यात तक्रारकर्त्याचे मीटर सदोष असल्याचे आढळून आले. त्यानुसार टेस्टींग रिपोर्ट करण्यात आला. जेंव्हा 7003 युनीट आले तेंव्हा पुरवठ्यावर काय काय जोडले होते हे माहीत नाही. तक्रारकर्त्याच्या खर्चाने मीटर तपासणी करण्यास विरुध्द पक्ष तयार आहे व अहवालात जितक्या टक्क्याने मीटर फास्ट आढळेल त्याप्रमाणे विज बील कमी करुन देण्यास तयार आहे. तरी मीटर तपासणी करुन अहवाल बोलवण्यात यावा, ही मंचास विनंती केली आहे.
3) तक्रारकर्ता यांची तक्रार, दाखल दस्तऐवज, विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब, दाखल दस्तऐवज, व उभय पक्षांचा युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निर्णय पारित करण्यात येत आहे.
तक्रारकर्ता याने विद्युत मिटर घरगुती वापरासाठी घेतले असल्याने व तो देयके भरत असल्याने, तो विरुध्द पक्ष यांचा ग्राहक होतो.
तक्रारकर्ता यांनी सर्व विज देयके दाखल केली आहेत, ती डुप्लीकेट आहेत, एकही ओरीजीनल बील सादर केलेले नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी पाठविलेली नोटीस विद्युत कायदा 2003 कलम-56 अन्वये तक्रारकर्ता यांनी दाखल केली आहे. तक्रारकर्ता यांनी कोणतीही लिखीत तक्रार विरुध्द पक्ष यांना केलेली नाही. विरुध्द पक्ष यांनी जुलै 2014 ते जुन 2017 पर्यंतचे सी.पी.एल. दस्त दाखल केलेले असुन, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेली बिले व विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेले सी.पी.एल. दस्त, यावरुन हे स्पष्ट होते की, फक्त ऑगस्ट 2015 व ऑगस्ट 2016 मध्येच विजेचा वापर वाढलेला असल्याने देयक जास्त आले आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला नोव्हेंबर 2016 मध्ये 17,503/- रुपयाची व जानेवारी 2017 मध्ये व्याज रकमेत वजावटही दिलेली आहे. तसेच विरुध्द पक्ष यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी पॅरलल मीटर टेस्टींग केल्यानंतर मीटर सदोष आढळले, यास पुष्टी अशी मिळते की, विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर मीटर तपासणीसाठी अर्ज केला आहे व निःशुल्क मीटर तपासणी करण्यास विरुध्द पक्ष तयार आहे, असे कथन केले, परंतु तक्रारकर्ता यांनी त्याला विरोध केला आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी 20/06/2016 नंतर कोणतेही देयक भरलेले नाही, तसे सी.पी.एल. दस्तातुन दिसुन येते. त्यामुळे यात विरुध्द पक्ष यांची सेवा न्युनता सिध्द होत नाही. तक्रारकर्ता हे अर्ज करुन त्यांचे मीटर विरुध्द पक्ष यांच्याकडून तपासणी करुन घेवु शकतात. त्यामुळे तक्रारकर्ता यांची तक्रार खारिज करुन, मंच पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्ता यांची तक्रार खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती शिल्पा एस. डोल्हारकर) (सौ. एस.एम.उंटवाले)
सदस्या. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri